Maharashtra

Chandrapur

CC/18/183

Shrimati Surekha Wasudeo Nagarkar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company ltd through Branch Manager - Opp.Party(s)

N M Naukarkar

08 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/183
( Date of Filing : 01 Dec 2018 )
 
1. Shrimati Surekha Wasudeo Nagarkar
R/O.Niljay,Tah-Warora,Dist-Chandrapur
Chandrapur
MAharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company ltd through Branch Manager
L.T.V.School behind,Main Road,Chandrapur
Chandrapur
MAharashtra
2. Jayka Insurance Brokraj Pub.Ltd
2 nd floor,Jayka Building ,Commercial road,Civil lines,Nagpur-440001
Nagpur
MAharashtra
3. Taluka Krushi Adhikari
Sindewahi,Tah-Sindewahi,Dist-Chandrapur
Chandrapur
MAharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Sep 2021
Final Order / Judgement

(मंचाचे निर्णयान्‍वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या)

(पारित दिनांक :- ०८/०९/२०२१)

 

  1. तक्रारकर्ती हिने ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अंतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍याबाबत तक्रार दाखल केलेली असून तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी होता व तो दिनांक ३०/०६/२०१७ रोजी सर्पदंशाने झालेल्‍या अपघातामुळे मरण पावला. त्‍यानंतर तक्रारकर्तीने गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत तलाठी प्रमाणपञासह आवश्‍यक कागदपञासह विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे अर्ज सादर केला. तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या नावाने मौजा निलजई. तह. वरोरा, जिल्‍हा चंद्रपूर  येथे शेतजमीन असून त्‍याचा भुमापन क्रमांक २९८ आहे. तक्रारकर्तीने विमा रक्‍कम मिळण्‍याकरिता वारंवार प्रयत्‍न करुनही विमा रक्‍कम न मिळाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष विरुध्‍द सदर तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ३ यांना नोटीस बजावण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी त्‍यांचे उत्‍तर तक्रारीत दाखल केले. विरुध्‍द पक्ष  क्रमांक ३ यांना नोटीस प्राप्‍त होऊनही तक्रारीत उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍याचे आदेश करण्‍यात आले.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारीत नमूद प्राथमिक आक्षेप केला की,  तक्रारकर्तीने तिचा विमा दावा तालुका कृषी अधिकारी, वरोरा यांचेकडे दाखल केलेली आहे परंतु सदर तक्रारीत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मध्‍ये कृषी अधिकारी, सिंदेवाही यांना पक्ष केलेले आहे. सदर विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चे या तक्रारीचा काहीही संबंध नाही. त्‍यामुळे सदर तक्रार योग्‍य पक्ष न जोडल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावा तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे पुढे नमूद करतात की, तक्रारीचे कारण दिनांक ३०/०६/२०१७ रोजी घडलेले आहे परंतु सदर तक्रार दिनांक २९/११/२०१८ रोजी दाखल केली असल्‍यामुळे मुदतबाह्य आहे. तक्रारकर्तीने विमा दाव्‍याचा अर्ज हा कृषी अधिकारी यांचेकडे ९० दिवसाचे आत दाखल करायलाच हवा परंतु हा दावा ९० दिवसाचे आत दाखल झालेला नाही या कारणास्‍तवही सदर तक्रार मुदतबाह्य आहे. तसेच तक्रारकर्ती हिच्‍या पतीचा सर्पदंशाने मृत्‍यु झाल्‍याचा केमीकल रिपोर्टही दाखल केलेला नाही. शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळण्‍याकरिता सदर अहवाल आवश्‍यक आहे या सर्व कारणाकरिता तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही मुळतः मुदतबाह्य असून खर्चासहीत खारीज करण्‍यात यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्‍याचे लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यात त्‍यांनी नमूद केले की, तक्रारकर्तीने शासनाव्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे अर्ज सादर केला होता तसेच विरुध्‍द पक्षाकडून जिल्‍हा कृषी अधिकारी मार्फत त्‍यांचेकडे प्राप्‍त झाला व तो त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे पाठविला. विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ ने काही दस्‍तऐवजाची पुर्तता तक्रारकर्तीने केलेली नसल्‍यामुळे पुर्तता करण्‍यासाठी तक्रारकर्तीला कळविले. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ विरुध्‍द तक्रार करण्‍याकरिता कोणतेही कारण घडलेले नाही व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी त्‍यांच्‍या सेवेत कोणतीही कसूर केलेली नसल्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्ती व विरुध्‍द पक्ष क्रमांक  १ व २ यांचे लेखी कथन आणि शपथपञ तसेच तक्रारकर्ती व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे तोंडी व लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षाचा परस्‍पर विरोधी कथनावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमिमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात येत आहेत.
  6. तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन निशानी क्रमांक ४  वरील दस्‍त क्रमांक ७, गाव नमुना ६ वरुन तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी आहे असे सिध्‍द होत आहे तसेच दस्‍त क्रमांक १,२ व ३ यावरुन स्‍पष्‍ट होत आहे की, तक्रारकर्तीने तिच्‍या पतीच्‍या अपघाती मृत्‍युचा नुकसान भरपाईचा दावा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व्‍दारा कृषी अधिकारी, तह. वरोरा यांचेकडे सादर केलेला आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्ती हिने विमा दावा वेळेत दाखल केला नाही त्‍यामुळे मुदतबाह्य आहे हा आक्षेप घेतला आहे परंतु ह्या तांञिक कारणावरुन विमा कंपन्‍यांना विमा दावा नाकारता येणार नाही ही बाब परिपञकात स्‍पष्‍ट आहे तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या निशानी क्रमांक ४ मधील दस्‍त क्रमांक १६, १७ आणि १८ तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु  विषारी साप चावल्‍यामुळे झालेला आहे हे सिध्‍द होत आहे तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमायोजना या परिपञकात असे स्‍पष्‍ट नमूद आहे की, विषारी साप चावला असे पी.एम. अहवाल तसेच इतर दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट लिहिले असता रासायन नी अहवालाची वाट पाहण्‍याची गरज नाही. सबब सदर प्रकरणात विमा दाव्‍यासंबंधीची मागणी केलेली कागदपञे तक्रारकर्तीने दाखल करुन देखील विमा दावा फेटाळल्‍याचे दिसून येत असल्‍यामुळे आयोगाचे मते विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडून तक्रारकर्ती विमा दाव्‍यासंबंधीची रक्‍कम रुपये २,००,०००/- मिळण्‍यास पाञ आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी प्रकरणात निःशुल्‍क सेवा पुरवली असल्‍यामुळे त्‍यांचेवर दावा देण्‍याची जबाबदारी नाही. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येते.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्ती हिची तक्रार क्रमांक सी.सी. १८/१८३ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा रक्‍कम रुपये २,००,०००/- तक्रारकर्तीला अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे विरुध्‍द दाखल करण्‍यात आलेली तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ती  यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.