Maharashtra

Chandrapur

CC/20/116

Smt.Kundabai Shamrao Gaddekar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv.U.P.Kshirsagar

11 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/116
( Date of Filing : 02 Nov 2020 )
 
1. Smt.Kundabai Shamrao Gaddekar
R/o.Pombhurna,Tah-Pombhurna,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager
Divisional Office no.3,Plot no.321/A-2,Osavaal Bandhu Samaj Building,J.N.Road,Pune-411042
Pune
MAHARASHTRA
2. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager
Dhanraj Planza,2nd floor,M.G.Road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. Jayaka Insurance Brokerage Pvt Ltd through Manager
2nd Floor,Jaika Building,Commercial Road,Civil Lines,Nagpur-440001
Nagpur
MAHARASHTRA
4. Taluka Krushi Adhikari,Pombhurna
Tah-Pombhurna,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Apr 2023
Final Order / Judgement

:::नि का ल  प ञ   :::

              (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)

                  (पारित दिनांक ११/०४/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,१९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती तक्रारीत नमूद पत्‍त्‍यावर राहत असून श्री श्‍यामराव कवडू गद्देकार हे मौजा पोंभूर्णा,‍ जिल्‍हा चंद्रपूर येथे शेतकरी होते व शेतीचा भुमापन क्रमांक २७६ हा आहे. या शेतीवर त्‍याचे कुटुंबाचे पालपोषण करीत होते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विमा कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे विमा सल्‍लागार कंपनी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ हे शासनाच्‍या वतीने रुपये २,००,०००/- चे विमा दावे स्‍वीकारतात. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु दिनांक ५/७/२०१९ रोजी रेल्‍वेने धडक दिल्‍याने जखमी होऊन झाला होता. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे सदर विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यास रुपये २,००,०००/- चा विमा उतरविला होता व त्‍याची पत्‍नी तक्रारकर्ती ही एकमेव वारस म्‍हणून सदर विम्‍याची लाभधारक आहे. सदर प्रस्‍ताव विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ कडून दस्‍तऐवजाची शहानिशा करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे पाठविला जातो. त्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे दिनांक ५/३/२०२० रोजी रितसर अर्ज केला पंरतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला दाव्‍याबद्दल काहीही न कळविल्‍याने सदर तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दाखल केलेली आहे.
  3. आयोगामार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ यांना नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी सदर प्रकरणात उत्‍तर दाखल करुन तक्रारीतीत तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोडून काढीत विशेष कथनात नमूद केले की, सदर तक्रारीला कारण दिनांक ५/७/२०१९ रोजी घडले जेव्‍हा तक्रारकर्तीच्‍या  पतीचा मृत्‍यु झाला  परंतु दावा प्रपञ ९० दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे तक्रारकर्त्‍याने दाखल केले नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे तक्रारकर्त्‍याचा कोणताही दावा अर्ज आलेला नाही. प्रकरणात दिसून येत आहे की, दिनांक २७/९/२०२० च्‍या पञानुसार तक्रारकर्ती हिने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ कडे आवश्‍यक दस्‍तऐवजाची पूर्तता केली नाही तसेच तक्रारकर्ती ही एकमेव मयताची वारस नसून त्‍याशिवाय ४ लोक त्‍यांचे वारसान सातबारा उता-यावर दाखवित आहे. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु रेल्‍वेने धडक दिल्‍याने झाला नाही. कारण त्‍याअनुषंगाने कोणतेही दस्‍तऐवज प्रकरणात दाखल नाही. सदर तक्रार विलंबाने तसेच विलंबाचे कोणतेही योग्‍य कारण न देता दाखल केलेले नाही तसेच रेल्‍वेने धडक दिल्‍यामुळे कारण दाखवतांना तक्रारीत त्‍याबाबत एफ.आय.