::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती कल्पना जांगडे (कुटे). सदस्या)
(पारीत दिनांक :- 22/07/2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1.अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराचा सोनिट्रॉनिक्स या नांवाने चंद्रपूर येथे व्यवसाय आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दि.29/11/2012 रोजी दुकानातील एकूण माल रू.21,00,000/- व रू..7,00,000/- चे फर्निचर असा एकूण 28,00,000/- रू. च्या मालमत्तेचा विमा गैरअर्जदाराकडून रू.10,976/- प्रिमियम भरून काढला होता. सदर विमा पॉलिसीचा क्र.182500/48/2013/1750 असून तो दिᛨ. 30/11/2012 ते 29/11/2013 चे मध्यरात्रीपर्यंत वैध होती. अर्जदाराने पुढे कथन केले की, दिᛨनांक 14/4/2013 चे रात्री अर्जदाराचे दुकानात चोरी झाली. सदर घटनेची माहिती अर्जदाराने दिᛨनांक 15/04/2013 रोजी गैरअर्जदाराला दिᛨली. तसेच अर्जदाराने दि. 02/05/2013 रोजी दावा प्रपत्र व त्यासोबतच 9,81,740/- रू. किमतीचे सामान /माल चोरी गेल्याची यादी व दुकानाचे फर्निचरचे झालेले नुकसान रू..1,43,000/- ची वेगळी यादी गैरअर्जदाराकडे दिली. अर्जदाराच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दि. 15/4/2013 रोजी अपराध क्र.119/2013 अन्वये भा.द.वि.चे कलम 457,380 चा गुन्हा दाखल केला व मा.मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांचे न्यायालयात फौजदारी मामला क्र. 64/2014 दाखल केला. अर्जदाराने गैरअर्जदाराचा मागणी नुसार अंतीम अहवालाचे प्रत दिलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा दिनांक 11/12/2014 पर्यन्त निकाली काढला नाही व 12/12/2014 रोजी पत्र पाठवुन अर्जदाराचा 9,81,740/- विमा दावा फक्त रूपये 24,578/- करिता मंजुर केला आहे. असे कळवुन त्यासोबत गैरअर्जदाराने अर्जदारास डिस्चार्ज व्हॉचर, लेटर ऑफ अंडर टेकिंग इ. फॉर्म पाठविले. सदर पत्र प्राप्त होताच अर्जदाराने गैरअर्जदारास पत्र पाठवुन रूपये 9,81,740/- चा विमा दावा रूपये 24,578/- पर्यन्त कसा सिमीत केला याची माहिती मागितली त्यावर गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 15/01/2015 चे पत्र पाठवुन त्या सोबत यादी पाठवली. गैरअर्जदाराने कोणतेही कारण न दर्शविता अर्जदाराचा विमा दावा बहुतांश वस्तु करिता नाकारलेला आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास लेखी कळविले की, अर्जदाराचा विमा दावा नेट लॉस बेसीस वर रूपये 24,578/- करिता मंजुर करण्यात आला आहे . परंतु अर्जदाराचे दुकानातील माल व फर्निचरेतर सामान याचा विमा दावा नाकारण्यास गैरअर्जदारास कुठलेही कारण नाही. यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा रूपये 24,578/- पर्यन्त सिमीत करून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेली सेवा न्युंनतापुर्ण व अनुचित व्यापार पध्दती ठरविण्यात यावी. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा फक्त रूपये 24,578/- करिता सिमीत करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून गैरअर्जदाराने अर्जदारास रूपये 11,24,740/- व त्यावर दिनांक 03/08/2013 पासुन रक्कम अर्जदाराच्या पदरी पडेपावतोचे द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज तसेच शारिरीक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रूपये 1,00,000/- व तक्रार खर्च रूपये 25,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यानी नि. क्रं. 9 वर आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरामधे अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द तक्रारीत केलेले आरोप हे चुकिचे असल्याने ते नाकबुल केले आहे परंतु अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन अर्जदाराचे दुकानातील माल व फर्निचर करिता विमा काढला होता ही बाब मान्य केली आहे. गैरअर्जदाराने पुढे कथन केले की, दिनांक 15/04/2013 रोजी अर्जदाराकडुन चोरीच्या घटने संबंधी माहिती मिळताच गैरअर्जदाराने सर्वेअर नियुक्त करून त्याच दिवशी सर्वे करण्यात आला व अर्जदारास क्लेम फार्म सुध्दा दिला गैरअर्जदाराने श्री. जे. सी भंसाली अॅन्ड कंपनी लक्ष्मी रोड, पुणे यांची सर्वेअर म्हणुन नियुक्ती केली होती. सर्वेअरने शहानिशा करून अहवाल दिला व सर्वेअरनी निश्चीत केलेल्या दायीत्वाची संपुर्ण रक्कम गैरअर्जदाराने मान्य केली व अर्जदाराने सदर रक्कमे बद्दल विचारणा केल्या नंतर अर्जदाराला परिशिष्टाची यादी पाठवली. सदर पॉलिसी मध्ये मोबाईल्स, लॅपटॉप, कॅमेरा आणि अॅक्सेसरीज हयांचा समावेश नव्हता. तसेच अर्जदाराचा फर्निचरचा व त्याने लावलेल्या सामानाचा रूपये 1,43,000/- चा उल्लेख दावा असेसमेन्ट सर्वेअरने न दिल्यामुळे विचारात घेतला नव्हता. सर्वेअर ने सर्वे नंतर त्यांच्या असेसमेंट मधे नजर चुकीने मोबाईल युनिट ची केलेली मोजणी व विमा पॉलिसी मंधे समाविष्ट नसलेल्या संपुर्ण वस्तुंची किंमत वजा करून गैरअर्जदार विमा कंपनीवर दावा दायित्व म्हणुन रूपये 25,578/- चा भार कायम केला. गैरअर्जदार कंपनीने सर्वेअरच्या शिफारशी नुसार अर्जदाराचा विमा दावा रूपये 24,578/- कायम करून अर्जदाराला तसे लेखी सुचित केले होते. गैरअर्जदाराने अर्जदारासोबत अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही. अर्जदाराची संपुर्ण मागणी बेकायदेशीर आहे. सबब अर्जदाराची तक्रार खर्च व नुकसान भरपाई सह खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय.
काय ?
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला होय.
आहे काय ?
(4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
3. मुद्दा क्रं. 1 बाबत ः- अर्जदाराने दिनांक 29/11/2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनी कडुन अर्जदाराचे दुकानातील माल व फर्निचर करिता रूपये 10,976/- विमा प्रिमीयम भरून 182500/48/2013/1750 क्रंमांकाची विमा पॉलिसी घेतली. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रं 4 वरील दस्त क्रं अ-1 पॉलीसी वरुन सिध्द होत आहे. तसेच गैरअर्जदाराने सुध्दा आपले लेखी उत्तरामध्ये ही बाब मान्य केली आहे. सबब अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
4.मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः- अर्जदाराने सोनिट्रॉनिक्स या दुकानातील माल व फर्निचरची विमा पॉलिसी गैरअर्जदाराकडुन काढली, अर्जदाराच्या दुकानात दिनांक 14/4/2013 रोजी मध्यरात्री चोरी झाली तसेच अर्जदाराने विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला याबाबत वाद नाही∙ अर्जदाराने दुकानात चोरी झालेल्या वस्तुंची यादी तसेच फर्निचर व इतर वस्तुंचे झालेल्या नुकसानाची यादी गैरअर्जदाराला विमा दावा अर्जा सोबत दिलेली होती सदर दावा अर्ज, यादी अभिलेखावर नि.