Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/298

Smt Sunita Pralhad Chauhan - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager & Other 2 - Opp.Party(s)

Shri Uday Kshirsagar

19 May 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/298
 
1. Smt Sunita Pralhad Chauhan
R/O Post Tondali Tah Mouda
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager & Other 2
Divisional Office No.2 Plot No.8 Hindustan Colony Near Ajani Chouk Wardha Road Nagpur
Nagpur
Maharashtra
2. M/S Kabal Insurance Broking Services Ltd. through Branch Manager
Plot No. 101 Karandikar House Near Mangla Takies Shivaji nagar Pune
Pune
Maharashtra
3. Taluka Krushi Adhikari Mouda
Mouda
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 May 2017
Final Order / Judgement

::निकालपत्र ::

       (पारित व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा. सदस्‍य)

     (पारित दिनांक-19 मे, 2017)

 

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या            कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1) ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर दोघां विरुध्‍द तिचे मृतक पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा मंजूर न केल्‍या संबधी दाखल केलेली आहे.

 

 

02.   तक्रारकर्तीचे तक्रारीचा थोडक्‍यात सारांश खालील प्रमाणे-

      

      मृतक श्री प्रल्‍हाद मारोती चव्‍हाण हा तक्रारकर्तीचा पती होता आणि व्‍यवसायाने तो शेतकरी होता, त्‍याचे मालकीची मौजा तोंडली, तालुका मौदा, जिल्‍हा नागपूर येथे भूमापन क्रं-18/2 ही शेत जमीन आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी असून, विरुध्‍दपक्ष क्रं-2) ही कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस नावाची नोडल एजन्‍सी आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी मौदा आहेत आणि महाराष्‍ट्र शासनाचे वतीने विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे संबधित लाभार्थ्‍यां कडून स्विकारतात. महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा काढण्‍यात आला होता आणि तक्रारकर्ती ही सदर विमा योजने अंतर्गत वारसदार पत्‍नी म्‍हणून लाभार्थी आहे.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिच्‍या पतीचा दिनांक-21/05/2009 रोजी आंगावर विज कोसळून मृत्‍यू झाला. त्‍यानंतर तिने दिनांक-18/08/2009 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्‍या संबधी रितसर प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांच्‍या प्रतींसह सादर केला. तसेच वेळोवेळी विरुध्‍दपक्षांचे मागणी नुसार दस्‍तऐवजांची पुर्तता केली परंतु पुढे तिला  विमा दावा प्रस्‍तावा संबधाने विरुध्‍दपक्षां तर्फे काहीही कळविण्‍यात आले नाही, म्‍हणून तिने दिनांक-03/08/2015 रोजी तिच्‍या वकीला मार्फत महितीच्‍या अधिकार खाली सदर दाव्‍या बाबत माहिती विचारली परंतु सदर माहिती संबधाने कोणताही स्‍पष्‍ट खुलास विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यंनी दिला नाही. विरुध्‍दपक्षांच्‍या  सेवेत कमतरता आहे या आरोपा वरुन तिने या तक्रारीव्‍दारे विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-18/08/2009 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्‍याजासह मागितले असून झालेल्‍या त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-30,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/- मागितले आहे.

 

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तर सादर करुन नमुद केले की, शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-15/08/2008 ते दिनांक-14/08/2009 असा होता. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिचे पतीचा अपघाती मृत्‍यू  दिनांक-21/05/2009 रोजी झालेला आहे आणि तिने विमा दावा हा दिनांक-18/08/2009 रोजी दाखल केलेला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार विमा योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत विमा प्रस्‍ताव स्विकारता येतील. विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-25.01.2010 रोजीचे पत्रान्‍वये तक्रारकर्तीचा विमा दावा विहित मुदतीत आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता केली नसल्‍याचे कारणा वरुन फेटाळलेला आहे आणि तसे तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना कळविल्‍याचे नमुद केले परंतु तक्रारकर्तीने सदरील बाब जाणुनबुजून लपवून ठेवली. ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे मृतक शेतक-याचे अपघाती मृत्‍यूचे तिथी पासून 02 वर्षाच्‍या आत ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे आवश्‍यक आहे परंतु तक्रार ही जवळ पास साडेसहा वर्षा नंतर दाखल केलेली आहे. मृतक हा खसरा क्रं-18/2 या जमीनीचा मृत्‍यू  दिनांकास मालक होता ही बाब नाकबुल आहे, तो  घटनेच्‍या वेळी जमीनीचा मालक असल्‍या बाबत एकही दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. नोटीस दिल्‍यामुळे तक्रार ही मुदतीत होत नाही. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍या बद्दल नाकबुल केलेले नाही. तक्रारकर्ती तर्फे विमा दावा विमा योजना संपल्‍याचे दिनांका पासून           90 दिवसांच्‍या नंतर दाखल करण्‍यात आल्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या अटी व

 

शर्ती नुसार तो खारीज करण्‍यात आला व त्‍या प्रमाणे तक्रारकर्तीला सुचित करण्‍यात आले होते. त्‍यांच्‍या सेवेत कुठलीही कमतरता होती ही बाब नाकबुल करुन तक्रार खारीज करण्‍याची विनंती करण्‍यात आली.

 

 

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस यांनी आपल्‍या लेखी निवेदनात असे नमुद केले की, तक्रारकर्ती ही त्‍यांची ग्राहक होत नाही, विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे केवळ मध्‍यस्‍थ सल्‍लागार असून शासनास विना मोबदला सहाय्य करतात. तालुका कृषी अधिकारी/जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्‍या मार्फत विमा दावा प्रस्‍ताव मिळाल्‍यावर त्‍याची छाननी करुन आणि त्रृटयांची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन त्‍यानंतर योग्‍य त्‍या विमा कंपनीकडे तो प्रस्‍ताव पाठविणे आणि विमा कंपनी कडून विमा दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबधित लाभार्थ्‍यास देणे एवढेच त्‍यांचे कार्य आहे. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू झाल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी मार्फतीने जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे मार्फतीने त्‍यांना विमा दावा प्रस्‍ताव प्राप्‍त झाला होता आणि तो त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे दिनांक-04/01/2010 रोजी मंजुरीसाठी पाठविला. विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-25 जानेवारी, 2010 च्‍या पत्रान्‍वये तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवज दाखल केले नसल्‍याचे कारणास्‍तव खारीज केला आणि त्‍याची सुचना तक्रारकर्तीला दिली होती असे दिसून येते, त्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍याची विनंती त्‍यांनी केली.

 

 

 

05.    विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्‍या लेखी जबाबा मध्‍ये असे नमुद केले की, तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव तहसिलदार, मौदा यंचे पत्र क्रं-679/2009 दिनांक-14/08/2009 अन्‍वये प्रत्‍यक्ष्‍य त्‍यांचे कार्यालयास दिनांक-18/08/2009 रोजी प्राप्‍त झाला, त्‍यानंतर त्‍यांनी तो प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयीन पत्र क्रं-2761/2009 अन्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर केला परंतु विमा दावा मंजूर किंवा नामंजूरीचे पत्र त्‍यांना प्राप्‍त झाले नाही. तक्रारकर्तीचे वकीलानीं दिनांक-03/08/2015 रोजीचे अर्जा नुसार उपलब्‍ध असलेली माहिती त्‍यांना देण्‍यात आली. त्‍यांनी सेवेमध्‍ये कोणतीही त्रृटी ठेवली नसल्‍याचे नमुद केले.

 

 

06.  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्षांची लेखी उत्‍तरे आणि उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच तक्रारकर्तीचे वकील             श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे वकील श्री रहाटे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-

     

:: निष्‍कर्ष ::

 

07.   विरुध्‍दपक्षानीं दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरां नुसार तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाला होता ही बाब मंजूर केल्‍या असल्‍यामुळे त्‍या मुद्दावर जास्‍त विचार करण्‍याची गरज नाही तसेच दाखल पोलीस दस्‍तऐवजां वरुन त्‍याच बरोबर शवविच्‍छेदन अहवाला वरुन मृतकाचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याची बाब सिध्‍द होते. शवविच्‍छेदन अहवालात मृत्‍यूचे कारण “Caused by lightening injury” (Thunderstorm) असे नमुद आहे.

 

 

 

 08.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीचे मृतक पती श्री प्रल्‍हाद मारोती चव्‍हाण याचा दिनांक-21/05/2009 रोजी अपघाती मृत्‍यू झाला परंतु घटनेच्‍या वेळी तो शेतकरी होता हे दर्शविणारे कुठलेही दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत.

     या आक्षेपाचे संदर्भात मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्तीने जो 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे, तो मौजा तोंडली, तालुका मौदा येथील असून त्‍यात भूमापन क्रं-18/2 मध्‍ये मृतकाचे नाव मालक म्‍हणून नमुद आहे आणि त्‍याचे मृत्‍यू नंतर फेरफार क्रं-463, दिनांक-05/08/2009 रोजी त्‍याचे नाव कमी करुन त्‍याचे वारसांची नावे चढविलेली असल्‍याचे दिसून येते. या व्‍यतिरिक्‍त तक्ररकर्तीने तिचे मृतक पती प्रल्‍हाद मारोती चव्‍हाण याचे नावाचा गाव नमुना 8-अ ची प्रत दिनांक-30/06/2005 रोजीची दाखल केली, ज्‍यामध्‍ये भूमापन क्रं -18/2 चा ते मालक असल्‍याची नोंद आहे. त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे या आक्षेपात मंचास काहीही तथ्‍य आढळून येत नसल्‍याने सदरील आक्षेप फेटाळण्‍यात येतो.

 

 

 

09.    या प्रकरणातील वादातीत मुद्दा केवळ एवढाच आहे की,  तक्रारकर्तीचा विमा दावा हा आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता केली नाही एवढयाच करणास्‍तव विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे फेटाळण्‍यात आला आणि ज्‍या कारणास्‍तव तो फेटाळण्‍यात आला ते कारण कायदेशीररित्‍या योग्‍य होते किंवा नाही. तसेच ही तक्रार मुदतीत आहे किंवा नाही हा मुद्दा पण प्राथमिक स्‍वरुपात विचारात घेणे आवश्‍यक आहे.

 

 

 

10.  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे असे नमुद करण्‍यात आले की, महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत  विमा दावा प्रस्‍तावा संबधी ज्‍या मार्गदर्शक सुचना जारी करण्‍यात आलेल्‍या आहेत, त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत करावयाचा विमा दावा प्रस्‍ताव हा विहित मुदतीत आवश्‍यक दस्‍तऐवजांच्‍या प्रतींसह विमा योजना संपल्‍याचे दिनांका पासून 90 दिवसांच्‍या आत दाखल करावा लागतो. तसेच तक्रार दाखल करण्‍यास ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 च्‍या कलम-24 (A) नुसार तक्रारीचे कारण घडल्‍या पासून 02 वर्षाच्‍या आत तक्रार ग्राहक मंचात दाखल करणे आवश्‍यक होते.

 

 

 

11.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे असा युक्‍तीवाद करण्‍यात आला की, ग्राहक मंचा समोर दाखल केलेली तक्रार अपघाती मृत्‍यूचे दिनांका पासून जवळपास साडेसहा वर्षा नंतर दाखल करण्‍यात आलेली आहे, त्‍यामुळे तक्रार तक्रारीचे कारण घडल्‍या पासून म्‍हणजे मृतकाचे मृत्‍यूचे दिनांका पासून             02 वर्षाच्‍या आत दाखल करणे आवश्‍यक असताना तक्रार विहित मुदती नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केली असल्‍यामुळे ती मुदतबाहय झालेली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

