Maharashtra

Chandrapur

CC/19/92

Shri.Rambhau Suryabhan Satpute - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Limited Through Divisional Manager - Opp.Party(s)

U.P.Kshirsagar

22 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/19/92
( Date of Filing : 05 Jul 2019 )
 
1. Shri.Rambhau Suryabhan Satpute
R/o Post Nagari Tah.Warora, Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Shrimati Parvata Rambhau Satpute
R/o Post Nagari, Tah.Warora,Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Limited Through Divisional Manager
Divisional Office, Pagalkhana Chowk, Chhindwada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. The Oriental Insurance Company Limited Through Branch Manager
Dhanraj Plaza, 2 nd Floor,M.G.Road,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. Jayaka Insurance Brokerage Prv. Ltd. Through Manager
2 nd Floor, Jayka building, Commercial Road,Civil Line, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Taluka Krushi Adhikari, Warora
Warora, Tah.Warora,Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Jun 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारित दिनांक २२/०६/२०२२)

 

                       

                       

  1. तक्रारकर्ते यांननी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ते हे रा.पो. नागरी, तालुका वरोरा, जिल्‍हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्ते यांचा मुलगा सचिन रामभाऊ सातपुते यांच्‍या मालकीची मौजा गौळ, तालुका वरोरा, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक ५७ ही शेतजमीन असून तो शेतीचा व्‍यवसाय करीत होता व त्‍या शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍यांचा मुलगा कुटुंबाचे पालनपोषन करायचा. तक्रारकर्त्‍यांचा मुलाचा मृत्‍यु दिनांक २८/१०/२०१७ रोजी शेतातील विहीरीत पाय पडल्‍याने पाण्‍यात बुडून झाला. तक्रारकर्त्‍यांनी  त्‍याच्‍या मुलाचा विमा योजनेअंतर्गत रुपये २,००,०००/- चा विमा शासनाच्‍या  वतीने उतरविला होता तसेच हा मुलगा अविवाहीत असल्‍यामुळे या मुलाचे आई वडील तक्रारकर्ता व त्‍याची पत्‍नी या विमारकमेचे लाभधारक आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे दिनांक २३/०१/२०१८ रोजी रितसर विमा रक्‍क्‍म मिळण्‍याकरिता अर्ज केला व  त्‍यासोबत आवश्‍यक दस्‍तऐवजाची पूर्तता केली. परंतु त्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष यांनी विमा रकमेबद्दल काहीही न कळविल्‍यामुळे कृषी आयुक्‍त यांना वकीलामार्फत माहिती विचारली असता दिनांक १९/०६/२०१९ रोजी तक्रारकर्त्‍याचा मुलाने आत्‍महत्‍या केली हे कारण देवून दावा फेटाळला. विरुध्‍द पक्ष यांनी अकारण दावा फेटाळून सेवेत न्‍युनता दिली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला सदर दाव्‍याच्‍या रकमेला व त्‍यावरील व्‍याजालाही मुकावे लागले. विरुध्‍द पक्ष यांनी शासनाने मृत शेतक-यासाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच विरुध्‍द पक्ष हे तडा देत असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार आयोगासमोर दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍यांनी प्रकरणात अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/- प्रस्‍ताव दिल्‍यापासून दिनांक २३/०१/२०१८ पासून द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍यास द्यावे तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासापोटी रुपये ५०,०००/- तसेच तक्रारीचा खर्चापोटी रुपये २०,०००-/- द्यावे.
  4. तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष यांना आयोगातर्फे  नोटीस काढण्‍यात आले.
  5. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारीत त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल करीत तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोडून काढीत उत्‍तरात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे तक्रारकर्त्‍याला विमा दावा देण्‍यास जबाबदार नाही तसेच आत्‍महत्‍या ही शेतकरी विमा पॉलिसी मध्‍ये येत नाही तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारीत स्‍पष्‍ट असे दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्त्‍याने पृष्‍ठ क्रमांक २६ ते ३० पर्यंत कागदपञे वाचनीय पुरवणे हेतु पुरस्‍पर टाळले आहेत तसेच पृष्‍ठ क्रमांक ३३ व ३४ चे दस्‍तऐवजाचा पुरवठा सक्षम अधिका-यांकडून केला जातो परंतु तक्रारकर्त्‍याने सदर कागदपञे खोटी व बनावट बनविली आहेत तसेच तक्रारकर्त्‍याचे प्रतिज्ञापञ हे खोटे आहे. तसेच तक्रारकर्ता हा त्‍याच्‍या मुलाचा अपघाती मृत्‍यु आहे हे दर्शविणारे कोणतेही कागदपञे दाखल केलेली नाहीत. सबब तक्रारकर्त्‍याच्‍या या तक्रारीत काहीही तथ्‍य नसल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  6. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍याचे उत्‍तर दाखल करुन नमूद केले की शासनाने शेतकरी व त्‍याचे कुटुंबीयाकरिता शेतकरी अपघात विमा योजना काढली. या योजनेअंतर्गत तक्रारकर्त्‍याला त्‍याचे दावे कृषी अधिकारी यांच्‍याकडे सादर करतात व त्‍यात काही ञुटी असल्‍यास त्‍याची मागणी करतात व त्‍यानंतर मंजुरीकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ कडे पाठवितात. दावे मंजूर वा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्रमाक १ व २ यांच्‍या अखत्‍यारीत असतात. त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ चा सहभाग नसतो. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे फक्‍त विमा कंपनी तक्रारकर्ता व शासन यांचयातील मध्‍यस्‍थ म्‍हणून काम करतात. तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचे दिनांक २८/१०/२०१७ रोजी अपघाती निधन झाले त्‍याप्रमाणे दिनांक २२/०१/२०१८ रोजी तक्रारकर्त्‍याने कृषी अधिकारी यांच्‍याकडे अर्ज सादर केला व त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी दिनांक २०/०३/२०१८ रोजी दावा मंजूरीकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे पाठविला. यावरुन स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी त्‍याची जबाबदारी पूर्ण केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी कागदपञांची शाहनिशा करुन तक्रारकर्त्‍याचा दावा नामंजूर केला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याला सेवा प्रदान करण्‍यास कोणतीही कसूर केलेली नाही. सबब विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  7. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ यांना आयोगातर्फे नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा आयोगासमोर उपस्थित न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश प्रकरणात दिनांक ४/१/२०१९ रोजी करण्‍यात आले.
  8. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ चे लेखी उत्‍तर व उभयपक्षांचे शपथपञ तसेच लेखी व तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या गाव नमुना सात या दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्त्‍याचा मुलगा मृतक सचीन रामभाऊ सातपुते यांचे नावे सदर शेतजमीन भुमापन क्रमांक ५७, मौजा गौळा, तहसील वरोरा, जिल्‍हा चंद्रपूर येथे आहे. यावरुन निर्वादपणे तक्रारकर्त्‍यांचा मुलगा हा शेतकरी होता असे दिसून येते. उभयपक्षामध्‍ये विमा पॉलिसीच्‍या कालावधीबाबत वाद नाही. तक्रारकर्त्‍यांचा तक्रारीप्रमाणे त्‍याचा मुलाचा मृत्‍यु दिनांक २८/१०/२०१७ रोजी शेतातील विहीरीत पाय घसरुन पडल्‍याने पाण्‍यात बुडून झाला. तक्रारकर्त्‍यांचा मुलगा शेतकरी असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी आवश्‍यक ते दस्‍तऐवज जोडून विमा दावा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे पाठविला परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍यांना त्‍याच्‍या मुलाने आत्‍महत्‍या केली हे कारण देऊन तो फेटाळला. आयोगाने तक्रारीतील दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारीतील अकस्‍मात मृत्‍यु  खबर व तोंडी रिपोर्ट दाखल आहे. यावरुन पोलीस निरीक्षक, वरोरा यांनी मृतक सचीन याला विहीरीत बाहेर काढणा-या आजुबाजुच्‍यांचे बयानाच्‍या आधारावर सचीन यांनी विहीरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केली असे नोंदविले आहे परंतु केवळ पोलिसांनी नोंदविलेल्‍या बयानाच्‍या आधारे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विमा कंपनीने मृतकाने विहीरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केली हा निष्‍कर्ष चुकीचा आहे या संदर्भात तक्रारकर्त्‍याच्‍या  वकीलांनी दिनांक २७/४/२०२२ रोजी तक्रारीत दाखल केलेल्‍या पुढील न्‍यायनिवाड्याचा आधार घेतला.  

III(2016) CPJ 574 (NC), SBI Life Insurance Co. Ltd Vs. Sudesh Khandeja & Anr.

Now, we turn to the report of the police. The report of the police carries exiguous value. The report of the police has to be proved by producing cogent plausible evidence. The affidavits of witnesses mentioned in the police report did not see the light of the day. The police submits that he was in debt for a sum of more than Rs. 75 Lakh but there is no proof. It is not bolstered by cogent and plausible evidence. The police report cannot be made the basis for the repudiation of the claim. There is no corroborative evidence. Such like stories can be created at any time.

          सदर प्रकरणात मा. राष्‍ट्रीय आयोगाने डॉक्‍टराचा अहवालावरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. पोलिसांनी घेतलेल्‍या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करतांना विमा कंपनीला घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले. तसेच Honble National Consumer Commission, New Delhi- Revision Petition No. 421/2013. Decided on 5/9/2019, Oriental Insurance Company Ltd. Vs. Rishikesh Sandeep Kale and 4 Ors. या न्‍यायनिवाड्यात सुध्‍दा मा. राष्‍ट्रीय आयोगाने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍याबाबत पुरावा समोर न आल्‍यामुळे विमा कंपनीचे अपील खारीज केलेले आहे.

  1. उपरोक्‍त नमूद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे आयोगाचे मत आहे. मृतक सचीन हा तक्रारकर्त्‍यांचा एकूलता एक मुलगा होता तसेच त्‍याला आत्‍महत्‍याचे कोणतेही कारण नव्‍हते किंवा त्‍याच्‍याजवळून पोलिसांना कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. तसेच इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा मध्‍येही मृत्‍युचे कारण विहीरीच्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यु असा आहे. तसेच पी.एम. रिपोर्ट मध्‍येही मृत्‍युचे कारण ‘Due to drawing’ असे नमूद आहे. आयोगाच्‍या मते पोलिसांनी अन्‍य नातेवाईक तसेच त्‍याचे मिञ, मामा यांना न तपासता अन्‍य व्‍यक्‍तींचे बयान घेऊन, मृतक सचीन यांनी त्‍याच्‍या शेतातील विहीरीत बुडून आत्‍महत्‍या केली, असे नोंदविले आहे आणि त्‍याच आधारे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत न्‍युनता दिली आहे. कोणत्‍याही सबब पुराव्‍याशिवाय केवळ पोलिसांनी नोंदविलेल्‍या बयानाचे आधारे काढलेला निष्‍कर्ष आणि त्‍या आधारे नाकारलेल्‍या विमा दावा ही तक्रारकर्त्‍याप्रति दोषपूर्ण सेवा आहे असे आयोगाचे मत आहे. सबब विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हे तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मृतक मुलाला शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी विमा रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहेत.

          विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍याने व त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍याचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

  1.  विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ यांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतक-याचा विमा काढला व सदर विमा काढण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ यांनी विनामोबदला मदत केली असल्‍याने त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ व ४ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार क्रमांक ९२/२०१९ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्ते यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये २,००,०००/- द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १०,०००/- व  तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे. 
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.