नि. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३८८/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १६/१२/२००८
तक्रार दाखल तारीख : २४/१२/२००८
निकाल तारीख : १२/०३/२०१२
----------------------------------------------------------------
श्री अतुल मोहन पेटकर
व.व.२९, धंदा – व्यापार
रा.विष्णू गल्ली, तासगांव ..... तक्रारदारú
विरुध्दù
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
कृष्णा कॉम्प्लेक्स, शिवाजी स्टेडियमसमोर,
सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.व्ही.जी.बाबर
जाबदार तर्फे : +ìb÷.सौ एम.एम.दुबे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या अपघाती विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी प्रवासी वाहतूक करण्यासाठी टाटा इंडिका हे वाहन खरेदी केले. सदर वाहनाचा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा उतरविला. तक्रारदार हे दि.५/९/२००८ रोजी वासुंबे तासगांव या रस्त्यावरुन गाडीमध्ये स्वत: एकटेच जात असताना सदर वाहनाचा अपघात झाला. सदर अपघाताची माहिती तक्रारदार यांनी जाबदार यांना लेखी कळविली. जाबदार यांनी अपघाती वाहनाचा सर्व्हे करण्यासाठी श्री सुयोग कुलकर्णी यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली. सर्व्हेअर यांनी वाहनाचा सर्व्हे केला व योग्य ती तपासणी करुन वाहन दुरुस्त करुन घेण्यास सांगितले. अर्जदार यांनी सदरचे वाहन पंडीत +ìटोमोटीव्ह यांचेकडून दुरुस्त करुन घेतले व सदरची बिले व इतर अन्य कागदपत्रे जोडून जाबदार यांचेकडे विमा प्रस्ताव सादर केला. जाबदार यांनी अपघाताचे वेळेस अर्जदार याचेकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता तसेच आर.टी.ओ.कार्यालयाकडील बॅज नंबर अपघातानंतर प्रदान केल्याच्या कारणावरुन पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग झाला असे कळवून अर्जदार यांचा विमादावा नाकारला. वास्तविक तक्रारदार यांचेकडे वाहन चालविण्याचा परवाना दि.१३/७/२०११ पर्यंत वैध आहे. तक्रारदार यांनी बॅज नंबर मिळविण्यासाठी दि.३/८/२००८ रोजी अर्ज केलेला होता व त्याबाबत आवश्यक ती कागदपत्रे देण्यात आली होती. वैध बॅज नंबर असल्याशिवाय वाहन चालविता येणार नाही असे कोणतेही कारण विमा पॉलिसीमध्ये नमूद नाही. परंतु जाबदार यांनी चुकीच्या कारणाने तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च मिळणेसाठी व इतर तदानुषंगिक मागणीसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे वाहनाचा विमा जाबदार यांचेकडे उतरविला आहे ही बाब मान्य केली आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये सदर वाहनास अपघात झाल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार यांना त्वरित कळविल्याची बाब अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना अपघाताची सूचना दिलेनंतर जाबदारांच्या तर्फे माहितगार इसमांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केलेली आहे तथापि तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांच्या सांगण्यानुसार वाहन पंडीत +ìटोमोटीव्ह यांचेकडे दुरुस्तीसाठी दिल्याची बाब खरी नाही. जाबदार यांनी वेळोवेळी कागदपत्रांची मागणी करुनही तक्रारदार यांनी कागदपत्रे सादर करण्यास विलंब केला त्यामुळे तक्रारदार यांच्या विमादाव्याबाबत निर्णय घेण्यास विलंब झाला आहे. तक्रारदार यांना अपघातसमयी इंडिका कारसारखे प्रवासी वाहतुकीचे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तसेच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनचालकास कायद्यानुसार योग्य ते प्रशिक्षण देवून बॅच नंबर दिला जातो. असा बॅच नंबरही तक्रारदार यांना नव्हता. या सर्व अटींचा खुलासा करुन नुकसान भरपाई देता येत नाही असे तक्रारदार यांना दि.२०/११/२००८ रोजीच्या पत्राने कळविले आहे. तक्रारदार यांचेकडून पॉलिसीतील महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग झाला असल्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारलेला आहे. जाबदार यांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिली नाही. या सर्व बाबींचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१५ ला प्रतिज्ञापत्र व नि.१६ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१७ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणण्यातील मजकुर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.११ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.१९ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपत्रे, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांनी घेतलेल्या विमा पॉलिसीची प्रत नि.५/३ वर दाखल केली आहे. सदर पॉलिसीवरुन विम्याचा कालावधी हा दि.२९/२/२००८ ते २८/२/२००९ असा आहे. सदर वाहनास अपघात हा दि.५/९/२००८ रोजी विमा मुदतीत झाला आहे असे तक्रारदार यांनी कथन केले आहे. अपघात झाल्याबाबत तक्रारदार यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. तथापि, जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यातील कलम ४ मध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांना अपघाताची सूचना दिल्यानंतर जाबदारांचे तर्फे माहितगार इसमांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे वाहनास विमा मुदतीत अपघात झाला ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी ज्या कारणास्तव नाकारला आहे, ते विमादावा नाकारलेचे पत्र तक्रारदार यांनी नि.५/८ वर दाखल केले आहे. सदर पत्रामध्ये अपघाताचे वेळेस वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता तसेच आर.टी.ओ. कार्यालयाकडून वाहनचालकास अपघातानंतर बॅच नंबर देण्यात आला आहे, त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो या कारणास्तव विमादावा मंजूर होण्यास पात्र नाही असे जाबदार यांनी कळविले आहे. जाबदार यांनी विमादावा नाकारण्यास दिलेले कारण योग्य आहे का ? हे प्रस्तुत प्रकरणी पाहणे गरजेचे आहे. जाबदार यांनी आपले म्हणणेमध्ये व युक्तिवादामध्ये तक्रारदार यांचेकडे Transport या प्रकारचे वाहन चालविणेचा परवाना नव्हता असे नमूद केले. तक्रारदार यांनी त्यांचेकडे असलेल्या वाहनाच्या आर.सी.बुकची प्रत याकामी दाखल केली आहे. सदरचे वाहन हे लाईट मोटार व्हेईकल टूरिस्ट या प्रकारातील आहे. जाबदार यांनी नि.२२/१ वर आर.टी.ओ. कार्यालयातील दाखला दाखल केला असून सदर दाखल्यावरुन तक्रारदार यांचेकडे एल.एम.व्ही.(एन.टी.) व एल.एम.व्ही.(टी.आर.) अशा दोन्ही प्रकारचे परवाने दि.२०/९/२००० ते १४/७/२००८ या कालावधीपर्यंत असल्याचे दिसून येते. तसेच सदरचे परवान्याचे दि.१४/७/२००८ ते १३/७/२०११ या कालावधीसाठी नूतनीकरण करुन घेतले आहे. यावरुन तक्रारदार यांचेकडे अपघातसमयी वाहन चालविण्याचा एल.एम.व्ही.(ट्रान्स्पोर्ट) या प्रकारचा परवाना होता ही बाब स्पष्ट होते. सदरचा परवाना वैध नाही असे दाखविण्यासाठी जाबदार यांनी इतर अन्य कोणताही पुरावा अथवा तरतूद मंचासमोर स्पष्ट केली नाही. त्यामुळे टूरिस्ट प्रकारचे लाईट मोटर व्हेईकल चालविण्यासाठी एल.एम.व्ही.(ट्रान्स्पोर्ट) हा परवाना वैध होईल असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे या कारणास्तव तक्रारदार यांचा विमादावा नाकारता येणार नाही.
६. तक्रारदार यांचा विमादावा नाकारण्यास जाबदार यांनी जे दुसरे कारण नमूद केले आहे ते सदरचे वाहन हे टूरिस्ट या प्रकारचे असल्यामुळे व तक्रारदार यांना त्यासाठीचा बॅच हा अपघातानंतर दिला असल्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो असे जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले. तक्रारदार यांना बॅच नंबर दि.२३/९/२००८ रोजी देण्यात आला आहे ही बाब जाबदार यांनी दाखल केलेल्या नि.२३/१ वरील दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते परंतु केवळ बॅच नंबर नाही या कारणास्तव विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग होतो का ? व सदरची अट महत्वाची आहे का ?हे प्रस्तुत प्रकरणी पाहणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी याकामी नि.५/३ वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये अशी कोणतीही अट असल्याचे दिसून येत नाही. जाबदार यांनी पॉलिसीमधील नेमक्या कोणत्या तरतुदीमुळे पॉलिसीतील अटीचा भंग होतो हे मंचास दाखवून दिलेले नाही. अपघातसमयी तक्रारदार हे प्रस्तुत वाहनातून एकटेच प्रवास करीत होते व ते स्वत चालवित होते, हीही बाब याठिकाणी विचारात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झाला या कारणास्तव जाबदार यांनी विमादावा नाकारला ते कारण मंचास योग्य वाटत नाही. जाबदार यांनी तक्रारदारांचा विमादावा अयोग्य कारणास्तव नाकारलेने तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
७. तक्रारदार यांनी सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.२७,१२९/-, धंद्याचे झालेले नुकसान रु.२५,०००/-, मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.२५,०००/-, जाबदार यांनी तात्काळ अर्थसहाय्य न केलेने झालेले नुकसान रु.२५,०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.५,०००/- इ. रकमांची मागणी केलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या वाहनाबाबत सर्व्हेअर यांचेकडे सर्व कागदपत्रे दाखल केली होती. सर्व्हेअर यांनी एस्टिमेट केले असे तक्रारदार यांनी नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये व युक्तिवादामध्ये अपघाताची सूचना दिलेनंतर जाबदारतर्फे माहितगार इसमाने अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केलेली आहे असे नमूद केले आहे. परंतु असा कोणताही सर्व्हे रिपोर्ट जाबदार यांनी याकामी हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारअर्जामध्ये जाबदार यांचेकडे संपूर्ण दुरुस्तीची बिले सादर केली असे नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणी दुरुस्तीस आलेल्या बिलांच्या प्रती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये पंडीत ऑटोमोटीव्ह यांचे रु.२२,१२९/- चे बिल झाल्याचे दिसून येते व अशोक ऑटोमोटीव्ह सेल्स ऍण्ड सर्व्हिसेसचे रक्कम रु.४,०५०/- चे बिल झाल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारअर्जामध्ये अशोक ऑटोमोटीव्ह यांचेकडे कोणत्या कारणासाठी वाहन दुरुस्तीसाठी दिले होते हे नमूद केलेले नाही. केवळ पंडीत ऑटोमोटीव्ह यांच्याकडून वाहन दुरुस्त करुन घेतले असे नमूद केले आहे. जाबदार यांनीही त्यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला नाही. त्यामुळे पंडीत ऑटोमोटीव्ह यांचेकडे वाहन दुरुस्तीसाठी आलेल्या खर्चाची रक्कम रु.२२,१२९/- ही विमा दावा नाकारले तारखेपासून म्हणजे दि.२०/११/२००८ पासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी धंद्याचे झालेले नुकसान व जाबदार यांनी लगेच अर्थसहाय्य न केलेमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम मिळावी याबाबत केलेली विनंती अमान्य करण्यात येत आहे.
८. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव नाकारलेने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये २२,१२९/-(अक्षरी रुपये
बावीस हजार एकशे एकोणतीस माञ) दि.२०/११/२००८ पासून द.सा.द.शे.९% दराने
व्याजासह अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक २७/५/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १२/०३/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.