Complaint Case No. CC/20/112 | ( Date of Filing : 02 Nov 2020 ) |
| | 1. Smt.Vandana Yadao Pendor | R/o.Ward no-6,Pombhurna,Tah-Pombhurna,Dist-Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager | Divisional Office no.3,Plot no.321/A-2,Osavaal Bandhu Samaj Building,J.N.Road,Pune-411042 | Pune | MAHARASHTRA | 2. The Oriental Insurance Company Ltd through Branch Manager | Dhanraj Planza,2nd floor,M.G.Road,Chandrapur | Chandrapur | MAHARASHTRA | 3. Jaika Insurance Brokrage Pvt.Ltd through Manager | 2nd Floor,Jaika Building,Commercial Road,Civil Lines,Nagpur-440001 | Nagpur | MAHARASHTRA | 4. Taluka Krushi Adhikari,Pombhurna | Taluka-Pombhurna,Dist-Chandrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारित दिनांक ०१/०९/२०२२) - तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ती ही वॉर्ड क्रमांक ६, पोंभूर्णा, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे पती श्री यादव जयराम पेंदोर यांच्या मालकीची मौजा पोंभुर्णा, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक ३४ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्तीचे पती हे शेतीचा व्यवसाय करीत होते व शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्तीचे पती कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ हे विमा कंपनी असून विरुद्ध पक्ष ३ ही विमा सल्लागार कंपनी आहे शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्रमांक ४ हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्रमांक ४ तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्या पतीचा रुपये २,००,०००/- चा विमा उतरविला होता. सदर विमा जरी शासनाच्या वतीने उतरवण्यात आला असला तरी तक्रारकर्ती ही मयत श्री यादव जयराम पेंदोर यांची पत्नी व वारस असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. सदर प्रस्ताव विरुद्ध पक्ष क्रमांक ३ व ४ तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून बरोबर आहे हे पाहून विरुद्ध पक्ष क्रमांक १ ला दिला जातो. तक्रारकर्तीचा पतीचा मृत्यु दिनांक २८/०९/२०१९ रोजी मोहाच्या झाडावर फुल तोडायला गेला असताघसरुन पडून जखमी होऊन झाला असल्यानेव त्यांचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने विरुद्ध क्रमांक ४ कडे दिनांक २९/०२/२०२० रोजी रीतसर अर्ज करुन केला. वेळोवेळी आणि मागितलेले दस्तावेज ची पूर्तता केल्यावर दावा सादर करुनही सात महिने उलटून गेल्यावरही विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीला काहीही कळविले नाही. तक्रारकर्तीचा दावा फेटाळल्याबाबत पत्रही तक्रारकर्तीला पाठविले नाही. तक्रारकर्तीचा दावा अकारण प्रलंबित ठेऊन विरुध्द पक्ष तक्रारकर्तीची फसवणूक करीत आहे व पैसे द्यायची इच्छा नसल्यानेच असे करीत आहे. सदर दाव्याची रक्कम मिळाली नसल्याने त्यावरील व्याजालाही तक्रारकर्तीला मुकावे लागत आहे. ज्या उद्देशाने शासनाने मृत शेतकर्यांच्या वारसदारांसाठी ही योजना सुरू केली त्या उद्देशालाच विरुद्ध पक्ष तडा देत असल्यामुळे तक्रारकर्तीला विरुद्ध पक्षांविरुध्द तक्रार दाखल करावी लागली. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्तीला आवश्यक ती सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने सदरची तक्रार तक्रारककर्तीने विमा दावा रक्कम रुपये २,००,०००/- ची मागणी करिता तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- मिळवण्याकरिता दाखल केलेला आहे
- तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करून तर्फे आयोगातर्फे विरुद्ध पक्ष क्रमांक १ ते ४ यांना नोटीस पाठवण्यात आले.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ तक्रारीत उपस्थित राहून त्यांचे लेखी उत्तर दाखल करीत असे नमूद केले की तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक २८/०९/२०१९ रोजी घडले जेव्हा तक्रारकर्तीच्या पतीचे निधन झाले परंतु तक्रारकर्तीने दिनांक १८/०९/२०२० रोजी तक्रार दाखल केलेली असल्यामुळे सदर दावा मुदतबाह्य आहे तसेच दाव्याचा प्रस्ताव हा योजनेच्या नियमाप्रमाणे ९० दिवसांच्या आत कृषी अधिकारी यांचेकडे दाखल करावा लागतो. तक्रारीत ९० दिवसाच्या आत प्रस्ताव दाखल केला त्याबद्दल कोणतेही दस्त दाखल केलेले नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ नियमाप्रमाणे काम करीत असून प्रत्येक कार्य हे पारदर्शक असते. सबब विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ विरुध्द केलेले सगळे आरोप खोटे असून तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाताबद्दल कोणताही पोलीस रिपोर्ट केला नाही. तसेच प्रकरणात पोलीस इन्वेस्टीगेशन, एफ. आय. आर., स्पॉट पंचनामा, क्राईम डिटेल्स यापैकी कोणतेही दस्त प्रकरणात दाखल नाही जेव्हा की सगळे दस्तावेज दावा करतांना आवश्यक आहे. यावरुन असे स्पष्ट होत आहे की तक्रारकर्ती हिने सदर दावा उपरोक्त दस्तऐवजाशिवाय प्रस्ताव दाखल केला आहे. सबब सदर तक्रारकर्तीच्या तक्रार नुकसान भरपाईची किंमत तसेच नुकसान भरुन दावा योग्यरित्या फेटाळून सदर रक्कम तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष यांना देण्याचे निर्देशीत करावे अशी प्रार्थना विरुध्द पक्ष यांनी त्याच्या उत्तरात केली आहे.
- विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांनी उत्तर दाखल करुन शासनाने शेतकरी व त्यांच्या कुटुंबियाकरिता शेतकरी जनता अपघात विमा योजना काढली आहे. या योजनेअंतर्गत अर्जदाराला आपले दावे विरुद्ध पक्ष क्रमांक ४ तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागतात व ते असे दावे सोबत जोडलेल्या कागदपत्र जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवितात. असे दावे प्राप्त झाले की, त्याची पडताळणी करुन तसेच काही ञुटी असल्यास त्याची मागणी करुन सर्व कागदपञे दावेदाराकडून जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झाल्यावर हे दावे विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ यांच्याकडे मंजुरी करिता पाठवितात. प्रत्येक दाव्याची शहानिशा करून तसेच काही त्रुटी असल्यास त्याची मागणी करून सर्व कागदपञे दावेदाराकडून प्राप्त झाल्यावर विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ असे दावे निकाली काढतात. दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांच्या अखत्यारित असते व यामध्ये विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांचा काही सहभाग नसतो. विरुद्ध पक्ष क्रमांक ३ हे फक्त विमा कंपनी, अर्जदार आणि शासन यांच्यातील एक मध्यस्थी म्हणून काम करतात. तक्रारकर्तीच्या पतीचे दिनांक २७/०९/२०१९ रोजी निधन झाले. तक्रारकर्तीने विरुद्ध पक्ष क्रमांक ४ यांच्याकडे दिनांक २२/०९/२०२० रोजी अर्ज सादर केला. हा अर्ज जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत विरुद्ध पक्ष क्रमांक ३ यांना दिनांक १२/१०/२०२० रोजी प्राप्त झाला. या अर्जाची शहानिशा केल्यावर कृषी अधिकारी यांच्यामार्फत तक्रारकर्तीकडे फेरफार ६-क व एफ. आय. आर., स्पॉट पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा आणि पोस्ट मार्टम रिपोर्ट तसेच विलंबाबाबत पत्र इत्यादी कागदपञांची तक्रारकर्तीने पूर्तता केल्यास विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ विमा कंपनी, तक्रारकर्तीचा दावा मंजूर करू शकतात. विरुध्द पक्ष क्रमांक ३ यांनी त्यांच्यावरील जबाबदारी व्यवस्थितपणे तसेच चोखपणे पार पडलेली असल्यामुळे विरुद्ध पक्ष क्रमांक ३ विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक ४ यांनी प्रकरणात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की, मयत श्री यादव जयराम पेंदोर यांच्या पत्नीने अर्जदार ह्या नात्याने अपघात विमा प्रस्ताव दिनांक २२/९/२०२० रोजी कार्यालयात सादर केले व या कार्यालयाने सदर प्रस्ताव दिनांक २२/९/२०२० रोजी जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे पाठविला. सदर प्रस्तावातील ञुटी संबंधी मे. जायका इंशुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमी. यांनी दिनांक १/१०/२०२० रोजी पञ पाठविले. या पञान्वये या कार्यालयाचे दिनांक १९/१०/२०२० अन्वये ञुटी पूर्ततेबाबत पञ देऊन आवश्यक कागदपञे प्राप्त करुन दिनांक २६/१०/२०२० नुसार वरिष्ठ कार्यालयाला माहिती सादर केली. परंतु आजतागायत प्रथम माहिती अहवाल, अकस्मात मृत्यु खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा व पोस्ट मॉर्टम रिपोर्ट इत्यादी कागदपञांची पूर्तता अर्जदाराकडून करण्यात आली नाही, याबाबत अर्जदारास कळविले आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद, विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ चे लेखी उत्तर, दस्तावेज, शपथपञ व लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्ष क्रमांक ३ व ४ चे लेखी उत्तर आणि उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालील कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्ती ही मयत श्री यादव जयराम पेंदोर यांची पत्नी असून तो शेतकरी होता व त्याचे नावे मौजा पोंभुर्णा, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ३४ ही शेतजमीन आहे, ही बाब प्रकरणात दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होत असून निर्विवाद आहे. तक्रारीत तक्रारकर्तीने तिच्या पतीचा मृत्यु दिनांक २८/९/२०१९ रोजी मोहाच्या झाडावर फुल तोडायला गेला असता घसरुन पडून जखमी होऊन झाला असे नमूद केले असून हा अपघाती मृत्यु असल्यामुळे व तिच्या पतीचा विमा योजनेअंतर्गत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ कडे विमा रक्कम मिळण्याकरिता प्रस्ताव अर्ज दाखल केला होता. प्रकरणात विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघाताबद्दल कोणतेही पोलीस दस्तऐवज, पोस्ट मार्टम रिपोर्ट, एफ.आय.आर. दस्तऐवज दाखल न केल्यामुळे तिच्या पतीचे अपघाती निधन नाही तसेच या योजनेअंतर्गत उपरोक्त दस्तऐवजाची आवश्यकता असल्यामुळे सदर दावा खारीज केला परंतु तक्रारकर्तीने त्याच्या युक्तिवादात असे नमूद केले की, जरी तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघाताबद्दल पोलीस तक्रार न झाल्याने पी.एम.रिपोर्ट, अकस्मात मृत्यु खबर व इतर दस्तऐवज देऊ शकत नाही परंतु शासकीय रुग्णालय चंद्रपूर यांनी शासकीय रुग्णालय, नागपूर येथे स्थानांतर करण्याबाबतचे दवाखान्याचे पेपर्स दाखल केले असून त्यात मृतकाच्या छातीला मार लागल्याचे स्पष्ट नमूद आहे असा युक्तिवाद केलेला आहे. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४ नुसार दस्त क्रमांक ४ वर स्थानांतर नमुना दाखल केलेला असून त्यात तक्रारकतीच्या पतीला छातीला मार लागल्याचे नमूद आहे परंतु आयोगाच्या मते फक्त स्थानांतर नमुना या दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होत नाही की, तक्रारकतीच्या पतीचा मृत्यु हा अपघाती मृत्यु आहे तसेच शासन निर्णयात नमूद असले की एखादे दस्तावेज मिळत नसेल तर पर्यायी दस्तऐवजावरुन दावा मंजूर करावा हे जरी असले तरी पर्यायी दस्तऐवज पुरक असून त्यात सुस्पष्टता हवी. परिणामतःशासनाच्या या योजनेनुसार विमा अपघात दाव्याची रक्कम वरील पोलीस दस्तऐवजाची पडताळणी केल्यावर तसेच इतर दस्तऐवजांची मागणी करुनच नंतर मंजूर वा नामंजूर केला जातो. सबब सदर प्रकरणात तक्रारकर्तीचा दावा आवश्यक दस्तावेज न पुरविल्यामुळे फेटाळून विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी सेवेत न्युनता दिली नाही असे आयोगाचे मत असल्यामुळे आयोग खालिलप्रमाणे आदेशपारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्र. ११२/२०२० खारीज करण्यात येते.
- उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
| |