Maharashtra

Chandrapur

CC/20/154

Smt.Nalini Gopinath Aarikar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv.U.P.Kshirsagar

16 Apr 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/154
( Date of Filing : 31 Dec 2020 )
 
1. Smt.Nalini Gopinath Aarikar
R/o.Tlodi Khurd,Tah-Bramhpuri,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager
Divisional Office No.3,Plot No.321/A-2,Oswaal Bandhu Samaj Building ,J.N.Road,Pune-411042
Pune
MAHARASHTRA
2. The Oriental Insurance Company Ltd through Branch Manager
Dhanraj Planza,2nd Floor,M.G Road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. Jayaka Insurance Brokerage Pra.ltd.
2nd Floor ,Jayka Building,Commercial Road,Civil Lines,Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
4. Taluka Krushi Adhikari,Bramhapuri
Tah-Bramhapuri,Dist-CHandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Vaishali R. Gawande PRESIDENT
 HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal MEMBER
 HON'BLE MRS. Swati A.Deshpande MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Apr 2024
Final Order / Judgement

(पारित दिनांक १६/०४/२०२४)

आयोगाचे आदेशान्‍वये श्रीमती स्‍वाती देशपांडे, मा. सदस्‍या

 

  1. तक्रारकर्ती यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्‍या कलम ३५ अंतर्गत विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या तक्रारीचा सारांश पुढीलप्रमाणे..

तक्रारकर्ती वरील पत्‍त्‍यावर राहत असून तक्रारकर्तीचे पती मयत श्री गोपीनाथ नामदेव आरीकर हे मौजा तळोदी (खुर्द), तहसील ब्रम्‍हपूरी येथे शेतकरी होते. त्‍याचा भुमापन क्रमांक ६३ ही शेतजमीन होती. शासनाच्‍या वतीने राज्‍यातील सर्व शेतक-यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्‍यात आली. याअंतर्गत शेतकरी कुटुंबातील शेतकरी व त्‍याच्‍या कुटुंबातील एक सदस्‍य यांचा विमा उतरविण्‍यात येतो. प्रस्‍तुत प्रकरणातही तक्रारदाराचे पती यांचा विमा विरुध्‍द पक्ष क्रमांक १. यांच्‍याकडे उतरविण्‍यात आला होता. सदर दाव्‍याचा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रमांक ३ व  ४ तर्फे सर्व कागदपञांची शहानिशा करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दिला जातो व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे दाव्‍याचे भुगतान करतात.

  1. तक्रारकर्तीच्‍या पतीचा दिनांक १३/०१/२०१८ रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामुळे जखमी होऊन मृत्‍यु झाला. तक्रारदार ही मयत गोपीनाथ आरीकर यांची पत्‍नी असल्‍यामुळे ती त्‍यांची वारस आहे. तिने विरुध्‍द पक्षाकडे दिनांक ११/६/२०१८ रोजी दावा दाखल केला. परंतु त्‍यांनी तो मंजूर अथवा नामंजूर झाला याबद्दल काहीही कळवले नाही. विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे रितसर अर्ज करुन आणि आवश्‍यक ती सर्व कागदपञे सादर करुनही त्‍यांनी दाव्‍याबद्दल काहीही कळवले नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने सदरील तक्रार आयोगात दाखल करुन रुपये २,००,०००/- (दोन लाख फक्‍त)  व्‍याजासह मिळावे व रुपये ५०,०००/- मानसिक व शारीरिक ञासापोटी आणि तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- देण्‍यात यावे अशी विनंती केली.
  2. तक्रारकर्तीने आपल्‍या लेखी बयाणासोबत निशानी क्रमांक ४ वर  खालील कागदपञे सादर केलेली आहेत.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना २०१७-२०१८ शासन निर्णय
  • तक्रारकर्तीच्‍या वकीलांनी माहिती अधिकार कायद्याखाली जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना मागितलेली माहिती.
  • तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या शेताचा ७/१२ उतारा व ईतर शेतीचे कागदपञे
  • तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या अपघाताबाबत एफ.आय.आर. व ईतर पोलीस दस्‍तावेज.
  • पी.एम रिपोर्ट
  • मृत्‍यु प्रमाणपञ
  • वाहन परवाना
  • तक्रारकर्तीच्‍या पतीचा वयाचा पुरावा.
  • तक्रारकर्तीचे ओळखपञ
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी त्‍यांचा लेखी जबाब सादर केला. यात त्‍यांनी असे कथन केले की, तक्रारदार यांनी त्‍यांच्‍याकडे कोणताही दाव्‍याचाप्रस्‍ताव सादर केला नाही. तक्रारकर्तीस विम्‍याची रक्‍कम मागण्‍याचा हक्‍क नाही आणि तिच्‍या मयत पतीजवळ वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नसल्‍यामुळे दावा फेटाळण्‍यास पाञ आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍यांचा लेखी जबाब सादर करुन त्‍यात म्‍हटले की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांच्‍याकडे दिनांक २३/५/२०१८ रोजी, रीतसर अर्ज कागदपञांसह सादर केला होता. हा अर्ज कृषी अधिकारी यांच्‍यामार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना दिनांक २७/१०/२०१८ रोजी प्राप्‍त झाला तसेच तो अर्ज आणि कागदपञ विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी दिनांक ६/११/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍याकडे पाठवले होते आणि त्‍यांची शहानिशा करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीचा अर्ज दिनांक ४/८/२०२० रोजी नामंजूर केला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करावी.
  3. तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपञ आणि लेखी युक्तिवाद तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी देखील लेखी युक्तिवाद सादर केला.
  4. उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ हे नोटीस पाठवूनही आयोगासमोर न हजर झाल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍द निशानी क्रमांक १ वर दिनांक २१/१२/२०२१ रोजी एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला.
  6. तक्रारदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपञे, लेखी युक्तिवाद  तसेच विरुध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब व युक्तिवाद यांचे अवलोकन केल्‍यानंतर आयोगासमोर पुढील मुद्दे विचाराधीन आहेत तसेच त्‍यावरील कारणमीमांसा खालीलप्रमाणे.

