तक्रार दाखल ता.15/04/2014
तक्रार निकाल ता.29/11/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल केली आहे.
2. प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प. तर्फे वकीलांचा तोंडी/लेखी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
तक्रारदार हे मजकूर गावचे कायमचे रहिवाशी असून मजकूर गावी त्यांची स्थावर व जंगत मालमत्ता आहे. तक्रारदारांची आई मयत होणेपूर्वी शेती हाच व्यवसाय करीत होती. तक्रारदारांचे सदर खातेचा क्र.39 असून त्यांचे नांवे 7/12 उतारा आहे. तक्रारदारांनी वि.प.कंपनीकडी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. वि.प.ही विमा कंपनी असून ती वेगवेगळया प्रकारचा विमा व्यवसाय करते. तक्रारदार हे दि.26.06.2010 रोजी त्यांचे स्वत:चे शेत गट नं.37 मध्ये शेतजमीनीमध्ये बैलांच्या सहाय्याने नांगरणीचे काम करत असताना, नांगरणीच्या फाळाला झालाचे मुळ लागलेने ते कु-हाडीचे सहाय्याने तोडणेचा प्रयत्न करत असताना अनावधानाने व अपघाताने सदरचे झाडाचे मुळावरुन कु-हाडीचा घाव सटकल्याने सदरचा घाव तक्रारदारांचे उजवे गुडघ्याचे खालील बाजूस लागलेने जब्बर जखम झालेली होती. त्यावेळी त्यांनी जखमेचे उपचाराकरीता कोल्हापूर येथील आधार नर्सिंग होम येथे दाखल करणेत आलेले होते. तेथे तक्रारदारांचे उजवे पायाजवळ बराच औषधोपचार करुनसुध्दा तक्रारदारांचा पाय बरा न होता उलट तक्रारदारांचा उजवा पाय गुडघ्याचे खालील बाजूपासून निकामी झाला आहे. सदर घटनेबाबत आधार हॉस्पीटल, कोल्हापूर येथील मेडीकल ऑफीसर शैलेंद्र यांनी मा.जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर यांचेकडे वर्दी दि.22.07.2010 रोजी दाखल केलेली होती व आहे. त्यानुसार सदरची वर्दी व त्यातील तक्रारदार यांचा जबाब नोंदवून राधानगरी पोलीस ठाणे यांचेकडे वर्ग करणेत आलेला होता व पुढील तपास राधानगरी पोलीस ठाणेमार्फत झालेला आहे. तक्रारदार यांचे उजव्या पायास अनावधनाने व अपघाताने तक्रारदारांचे उजवे पायास जखम झालेनंतर त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत विमा क्लेम रक्कम मिळावी म्हणून तालुका कृषी अधिकारी, राधानगरी यांचे माध्यमातुन वि.प.यांचेकडे योग्य त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म दि.12.10.2010 रोजी भरुन दिलेला होता. तथापि वि.प.यांनी आजअखेर तक्रारदारांचे प्रस्तुतचे क्लेमबाबत अद्याप काहीही कळविलेले नाही. तक्रारदार हे दुर्गम भागातील शेतकरी असून त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. तक्रारदार हे वि.प.कंपनीचे ग्राहक असून वि.प.कंपनीने तक्रारदारांना विनाविलंब, सुलभ व तात्काळ सेवा देणेची कायदेशीर जबाबदारी वि.प.कंपनीवर असतानासुध्दा त्यामध्ये वि.प.कंपनीने प्रचंड त्रुटी व हयगय निर्माण केलेली आहे म्हणून सदरची तक्रारदारांनी सदरची तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदारांनी वि.प.यांचेकडून तक्रारदारांना अपघाताने आले अपंगत्वामुळे जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा क्लेमची रक्कम रु.50,000/- द.सा.द.शे.15टक्के दराने वसुल होऊन मिळावे, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च वकील फीसह रक्कम रु.3,000/- अशी वि.प.यांचेकडून अदा होऊन तक्रारदारांना मिळावेत अशी सदरहू मे.मंचास विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रारीसोबत एकूण 14 कागदपत्रे दाखल केलेली असून ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. विमा प्रस्ताव क्लेम फॉम्र भाग-1, गट नं.266 चा 7/12 उतारा, जमीन खाते नं.39 चा 8अ उतारा, जुनी डापरनी नं.564 चा उतारा, विमा प्रस्ताव क्लेम फॉर्म भाग-2, तक्रारदार यांचे प्रतिज्ञापत्र, तक्रारदारांचे अपंगत्वाचा दाखला, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, आधार हॉस्पीटल यांचेकडील दाखला, आधार हॉस्पीटल यांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे यांना दिली वर्दी, जुना राजवाडा पोलीस ठाणे यांनी राधानगरी ठाणे यांना दिले पत्र, राधानगरी पोलीस यांनी केलेला घटनास्थळचा पंचनामा, जुना राजवाडा पोलीसांनी घेतलेला तक्रारदारांचा जबाब, विजय कोतेकर यांचा जबाब तसेच दि.23.08.2016 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प.यांनी दि.09.07.2014 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार साफ खोटी, लबाडीची व चुकीची असून ती वि.प.