12.   विमा पॉलिसीची प्रत अभिलेखावर दाखल असून शेतकरी अपघात             विमा योजना ही दिनांक-15/08/2008 ते दिनांक-14/08/2009  या   कालावधी  करीता  चालू  ठेवण्‍यात  आली  होती,  तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू

दिनांक-21/05/2009 रोजी म्‍हणजेच विमा योजनेच्‍या कालावधीत झालेला आहे. मार्गदर्शक तत्‍वा नुसार शेतक-याचा विमा प्रस्‍ताव विमा योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक आहे. अखरेच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी विमा योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसां पर्यंत विमा दावा प्रस्‍ताव स्विकारता येतो आणि समर्थनीय कारणास्‍तव  90 दिवसा नंतर प्राप्‍त झालेले विमा दावे सुध्‍दा स्विकारावे अशा सुचना निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत.

 

 

 

13.   विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यानीं आपल्‍या लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव तहसिलदार, मौदा यंचे पत्र क्रं-679/2009 दिनांक-14/08/2009 अन्‍वये प्रत्‍यक्ष्‍य त्‍यांचे कार्यालयास दिनांक-18/08/2009 रोजी प्राप्‍त झाला, त्‍यानंतर त्‍यांनी तो प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयीन पत्र क्रं-2761/2009 अन्‍वये जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर केला. विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-14/08/2009 रोजी संपला आणि महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार विमा योजना कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत विमा दावा स्विकारावा असे स्‍पष्‍ट नमुद आहे. विमा योजना संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंतचा कालावधी हा                   दिनांक-14/11/2009 असा येतो परंतु तक्रारकर्तीने तिचा विमा प्रस्‍ताव हा दिनांक-18/08/2009 रोजीच तालुका कृषी अधिका-यांकडे दाखल केलेला असल्‍याने तो तिने विहित मुदतीत केल्‍याची बाब सिध्‍द होते. तसेही मार्गदर्शक सुचने नुसार विमा योजनेच्‍या कालावधीत प्राप्‍त झालेले विमा प्रस्‍ताव विचारात घेणे विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला बंधनकारक आहे. त्‍याशिवाय विमा योजना संपल्‍याचे दिनांका पासून 90 दिवसांची दिलेली मुदत अनिवार्य (Mandatory) नसून Directory आहे.

 

 

 

14.   मुदती संबधी तक्रारकर्तीचे वकीलां तर्फे खालील 03 मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांचा आधार घेण्‍यात आला-

 

  

 

(01) “NEW INDIA ASSURANCE CO.LTD.-VERSUS-SATVINDER KAUR & ANR.”- II (2012) CPJ 413

 

 

(02)  “LAXMIBAI & OTHERS-VERSUS –ICICI LOMBARD   GENERAL INSURANCE CO.LTD”- III (2011) CPJ 507 (NC)

 

 

(03)   “BHAGABAI-VERSUS –ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD”- I (2013) CPJ 115 (MAH)

 

 

 

      उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालांचे आम्‍ही काळजीपूर्वक वाचन केले, उपरोक्‍त नमुद निकालापैकी श्रीमती लक्ष्‍मीबाई विरुध्‍द आयसीआयसीआय लोम्‍बार्ड इन्‍शुरन्‍स कंपनी या निकालपत्रात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, जो पर्यंत विमा कंपनी विमा दाव्‍या संबधाने निर्णय घेत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत असते, मृत्‍यूचे दिनांका पासून 02 वर्षाचे आतच तक्रार ग्राहक मंचात दाखल करता येते या कारणास्‍तव ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍याचे अधिकार रोखता येणार नाहीत असे स्‍पष्‍ट नमुद केलेले आहे, आणि हातातील प्रकरणातील वस्‍तुस्थिती या प्रकरणातील वस्‍तुस्थितीशी जवळपास सारखीच आहे त्‍यामुळे सदर निकालपत्र येथे तंतोतंत लागू पडते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

15.  “KANDIMALLA RAGHAVAIAH & CO.-VERSUS-NATIONAL INSURANCE COMPANY LTD.& ANR.”-III (2009) CPJ- 75 (SC)

      या निकालपत्रात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमुद केलेले आहे की, तक्रारीचे कारण जो पर्यंत विमा दाव्‍या संबधीचा निर्णय संबधिताला विमा कंपनी तर्फे कळविल्‍या जात नाही तो पर्यंत सतत घडत असते. आमचे समोरील प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी ही तक्रारकर्तीला त्‍यांचे कार्यालयीन पत्र दिनांक-25/01/2010 चे पत्रान्‍वये विमा दावा फेटाळल्‍या बाबत सुचित केले असल्‍याचे जरी म्‍हणत असली तरी तक्रारकर्तीने सत्‍यापनावर असे नमुद केले आहे की, तिला विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे तिचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्‍या बाबत काहीही कळविलेले नाही तसेच सदर विमा दावा फेटाळल्‍या बाबत पत्र पाठविल्‍या बाबत पुरावा म्‍हणून पोस्‍टाची पावती प्रत व पोच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुराव्‍या दाखल दाखल केलेली नाही त्‍यामुळे जो पर्यंत विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विमा दावा मंजूरी अथवा नामंजूरी बाबत कळवित नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडणारे असते असे जे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने आपल्‍या निकालपत्रात नमुद केलेले आहे, तीच परिस्थिती आमचे समोरील प्रकरणाला सुध्‍दा लागू पडते, त्‍यामुळे मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे हे निकालपत्र आमचे समोरील प्रकरणात तंतोतंत लागू पडते.  

 

 

16.   या व्‍यतिरिक्‍त हे मंच खालील निकालपत्रावर आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 

(01) “ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY-VERSUS- SINDHUTAI KHAIRNAR”- II (2008) CPJ 403

  

 

(02) “BRANCH MANAGER, NATIONAL INSURNACE COMPANY LTD-VERSUS-SUMITRA MOHITE”-FIRST APPEAL NO.-A/10/786 HON’BLE MAHARASHTRA STATE COMMISSION ORDER PASSED ON-26TH MARCH, 2014

 

 

(03) “NATIONAL INSURANCE COMPANY-VERSUS-JYOTI GOPAL KHUDANIYA”-FIRST APPEAL NO.-A/09/452 HON’BLE MAHARASHTRA STATE COMMISSION CIRCUIT BENCH NAGPUR ORDER PASSED ON-21ST APRIL 2014.

 

 

       या निवाडयांचा थोडक्‍यात सारांश असा आहे की, विमा प्रस्‍ताव दाखल करण्‍या संबधी जी मुदत (Limit) शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये नमुद केलेली आहे ती अनिवार्य (Mandatory) नाही, त्‍यामुळे मुदती संबधीची असलेली तरतुद कायदेशीर विमा प्रस्‍ताव फेटाळून लावण्‍यासाठी उपयोगात आणता येणार नाही. ज्‍याअर्थी तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू  हा विमा कालावधीत झालेला होता आणि त्‍याचे मृत्‍यू नंतर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे सादर करण्‍यात आला होता, त्‍याअर्थी तो प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विचारात घेणे आवश्‍यक होते म्‍हणून विमा दावा प्रस्‍ताव दाखल करण्‍यास विलंब झाला हे कारण कायद्दा नुसार योग्‍य नाही.

 

 

 

17.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे पुढील आक्षेप असा घेण्‍यात आलेला आहे की, ही तक्रार तक्रारीचे कारण घडल्‍या पासून म्‍हणजे तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याचे दिनांका पासून 02 वर्षा नंतर दाखल केलेली असल्‍याने ती मुदतबाहय आहे. या आक्षेपावर तक्रारकर्तीचे वकीलानीं प्रत्‍युत्‍तर देताना असे सांगितले की, तिच्‍या विमा दावा प्रस्‍तावावर काय निर्णय झाला या संबधी तिला आज पर्यंत काहीही कळविलेले नाही आणि जो पर्यंत तिचा विमा दावा प्रस्‍ताव खारीज झाला असल्‍याचे तिला लेखी कळविल्‍या जात नाही, तो पर्यंत तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण घडत असते.