     अ.क्र.             मुद्दे                               उत्‍तर 

१. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदारास विमा               होय          

        नाकारुन ञुटीपूर्ण सेवा दिली आहे

        कायॽ  

२. तक्रारदार विरुध्‍द पक्षाकडून विमा दाव्‍याचे रुपये            होय          

२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्‍त) तसेच त्‍यावरील व्‍याज आणि शारीरिक मानसिक ञासापोटी रुपये ५०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- मागणीप्रमाणे मिळण्‍यास पाञ आहे कायॽ

३. आदेश काय?                       अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक १ व २ बाबतः- तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्रमांक ४ वर सातबारा चा उतारा, मयताचे अपघाताबाबतचा एफ.आय.आर आणि इतर पोलीस दस्‍तावेज, पोस्‍ट मॉर्टम रिपोर्ट, मृत्‍यु  प्रमाणपञ, वाहन परवाना इत्‍यादी दाखल केले आहेत. सदरील सातबाराच्‍या उता-याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती व तिचे पती यांच्‍या नावे तळोधी खुर्द, तहसील ब्रम्‍हपूरी येथे गट क्रमांक ६३, क्षेञफळ १.५ हेक्‍टर आर इतकी शेती आहे, यावरुन गोपीनाथ आरीकर हे शेतकरी आहेत आणि तक्रारकर्ती त्‍यांची पत्‍नी असून वारस आहे यात कोणताही वाद नाही.
  2. तसेच रेकॉर्डवरील एफ.आय.आर., स्‍पॉट पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा आणि पोस्‍ट मॉर्टम रिपोर्ट यांचे अवलोकन केले असता मयत गोपीनाथ आरीकर यांचा मृत्‍यु अपघातामुळे झाला असे दिसते. पोस्‍ट मॉर्टम रिपोर्टमध्‍ये  मृत्‍युचे कारण ‘हेड इंजुरी’ असे नमूद आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु अपघातात झाला याबद्दलही वाद नाही.
  3. विरुध्‍द पक्षाने या केसमध्‍ये फक्‍त तक्रारकर्तीच्‍या पतीजवळ गियरचे वाहन चालविण्‍याचा वैध परवाना नसल्‍यामुळे त्‍यांचा विम्‍याचा दावा फेटाळण्‍यात आला असे त्‍यांच्‍या लेखी बयाण तसेच लेखी युक्तिवादात म्‍हटले आहे परंतु तक्रारकर्तीने निशानी क्रमांक ४ वर तिचे मयत पती गोपीनाथ आरीकर यांचा वाहन परवाना दाखल केलेला आहे. या परवान्‍यावर (Licence) वर Non Transport वाहन परवाना दिनांक १२/०९/२०२४ पर्यंत वैध असल्‍याची स्‍पष्‍ट नोंद आहे तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या या आक्षेपावर तक्रारकर्तीने लेखी शपथपञ/उत्‍तर सादर केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दावा कोणत्‍या कारणासाठी फेटाळून लावला हे त्‍यांच्‍या लेखी जबाबात नमूद नसल्‍याचे कथन केले आहे. निशानी क्रमांक ४ वर तक्रारकर्तीने वकिलांमार्फत दिनांक २३/१०/२०२० रोजी माहितीच्‍या अधिकाराखाली अर्ज देवून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० पर्यंत, चंद्रपूर जिल्‍ह्यातील अर्जांची संपूर्ण माहिती मागविली. केवळ या अर्जाला जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्‍याकडून मिळालेल्‍या  उत्‍तरामुळे तक्रारकर्तीस तिचा दावा फेटाळल्‍याची माहिती मिळाली. वास्‍तविक पाहता तक्रारकर्तीच्‍या विमा दावा अर्जाचा Status अर्थात तो मंजूर अथवा नामंजूर झाला हे तिला कळविण्‍याची जबाबदारी विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ व २ यांची होती परंतु त्‍यांनी या कर्तव्‍यात टाळाटाळ केली. यावरुन त्‍यांची हेळसांड करण्‍याची वृत्‍ती दिसून येते तसेच त्‍यांनी तक्रारकर्तीस दावा नामंजूर केल्‍याबाबत कोणतीही माहिती न दिल्‍यामुळे दावा मुदतीत आहे.  (Continuous Cause of Action)
  4. तक्रारकर्तीने खालील न्‍यायनिर्णयांचा आधार घेतला आहे.
  1. The National Insurance Company Ltd. Vs. SundhubaiNagne& Others, First Appeal No. 200/2018, Dated 27/09/2021, passed by Consumer Dispute Redressal Commission, Circuit Bench Aurangabad. In this judgment, it was held that mere absence, fake or invalid license or disqualification of driver for driving at the relevant time are not in themselves defences available to insurer against either the insured or the third parties and also it was held that  submission of driving license of deceased cannot be mandatory requirement. It is the duty of the insurance company  to get the same verified through RTO and so burden is on the opponent insurance company to establish that deceased was not having a valid license.
  2. 15विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी खालील न्‍यायनिवाड्यांचा आधार घेतला आहे.
  3. Liberty General Insurance Ltd. Vs. Pranali Popat Suryavanshi, Dated 10/04/2019
  4. First Appeal No. A/15/140, United India Ins. Co. Ltd. Vs. Dileshwari Damahe & Others. Dated 6/8/2018, Passed by Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur.
  5. United India Insurance Co. Ltd. Vs. Tarabai Subhash Maindalkar, dated 03/06/2015, passed by State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur.