यांना कोणत्याही मान्य व कबूल नाही. तसेच सदरहू तक्रार आहे त्यास्थितीत कायदेशीररित्या चालणेस पात्र नाही, सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. तक्रारदारांचा व्यवसाय शेतजमीन व अन्य स्थावर व जंगम मालमत्तेबाबत प्रस्तुत वि.प.यांना जादा काहीही नाही. सदरील बाब तक्रारदारांनी पुराव्यानिशी शाबीत करणे जरुर आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील सर्व मजकूर साफ खोटा, लाबाडीचा व चुकीचा असून तो वि.प.यांना कोणत्याही प्रकारे मान्य व कबूल नाही. तक्रारदारांनी तिचे पतीचे अपघाती मृत्युबाबत विमा क्लेमची रक्कम मिळणेसाठी कृषी अधिकारी यांचेकडे क्लेम फॉर्म भरुन दिला होता अगर कसे याबाबत प्रस्तुत वि.प.यांना काहीही माहिती नाही. तशा प्रकारचा तक्रारदारांचा कोणताही क्लेम आजतागायत वि.प.कडे प्राप्त झालेला नाही. सबब, वि.प.यांनी तक्रारदारांना त्यांचे क्लेमबाबत काहीही कळविणेचा प्रश्नच उदभवत नाही. महाराष्ट्र शासन, कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर व वि.प.विमा कंपनी यांचे दरम्यान झाले कराराप्रमाणे व महाराष्ट्र शासनाचे अध्यादेशाप्रमाणे मयत व्यक्तीचे वारसांनी अगर जखमी विमाधारकाचे क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी करुन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत वि.प.विमा कंपनीकडे पाठविले जातात. तथापि तक्रारदाराचे अपघाताबाबत तसा कोणताही क्लेम अद्यापपर्यंत वि.प.कडे प्राप्त झालेला नाही. सबब, वि.प.कंपनीने तक्रारदारांना देणेचे सेवेमध्ये त्रुटी ठेवणेचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रार अर्जातील सर्व मजकूर साफ खोटा, लबाडीचा व चुकीचा असून तो वि.प.यांना कोणत्याही प्रकारे मान्य व कबूल नाही. सदरील तक्रार करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. जे कारण घडले असे तक्रारदार कथन करतात ते साफ खोटे, लबाडीचे व चुकीचे आहे. सबब, तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार मागतात तशी कोणतीही दाद मागणेचा त्यांना कायदेशीर अधिकार नाही अगर तशी कोणतीही दाद कायदेशीररित्या तक्रारदारांना देताच येणार नाही, तक्रारदारांची व्याजाची व शारिरीक व मानसिक त्रासापोटी व खर्चाबाबत मागणी खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी तसेच तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च तक्रारदाराकडून वि.प.यांना देणेबाबत हुकूम व्हावा अशी सदरहू मंचास वि.प.यांनी केलेली आहे.
6. वि.प.यांनी दि.10.10.2016 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल, साक्षीदार तालुका कृषि अधिकारी यांनी दि.06.06.2006 रोजी तालुका कृषिअधिकारी, राधानरी यांचे पत्र, राधानगरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना तालुका कृषी अधिकारी, राधानगरी जि.कोल्हापूर यांनी दिलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांनी दि.28.07.2016 रोजी कबाल इन्शु. ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.यांचे पत्र, इतयादी कागदपत्रे दाखल केलेली आहे.
7. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, वि.प.यांचे म्हणणे व सोबत दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवादाचा विचार करता, तक्रारदार यांचा वि.प. यांचेकडे शेतकरी व्यक्तिगत विमा योजना, या योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा हप्ता हा शासनामार्फत वि.प.कंपनीने अदा केलेला होता. दि.26.06.2010 रोजी तक्रारदार हे स्वत:चे शेतात बैलाचे सहाय्याने नांगरणीचे काम करत असताना, नांगरणीच्या फळाला झाडाचे मुळ लागलेने ते कु-हाडीचे सहाय्याने तोडणेचा प्रयत्न करत असताना अनावधाने व अपघाताने सदरचे झाडाचे मुळावरुन कु-हाडीचा घाव सरकल्याने सदरचा घाव तक्रारदारांचे उजवे गुडघ्याचे बाजूस लागलेने जखम झाली. सदरचे पायास बराच औषधोपचार करुन सुध्दा पाय बरा न होता उजवा पाय गुडघ्याचे खालील बाजूस निकामी झाला. त्याकारणाने दि.12.10.2010 रोजी तक्रारदारांनी विमा क्लेमची रक्कमेची मागणी करता, तालुका कृषी अधिकारी, यांचे माध्यमातून विमा क्लेम वि.प.यांचे पाठविलेला तथापि वि.प.यांनी आजअखेर सदर क्लेमबाबत तक्रारदारांना काहीही न कळवून तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत कामी वि.प.यांनी तक्रारदाराचे अपघाताबाबतचा कोणताही क्लेम अद्यापपर्यंत वि.प.यांचेकडे प्राप्त झालेला नाही. जखमी विमाधारकाचे क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत छाननी करुन कबाल इन्शुरन्स सर्व्हेअर यांचेमार्फत वि.प.विमा कंपनीकडे पाठविले जातात असे वि.प.यांनी लेखी म्हणणेमध्ये कथन केलेले आहे. प्रस्तुत मुद्दयांचे अनुषंगाने सदर कामी तक्रारदारांनी मंचात दाखल केलेल्या अर्जानुसार मा.मंचाने तालुका कृषी अधिकारी, राधानगरी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना साक्षी समन्स काढले. तालुका कृषी अधिकारी यांनी मा.मंचात दि.21.11.2010 रोजी सदरचा प्रस्ताव मा.जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांना पाठविलेचे पत्र दाखल केले आहे. म्हणजेच सदरचा प्रस्ताव हा मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दि.21.11.2010 रोजी प्राप्त झालेला होता. तथापि वि.प.कबाल इन्शुरन्स यांनी दि.28.01.2011 रोजी सदरचा प्रस्ताव स्विकारण्याची मुदत दि.15.11.2011 रोजी संपलेली आहे. त्यामुळे सदरचा मुदतबाहय प्रस्ताव स्विकारत नाही अशा आशयाचे पत्र तक्रारदारांना पाठविलेचे दिसून येते. तथापि सदरचे पत्र तक्रारदारांना प्राप्त झालेची पोस्टाची पोहच दाखल नसलेने सदरचे पत्र तक्रारदाराला मिळालेचे शाबीत होत नाही. अ.क्र.1 ला तक्रारदारांनी क्लेम फॉर्म दाखल केलेला आहे. सदर क्लेम फॉर्मवर तालुका कृषि अधिकारी यांनी दि.12.10.2011 रोजी स्विकारलेची पोहच असून त्यावर सही व शिक्का आहे. सबब, वरील कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी सदरचा क्लेम फॉर्म व त्यासोबतची कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी यांना दि.15.11.2010 रोजी म्हणजे मुदत संपणेपुर्वीची दि.12.10.2010 रोजी दिलेले होती. सदरचे कागदपत्रांवरुन स्पष्टपणे दिसून येते.
8. प्रस्तुत कामी, या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदारांचे अपंगत्वाचा दाखला, गांवकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, आधार हॉस्पीटलकडील दि.29.09.2011 रोजीचा दाखला, आधार हॉस्पीटल यांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेली वर्दी, राधानगरी पोलीस यांनी केलेला पंचनामा, तक्रारदारांचा जबाब, इत्यादी कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा उजवे गुडघ्याखालील पायास कु-हाडीचा घाव अनावधाने व अपघाताने लागून जबर जखम झाली होती. सदर जखेमवर आधार नर्सिंग होम येथे बराच औषधोपचार करुन सुध्दा तक्रारदारांचा पाय बरा न होता उलट उजवा पाय गुडघ्याखालील बाजूपासून निकामी झाला. त्याकारणाने, तक्रारदारांचे उजव्या पायास कायमचे अपंगत्व आलेचे स्पष्टपणे दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दि.29.09.2010 रोजीचे आधार हॉस्पीटलचे दाखल्याचे अवलोकन केले असता, He has undergone RT B.K.Amuptation on 07.07.2010 नमुद असून त्यावर डॉ.शैलेंद्र नवले यांची सही आहे. तसेच छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पीटल, कोल्हापूर यांचे डिसॅबिलीटी सर्टिफिकेटचे अवलोकन केले असता,
Percentage of Disability -60%
परिच्छेद क्र. 4(vi) ST- Can perform work by standing –No
4(vii) W –Can perform work by walking –No
सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे उजव्या पायात पुर्णपणे अपंगत्व आलेले होते हे सिध्द होते.
9. शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली कल्याणकारी योजना असून अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असलेने शेतक-यांसाठी कार्यान्वीत केलेली योजना आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, तक्रारदारांच्या उजव्या पायास पुर्णपणे अपंगत्व होते. तक्रारदारांनी सदरचा क्लेम फॉर्म दि.12.10.2010 रोजी तालुका कृषीअधिकारी यांचेकडे दिलेला होता. सदरचा क्लेम फॉर्म स्विकारणेची दि.15.11.2011 रोजी पर्यंत मुदत होती. परंतु तालुका कृषी अधिकारी, राधानगरी, यांनी सदरचे कागदपत्रे, मुदतीत पाठविली नसलेने तक्रारदारांच्या कायदेशीर हक्क डावलणे न्यायोचित होणार नाही. सबब, पॉलीसीचा मुळ हेतु विचारात घेता, तक्रारदार हे विमा रक्कम रु.50,000/- (अक्षरी रक्कम रुपये पन्नास हजार फक्त) मिळणेस पात्र आहेत. सदर रक्कमेवर व्याज मिळणेस अपात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना पॉलीसीप्रमाणे असलेली विमा रक्कम रु.50,000/- (अक्षरी रक्कम रुपये पन्नास हजार फक्त) ही आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत अदा करावी.
3 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.