Maharashtra

Chandrapur

CC/19/91

Shrimati Bebibai Kashinath Jambhule - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Limited Through Divisional Manager - Opp.Party(s)

U.P.Kshirsagar

27 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/91
( Date of Filing : 05 Jul 2019 )
 
1. Shrimati Bebibai Kashinath Jambhule
R/o Post dongargaon Tah.Nagbhid Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Limited Through Divisional Manager
Divisional Office, Pagalkhana Chowk, Chhindwada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. The Oriental Insurance Company Limited Through Branch Manager
Dhanraj Plaza, 2 nd Floor, M.G.Road,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. Jayaka Insurance Brokerage Prv. Ltd. Through Manager
2 nd Floor Jayka Building, Commercial Road, Civil Line, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Taluka Krushi Adhikari, Nagbhid
Nagbhid, Tah.Nagbhid, Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Jan 2022
Final Order / Judgement

:: निकालपत्र ::

(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), सदस्या यांचे आदेशान्‍वये)

(आदेश पारीत दि. 27/1/2022)

   

 

तक्रारकर्ती ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. तक्रारीची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहेः-

 

  1. तक्रारकर्ती ही रा. डोंगरगाव ता. नागभिड जि. चंद्रपूर येथे राहत असुन तक्रारकर्तीचा पती श्री. काशीनाथ नागो जांभूळे यांच्‍या मालकीची मौजा- डोंगरगाव खुर्द ता. नागभिड जि. चंद्रपुर येथे भूमापन क्र. 31 ही शेतजमिन आहे. तक्रारकर्तीचा पती शेतातील उत्‍पन्‍नावर कुटूंबाचे पालनपोषण करायचा. दि. 30/10/2017 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्यु शेतात विषारी औषधाची फवारणी करतांना नाकातोंडात विषारी औषध गेल्‍याने विषबाधा होऊन उपचारा दरम्‍यान झाला. तिच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने विरूध्‍द पक्ष क्र 4 कडे तिने विमा नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता रितसर अर्ज दि. 21/06/2018 रोजी केला व त्‍यांनी मागविलेल्‍या दस्‍तऐवजाची पुर्तता केली. परंतु त्‍यानंतर विरूध्‍द पक्षांकडून काहीही उत्‍तर आले नसल्‍यामुळे तिने विचारणा केली असता कृषी आयुक्‍त महाराष्‍ट्र हयांनी दि. 19/06/2019 रोजी मयताच्‍या व्हिसेरा अहवालामध्‍ये विष सापडले नाही हे कारण दाखवून दावा फेटाळला असे कळविले. तक्रारकर्तीचा दावा विरूध्‍द पक्ष हयांनी अकारण फेटाळला असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष हयांनी सेवा देण्‍यात कसुर केल्‍याने नुकसान भरपाई मिळण्‍याकरीता तक्रारकर्तीने मा. आयोगासमोर तक्रार दाखल केली आहे.

 

  1. तक्रारकर्तीची मागणी अशी आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर करून विरूध्‍दपक्षांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 2,00,000/-, प्रस्‍ताव दिल्‍याच्‍या तारखेपासुन 18% व्‍याजासह देण्‍याचे आदेश व्‍हावा तसेच शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍याचे आदेश विरूध्‍द पक्षाला दयावेत.
  2.  तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करून विरूध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍यात आले.
  3. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हयांनी तक्रारीत उपस्थित राहून त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल करित प्राथमिक आक्षेप घेतला की, सदर तक्रारीत तक्रारकर्तीने कृषी आयुक्‍त पुणे आणि जायका इंन्‍शुरंन्‍स हे आवश्‍यक पक्षकार असुनही त्‍यांना विरूध्‍दपक्ष म्‍हणुन तक्रारीत सम्‍मीलीत न केल्याने सदर तक्रार मिस जाईंडर ऑफ पार्टी व योग्‍य  पक्ष न जोडल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी तसेच पुढे त्‍यांनी तक्रारकर्तीच्‍या  तक्रारीतील सगळया बाबी खोडून काढुन पुढे नमुद केले की,  तक्रारकर्तीचा पतीचा रासायनिक अहवालात नमुद केल्‍याप्रमाणे त्‍याचा मृत्‍यु विषबाधा झाल्‍यामुळे झाला. त्‍यामुळे विरूध्‍दपक्ष क्र 1 व 2 त्‍यासाठी नुकसान भरपाई देण्‍यास बाध्‍य  नाही. तसेच सदर तक्रारीला कारण दि. 30/10/2017 रोजी घडले जेव्‍हा  तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला पंरतु सदर तक्रार दि. 05/07/2019 रोजी दाखल झाल्‍यामुळे सदर तक्रार मुदतबाहय आहे तसेच कराराप्रमाणे कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा हा ९० दिवसाच्‍या आत दाखल करायला हवा होता पंरतु सदर तक्रारीत विरूध्‍दपक्ष क्र 1 व 2 कडे विहीत मुदतीत दाखल केलेले आहे. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हयांचे सर्व व्‍यवहार हे करारातील अटी व शर्तीप्रमाणे राबविले जातात. सदर तक्रारीतील लावलेले सर्व आरोप खोटे असुन तक्रारकर्तीला विरूध्‍द  पक्ष क्र 1 व 2 हयांनी कोणतीही सेवेत त्रृटी दिलेली नसल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात यावी.

  

  1. विरूध्‍द पक्ष क्र 3 हयांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्‍यांचे लेखीउत्‍तर दाखल करून नमुद केले की, शेतकरी जनता अपघात विमा योजनेखाली दावे तक्रारकर्तीला विरूध्‍द पक्ष क्र 4 कडे सादर करावे लागतात ते जिल्‍हा कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठवितात व त्‍यानंतर ते दावे विरूध्‍द पक्ष क्र 3 कडे पाठविले जातात, असे दावे प्राप्‍त झाल्‍यावर त्‍याची पडताळणी करून त्‍यात काही त्रृटी असल्‍यास त्‍याची मागणी करून जिल्‍हा कृषी अधिकारी यांचेकडून मंजुरीसाठी विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 कडे पाठविले जातात. दावा मंजुर अथवा नामंजुर करणे विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हयांच्‍या अख्‍यत्‍यारीत असत यात विरूध्‍दपक्ष क्र 3 चा सहभाग नसतो, ते फक्त विमा कंपनी, तक्रारकर्ती व शासन यांच्‍यातील मध्‍यस्‍थ म्‍हणुन काम करतात. तक्रारकर्तीचा दावा विरूध्‍द पक्ष क्र 3 हयांना दि. 02/01/2018 रोजी प्राप्‍त झाला, व त्‍यानंतर विरूध्‍द पक्ष क्र 3 हयांनी विरूध्‍दपक्ष क्र 1 व 2  कडे दि. 19/02/2018 रोजी पाठविला. विरूध्‍द पक्ष क्र 1 व 2 हयांनी तक्रारकर्तीचा दावा व्हिसेरा अहवालामध्‍ये विष नसल्‍याने नामंजुर केला. विरूध्‍द पक्ष क्र 3 हयांनी या प्रकरणात तक्रारकर्ती विरूध्‍द कोणतीही कसुर केलेली नसून जबाबदारी पूर्णपणे पार पाडली असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष क्र 3 विरूध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2. विरूध्‍द पक्ष क्र 4 हयांना प्रकरणात नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा प्रकरणात उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरूध्‍द प्रकरणात दि. 04/11/2019 रोजी एकतर्फा चालविण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले.
  3. तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र व दस्‍तऐवज व विरूध्‍दपक्ष हयांचे लेखीबयान,लेखीयुक्तिवाद या अनुषंगाने उभयपक्षाने केलेल्‍या  युक्‍तीवादावरून आयोगाच्‍या निर्णयास्‍तव मुद्दे व निष्‍कर्ष व  त्यावील कारणमीमांसा खालील प्रमाणे  आहे.     

 

कारणमिमांसा

 

8) विरुद्ध पक्ष  1 व 2  व दोन यांनी तक्रारकर्तीचा ग्राहक तत्वा बाबत वाद उपस्थित केलेला नाही त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व  2 ची ग्राहक आहे. उपरोक्त तक्रारीतील दोन्‍ही पक्षाचे कथन व दस्ता-ऐवजांवरून दिसून येते की तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्यू दिनांक 30/10/2017 रोजी शेतात विषारी औषधांची फवारणी करताना विषारी औषध नाकातोंडात गेल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला तसा उल्लेख अकस्मात मृत्यू खबरी तसेच मरणान्‍वेश प्रतिवृत्त यात स्पष्ट नमूद आहे. परंतु दाखल केलेल्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये विष कुठलेही आढळले नाही असे असल्यामुळे विरुद्ध पक्ष एक व दोन यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्यू अपघाती नसल्‍यामुळे तिचा विमा दावा नाकारला. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी त्यांच्या उत्तरात तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्यू हा विषारी औषध पिल्‍यामुळे विषबाधा होऊन झाला असल्यामुळे यात आत्महत्याची शंकासुद्धा नाकारता येत नाही असे नमूद केले आहे. तक्रारीत व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला आहे, त्या रिपोर्टचे अवलोकन केले असता त्यात असे नमूद आहे की ‘General and specific chemical testing does not reveal any poison in exhibit numbers 1 2 and 3’,  यावरून असे स्पष्ट  आहे कि तक्रारकर्तीच्या पतीच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष आढळले नाही. आयोगाच्या मते शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम देण्यास वरील कारण नमूद करून दावा रक्कम नाकारून  विरुद्ध पक्ष १ व २ ह्यांनी तक्रारकर्ती प्रति सेवेत कोणत्याही प्रकारची  सेवेत न्यूनता दिली नाही.

9) विरुद्ध पक्ष क्र. 3 यांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विरुद्ध पक्ष क्र 1 व 2 कडे विमा काढला व सदर विमा काढण्‍याकरीता विरुद्ध पक्ष 3 व 4 ने विना मोबदला मदत केली असल्‍याने विरुद्ध पक्ष क्र. 3 व 4 विरुद्ध कोणताही आदेश नाही.

 

10) वरील विवेचनावरून आयोग खालील आदेश पारित करीत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार क्रमांक 91/2019 खारीज करण्‍यात येते. 
  2. उभयपक्षांनी आपआपला तक्रारखर्च सोसावा.

  3  उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी. 

  4 प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्तीला परत करण्यांत याव्यात.

 

 

श्रीमती.

 

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.