 

 

     विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या निवाड्यांमध्‍ये मयताकडे अपघाताच्‍या वेळी वाहन चालविण्‍याचा परवानाच (License) नव्‍हता म्‍हणून दावा फेटाळण्‍यात आल्‍याचे नमूद आहे परंतु तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या  प्रस्‍तुत तक्रारीचे अवलोकन केले असता मयत गोपीनाथ आरीकर यांच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना (Non Transport) दिनांक १२/०९/२०२४ पर्यंत वैध होता हे स्‍पष्‍ट दिसून येते म्‍हणूनच विरुध्‍द पक्षाने दाखल केलेले न्‍यायनिवाडे प्रस्‍तुत तक्रारीसाठी गैरलागू (Irrelevant) ठरतात.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीस दावा फेटाळला अथवा नाही याची साधी माहिती देखील दिलेली नाही. तसेच चुकीच्‍या  कारणास्‍तव तक्रारकर्तीचा विमा फेटाळून तिला न्‍युनतापूर्ण सेवा देवून ह्रयगय केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येत आहे म्‍हणूनच मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. उपरोक्‍त विवेचनावरुन स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ती ही गोपीनाथ मुंडे  शेतकरी विमा अपघात योजनेअंतर्गत तिच्‍या पतीच्‍या अपघाती मृत्‍यु दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/-(रुपये दोन लाख फक्‍त) मिळणेस पाञ आहे. तसेच तिला सदरील रक्‍कम मिळवण्‍यासाठी आयोगासमोर  तक्रार दाखल करावी लागली तसेच शारीरिक व मानसिक ञास सहन करावा लागला म्‍हणून या ञासापोटी ती रुपये ५,०००/- मिळण्‍यास पाञ आहे तसेच तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- मिळण्‍यास पाञ आहे असे आयोगाचे मत आहे.
  2. सदरील प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ आणि ४ फॉर्मल पार्टी   असल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

वरील विवेचनावरुन उपरोक्‍त मुद्दयांचे उत्‍तर त्‍यानुसार देवून पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारदारास  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्‍यांच्‍या पतीच्‍या अपघाती मृत्‍युसाठी दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- (रुपये दोन लाख फक्‍त) प्रस्‍तुत तक्रार अर्ज दाखल केल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दिनांक ३१/१२/२०२० पासून ते रक्‍कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्‍के व्‍याजासह द्यावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १  व २ यांनी तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. निकालपञाच्‍या प्रती सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव आणि उचित कार्यवाहीसाठी विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MRS. Vaishali R. Gawande]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Sachin Vinodkumar Jaiswal]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Swati A.Deshpande]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.