Maharashtra

Chandrapur

CC/20/111

Shri.Purshottam Manohar Vasekar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv.U.P.Kshirsagar

01 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/111
( Date of Filing : 02 Nov 2020 )
 
1. Shri.Purshottam Manohar Vasekar
R/o.Jaam,tah-Savli,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd through Divisional Manager
Divisional Office no.3,Plot no.321/A-2,Osavaal Bandhu Samaj Building,J.N.Road,Pune-411042
Pune
MAHARASHTRA
2. The Orienral Insurance Company Ltd through Branch Manager
Dhanraj Planza,2nd floor,M.G.Road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. Jaika Insurance Brokrage Pvt.Ltd through Manager
2nd Floor,Jaika Building,Commercial Road,Civil Lines,Nagpur-440001
Nagpur
MAHARASHTRA
4. Taluka Krushi Adhikari,Savli
Taluka-Savli,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Sep 2022
Final Order / Judgement

    ::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारित दिनांक ०१/०९/२०२२)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ (१) अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हे तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्त्‍याच्‍या  मालकीची मौजा जाम, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ५५ ही शेत जमीन आहे. तक्रारकर्ता हा शेतीचा व्यवसाय करीत आहे व त्यावरील उत्पन्नावर तक्रारकर्ता कुटुंबाचे पालनपोषण करतो. तक्रारकर्त्याची पत्नी श्रीमती पंचशिला उर्फ शिला पुरुषोत्‍तम वासेकर हिचा मृत्यू दिनांक २२/११/२०१९  रोजी सर्पदंश होऊन झाला. तक्रारकर्त्‍याच्‍या पत्नीचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्त्‍याच्‍या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने विरुद्ध पक्ष क्रमांक १ कडे दिनांक २४/०१/२०२० रोजी रीतसर अर्ज केला तसेच वेळोवेळी विरुद्ध पक्षाने दस्तावेज मागितले असता त्याची पूर्तता केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या पत्नीच्या दाव्याबाबत आठ महिने उलटून गेले तरी दावा मंजूर अथवा नामंजूर न कळविल्याने तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार या आयोगासमोर दाखल केली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे विमा कंपनी असून विरुद्ध पक्ष क्रमांक ३ हे विमा सल्लागार कंपनी आहे. शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्रमांक ४ हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. शासनाच्या वतीने विरुद्ध पक्ष क्रमांक ४ तर्फे सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्ता व त्यांच्या कुटुंबातील त्यांच्यावर अवलंबून असलेल्या एका व्यक्तीचा रुपये दोन लाखचा विमा शासनाच्या वतीने उतरविला होता. सदर दाव्याचा प्रस्ताव विरुद्ध पक्ष क्रमांक ३ व ४ तर्फे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून सर्व प्रस्ताव बरोबर आहे हे पाहून विरुद्ध पक्ष क्रमांक १ व २ कडे दिला जातो. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ सदर दाव्‍याचे भुगतान करते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याचा दावा फेटाळल्‍याबाबत त्यांना अद्याप पत्राने न कळविल्‍याने तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे. विरुद्ध पक्ष यांच्या कृतीमुळे तक्रारकर्त्याला अतिशय मानसिक ञास झाला असून विरुद्ध पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा देण्यास कसूर केल्‍याने सदर अर्ज विद्यमान न्‍यायमंचामध्‍ये  नुकसान भरपाईची रक्कम रुपये दोन लाख तसेच झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/-  मिळण्‍याकरिता दाखल केलेला आहे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन खोडून काढीत पुढे आपल्‍या  विशेष कथनात  नमूद केले की, मयत श्रीमती पंचशिला उर्फ शिला यांचा मृत्‍युसर्पदंशने होऊन विसेरा हा जतन करण्‍यात आला होता हे पी.