नि. १७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१७३/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ८/४/२०१०
तक्रार दाखल तारीख : १३/४/२०१०
निकाल तारीख : २३/८/२०११
--------------------------------------------------------------
श्री संभाजी भगवान घाटगे
वय वर्षे ३२, धंदा - शेती व पशुपालन
मु.पो. आष्टा ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय-१, १५ ए.डी.कॉम्प्लेक्स,
माऊंट रोड, एक्स्टेन्शन, सदर, नागपूर-४४०००१ .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.एन.शेटे
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री एम.एम.दुबे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या पशु विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करतो व त्यासाठी त्याने म्हैस घेतली होती. तक्रारदाराने त्याच्या म्हैशीचा रक्कम रु.२०,०००/- इतक्या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.३१/०३/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्याकडून विमा पॉलिसी ही देण्यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेल्या म्हैशीवर दि.२२/३/०८ ते २२/३/०९ अखेर सरकारी दवाखान्यात उपचार केले. सदर उपचाराला म्हैशीने दाद दिली नाही व शेवटी डॉक्टरांनी सदरची म्हैस इथून पुढे गाभ धरणार नाही व सदरची म्हैस ही तुम्हाला भाकड म्हणूनच सांभाळावी लागेल असे सांगितल्याने सदर म्हैशीला कायमचे संपूर्ण अपंगत्व आलेमुळे विम्याची रक्कम मिळणेसाठी दि.४/४/२००९ रोजी विमाप्रस्ताव दाखल केला. सदरचा विमाप्रस्ताव दि.१५/१२/२००९ चे पत्राने खोटी कारणे देवून जाबदार यांनी नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर अन्य मागण्यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ७ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. परंतु सदर म्हैशीवर सरकारी डॉक्टरांच्याकडून उपचार केले ही बाब माहितीअभावी अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी दि.४/४/२००९ रोजी क्लेम फॉर्म भरुन दिल्याचा मजकूर जाबदार यांनी मान्य केला आहे. परंतु सदर क्लेमफॉर्ममध्ये केलेले विमाकृत म्हैशीचे वर्णन व प्रत्यक्ष विमा केलेली म्हैस यांचे वर्णनामध्ये प्रचंड तफावत आहे. त्याचप्रमाणे विमा घेत असताना त्यावर विमेदाराची सही व क्लेमफॉर्मवरील विमेदाराची सही यामध्ये तफावत असलेचे नमूद केलेले आहे. म्हैस पूर्ण भाकड झाल्यास विमारकमेच्या ७५ टक्के इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाते. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही, सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१३ ला शपथपत्र व नि.१४ चे यादीने १ कागद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.१५ ला लेखी युक्तीवाद व नि.१६ चे यादीने काही निवाडे दाखल केले आहेत. जाबदार यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला नाही अथवा त्यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादाचे दरम्यान हजर राहिले नाहीत.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार याने याकामी नि.५/६ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये विमा पॉलीसीचा कालावधी हा दि.३१/३/०८ ते ३०/०३/०९ असा नमूद आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्य केला आहे. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्याचे पञ तक्रारदार यांनी याठिकाणी नि.५/५ वर दाखल आहे. त्यामध्ये विमा दावा नाकारणेसाठी जे कारण दिले आहे, ते पुढीलप्रमाणे - पॉलिसी कव्हरनोट में तथा अन्य दावा प्रपत्रों मे. जानवर संबंधी जानकारी मे काफी विसंगतियॉं है. तक्रारदार यांचा विमादावा नाकारणेच्या कारणांचे अवलोकन केले असता नेमकी कोणती विसंगती आहे हे जाबदार यांनी स्पष्ट केलेले नाही अथवा त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. आपल्या म्हणण्यामध्ये क्लेम फॉर्मवरील वर्णन व पॉलिसीमधील वर्णन यामध्ये तफावत आहे असे नमूद केले आहे. परंतु नेमकी काय तफावत आहे याबाबत जाबदार यांनी कोणताही ऊहापोह त्यांचे म्हणण्यामध्ये अथवा विमा दावा नाकारणेच्या पत्रामध्ये केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसी व क्लेमफॉर्ममध्ये अशी तफावत दिसून येत नाही. जाबदारांनी विमादावा नाकारणेचे दुसरे कारण जे दिले आहे ते - जानवर की गर्भावस्था / प्रसुती संबंधी जानकारी में काफी विसंगती है, या कारणाचा विचार करता विमा पॉलिसीमधील प्रसुतीची तारीख मार्च २००८ नमूद केली आहे. क्लेम फॉर्म भरुन देताना सदरची तारीख ही मार्च २००८ अशीही नमूद केली आहे. त्यामुळे त्याबाबत नेमकी कोणती विसंगती आहे हे जाबदार यांनी पुराव्यानिशी शाबीत केलेले नाही. विमा दावा नाकारताना पुढे जे कारण नमूद केले आहे ते म्हणजे औषधाची बिले दाखल केली नाहीत. त्याबाबतची बिले जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडे मागितली होती याबाबत कोणताही पुरावा जाबदार यांनी मंचासमोर आणलेला नाही व तशी बिले दाखल करणे पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार आवश्यक होते व आहे हेही मंचासमोर आणले नाही त्यामुळे सदरचे कारण संयुक्तिक वाटत नाही. विमा दावा नाकारण्यास पुढे जे कारण नमूद केले आहे, ते म्हणजे विमा धारकाच्या हस्ताक्षरामध्ये फरक आढळून आला. याबाबत नेमका कोणता फरक आढळून आला हे जाबदार यांनी पुराव्यानिशी शाबीत केले नाही, त्यामुळे सदरचे कारण विमादावा नाकारण्यास संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे जाबदार यांनी ज्या कारणास्तव विमादावा नाकारला ती कारणे संयुक्तिक वाटणारी नाहीत. तक्रारदार यांनी याकामी पॉलिसीची प्रत हजर केली आहे. सदर प्रतीवर पॉलिसी नंबर एसएनजी १०४६६४ असा नमूद आहे. सदर पॉलिसीवरुन तक्रारदार यांनी त्यांच्या म्हैशीचा रक्कम रु.२०,०००/- चा विमा दि.३१/३/२००८ रोजी उतरविला आहे. तक्रारदार यांनी नि.५/२ वर वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यावर वैद्यकीय अधिका-यांनी Case of P.T.D.असे नमूद केले आहे. सदरचे प्रमाणपत्र हे पॉलिसीवर नमूद असलेल्या डॉक्टरांनी दिले असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जासोबत शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांची म्हैस भाकड झाली नाही याबाबत कोणताही पुरावा आणला नाही अथवा तक्रारदार यांनी त्यांचेकडे कोणकोणती कागदपत्रे दाखल केली याबाबत कोणताही ऊहापोह आपल्या म्हणण्यामध्ये केला नाही अथवा कागदपत्रेही सादर केली नाहीत. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये म्हैस भाकड झाली असे जरी मानले तरी करारानुसार विमा रकमेच्या ७५ टक्के इतकी रक्कम नुकसान भरपाई दिली जाते असे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या म्हैशीचा रक्कम रु.२०,०००/- चा विमा उतरविला होता, त्याच्या ७५ टक्के म्हणजे रक्कम रु.१५,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.१५/१२/२००९ पासून व्याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
५. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय न घेवून तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना म्हैशीच्या विमा दाव्यापोटी रक्कम रु.१५,०००/-
(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) दि.१५/१२/२००९ पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने
व्याजासह अदा करावेत.
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा
करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.५/१०/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २३/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.