क्रं 4 वर दस्त क्र. अ-4 , अ-5 व अ-6 वर दाखल आहे. अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल केलेले दस्त क्रं. अ-1 ते अ 15 या दस्तऐवजाचे अवलोकन करताना असे निदर्शनास आले कि, अर्जदाराचे दुकानात दिनांक 14/04/2013 चे मध्यरात्री मालाची चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गैरअर्जदाराने नियुक्त केलेले सर्वेअर श्री भनसाली यांनी सर्वे केला व त्यांनतर गैरअर्जदाराने अर्जदारास दस्त क्रंमाक अ 15 असेसमेन्ट ऑफ लॉस ऑफ स्टॉक नुसार पॉलीसी मध्ये समाविष्ठ असलेल्या वस्तुचा विमा रक्कम रूपये 2,80,478/ व त्यामधुन वसुल झालेली रक्कम रूपये 2,55,900/ वजा करून रूपये 24,578/ अर्जदारास घेण्याचे लेखी सुचीत केले आहे∙ दस्त क्रंमाक अ 1 पॉलिसीमध्ये लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीवी कॅमेरा, मिसींग कॅश इत्यादीचा समावेश नसल्याने सदर वस्तुची विमा रक्कम गैरअर्जदाराने अर्जदाराला दिली नाही.तसेच दस्त क्रंमाक अ 15 मध्ये Less –Recovered Cash 2,55,900/- असे नमुद आहे. सदर वसुल झालेल्या रक्कमेच्या संदर्भात अर्जदार व गैरअर्जदार यानी प्रकरणामध्ये काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. अर्जदाराच्या दुकानात मालाची चोरी झाली तेव्हाच दुकानातील फर्नीचर व इतर वस्तुचे सुध्दा नुकसान झालेले आहे तशी यादी अर्जदाराने दस्त क्रंमाक अ 6 वर दाखल केलेली आहे. अर्जदाराचे दुकानात चोरी झाली तेव्हा फर्नीचरचे सुध्दा नुकसान झाले हे अर्जदाराचे कथन तसेच अर्जदाराने दुकानातील फर्नीचरचे व इतर नुकसान झाले हे दाखविण्यासाठी अर्जदाराने दाखल केलेले दस्त क्रंमाक अ 6 यादी हे गैरअर्जदाराने कोणताही दस्तऐवज अथवा साक्षी पुरावा दाखल करून खोडून काढलेले नाही त्यामुळे अर्जदाराचे दुकानात मालाची चोरी झाली तेव्हा फर्नीचर व इतर नुकसान झाले हे दस्ताऐवजावरून सिध्द होत आहे. दस्त क्रंमाक अ 1 पॉलीसी .मध्ये ‘’ 1. Stock in trade consisting of electronic spares, Computer parts, DTH, Audio and video sys. Good of SIM HAZ. 2. Furniture and Fixtures INCL, Air Conditioner.” असे नमुद आहे. असे असतांना सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदारास फर्नीचर आणि फिक्चर्स चे झालेल्या नुकसानाची विमा रक्कम दिलेली नाही गैरअर्जदार अर्जदारास यादी क्रंमाक अ 6 मधील फर्नीचर व इतर ज्यांचा पॉलीसी मध्ये समावेश आहे त्याची विमा रक्कम देण्यास जवाबदार आहे. दस्त क्रं. अ-6 यादीमधील सिसीटिव्ही कॅमेरा व मेकिंग चार्जेस पॉलीसी मध्ये नमुद नाही ती रक्कम सोडून उर्वरीत रक्कम 82,800/ व दस्त क्रंमाक अ 15 असेसमेन्ट ऑफ लॉस ऑफ स्टॉक सिट नुसार मालाची रक्कम रूपये 24,578/ असे एकुण रूपये 1,07,378/ गैरअर्जदार अर्जदाराला देण्यास जवाबादार आहे हे अभिलेखावर दाखल असलेल्या दस्तऐवजा वरून सिध्द होत आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दाव्याची रक्कम न देऊन अर्जदारासोबत अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला तसेच सेवेत न्युनता दर्शविली हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं 2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
5.मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास विमा दावा रक्कम रूपये 1,07,378/ तसेच
त्यावर तक्रार दाखल झाल्याचे दिंनाक 04/03/2015 पासुन संपूर्ण रक्कम
अदा होईपर्यन्त 8 टक्के व्याज आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45
दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने
रु. 10,000/ आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत अर्जदारास
दयावे.
(4) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 22/07/2016