एम. रिपोर्टमध्‍ये स्‍पष्‍ट दिसून येत आहे. परंतु  सरकारचा रासायनिक अहवाल प्रकरणात तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नाही त्‍यामुळे विरुध्‍द पक्षक्रमांक १ व २ हे सदर तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत. प्रकरणातील दाव्‍याचे  कारण दिनांक २२/११/२०१९ रोजी घडले जेव्‍हा की तक्रार  ही दिनांक ८/८/२०२० रोजी दाखल केली आहे. त्‍यामुळे सदर तक्रार मुदतबाह्य असून सदर आयोगाला हे प्रकरण चालविण्‍याचे अधिकारी नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने सदर  दावा कृषी अधिकारी यांचेकडे ९० दिवसाच्‍या आत  दाखल केला याबद्दल कोणताही पुरावा कागदपञ तक्रारीत दाखल नाही. सदर योजना सार्वजनिक  योजना  असून नियमानुसार सर्व  कामे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडून केल्‍या गेल्‍या असून त्‍या पारदर्शता आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी केलेले विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्‍दचे आरोप हे बेकायदेशीर व तत्‍वहीन आहेत. तसेच तक्रारकर्ता यांनी खोटे व बोगस कागदपञे तयार करुन खोटी सही व अंगठ्याचा ठसा तक्रारीत  केलेला आहे. सबब विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ आयोगाला विनंती  करीत आहे की, सदर तक्रार खारीज  करण्‍यात  यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल करुन नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे दिनांक २३/११/२०१९ रोजी अपघाती निधन झाले. तक्रारकर्त्‍याने या योजनेअंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक ४, तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे दिनांक २५/०१/२०२० रोजी अर्ज सादर केला. सदर अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडून जिल्‍हा कृषी अधिकारी मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांच्‍याकडे दिनांक ७/२/२०२० रोजी प्राप्‍त झाला व हा अर्ज त्‍यासोबत जोडलेले दस्‍तावेज विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍याकडे दिनांक २१/०२/२०२० रोजी विचारार्थ पाठविले. या अर्जाची शहानिशा केल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी मयतव्‍यक्‍तीच्‍या नावावर तसेच फेरफार उतारा ६ (क) व ६ (ड) नसल्‍यामुळे दिनांक १९/०८/२०२० रोजी या पञाव्‍दारे दावा नामंजूर केला. दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍या अखत्‍यारीत असते. यामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चा कोणताही सहभाग नसतो. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे फक्‍त विमा कंपनी, अर्जदार व शासन यांच्‍यातील एक मध्‍यस्‍थी म्‍हणून काम करतात.  
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांनी प्रकरणात उपस्थित राहून त्‍याचे उत्‍तर दाखल करीत नमूद केले की, मयत पंचशिल उर्फ शिला पुरुषोत्‍तम वासेकर यांचे वारसदार श्री पुरुषोत्‍तम मनोहर वासेकर यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्‍ताव दिनांक २५/११/२०२० रोजी या कार्यालयात सादर केला व या कार्यालयातून दिनांक १८/०९/२०२० रोजी जिल्‍हा अधिक्षक यांचे कार्यालयात सादर केला होता. कोणताही दावा प्रकरण मंजूर  अथवा नामंजूर याबाबत अपघातग्रस्‍त कुटुंबाच्‍या वारसदाराला लेखी स्‍वरुपात कळवून त्‍याची एक प्रत कृषी विभागात देणे कंपनीला अनिवार्य आहे. परंतु अद्याप संबंधीत दाव्‍याप्रकरणी कोणतेही पञ प्राप्‍त झाले नाही. सदर प्रकरणात या कार्यालयाकडून कोणतेही कार्य प्रलंबित नसल्‍याने या कार्यालयाला या प्रकरणातून वगळण्‍यात यावे.
