::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 10/10/2019)
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. | |
| |
2. अर्जदार ही राहणार आंबे तालुका वरोरा राहणार नागलोन तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्ते चा मुलगा श्री अरविंद बंडू धवस यांच्या मालकीचा मौजा नागलोन, तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्र. 95 ही शेतजमीन आहे.अर्जदाराचा मुलगा हा शेतीचा व्यवसाय करीत होता गैरअर्जदार क्र. 1 हि विमा कंपनी असून गैरअर्जदार क्र.2 ही विमा सल्लागार कंपनी आहे. शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्वीकारतात. शासनाच्यावतीने विरुद्ध पक्ष क्र. 3 तर्फे सदर विमा योजने अंतर्गत अर्जदार महिलेच्या मुलाचा 1 लाखाचा विमा शासनाच्यावतीने उतरवला होता. सदर विमा उतरवण्यात आला असला तरी अर्जदार ही मयत श्री अरविंद बंडू धवन यांची आई असल्याने रवींद्र बंडू अविवाहित असल्याने सदर योजनेचे लाभधारक अर्जदार आहे.अर्जदाराच्या मुलाचा मृत्यू दिनांक 16.11.2008 रोजी दुसरे समोरून येणारे वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी पडून झाला. मुलाचा अपघात विमा काढलेला असल्यामुळे अर्जदार हिने सर्व दस्तावेज गैर अर्जदार 3 कडे दाखल केला व 3 ह्यांनी मागितलेल्या दस्तावेजांची पूर्तता केली दस्त दिल्यानंतरही गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदार हिचा दावा बाबत दहा वर्षे उलटून गेली तरी मंजूर किंवा नामंजूर न कळल्याने अर्जदाराने तिच्या वकिलामार्फत दिनांक 7.03.2018 रोजी कायदेशीर नोटीस गैरअर्जदार यांना पाठवला गैरअर्जदाराने त्यावर काहीही उत्तर न दिल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदारा विरुद्ध मंचात तक्रार दाखल केलेली आहे
अर्जदार हिची मागणी अशी आहे की अर्जदार हिला दाव्याची रक्कम गैरअर्जदाराने रुपये 1,00,000/- गैरअर्जदार कडे प्रस्ताव दाखल केल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्यात यावा तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक आर्थिक 30,000/- व तक्रारीचा खर्च 20,000/- देण्यात यावा.
3. गैरअर्जदार क्रमाक 1 ह्यांनी तक्रारीत हजर राहून त्यांचे प्राथमिक आक्षेप दाखल केले त्यात अर्जदाराने सन 2008 मध्ये मुलाचा मृत्यू नंतर गैरअर्जदार क्र. 2008 मध्ये दावा दाखल केला असं कथन केलेले आहे परंतु अर्जदाराकडे कोणत्याही विमा दावा अर्जदाराने दाखल केलेला नाही सबब अर्जदाराला हा अस्तित्वात नसलेला ग्राहक वाद दाखल करण्यास कोणतेही कारण नाही तसेच अर्जदार खरी परिस्थिती विद्यमान याला पासून लपवून ठेवली आहे अरविंद ह्याच मृत्यू अपघात दिनांक 16.11. 2008 रोजी झाला आहे तरी असे गृहीत धरले तरी दिनांक 16.11.2008 पासून आतापर्यंत त्यांनी विमा कंपनीकडे स्वतः अपघात व्यक्तीचे नुकसान भरपाई करता कोणत्याही विमा दावा दाखल केलेला नाही ,तसेच अर्जदाराने विद्यमान न्यायालयात क्र. 3 अथवा गैरअर्जदार क्र. दोन कडे स्वर्गीय मुलाच्या अपघात नुकसान भरपाई मिळणार दावा दाखल केला नाही हे दाखवणारा कोणताही पुरावा तक्रारीसोबत दाखल नाही. तसेच दिनांक 18. 4. 2018 ची यादी सोबत एकूण सहा दस्त विद्यमान अर्ज दाखल केलेले आहे, त्यावरून असे कुठेच दिसत नाही दिसत नाही कि दावा दाखल केलेला आहे, अशा परिस्थितीत न केलेल्या विमा दाव्यावर या गैरअर्जदार विमा कंपनीने कोणताही निर्णय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच अर्जदाराने विद्यमान न्यायालयात दाखल केलेल्या दस्तावेज हे पूर्णपणे वाचतांना योग्य नाही तसेच पान क्र. 27 वरील प्रथम खबरी ची प्रत वाचता येण्यासारखी नाही ती प्रथम खबरी कशासंदर्भात आहे हे समजून येत नाही. अर्जदाराने आजपर्यंत कधीही स्वर्गीय अरविंद तथाकथित अपघाती मृत्यूचे नुकसान भरपाई गैरअर्जदार क्र. 1 कडे दाखल केलेले नाही त्यामुळे दाखल न झालेल्या विमा दावा फेटाळण्याचा किंवा मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सबब सदर तक्रर पूर्णपणे मुदतबाह्य असून कोणतही विमा दावा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल न केल्यामुळे आता अर्जदारास गैरअर्जदाराविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी व करारातील तरतुदीनुसार या गैरअर्जदार विमा कंपनीचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही अशा परिस्थितीत अर्जदारांची तक्रार खरिजहोण्यास पात्र आहे.