आर., स्‍पॉट पंचनामा व इतर दस्‍तऐवज तसेच रेल्‍वे टिकीट किंवा रेल्‍वे अधिकारी यांचे त्‍याबाबतचे पञ असे कोणतेही दसतऐवज दाखल केलेले नाही. सबब सदर तक्रार तक्रारकर्तीने बोगस दस्‍तऐवजासह खोटी तक्रार दाखल केलेली असल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍याचे उत्‍तर दाखल करीत नमूद केले की, शासनाने शेतकरी व त्‍याच्‍या कुटुंबाकरिता शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्त्‍याला त्‍याचे दावे विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे सादर करावे लागतात व ते दावे दस्‍तऐवजासह ते जिल्‍हा कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठवितात व त्‍यानंतर जिल्‍हा कृषी अधिकारी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे पाठवितात. ते प्राप्‍त झाले की त्‍याची पडताळणी करुन काही ञुटी असल्‍यास त्‍याची मागणी करुन प्रापत झाल्‍यावर जिल्‍हा कृषी अधिकारी मार्फत दावे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडे मंजुरीसाठी पाठविले जातात. दावा मंजूर वा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ च्‍या अखत्‍यारीत असते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चा सहभाग नसतो. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे फक्‍त विमा कंपनी तक्रारकर्ता व शासन यांच्‍यातील एक मध्‍यस्‍थ म्‍हणून काम करतात. तक्रारकर्तीच्‍या पतीचा दिनांक ५/७/२०१९रोजी निधन झाले. तक्रारकर्तीने दिनांक ५/३/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे अर्ज सादर केला. हा अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला दिनांक २०/०३/२०२० रोजी प्राप्‍त झाला. दावा प्रपञात काही दस्‍तऐवजाची ञुटी असल्‍यामुळे कागदपञाची मागणी तक्रारकर्तीकडे करण्‍यात आली तसेच हा अर्ज व त्‍यासोबत जोडलेले अपूर्ण कागदपञ विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मार्फत दिनांक ५/५/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना पाठविले. यावरुन विरुध्‍द  पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍याच्‍यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडली. तक्रारकर्तीने दस्‍तऐवजाची पूर्तता केल्‍यास तिचा दावा विरुध्‍द पक्ष  क्रमांक १ व २ मंजूर करु शकतात. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍याची जबाबदारी पूर्ण केली असल्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांनी प्रकरणात त्‍याचे उत्‍तर दाखल करीत नमूद केले की, तक्रारकर्तीचा पतीचा दिनांक ५/७/२०१९ रोजी मृत्‍यु झाला.कृषी विभागाच्‍या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताने मृत्‍यु  पावलेल्‍या श्री श्‍यामराव कवडू गद्देकार यांच्‍या पत्‍नीने दिनांक ५/३/२०२० रोजी विमा प्रकरण सादर केले. या कार्यालयाने सदर प्रस्‍ताव दिनांक ५/३/२०२० रोजी जिल्‍हा  अधिक्षक, कृषी अधिकारी यांचेकडे पाठविला. सदर प्रस्‍तावातील ञुटीसंबंधी विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ने दिनांक १९/०३/२०२० रोजी पञ पाठविले त्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याला दिनांक २७/३/२०२० च्‍या पञान्‍वये ञुटी पूर्ततेबाबत कळवून वरील कार्यालयाला दिनांक ९/७/२०२० नुसार माहिती सादर केलेली आहे तसेच दिनांक १८/१२/२०२० रोजी चंद्रपूर कार्यालयातील सभेमध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ने सदर केसमध्‍ये ६(ड) जुना फेरफार आवश्‍यकता असल्‍याबाबतचे कळविले. तक्रारकर्त्‍याकडून ६(ड) कार्यालयात सादर केल्‍यानंतर त्‍वरीत वरिष्‍ठ कार्यालयाला सादर करण्‍याची दक्षता घेण्‍यात येईल. तरी विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांनी वरिलप्रमाणे प्रस्‍तावासंबंधी योग्‍य, परिपूर्ण आवश्‍यक ती कार्यवाही, ञुटीची पूर्तता करुन वरिष्‍ठ कार्यालयास सादर केलेली आहे.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपञ, युक्तिवाद, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ चे उत्‍तर तसेच लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद यावरुन निकालीकामी खालिल कारणमीमांसा नोंदविण्‍यात आले.

