::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 10/10/2019)
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. | |
|
2. अर्जदार ही राहणार आंबेमक्ता तालुका वरोरा येथील रहिवासी असून तिचा पती श्री मेघराज लहानु डुकरे यांच्या मालकीची मौजा आंबेमक्ता तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 45 ही शेतजमीन आहे अर्जदाराचा पती शेतीचा व्यवसाय करीत होता, त्या उतपान्नावर अर्जदाराच्या पालन पोषण करीत होता. गैरअर्जदार क्र. एक विमाकंपनी असून विरुद्ध पक्ष गैरअर्जदार क्र. दोन हे विमा सल्लागार आहेत विरुद्ध पक्ष क्र. 3 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात शासनाच्यावतीने गैरअर्जदार क्र. 4 तर्फे सदर विमा योजनेअंतर्गत अर्जदार तिने पतीचा एक लाख चा विमा उतरविला होता सदर विमा तरी शासनाच्या वतीने उतरवण्यात आला असला तरी अर्जदार हि मयत श्री मेघराज लहानु ठाकरे यांची पत्नी असल्याने सदर विमा ची लाभधारक आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 10. 1 2008 रोजी मोटरसायकलवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी होऊन झाला. अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू असल्यामुळे बाईने सदर दाव्याचा प्रस्ताव दस्ते एव्जासह गैर अर्जदार ३ तर्फे शहानिशा करून गैरअर्जदार क्रमाक १ कडे कडे दाखल करा परंतु गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराच्या पतीच्या दाव्याबाबत दहा वर्ष उलटून गेले तरी नामंजूर वा मंजूर न कळवील्याने अर्जदार हिने वकिलामार्फत 31. 1. 2018 रोजी गैरअर्जदार क्र. १ ते 4 ह्यांना कायदेशीर नोटीस पाठवून अर्जदाराचा दावा केव्हा नाकारला आहे विचारले परंतु सदर दाव्याबाबत मंजूर अथवा नामंजूर ची माहिती अद्याप गैरअर्जदार क्र. एक ते तीन ह्यांनी अर्जदार हिला दिली नाही. सबब सदर दाव्याची रक्कम मिळाली नसल्यामुळे व त्यावरील व्याजाला तिला मुकावे लागले. त्यामुळे सदर तक्रार अर्जदार हिने मंचा समोर दाखल केलेली आहे.
3. अर्जदार बाईची मागणी अशी आहे की गैरअर्जदारानी अर्जदार हिला आवश्यक ते सेवा प्रदान करण्यामध्ये कसूर केल्याने सदरचा अर्जदाराला १०००००/- देण्यात यावे तसेच झालेल्या मानसिक शारीरिक त्रास पोटी 30,000 व तक्रारीचा खर्च 10,000 मिळण्यात यावा.
4. गैरअर्जदार क्र. एक ने मंचात उपस्थितीत राहून त्यांचे लेखी बयान करून अर्ज्दाराचेताक्ररीतील म्हणणे खोडून काढीत नमूद केले कि केले की अर्जदार हिच्य पतीचा अपघात हा दिनांक 10. 1. 2008 रोजी झाला 2008 मध्ये घडलेल्या कारणाकरता दिनांक 31. 1. 2018 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठून तक्रारीचे कारण होऊ शकणार नाही. सबब अर्जदाराची तक्रार प्राथमिक दृष्ट्या मुदतबाह्य आहे. तसेच अर्जदाराने विमादाव्यासोबत काही दस्तावेज ऐवज गैरअर्जदार क्र. 4 च्या माध्यमातून तक्रारीत दाखल केले त्या दस्तएवजाचा अभ्यास केल्यानंतर या गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास वारंवार मृतकाचे नाव असलेला जमिनीचा सातबारा फेरफार पत्रक आणि वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी दस्तावेजांची मागणी केली, परंतु अर्जदाराने या दस्तऐवजाची पूर्तता न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 12. 12 2018 अर्जदारास पत्र पाठवून अर्जदाराचा विम दावा फेटाळला. अर्जदार हिने तक्रारीत मोघम कथन केले आहे, तसेच विमा केव्हा व कोणत्या कंपनीकडे हे तक्रारीत स्पष्ट केले नाही तिच्या पतीचा अपघात कुठे व कसा व पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हा बाबत कोणतीही कथन अर्जदार केलेले नाही बहुदा असा कोणताही अपघात झाला नसल्यामुळे अर्जदार ही बाब विद्यमान मंचा समोर आणले नाही,किवा त्याबाबत दस्त सादर केले नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्त यावरून असे दिसून येते की अर्जदाराला गैरअर्जदार क्र. तीन कडून 2008 मध्ये मयताचे वाहन चालवणे करता परवाना पोलिसांनी छायांकित केलेली प्रथम मृतकाचे नावाच्या शेतजमिनीचा नावाचा फेरफार दस्तावेज मागितल्याचे दिसून येते पण हे प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना दिल्याच्या कोणताही दस्तावेज सादर केलेला नाही अर्जदाराने गैरअर्जदार क्र. तीनमार्फत तिचे पतीचे वाहन अपघात झालेल्या मृत्यू संदर्भात विमा दावा दाखल केला त्या विमा दाव्यांची पडताळणी करताना गैरअर्जदार क्र. तीन चे लक्षात आले की अर्जदाराने मृतकाच्या मोटर सायकल चालवण्याचा परवाना दाव्या सोबत सादर केलेला नाही तसेच मृतकाच्या नावे शेतजमीन झाली नसून त्याचा फेरफार दाखल केले नाही. त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेल्या पान क्र. 23 वरील पत्राद्वारे 15 दिवसाच्या आत दस्त दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु गैरअर्जदार क्र. तीन ला मृतकाच्या वाहन चालवण्याचा परवाना अथवा शेत जमिनीचा फेरफार दिनांक 4. 