Maharashtra

Satara

CC/10/159

shri sambhaji chandu khade - Complainant(s)

Versus

the oriental insurance company Ltd. - Opp.Party(s)

gore

03 Sep 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 159
1. shri sambhaji chandu khadeAtpost palshi tal mansatara ...........Appellant(s)

Vs.
1. the oriental insurance company Ltd.nagpur nagpurmaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :gore, Advocate for
For the Respondent :

Dated : 03 Sep 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.19
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 159/2010
                                          नोंदणी तारीख – 1/7/2010
                                          निकाल तारीख – 3/9/2010
                                          निकाल कालावधी – 62 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
 
 (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री संभाजी चंद्रु खाडे
रा. पळशी, ता.माण जि.
जि. सातारा                                       ----- अर्जदार
                                            (वकील श्री गजानन घाडगे)
      विरुध्‍द
1. श्री नरेश कांकरिया, डीव्‍हीजनल मॅनेजर,
    दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि.
    विभागीय कार्यालय, 1-15, ए.डी.कॉम्‍प्‍लेक्‍स,
    पहिला मजला, माऊंट रोड, सदर,
    नागपूर – 01
2. श्री के.एस.गाडेकर, डीव्‍हीजनल मॅनेजर,
    दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि.
    एल.आय.सी. बिल्‍डींग,
    जिल्‍हाधिकारी ऑफिससमोर, सातारा
    ता.जि.सातारा  
3. सी.यजूलू राव
    मुख्‍य कार्यकारी अधिकारी,
    मे.जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि.
    दुसरा मजला, जाईका बिल्‍डींग कमर्शियल रोड,
    सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर-440 001
4. डॉ ए.एस. कुचेवार
    मुख्‍य कार्यकारी अधिकारी,
    महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक बोर्ड, प्रतिष्‍ठाण बंगलो,
    डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषीनगर,
    अकोला – 444104                             ----- जाबदार
                                           (वकील श्री कालीदास माने)
 
 
न्‍यायनिर्णय
 
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार ही मौजे पळशी ता. माण येथील कायमचे रहिवासी आहे.   अर्जदार यांचा शेती हा व्‍यवसाय असून त्‍याला पूरक दुग्‍ध व्‍यवसाय आहे. अर्जदार यांनी त्‍यांचे मालकीच्‍या जर्सी गायीचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला आहे. सदरचे पॉलिसीचे कालावधीत अर्जदार यांची संबंधीत गाय दि. 18/8/2008 रोजी आजारी पडली. तिचेवर औषधोपचार चालू असताना दि. 23/8/2008 रोजी ती मरण पावली. तदनंतर जाबदार यांचे सूचनेप्रमाणे मृत गायीचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. सदर गायीचे नुकसानीपोटी भरपाई मिळावी म्‍हणून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसोबत दाखल केला. परंतु जाबदार यांनी कानाच्‍या तुकडयासह बिल्‍ला सादर न केल्‍याचे कारण दाखवून अर्जदार यांचा विमादावा नामंजूर केला. सबब गायीचे नुकसान भरपाईपोटी विमा दावा रक्‍कम रु.30,000/- व्‍याजासह मिळावेत, मानसिक, शारिरिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र.1 व 2 यांनी नि.14 कडे म्‍हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार महाराष्‍ट्र शासनाचे महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक डेव्‍हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी समझोता करार केला असून सदरचे करारानुसार 210 जनावरांसाठी जाबदार यांचेकडे विमा उतरविण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये अर्जदार यांचे जनावराचा समावेश आहे. सदरचे पॉलिसीची मुलभूत अटीनुसार तसेच समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्‍या जनावराचा मृत्‍यू झाला तर त्‍याचे कानात बसविलेला टॅग हा intact स्‍वरुपात जाबदार यांचेकडे संबंधीत मालकाने सादर करणे आवश्‍यक आहे. सबब अर्जदारने त्‍यांचे संबंधीत जनावराचा मृत्‍यू झालेनंतर कानाच्‍या तुकडयासह टॅग जाबदार यांचेकडे सादर करणे आवश्‍यक होते. परंतु अर्जदार यांनी मृत गायीच्‍या कानातील टॅगच जाबदार यांना सादर केलेल्‍या असल्‍याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा भंग केलेला आहे. म्‍हणून जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे. सबब जाबदार यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नसल्‍याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
 
3.    अर्जदारतर्फे वकील श्री घाडगे व जाबदारतर्फे वकील श्री माने यांचा युक्तिवाद ऐकला. 
 
4.    अर्जदारतर्फे दाखल करण्‍यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि. 5 सोबतची 8 कागदपत्रे पाहिली. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि. 15 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 16 सोबतची 12 कागदपत्रे पाहिली.
 
 
5.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               नामंजूर करणेत येत आहे.
 
कारणे
6.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, महाराष्‍ट्र शासनाचे महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक डेव्‍हलपमेंट बोर्ड, अकोला यांनी व जाईका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. यांचेबरोबर जाबदार यांनी केलेल्‍या समझोता करारातील अट क्र.6 नुसार जर विमा उतरविलेल्‍या जनावराचा मृत्‍यू झाला तर संबंधीत विमाधारकाने जाबदार यांचेकडे त्‍यांचे संबंधीत जनावराच्‍या कानाच्‍या तुकडयासह टॅग सादर करणे आवश्‍यक आहे, परंतु अर्जदार यांनी संबंधीत गायीचे कानातील टॅगच जाबदार यांना सादर केलेला नसल्‍याने अर्जदारने पॉलिसीचे अटींचा व समझोता करारातील अटीचा भंग केलेला आहे व या कारणामुळे जाबदार यांनी अर्जदारचा विमादावा नाकारलेला आहे.   अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जामध्‍ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी जाबदार यांना कानाच्‍या तुकडयासह गायीचे कानातील टॅग सादर केला आहे. परंतु सदरचे कथनाचे पृष्‍ठयर्थ अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी संबंधीत गायीचे कानातील टॅग जाबदार यांना सादर केला होता ही बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेली नाही. सदरची बाब विचारात घेता वर नमूद समझोता करारातील अट क्र.6 चे तसेच विमा पॉलिसीचे संबंधीत अट क्र.8 चे पालन अर्जदार यांनी केलेले नाही हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. सबब अर्जदार यांचा विमा दावा नाकारण्‍याची जाबदार यांची कृती ही योग्‍य व संयुक्तिक आहे असे या मंचाचे मत आहे. वरील बाबींचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
7.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार यांनी तक्रारअर्जदार यांचे नावे उतरविलेल्‍या संबंधीत गायीची विमा पॉलिसी नं.एसटीआरए 100967 सादर केलेली आहे. सदरच्‍या पॉलिसीतील अट क्र.9 नुसार यदाकदाचित संबंधीत व्‍यक्‍तीला प्रस्‍तुतच्‍या पॉलिसीअंतर्गत संबंधीत जनावरासाठी विमा रक्‍कम देय झाल्‍यास विमा कंपनी त्‍यांचेकडून देय असलेल्‍या रेटेबल प्रपोर्शनमध्‍ये रक्‍कम देणेस जबाबदार राहतील.   अर्थातच मृत जनावराचे विम्‍याची काही रक्‍कम संबंधीत करारास पक्षकार असलेल्‍या महाराष्‍ट्र शासनास द्यावी लागणार आहे. परंतु प्रस्‍तुत कामी समझोता करारातील महत्‍वाचे पक्षकार महाराष्‍ट्र लाईव्‍हस्‍टॉक डेव्‍हलपमेंट बोर्ड यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत दाखल केली नसल्‍याने जरी जाबदार क्र.1 व 2 हे संबंधीत विमा पॉलिसीअंतर्गत अर्जदारास काही रक्‍कम देणे लागत आहे अशा निष्‍कर्षाप्रत हा मंच आला तरी नेमकी किती रक्‍कम देणे जरुर आहे ही बाब निश्चित करता येत नाही. पर्यायाने प्रस्‍तुतचा अर्ज नामंजूर करणे योग्‍य ठरणारे आहे.
     
8.    या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे.
 
 
 
आदेश
 
      1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे.
      2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत.
      3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 3/9/2010
 
 
 
 
       (सुचेता मलवाडे)                            (विजयसिंह दि. देशमुख)
           सदस्‍या                                      अध्‍यक्ष
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER