निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 22.10.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 25.10.2010 तक्रार निकाल दिनांकः- 04.07.2011 कालावधी 08 महिने 09 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. गजानन गोपीचंद सामाले अर्जदार वय 36 वर्षे धंदा शेती व व्यापार रा.टाकळी कुंभकर्ण, ( अड एस.एन.वेलणकर ) ता.जि.परभणी. विरुध्द शाखा प्रबंधक गैरअर्जदार दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड ( अड.गौतम नरवाडे ) परभणी शाखा दौलत बिल्डींग शिवाजी चौक, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या -------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या. ) गैरअर्जदाराने अर्जदाराच्या अपघातग्रस्त वाहनाचा विमा दावा फेटाळून दिलेल्या त्रूटीच्या सेवेबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा प्रवासी वाहतूक व्यवसाय करत असून त्याने एम.एच.38/एफ 183 क्रमांकाची जीप विकत घेतली होती व गैरअर्जदाराकडून अर्जदार दरवर्षी जीपचा विमा उतरवत होता. दिनांक 16.06.2009 रोजी अर्जदाराच्या जीपचा अपघात झाला. अर्जदाराने अपघाताची कोतवाली पोलीस स्टेशन येथे खबर दिली व गैरअर्जदाराना या घटनेची कल्पना दिल्यावर त्यानी जागेवरच जीपची तपासणी करुन जीप गंगाखेड रोडवरील साई मोटार्स यांच्याकडे दुरुस्तीला पाठवली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईचा क्लेम क्रमांक 182003/31/2010/000050 नोंदवला व वाहन दुरुस्त झाल्यावर कागदपत्रांची पूर्तता केली परंतू दिनांक 29.04.2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास अपघाताच्या वेळी वाहनाचे फीटनेस प्रमाणपत्र हे Invalid असल्यामुळे विमा दावा फेटाळल्याचे कळवले. अर्जदाराचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने त्याला त्रूटीची सेवा दिल्याबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम द.सा.द.शे 12 % व्याजासह मिळावी व मानसिक त्रास दिल्याबद्यल रुपये 5000/-, तक्रार अर्जाचा खर्च रुपये 2500/- मिळावा अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र नि. 2 वर जीप नोंदणीचा तपशील फीटनेस प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, क्लेम फेटाळल्याचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदाराने आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे की, अर्जदाराने अपघातग्रस्त वाहनाचा गैरअर्जदाराकडून विमा उतरवल्याचे मान्य करुन तक्रारीतील बाकीचा मजकूर अमान्य केला आहे. तसेच अर्जदार हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत होता त्यामुळे त्याने कराराचे उल्लघंन केल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाईस पात्र नाही तसेच वाहनाचे फीटनेस सर्टीफीकेट सुध्दा नसल्यामुळे अर्जदाराने कराराचे उल्लघन केले आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदाराने आपल्या म्हणण्यासोबत नि. 12 वर शपथपत्र , इन्शुरन्स पॉलीसीची कॉपी, ड्रायव्हर लायसंस , मोटार ओन डॅमेज क्लेम गाइड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 – अर्जदाराने गैरअर्जदाराकडून सन 2009 मध्ये त्याच्या टॅक्सी जीप क्रमांक एम.एच.38/एफ 183 ची पॉलीसी क्रमांक 182003/31/2010/2939 अन्वये दिनांक 25.11.2009 ते दिनांक 25.11.2010 या कालावधीसाठी विमा उतरवला होता ही बाब सर्वमान्य आहे. दिनांक 16.06.2009 रोजी अर्जदार स्वतः जीप घेऊन पोखर्णी ते परभणी येत असताना पिंगळगड नाल्याजवळ अपघात होवून जीपचे साधारण रुपये 50,000/- च्या वर नुकसान झाले. अर्जदाराने गैरअर्जदाराना या घटनेची माहिती दिल्यावर त्यानी जागेवरच जीपची तपासणी करुन जीप गंगाखेड रोडवरील साई मोटार्स हयांचेकडे दुरुस्तीला पाठवून दिली व अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम अनु.क्र.182003/31/2010/000050 अन्वये नोंदवला. गैरअर्जदारानी अर्जदाराकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली व दिनांक 29.04.2010 रोजी अर्जदारा पत्र पाठवून कळवले की, ‘’ सर्व्हेअरनी रुपये 29000/- रुपये देण्याचा अहवाल दिला आहे परंतू अपघाताच्या वेळी फीटनेस प्रमाणपत्र हे इनव्हॅलीड असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही ‘’ असे कळवले. अर्जदारास अपघाच्या वेळी Fitness certificate चे रिन्यूअल नव्हते हे मान्य आहे परंतू त्यानंतर दिनांक 29.08.2009 ते 28.08.2010 पर्यंतचे रिन्यूअल अर्जदाराने करुन घेतलेले होते. गैरअर्जदारानी अर्जदाराचे वाहन हे रस्त्यावर चालावण्यास Unfit होते असा कोणताही अहवाल आर.टी.ओ. यांच्याकडून घेतलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदार हा सदरील जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेवून जात असल्यामुळे अर्जदार हा नुकसान भरपाई मागण्यास पात्र नाही असे म्हटले आहे. गैरअर्जदार जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणतो आहे याचा कोणताही ठोस पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही. तसेच अर्जदाराच्या जीपचे फीटनेस सर्टीफीकेट नव्हते म्हणून विमा दावा फेटाळल्या संदर्भात गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या नि. 14/2 वरील पॉलीसी शेडयूलमध्ये कोणताही क्लॉज दिसून येत नाही तसेच नि. 14/3 वरील ड्रायव्हींग लायसेंस हा LMV (Tr) आहे. त्यामुळे ड्रायव्हरचा लायसेंस हा पॉलीसी कंडीशन प्रमाणे व्हॅलीड आहे. वाहनाच्या फीटनेस बाबत सर्टीफीकेट आसणे आवश्यक आहे असे नि. 16/1 वर गैरअर्जदाराने दाखल केलेले ‘’ Motor own damage guide “ मध्ये म्हटलेले आहे. परंतू ही माहिती अर्जदारास दिलेली होती याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत नाही. अर्जदारास दिलेल्या मोटर इन्शुरन्स सर्टीफीकेट कम पॉलीसी शेडयूल वर वाहनाचे फीटनेस सर्टीफीकेट आवश्यक आहे असा सर्वसामान्य लोकांना समजेल असा उललेख कुठेही दिसून येत नाही म्हणून अर्जदाराचा विमा दावा फेटाळून गैरअर्जदाराने अर्जदाराला त्रूटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते तसेच अर्जदाराचा विमा दावा दिनांक 29.04.2010 रोजी फेटाळण्यात आला आहे तेंव्हापासून अर्जदार हा रुपये 29000/- वर व्याज मिळण्यास पात्र आहे असे आम्हास वाटते खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत रुपये 29000/- हे दिनांक 29.04.2010 पासून संपूर्ण रक्कम देय होइपर्यंत द.सा.द.शे 9 % व्याजाने दयावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासाबाबत रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1500/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |