Maharashtra

Nagpur

CC/496/2017

NITIN MURLIDHAR AGRAWAL - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD., DIVISIONAL OFFICE-3, THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. HARNISH R. GADHIA

17 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/496/2017
( Date of Filing : 13 Nov 2017 )
 
1. NITIN MURLIDHAR AGRAWAL
R/O. MITTAL VILLA, 222, EAST WARDHAMAN NAGAR, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD., DIVISIONAL OFFICE-3, THROUGH DIVISIONAL MANAGER
CHHAPRU NAGAR CHOWK, C.A.RAOD, NAGPUR-440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. HARNISH R. GADHIA, Advocate for the Complainant 1
 
Dated : 17 Mar 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  त्‍याचे वाहन क्रं. MH 40 KR6522 या Toyota  Fortuner  वाहनाचा Bajaj Allianz General Insurance Company Limited यांच्‍याकडून दि. 15.02.2015 पर्यंत विमा सेवा घेतली होती. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष ओरिएण्‍टल इंश्‍योरंस कं.लि. यांच्‍याकडून वरील नमूद वाहनाचा दि. 16.02.2015 ते 15.02.2016 या कालावधीकरिता विमामुल्‍य रुपये 14,31,449/- करिता विमा पॉलिसी क्रं. 181300/31/2015/4392 अन्‍वये विमा उतरविला होता. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला No Claim Bonus म्‍हणून विमा पॉलिसी  निर्गमित केली होती.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या वाहनाला दि. 19.08.2015 ला रात्री 8.00 वा.अमरावती रोडवर अपघात झाला व अपघातामध्‍ये त्‍याच्‍या वाहनाचे मोठे नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन दुरुस्‍त केले व दि. 20.08.2015 ला विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव सादर केला. तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने आधिच्‍या विमा कंपनीकडून स्‍वीकारलेल्‍या विमा दाव्‍याबाबत चौकशी सुरु केली. संपूर्ण चौकशीनंतर विरुध्‍द पक्षाच्‍या लक्षात आले की, तक्रारकर्त्‍याने आधिच्‍या विमा कंपनीकडून एका छोटया अपघातामध्‍ये उजव्‍या बाजुचा आरसा क्षतिग्रस्‍त झाल्‍याबाबत रुपये 17,952/- इतक्‍या रक्‍कमेचा विमा दावा घेतलेला आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी निर्गमित करतानां नो क्‍लेम पॉलिसी अंतर्गत अदा केलेली विमा हप्‍ता रक्‍कम व विमा पॉलिसी अंतर्गत अदा करावयाची रक्‍कम यातील फरकाची रक्‍कम अदा करावयास सांगितली व सांगितले की, जो पर्यंत विमा पॉलिसी हप्‍त्‍यामधील फरकाची रक्‍कम भरीत नाही तो पर्यंत तक्रारकर्त्‍याच्‍या विमा पॉलिसी दाव्‍याबाबत पुढील आवश्‍यक कार्यवाही करता येणार नाही. त्‍याप्रमाणे

तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी अंतर्गत अदा करावयाची फरकाची रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे जमा केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पॅकेज पॉलिसी – Endorsement  Schedule दि. 14.09.2015 रोजी अदा केली होती व  त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याकडून  नो क्‍लेम बोनस वसूल करण्‍यात आले आणि पॉलिसीमधील इतर शर्ती व अटी यामध्‍ये काहीही बदल करण्‍यात येणार नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, मध्‍यतंरी त्‍याचे वाहन मेसर्स कॉस्‍मीक ग्रेस अॅटो (इंडिया) प्रा.लि. यांच्‍याकडून दुरुस्‍त करण्‍यात आले व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने स्‍वतः रुपये 1,17,231/- इतके अदा केले होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा ( Due to non-disclosure of material fact ) माहिती लपवून ठेवल्‍याच्‍या कारणाने नाकारण्‍यात आल्‍याचे तक्रारकर्त्‍याला दि. 18.12.2015 चे पत्रान्‍वये कळविले. तक्रारकर्त्‍याने दि. 20.08.2015 ला सादर केलेला विमा दावा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीनुसार मंजूर करण्‍या योग्‍य नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारण्‍यात आल्‍याचे कळविले होते.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमा पॉलिसी घेतांना संपूर्ण दस्‍तावेज सादर केल्‍यानंतर त्‍यांनी आधिच्‍या विमा कंपनीकडे कोणतीही चौकशी न करता तक्रारकर्त्‍याला नो क्‍लेम बोनस अंतर्गत विमा हप्‍त्‍यात सुट देऊन विमा पॉलिसी निर्गमित केली होती. परंतु तक्रारकर्त्‍याने वाहनाच्‍या अपघाताबाबत झालेल्‍या नुकसानीबाबत विमा दावा सादर केला असता विरुध्‍द पक्षाने आधिच्‍या विमा कंपनीने दिलेल्‍या छोटया विमा दाव्‍याच्‍या रक्‍कमेची माहिती घेतली आणि तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवून विमा दाव्‍याच्‍या रक्‍कमेची मागणी केली होती, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीस दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने   वाहन क्रं. MH40 KR6522 या Toyota  Fortuner  वाहनाचा Bajaj Allianz General Insurance Company Limited यांच्‍याकडून दि. 15.02.2015 पर्यंत विमा सेवा घेतली होती आणि त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वरील नमूद वाहनाचा दि. 16.02.2015 ते 15.02.2016 या कालावधीकरिता विमामुल्‍य रुपये 14,31,449/- करिता विमा पॉलिसी क्रं. 181300/31/2015/4392 अन्‍वये विमा उतरविला होता याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाचा विमा काढतांना पूर्वीच्‍या विमा कंपनीकडून विमा दावा घेतल्‍याची माहिती लपवून ठेवली होती. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी फॉर्म मध्‍ये दिलेल्‍या डिक्‍लरेशनच्‍या आधारावर  आणि सोबत दिलेल्‍या दस्‍तावेजाच्‍या आधारे नो क्‍लेम बोनस अंतर्गत विमा पॉलिसी निर्गमित केली होती व त्‍याप्रमाणे विमा हप्‍ता रक्‍कम अदा करावयास सांगितली होती.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाला अपघात झाले असता तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत पोलिस तक्रार केली नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रारकर्त्‍याने दि. 20.08.2015 रोजी विमा दावा सादर केला व विरुध्‍द पक्षाला सदरचा विमा दावा दि. 21.08.2015 ला प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा सादर केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने आधिच्‍या विमा पॉलिसीबाबत चौकशी सुरु केल्‍याचे कथन अमान्‍य केले. जेव्‍हा विमाधारक आपला विमा दावा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे सादर करतात त्‍यावेळी प्रत्‍येक प्रकरणात विमा कंपनी त्‍यांच्‍या पूर्वीचे विमा पॉलिसीबाबत चौकशी करते. तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रस्‍ताव दाखल केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने बजाज अलायन्‍स इन्‍श्‍युरन्‍स कंपनी यांच्‍याकडून माहिती प्राप्‍त केली असता तक्रारकर्त्‍याने विमा कंपनीने (बजाज अलायन्‍स ) यांच्‍याकडून विमा दावा रक्‍कम रुपये 17,952/- दि. 04.09.2015 ला प्राप्‍त केली होती. विमाधारकाने विमा पॉलिसी घेतांना प्रपोजल फॉर्म मध्‍ये अ.क्रं. 7 मध्‍ये खालीलप्रमाणे डिक्‍लरेशन दिले आहे.

Declaration

I Declare that the rate of NCB stated above is correct and that no claim is arisen in the expiring policy, I further undertake that if this declaration is found to be incorrect, all benefits under the policy will stand forfeited.

त्‍यामुळे विमा हप्‍त्‍याचा हिशोब करतांना तक्रारकर्त्‍याला नो क्‍लेम बोनसची पॉलिसी मंजूर करतांना विम्‍याच्‍या फरकाची रक्‍कम भरण्‍यास कळविल्‍याचे कथन नाकारलेले आहे. तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी घेतांना चुकिचे डिक्‍लरेशन प्रपोझल फॉर्म मध्‍ये नमूद केले असल्‍यामुळे त्‍यापासून होणा-या परिणामा पासून सुटका मिळण्‍याकरिता नो क्‍लेम बोनस पोटी घेतलेल्‍या सुटची रक्‍कम रुपये 14,212/- परत करण्‍याचा मार्ग निवडला व  त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विमा फरकाची रक्‍कम रुपये 14,212/- ही दि. 14.09.2015 ला विरुध्‍द पक्षाकडे जमा केली. तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने सर्वेअर म्‍हणून श्री.अनिल एस. साखरकर यांची नियुक्‍ती केली, त्‍याप्रमाणे सर्वेअरने दि. 29.08.2015 ला अहवाल सादर केला होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडून पॉलिसी घेतांना 35 टक्‍के नॉ क्‍लेम बोनस घेतला होता विमा पॉलिसीच्‍या फरकाची रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे भरल्‍यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा योग्‍य कारणाने नाकारला आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन मे. कॉस्‍मॉस ग्रेस (इंडिया) प्रा.लि. यांच्‍याकडून दुरुस्‍त केल्‍याची बाब मान्‍य केली आहे. विमाधारक व विमा कंपनी यांच्‍यामधील विमा करार हा  UTMOST GOOD FAITH या तत्‍त्‍वावर स्‍वीकारला जातो. परंतु त्‍यामध्‍ये चुकिची माहिती पुरविल्‍यास अशा वेळी विमा पॉलिसी निरर्थक समजल्‍या जाते.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.

 

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ             होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ     नाही

 

  1. काय आदेश ॽ                         अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने वाहन क्रं. एम.एच.40 के.आर. 6522 या टोयाटो वाहनाची बजाज अलायन्‍स जनरल इन्‍श्‍युरन्‍स कं.लि. या विमा कंपनीकडून दि. 15.02.2015 पर्यंत विमा सेवा घेतली होती. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वरील नमूद वाहनाचा दि. 16.02.2015 ते 15.02.2016 या कालावधीकरिता विमामुल्‍य रुपये 14,31,339/- एवढया रक्‍कमेकरिता पॉलिसी क्रं. 181300/31/2015/4392 अन्‍वये विमा उतरविला होता व सदरच्‍या पॉलिसीकरिता प्रपोझल फॉर्म मध्‍ये नमूद केलेल्‍या डिक्‍लेरेशनच्‍या आधारावर  तक्रारकर्त्‍याला नो क्‍लेम बोनस अंतर्गत 12,435/- रुपयाची सुट दिलेली पॉलिसी निर्गमित केली असल्‍याचे दस्‍ताऐवज क्रं. 2 (बी) वरुन  दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा दि. 19.08.2015 रोजी रात्री 8.00 वा. अमरावती रोडवर अपघात झाल्‍याने सदरचे वाहन दुरुस्‍त करुन त्‍याबाबतचा विमा प्रस्‍ताव दि. 20.08.2015 ला सादर केला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली काढण्‍यापूर्वी आधिच्‍या विमा कंपनीकडून (Bajaj Allianz General Insurance Company Limited) विमा दावा बाबतची चौकशी केली असता तक्रारकर्त्‍याने दि. 04.09.2015 ला विमा दावा रुपये 17,952/- स्‍वीकारलेला असल्‍याची माहिती प्राप्‍त झाली. तक्रारकर्त्‍याने प्रपोझल फॉर्म मध्‍ये डिक्‍लेरेशन मध्‍ये चुकिची माहिती नमूद केलेली आहे व विमा करार हा Uberrima fides या तत्‍वावर आधारित असतो. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने त्‍याचे कार्यालयीन पत्र क्रं. 18.12.2015 अन्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍याचे दस्‍तावेज 2 (आय) वरुन दिसून येते. विमाधारक व विमा कंपनी यांच्‍यामधील विमा करार हा  UTMOST GOOD FAITH या तत्‍त्‍वावर स्‍वीकारला जातो. परंतु विमाधारकाने प्रपोझल फॉर्म मध्‍ये चुकिची माहिती पुरविल्‍यास अशा वेळी विमा पॉलिसी निरर्थक समजल्‍या जाते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍या योग्‍य आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.                                                                                                                                                                                                                                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

ंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.

 

  1. उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.