4. गैरअर्जदार क्र. 2 ह्यांना प्रकरणात नोटीस प्राप्त होऊनसुद्धा हजर न झाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुद्ध एकतर्फा चालविण्याचा आदेश करण्यात आला.
5. गैरअर्जदार क्र.3 यांनी मंचात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल करीत नमूद केले की,अर्जदाराने सादर केलेल्या दाव्याची तपासणी करून माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अर्जदाराचा दावा सादर करण्यात आला व माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी सदर प्रस्ताव देऊ विमा कंपनी सादर केला. त्यामुळे त्यांनी कोणतीही त्रुटी केलेली नसून त्यांचेविरूध्द तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
6. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांचे लेखी म्हणणे, गैरअर्जदार क्र. 1 यांचे पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही 2. आदेश काय ? आदेशप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
7. तक्रारीतील दोन्ही पक्षाचे उपरोक्त कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत की अर्जदाराचे मुलाचा मृत्यु दि. 16/11/2008 रोजी समोरून येणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झाला. अर्जदार हिच्या मुलाचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज केला. गैरअर्जदार क्र.1 च्या उत्तरात नमूद आहे की, अर्जदाराने तिच्या मुलाचा विमादावा विमाकंपनीकडे दाखल केला नाही. त्यामुळे जोविमादावा दाखल केला नाही,तो विमादावा मंजूर वा नामंजूर करण्याचा प्रश्नच नाही. परंतु गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषि अधिकारी, यांनी अर्जदाराचा विमादावा दिनांक 8/12/2009 रोजी मंजूरीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविले असे गैरअर्जदार क्र.3 च्या उत्तरात नमूद आहे. यावरून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विमादावा दाखल केला होता हे सिध्द होते. अर्जदाराने तक्रारीत दस्तावेजांसह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना पत्र देवून विमा कंपनीने अपु-या दस्तावेजांमुळै प्रस्ताव परत आला व कागदपत्रांची पुर्तता करावी असे दि.16/9/2009 चे पत्राद्वारे कळविले. सदर पत्राची प्रत प्रकरणात दाखल आहे. यावरून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मुलाचा विमादावा कागदपत्रांचे पुर्ततेसाठी परत पाठविला होता. परंतु त्यानंतर अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांची नियमानुसार गैरअर्जदार क्र.1 कडे पुर्तता केल्याची बाब प्रकरणात दाखल दस्तावेतांवरून दिसून येत नाही. त्यामुळे दावा दाखल केल्यानंतर केवळ दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही, तसेच दावा दाखल केल्यानंतर १० वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावर दि. 7.03.2018 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवण्यामुळे तक्रारिचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही. सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.६४/२०१८ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे))(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))(श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.