कारणमीमांसा

  1. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांसाठी व कुटुंबातील कोणत्‍याही पॉलिसीधारक खातेदारासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलिसीचे नियोजन केलेले आहे व शेतक-याच्‍या वतीने महाराष्‍ट्र शासनाने विमा हप्‍ता विरुध्‍द पक्षाकडे अदा केलेला असतो. या पॉलिसीव्‍दारे या प्रकरणातील तक्रारकर्ता ही श्‍यामराव कवडू गद्देकार यांनी पत्‍नी असल्‍याकारणाने तिने लाभार्थी म्‍हणून पतीच्‍या नावाने काढलेा विमा योजनेचा लाभ विमा दावा रक्‍कम प्राप्‍त व्‍हावी म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे दस्‍तऐवजासह दावा दाखल केला. तक्रारकर्तीचे पती श्री श्‍यामराव कवडू गद्देवार यांचे नावे मौजा पोंभूर्णा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक २७६ ही शेतजमीन असून त्‍याबद्दलचा सातबारा तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेला आहे तसेच त्‍यासोबत गांव नमूना ६ सुध्‍दा फेरफार पञक दाखल असून त्‍यावर तक्रारकर्तीचे नाव वारस म्‍हणून नोंदविले असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्ष यांची ग्राहक आहे. तक्रारकर्तीचा पती यांचे दिनांक ५/७/२०१९ रोजी रेल्‍वेने धडक दिल्‍याने जखमी होऊन मृत्‍यु झाला. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या पोलीस दस्‍तऐवजावरुन तसेच पी.एम. रिपोर्ट यावरुन तक्रारकर्तीचा पती व त्‍यांचा मुलगा गुंतकाल ते बल्‍लारशा रेल्‍वेने प्रवास करीत असतांना तक्रारकर्तीचा पती श्री श्‍यामराव हे गर्दीमुळे अचानक घसरल्‍यामुळे रेल्‍वेतून पडून त्‍याचा बीबीनगर रेल्‍वे स्‍टेशन जवळ पडल्‍यामुळे जबर जखमी होऊन मृत्‍यु झाला तसेच पी. एम. रिपोर्टमध्‍येही मल्‍टीपल इंजुरीजमुळे मृत्‍यु असे कारण नमूद आहे, यावरुन तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे, ही बाब स्‍पष्‍ट होत आहे. महाराष्‍ट्र  शासनाच्‍या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेनुसार तक्रारकर्ती हिने तिच्‍या  पतीच्‍या अपघाती मृत्‍यु पश्‍चात कृषी अधिकारी विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ विमा रक्‍कम मिळण्‍याकरिता अर्ज दस्‍तऐवजासह दाखल केला याबद्दल अर्ज अभिलेखावर तक्रारकर्तीने दाखल केलेला आहे. विरुध्‍द पख्‍ज्ञ क्रमांक १ यांनी तक्रारकर्तीने दावा मुदतीत दाखल केला नाही  परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना तांञिक कारणाचा गैरफायदा घेता येणार नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. शेतक-याचा विमा दावा उशिरा दाखल केला तरी या कारणासाठी नाकारु नये असे मत मा. राष्‍ट्रीय आयोगाने व मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने अनेक न्‍यायनिवाड्यात स्‍पष्‍ट केलेले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांनी ६(ड) तक्रारकर्तीने पूर्तता केल्‍यावर दावाप्रपञ वरिष्‍ठ कार्यालयाला पाठविण्‍यात येईल असे नमूद केलेले आहे तर विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी फेरफार ६(ड)(क), 6(ब) व एफ.आय.आर. स्‍पॉट पंचनामा आणि इनक्‍वेस्‍ट पंचनामा इत्‍यादी सर्व दस्‍तऐवजासह तक्रारकर्तीने विमा दावा अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कउे दाखल केल्‍याचे अभिलेखावर दाखल आहे. सबब दस्‍तऐवजाची पूर्तता करुनही तक्रारकर्तीचा दावा अर्ज मंजूर न करणे ही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ची सेवेत दिलेली न्‍युनता आहे असे आयोगाचे मत आहे. या संदर्भात मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई, शकुंतला मुंडे विरुध्‍द स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र, २०१० (२) या निवाड्यात खालील निष्‍कर्षे काढलेला असून त्‍यात खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्‍व विषद करण्‍यात आलेले आहे.

“Scheme of Personal Accident Insurance is a social welfare scheme and said scheme is beneficial to the family members of the farmers in the event, karta of the family met with an accident resulting into stoppage of income of the family. The said minutes further disclosed that the said scheme is not for the farmer and technical approach of respondent No. 4 while granting the compensation and claim of the family member, depriving them from it is wrong and incorrect.”

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्‍कम मिळण्‍यासाठी मयत हा शेतकरी असणे किंवा शेतकरी कुटुंबातील असणे व त्‍याचा मृत्‍यु हा अपघाती झालेला असणे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार  व शासन परिपञकानुसार बंधनकारक आहे. तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्ती ही मयत श्री श्‍यामराव कवडू गद्देवार यांची पत्‍नी असल्‍याने ती अपघात योजनेनुसार लाभार्थी आहे. त्‍यामुळे सदर अपघात विमा योजनेनुसार विमा रक्‍कम मिळण्‍यास पाञ असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. सबब वरील विवेचनावरुन तक्रारकर्ती ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्‍कम रुपये २,००,०००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडून तक्रार आदेशाच्‍या  तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. ७ टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे. तसेच आयोगाच्‍या मते तक्रारकर्तीस शारीरिक व मानसिक तसेच तक्रारीचा खर्च विरुध्‍द पक्ष कमांक १ व २ कडून मिळण्‍यास पाञ आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक CC/११६/२०२० अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीस विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- तक्रार आदेशाच्‍या तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. ७ टक्‍के व्‍याजासह द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.