निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 06/02/2010 तक्रारनोदणीदिनांकः-16/12/2010 तक्रारनिकालदिनांकः- 20/04/2010 कालावधी05 महिने 04 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांतबी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. दादाराव पिता मारोतराव शिंदे अर्जदार वय 50 वर्षे.धंदा शेती अँड.आर.बी.वांगीकर रा.वांगी ता व जि. परभणी. विरुध्द दि ओरियंटल इन्शुरंस कं.लि. गैरअर्जदार. विभागीय कार्यालय अंबर प्लॉझा अँड.अभय गिरगांवकर दौलत बिल्डींग. शिवाजी चौक.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाताजोशी. सदस्या. 3) सौ.अनिताओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्षा ) जनता वैयक्तिक अपघात विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीने दिली नाही म्हणून प्रस्तूतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचा मुलगा जगनाथ याचा दिनांक 25/5/2009 रोजी नातेवाइकासोबत मोटार सायकलवरुन जात असताना परभणी ते बसमत रोडवर मोटार सायकलला जीपने धडक दिल्यामुळे अपघातात अर्जदाराचा मुलगा जगनाथ ला डोक्याला जबर जख्म झाली. परभणी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी अडमिट केले परंतू उपचारा दरम्यान दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला. अपघातातील जीप एम.एच. 22-2034 च्या ड्रायव्हर विरुध्द नवा मोंढा पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला. मयत जगनाथ च्या नावे अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडून रुपये एक लाख जोखमीची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी घेतली होती. कंपनीतर्फे लाइफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस लिमीटेड यांचे लाईफ केअर कार्ड क्रमांक डि 2007 / एम.एच.77/000277-000278 दिलेले होते. अर्जदाराने मुलाच्या मृत्यूनंतर गैरअर्जदाराकडे पॉलीसी हमीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम केला होता परंतू त्याने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रुपये एक लाख मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- द.सा.द.शे. 15 % व्याजासह मिळावे अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपथ (नि.2) व पुराव्यातील कागदपत्र नि.5 लगत 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. मंचाची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने लेखी निवेदन दिनांक 09.03.2011 रोजी (नि.10) दाखल केले आहे. तक्रार अर्जातील अपघात घटनेसंबधीचा मजकूर वैयक्तिक माहीती अभावी गैरअर्जदाराने अमान्य केला आहे. पॉलीसी संबधीचा मजकूर त्याना मान्य आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, अपघातातील जीप ड्रायव्हर ची काहीच चुक नव्हती अर्जदार प्रवास करीत असलेल्या मोटार सायकल चालकाच्या निष्काळजीपणा मुळेच अपघात घडलेला होता. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणतीच सेवा त्रूटी झालेली नाही. अर्जदाराने लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस मार्फत पाठवलेली क्लेमची कागदपत्रे तपासता अर्जदाराने ब-याच गोष्टी लपावल्या असल्याचे दिसून आले. शिवाय घटनेनंतर सात दिवसाचे मुदतीत क्लेम दाखल केलेला नव्हता त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र (नि.11) वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या मुलाची अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? होय. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने स्वतःचे नावे व तीन मुले अनुक्रमे 1) जगनाथ (2) विश्वनाथ (3) कुणाल यांचे नावे गैरअर्जदार कंपनीकडून जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी उतरविलेली होती त्या पॉलीसी सर्टीफीकेटची कॉपी पुराव्यात ( नि.5/1) दाखल केलेली आहे तिचे अवलोकन केले असता. अर्जदाराचे नावे रुपये एक लाख हमीची जगनाथ चे नावे रुपये एक लाख हमीची विश्वनाथ चे नावे रुपये 50,000/- व कुणाल चे नावे रुपये 50,000/- जोखीमीची असून तिची मुदत 13.07.2007 ते 12.07.2012 अखेर असल्याचे नमूद केलेले आहे. वरील चौघांचे पॉलीसीचे नंबर्स पॉलीसी सर्टीफीकेट वर आह. दिनांक 20.05.2009 रोजी अर्जदाराचा मुलगा जगनाथ दादाराव शिंदे नातेवाइकासोबत मोटार सायकलवरुन जात असताना परभणी ते बसमत रोडवर मोटार सायकलला जीपने धडक दिल्यामुळे अपघातात त्याच्या डोक्याला जबर जख्म झाली. परभणी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी अडमिट केले परंतू उपचारा दरम्याना दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला. अपघातातील जीप एम.एच. 22-2034 च्या ड्रायव्हर विरुध्द नवा मोंढा पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला ही वस्तूस्थिती शाबीत करण्यासाठी पुराव्यात पोलीस स्टेशनला दिलेल्या फीर्यादीची छायाप्रत (नि.5/2) , घटनास्थळ पंचनामा नि. 5/3 मरणोत्तर पंचनामा, (नि.5/4) पी.एम.रिपोर्ट ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यांचे बारकाईने अवलोकन केले असता जगनाथ शिंदे याचा अपघाती मृत्यू झाला होता याबदल कोणतीही शंका उरत नाही. मयत जगनाथ चे नावे गैरअर्जदार कंपनीकडून रुपये एक लाख हमीची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी घेतलेली असल्यामुळे आणि त्याचा मृत्यू पॉलीसी मुदतीत झालेला असल्यामुळे पॉलीसी हमीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराशी सलग्न कंपनी लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हीसेस प्रा.लि. यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम पाठविलेला होता हे गैरअर्जदाराने नाकारलेले नाही. परंतू नुकसान भरपाई मंजूर न करता मयताचा मत्यू जीप चालकाच्या चुकीमुळे झालेला नव्हता तर मयत ज्या मोटार सायकलवरुन जात होता त्या चालकाच्याच निष्काळजीपणा मुळे झाला त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असा लेखी जबाबात बचाव घेतलेला आहे तो चुकीचा आहे कारण पुराव्यात दाखल केलेल्या पोलीस पेपरवरुन जीप चालकाविरुध्दच पोलीसानी अंती गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे जीप चालकाच्या निष्काळजीपणा मुळे तो अपघात घडलेला होता हे स्पष्ट होते. गैरअर्जदारानी लेखी जबाबात असाही बचाव घेतलेला आहे की, अपघात घडल्यानंतर नियमाप्रमाणे सात दिवसाचे आत विमा कंपनीकडे क्लेम दाखल केलेला नसल्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही हा बचाव ही मुळीच मान्य करता येणार नाही. सदर ची अट अथवा नियम गैरअर्जदारानी पुराव्यात दाखल केलेले नाही. आणि ती अट आहे असे वादाकरीता मान्य केले तरी ती मॅडेटरी ठरु शकत नाही. गैरअर्जदारानी वास्तविक अर्जदाराचे मुलाच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई पॉलीसी हमीप्रमाणे रुपये एक लाख क्लेम दाखल केल्यानंतर मजूर करावयास काहीच हरकत नव्हती मात्र ती देण्याचे बाबतीत आजपर्यंत टाळाटाळ करुन अर्जदाराला मानसिक त्रास दिला आहे व सेवा त्रूटी केली आहे असेच यातून अनुमान निघते सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास विमादाव्याची रक्कम रु.1,00,000/- अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 % दराने व्याजासह द्यावी. 3 याखेरीज सेवात्रुटीपोटी व मानसिकत्रासा बद्दल रक्कम रु.3,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- आदेश मुदतीत अर्जदारास द्यावे. 4 पक्षकारांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |