Maharashtra

Chandrapur

CC/19/44

Shri Manish Nageshwar Deurmale - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company ltd. Through Branch Manager - Opp.Party(s)

N M Naukarkar

04 Apr 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/44
( Date of Filing : 27 Mar 2019 )
 
1. Shri Manish Nageshwar Deurmale
Pombhurna Tah.Pombhurna Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company ltd. Through Branch Manager
The Oriental Insurance Company Ltd. L.T.V. Shalechya Bajula,Main Road, Chandrapur, Tah.Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. Jayaka Insurance Brokerage Pra.ltd.
Dusara Majala, Jayaka Building Commercial Road, Civil Line,Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
3. Taluka Krushi Adhikari
Sindewahi, Tah.Sindewahi Dist.Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Vaishali R. Gawande PRESIDENT
 HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Apr 2024
Final Order / Judgement

 (पारित दिनांक ०४/०४/२०२४)

आयोगाचे आदेशान्‍वये श्रीमती वैशाली आर. गावंडे, मा. अध्‍यक्ष

  1. प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्‍यात पुढीलप्रमाणे.
  2. तक्रारकर्त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याचे वडिल हे शेतकरी असून त्‍यांच्‍या मालकीची मौजा पोंभुर्णा, तहसील पोंभुर्णा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन/सर्व्‍हे क्रमांक ७६३ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा दिनांक २४/०७/२०१८ रोजी रस्‍त्‍यावर वाहन अपघातात मृत्‍यु झाला.
  3. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा शेतकरी अपघात विमा काढलेला असून त्‍याच्‍या वडिलांचा वाहन अपघातात गंभीर दुखापत होऊन  मृत्‍यु झाला. कारणाने त्‍याचे कुटूंब गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा लाभ मिळण्‍यास पाञ आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक १२/०९/२०१८ रोजी  विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विहीत मुदतीत विमा दावा प्रस्‍ताव  सादर केला आणि आवश्‍यक कागदपञांची पुर्तता केली.
  4. तक्रारकर्त्‍यानुसार तक्रारकर्ता विमा रक्‍कम मिळण्‍याकरिता वारंवार प्रयत्‍न करीत राहिला परंतु विमा रक्‍कम न मिळाल्‍याने तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी त्‍याचा विमा दावा कोणतेही कारण नसतांना तसेच आवश्‍यक त्‍या कागदपञांची पुर्तता केल्‍यानंतरही फेटाळला. कारणाने त्‍याने आयोगासमोर सदरचे प्रकरण दाखल करुन तक्रार अर्जात नमूद प्रार्थनेनुसार मागणी केलेली आहे.
  1. तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रार अर्जासोबत निशानी क्रमांक ४ वरील यादीनुसार एकूण १५ दस्‍तावेज दाखल केलेले आहेत.
  2. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस  काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांना आयोगामार्फत नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा ते प्रकरणात हजर न झाल्‍यामुळे दिनांक १/१/२०२० रोजी प्रकरण विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचा आदेश करण्‍यात आला.  

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी प्रकरणात हजर होऊन त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नुसार तक्रारकर्त्‍याने सादर केलेले दस्‍तऐवज क्रमांक १ ते ७ चे अवलोकन केले असता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना तक्रारकर्त्‍याने विमा दावा सादर केल्‍याबाबत कोणतेही पोच पावती आढळून येत नाही तसेच दस्‍त क्रमांक १६ वर तक्रारकर्त्‍याची सही नाही. कारणाने तक्रारकर्त्‍याने दिनांक १२/९/२०१८ रोजी विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर केला हे तो खोटे सांगत आहे व आयोगाची दिशाभूल करीत आहे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ पुढे नमूद करतात की, दिनांक २४/७/२०१८ रोजीच्‍या प्रथम खबरी अहवालानुसार सदर घटनेत एकूण दोन मोटर वाहनांचा समावेश दिसून येतो तसेच पोस्‍ट मार्टम अहवालावरुन स्‍पष्‍ट होत आहे की, मृतकाच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्‍याचा मृत्‍यु झाला.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नुसार मयत शेतकरी याने शिरस्‍ञान (हेलमेट) न घालता गाडी चालविली हो मोटर वाहन कायद्याचे उल्‍लंघन आहे. कारणाने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी मयत शेतकरी यांचा वाहन परवाना सादर करणे तक्रारकर्त्‍याला आवश्‍यक केले आणि वाहन परवाना सादर न केल्‍याने सदरहू विमा दावा अर्ज फेटाळला. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ नुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा किंवा अनुचित व्‍यापार पध्‍तीचा अवलंब केला नाही. कारणाने त्‍यांचेविरुध्‍दचा दावा खारीज करण्‍यात यावा.

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार, तक्रार अर्जाच्‍या समर्थनार्थ दाखल केलेले निशानी क्रमांक ४ वरील यादीनुसार एकूण १५ दस्‍तऐवजाचे तसेच उभयपक्षांचे परस्‍परविरोधी कथन तसेच लेखी व तोंडी युक्तिवादाचे अवलोकन करुन सदर तक्रार निकाली काढण्‍याकरिता आयोग पुढीलप्रमाणे कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करीत आहे.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याचे वडिल मयत नागेश्‍वर तानुजी देऊरमल्‍ले  याचा मृत्‍यु दिनांक १२/०९/२०१८  रोजी रस्‍त्‍यावर वाहन अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन झाला.  तसेच त्‍याच्‍या नावे शेतजमीन असून तो शेतकरी आहे व शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍याच्‍या कुटुंबाचे पालनपोषन होत आहे व सदरहू वाहन अपघातात समोरच्‍या वाहनाने धडक दिल्‍याने शेतक-याच्‍या  डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्‍याचा मृत्‍यु झाला आहे या बाबी सिध्‍द होत आहेत.  
  2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकरी कुटूंबातील कोणत्‍याही एका व्‍यक्‍तीचा अपघात झाल्‍याने शेतकरी कुटूंब सदर विमा योजनेच्‍या लाभास पाञ ठरतात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचेकडे रितसर विमा प्रस्‍ताव दाखल करुन आवश्‍यक त्‍या कागदपञांची पुर्तता केली तसेच सदर वाहन अपघातात केवळ शेतक-याची चुक होती ही बाब विरुध्‍द पक्ष क्रमांक १ सिध्‍द करु शकले नाही किंवा वाहन अपघातात वाहन चालकाची जबाबदारी सिध्‍द करणाने कोणतेही कागदोपञी पुरावे विरुध्‍द पक्ष यांनी सादर केले नाही. कारणाने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी विमा दावा नाकारण्‍याचे  कारण आयोगास संयुक्तिक वाटत नाही तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही सामाजिक न्‍याय तत्‍वाचे अनुषंगाने संयुक्‍तीक वाटत असल्‍याने आयोग पुढीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्रमांक CC/१९/४४ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याप्रति अनुचित व्‍यापार पध्‍दती तसेच न्‍युनतापूर्ण सेवा प्रदान केली असल्‍याचे आयोग घोषित करीत आहे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा रक्‍कम रुपये २,००,००० द्यावे तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक २७/०३/२०१९ पासुन ते  प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम ४५ दिवसाचे आत द्यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला दाव्‍याची रक्‍कम न दिल्‍याने झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- अदा करावे.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे विरुध्‍द दाखल करण्‍यात आलेली तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MRS. Vaishali R. Gawande]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.