 

 

 

 

 

 

 

 

18.   विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव खारीज केल्‍या संबधीच्‍या दिनांक-25/01/2010 रोजीच्‍या पत्राची प्रत दाखल केली, ते पत्र तक्रारकर्तीचे नावे लिहिलेले असून पत्राची प्रत कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना दिल्‍याचे त्‍यात नमुद आहे परंतु केवळ एवढया वरुन हे सिध्‍द होत नाही की, त्‍या पत्राची प्रत तक्रारकर्तीला पाठविण्‍यात आली होती आणि ती प्रत तिला प्राप्‍त झाली होती कारण तक्रारकर्तीला ते पत्र मिळाल्‍याची पोच अभिलेखावर दाखल नाही. त्‍या पत्रा नुसार विमा दावा विहित दस्‍तऐवज दाखल केले नसल्‍याचे कारणास्‍तव खारीज करण्‍यात आला असे नमुद केले आहे.

  

   तक्रारकर्तीचे वकीलानीं या संबधी खालील 02 मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांचा आधार घेतला-

 

 (01) “PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”—I (2006) CPJ-53 (NC)

 

     या प्रकरणा मध्‍ये विमा दावा खारीज केल्‍याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्‍हते तसेच त्‍या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्‍याचे पण सिध्‍द झाले नव्‍हते परंतु तरीही जिल्‍हा ग्राहक मंचाने ती तक्रार खारीज केली होती, जिल्‍हा मंचाचा तो निर्णय मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्‍याचे नमुद केले.

      हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केल्‍या संबधीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्‍याचा कोणताही पुरावा अभिलेखावर नाही आणि म्‍हणून तक्रार दाखल करण्‍यास कारण हे सतत घडत असल्‍याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही.

 

 

 

(02) “THE NEW INDIA ASSURANCE CO.LTD.-VERSUS-SMT.VANITA PATIL”-FIRST APPEAL NO.-1559 OF 2008,ORDER DATED-17/12/2009

 

       या प्रकरणात तक्रार दाखल करण्‍यास झालेला 04 वर्षाचा विलंब माफ करण्‍यात आला होता आणि त्‍यावर कारण देताना असे नमुद केले होते की, विमा योजनेचे लाभार्थी हे ग्रामीण भागातील असल्‍यामुळे आणि त्‍यांना या विमा योजने संबधीची माहिती असण्‍याची शक्‍यता नसावी म्‍हणून ते मुदतीमध्‍ये विमा प्रस्‍ताव दाखल करु शकले नाही.

       हातीतील प्रकरणा मध्‍ये विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्‍याचे कुठेही सिध्‍द होत नसल्‍याने तक्रार मुदतबाहय आहे असे ठरविता येणार नाही.

 

 

 

19.   वरील कारणास्‍तव मंचाचे मते तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव कायद्दा नुसार योग्‍य असल्‍यामुळे आणि तो मुदतीत असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने मंजूर करावयास हवा होता. तसेच त्‍या प्रस्‍तावावर झालेल्‍या निर्णयाची सुचना तक्रारकर्तीला न दिल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने सेवेत कमतरता ठेवली या कारणास्‍तव आम्‍ही ही तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

 

                ::आदेश::

 

(01)  तक्रारकर्ती श्रीमती सुनिता प्रल्‍हाद चव्‍हाण यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष            क्रं-(1) दि ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय क्रं-2) हिंदुस्‍थान कॉलिनी, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापकानां आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) दिनांक-18/08/2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला अदा करावी.

 

 

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून                  रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीला देण्‍यात यावेत.

 

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं-(2) आणि विरुध्‍दपक्ष क्रं-(3) विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

 

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) विमा कंपनी तर्फे संबधित विभागीय व्‍यवस्‍थापकानीं निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.