8. 2008 पर्यंत दिला नाही. व त्यावर 5.8.2008 चा अर्ज देऊन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. तीन ला कळवले की त्याचा वाहन परवाना गहाळ झाला आहे व फेरफार चा दाखला देत आहे वास्तविक अर्जदाराने दाखला न देता फक्त त्याची नावे असलेला सातबारा उतारा दिला पूर्ण संधी देऊन सुद्धा अर्जदाराने त्याचा वाहन चालवण्याचा परवाना न दिल्यामुळे गैरअर्जचेदार क्र. तिन ने तसा अहवाल विमा कंपनीकडे सादर केला व विमा कंपनी ने दिनांक 11. 12. 2008 चे मयताचा वाहन परवाना अर्जदाराने न दिल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा फेटाळून तसेच अर्जदार दिनांक 12. 12.2008 चे पत्राद्वारे कळवले आहे. सत्य परिस्थिती विद्यमान यांच्यापासून अर्जदाराने लपवून ठेवली असल्यामुळे खोट्या आशयाची नोटीस गैरअर्जदार यांना पाठवला सन 2008 मध्ये वर नमूद केल्याप्रमाणे अर्जदारास विमा दावा फेटाळण्याचे पत्र दिल्यानंतर सन 2018 मध्ये वाद दाखल करण्याचे कोणतेही कारण नाही सबब अर्जदाराचा तक्रार खारीज करण्यात यावा
5. गैरअर्जदार क्र. 3 ह्यांना प्रकरणात नोटीस प्राप्त होऊनसुद्धा हजर न झाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्र.3 विरुद्ध एकतर्फा चालविण्याचा आदेश करण्यात आला.
6. गैरअर्जदार क्र.चार यांनी मंचात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की,अर्जदाराने सादर केलेल्या दाव्याची तपासणी करून माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अर्जदाराचा दावा सादर करण्यात आला व माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रस्ताव देऊ विमा कंपनी सादर केला.
7. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र.१,२व ४ यांचे लेखी म्हणणे, गैरअर्जदार व अर्जदार यांचे पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व गैरअर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. आदेश काय ? आदेशप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
8. तक्रारीतील दोन्ही पक्षाचे उपरोक्त कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत की अर्जदाराचे पतीचा मृत्यु दि. १०.०१.२००८ रोजी मोटार सायकल वरून जात असताना वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी होऊन झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज २००८ मध्ये केला. गैरअर्जदाराच्या उत्तरात नमूद असल्याप्रमाणे अर्जदाराने दस्तेव्जाची पूर्तता न केल्यामुळे या आधारावर तिचा विमादावा खारीज केला. परंतु अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैरअर्जदारांनी पाठविलेले दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्या मते एखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्यानंतर दावा प्राप्त करण्यासाठी तो ९ ते १० वर्ष वाट पाहणार नाही व दावा मिळण्याकरिता त्याचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केल्याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. उलटपक्षी गैर अर्जदाराने त्यांचे कागद पत्रासह अर्जदाराला तिचा विमा दावा फेटाळल्याचे दि १२.१२..२००८ चे पत्र दि. ५.०६.२०१८ चे यादीसह तक्रारीत दाखल केले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतर केवळ दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही,तसेच दावा दाखल केल्यानंतर १० वर्षाच्या कालावधी उलटून गेल्यावर दि. ३१.१.२०१८ रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठविन्या मुळे तक्रारिच कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.४६/२०१८ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे))(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))(श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.