  6. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२,३ व ४ चे लेखी उत्‍तर तसेच तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ह्यांचे पुरावा तसेच लेखी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍त क्रमांक ४ वरील कागदपञांच्‍या यादीमध्‍ये  ७/१२ उतारा व इतर शेतीचे कागदपञांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता याच्‍या मालकीची मौजा जाम (रैयतवारी), तालुका सावली, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ५५ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ विमा कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे विमा सल्‍लागार कंपनी आहे व तक्रारकर्ता यांनी शासनाच्‍या वतीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ तर्फे सदर विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्ता व त्‍याच्‍या कुटुंबातील त्‍याच्‍यावर अवलंबुन असलेल्‍या म्‍हणजे त्‍याच्‍या पत्‍नीचा श्रीमती पंचशिला ऊर्फ शिला पुरुषोत्‍तम वासेकर हिचा रुपये २,००,०००/- चा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला होता. सदर तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा  श्रीमती पंचशिला ऊर्फ शिला हिचा मृत्‍यु दिनांक २२/११/२०१९ रोजी सर्पदंश होऊन झाला. सबब तक्रारकर्ता यांनी पत्‍नीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दिनांक २४/०१/२०२० रोजी रितसर अर्ज केला तसेच वेळोवेळी मागितलेले दस्‍तावेज पुरविले. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी त्‍याच्‍या उत्‍तरात असे नमूद केले की मयताची पत्‍नी सर्पदंशाने मृत्‍यु पावली असे पी.एम. रिपोर्ट मध्‍ये स्‍पष्‍ट असले तरी त्‍याबद्दल रासायनीक विश्‍लेषण अहवाल तक्रारकर्ता यांनी तक्रारीत दाखल केला नाही तसेच प्रकरणातील घटना दिनांक २२/११/२०१९ रोजी घडली परंतु तक्रारकर्ता यांनी तक्रार दिनांक ८/८/२०२० रोजी दाखल केल्‍यामुळे तक्रार मुदतबाह्रय असून खारिज करण्‍यात यावी तसेच योजनेनुसार ९० दिवसाचे आत दावा कृषी अधिका-याकडे दाखल करावा लागतो परंतु वेळेत दावा दाखल केल्‍याचे कोणतेही कागदपञ तक्रारकर्ता यांनी प्रकरणात दाखल केले नाही. उपरोक्‍त प्रकरणातील दोन्‍ही पक्षाचे कथन व दस्‍तऐवजावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु दिनांक २२/११/२०१९ रोजी शेतात काम करीत असतांना साप चावल्‍याने झाला तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख घटनास्‍थळ पंचनामा तसेच वैद्यकीय अधिकारी अधिक्षक ग्रा‍मीण रुग्‍णालय सावली यांच्‍या मार्फत केलेल्‍या शवविच्‍छेदन अहवालात आहे. तसेच सरपंच ग्रामपंचायत कोंडखल यांनी दिलेल्‍या प्रमाणपञात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु सर्पदंशाने झाल्‍याचा उल्‍लेख आहे तसेच विमा योजनेच्‍या ञिपक्षीय करारानुसार पोस्‍ट मार्टम रिपोर्टमध्‍ये मुत्‍युचे कारण स्‍पष्‍टपणे नमूद असल्‍यास त्‍याबाबत सविस्‍त्‍र विसेरा रिपोर्टचा आग्रह विमा कंपनीने धरु नये. शिवाय प्राधिकृत अधिका-याने दिलेल्‍या स्‍पष्‍ट अहवालाला नाकारण्‍याचे कोणतेच कारण विमा कंपनीला नाही. त्‍याशिवाय सदर अहवाल चुकीचा आहे याबद्दल विरुध्‍द पक्ष यांनी कोणताही पुरवा आयोगासमोर आणला नाही तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ता यांनी दावा मुदतीत दाखल केला नाही, या तांञिक कारणाचा आधार घेता येणार नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे कारण महाराष्‍ट्र शासनाने विम्‍या  दाव्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे घालून दिली असून त्‍यानुसार विमा दावा ९० दिवसाच्‍या  मर्यादीत दाखल न होता विलंबाने दाखल झाला तरी देखील तो स्‍वीकारावा असे दिशानिर्देश आहे. सबब तक्रारकर्त्‍याची मयत पत्‍नी श्रीमती पंचशिला ऊर्फ शिला हिचा अपघात विमा दावा नाकारुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला सेवेत न्‍युनता दिली आहे हे सिध्‍द होत आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ यांनी तक्रारकर्त्‍याला विना मोबदला मदत केली असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द कोणताही आदेश नाही. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १११/२०२० अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची मयत पत्‍नी श्रीमती पंचशिला ऊर्फ शिला पुरुषोत्‍तम वासेकर हिच्‍या अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ यांचे विरुध्‍द दाखल करण्‍यात आलेली तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.