Maharashtra

DCF, South Mumbai

MA/21/103

CHHAYA ARUN TULE - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD THROUGH ITS MANAGER - Opp.Party(s)

ABHAYKUMAR N JADHAV GANESH SHIKHARE

10 Jan 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/21/103
( Date of Filing : 22 Jun 2021 )
In
Complaint Case No. CC/21/177
 
1. CHHAYA ARUN TULE
LAKHANGAON TAL AMBEGAON DIST PUNE
...........Appellant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE COMPANY LTD THROUGH ITS MANAGER
MAYFAIR TOWERS 1ST FLOOR PUNE MUMBAI ROAD WAKDEWADI SHIVAJI NAGAR PUNE 411005
2. GOVT OF MAHARASHTRA THROUGH ITS HONBLE SECRETARY AGRICULTURE ANIMAL HUSBANDRY DAIRY DEVELOPMENT AND FISHERY DEPARTMENT
5TH FLOOR MANTRALAYA MUMBAI 400 032
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Jan 2022
Final Order / Judgement

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

    तक्रारदार वकील श्री. अभयकुमार जाधव. सामनेवाले 1 यांचे वकील श्री.सचिन राजे हजर. सामनेवाले 2 पुकारले असता गैरहजर. सदर प्रकरणामध्‍ये तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या विलंब माफीच्‍या अर्जावर सामनेवाले 1 यांनी दि.25.10.2021 रोजी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले असून सामनेवाले क्र. 2 यांचे म्‍हणणे आयोगाच्‍या आवक कक्षात दि. 30.09.2021 रोजी आवक क्र.589 अन्‍वये प्राप्‍त झाले आहे. सदर प्रकरणामध्‍ये नमूद तक्रारदार हे शेतकरी कुटुंबातील असून अशिक्षित व आर्थीकदृष्‍टया दुर्बल असल्‍याने सदर योजनेबाबत  त्‍यांना माहित झाल्‍यावर प्रस्‍तूत तक्रार दाखल करणेकामी झालेला 02 वर्ष 05 महिने व 22 दिवसांचा विलंब माफ करण्‍यात यावा असा अर्ज तक्रारदारांनी दाखल केला आहे सामनेवाले 1 यांनी त्‍यावर म्‍हणणे दाखल करुन त्‍यांचा आक्षेप नोंदविला असून सदर विलंबा बाबतचे  ठोस कारण  तसेच सदर विलंब झाल्‍याबाबतचा प्रत्‍येक दिवसाचा तपशील तक्रारदारांनी दिला नसल्‍याने तक्रारदारांचा प्रस्‍तूत अर्ज फेटाळण्‍यात यावा असा युक्‍तीवाद  सामनेवाले 1 यांनी केला आहे. सामनेवाले 2 यांनी सदर प्रकरणामध्‍ये सदर प्रकरणात नमूद विमा प्रस्‍ताव  तालुका कृषी अधिकारी  कार्यालयामार्फत  दि.05.05.2017 रोजी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्‍त झाला सदरचा प्रस्‍ताव हा  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयादवारे दि.17.09.2017 रोजी  जयका इंन्‍शुरन्‍स बोकरेज प्रा.लि. नागपूर, पुणे  विमा सल्‍लागारा मार्फत  ओरियंटल इंन्‍शुरन्‍स कं. यांचेकडे पाठविला व सदर प्रकरणात नमूद अपघातग्रस्‍त शेतक-याचे नाव 6 ड योजना कालावधी पूर्वीचे नसल्‍या कारणाने दावा बंद करण्‍यात आल्‍याचे विमा कंपनीने सामनेवाले 2 यांना कळविले आहे व प्रस्‍तूत तक्रारीमधून सामनेवाले 2 यांची पूर्णपणे मुक्‍तता करण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाले 2 यांनी केली आहे. तक्रारदाराचे वकीलांनी  सदर प्रकरणात नमूद विमा दावा सामनेवाले 1 विमा कंपनीने नाकारल्‍याबाबत  तक्रारदारांना कळविले नसल्‍याचे युक्‍तीवाद केला. सामनेवाले 1 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासह सदर दावा नाकारल्‍याबाबत सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना कळविल्‍या असल्‍याबाबतचे कागदपत्रे अभिलेखावर दाखल केल्‍याचे दिसून येत नाही. तसेच विलंब माफीच्‍या अर्जात नमूद कारण पाहता तसेच प्रस्‍तूत तक्रार गुणवत्‍तेवर निकाली काढणे संयुक्तिक असल्‍याचे आयोगाचे मत असल्‍याने  तसेच शेतकरी अपघात योजना ही महाराष्‍ट्र शासनाने ज्‍या शेतकरी कुटुंबातील शेतक-याचा मृत्‍यु अपघाताने झाला आहे त्‍याच्‍या वारसांना  शासना तर्फे आर्थिक मदत देण्‍याचे हेतुने सुरु केले असल्‍याने  त्‍यामधील सामाजिक हेतु लक्षात घेता प्रस्‍तूत प्रकरणामधील विलंब माफीचा अर्ज त्‍यामधील विलंब न्‍यायहिताचेदृष्‍टीने माफ करुन मंजूर करण्‍यात येतो. पुढील तारीख तक्रार दाखल सुनावणीकामी पु.ने.ता.21/02/2022.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.