Maharashtra

Kolhapur

CC/11/69

Gangaram Tukaram Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co - Opp.Party(s)

K.J.Nazare

27 Jul 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/69
1. Gangaram Tukaram PatilMandukali, Tal. GaganbawdaKolhapur.Maharashtra. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance CoDivisional Office, Near Pearl Hotel and Bhu Vikas Bank,Kolhapur.Kolhapur.Maharashtra.2. Tahsildar , GaganbawdaGaganbawdaKolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :K.J.Nazare, Advocate for Complainant
N.D.Joshi , Advocate for Opp.Party

Dated : 27 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.27/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांना नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सबब हे मंच त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार यांची पत्‍नी सौ.ताई गंगाराम पाटील या व्‍यवसायाने शेतकरी होत्‍या. त्‍यांचे मालकीची मांडूकली ता;गगनबावडा येथे भूमापन गट नं.619 क्षेत्र हे.0.13 प्रमाणे जमीन होती. तक्रारदाराची पत्‍नी शेतकरी अपघात योजनेअंतर्गत समाविष्‍ट होती. दि.10/10/2009 रोजी तक्रारदाराची पत्‍नी व त्‍यांचे शेजारी संगिता हरी कापडे या मांडूकली येथील सोबत बाधे नावाचे शेतात वैरण आणणेसाठी जात असताना तिचे डाव्‍या पायाचे छप्‍पेवर विषारी साप चावला. लागलीच तिला सी.पी.आर.हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.मात्र सदर दिवशी रात्री सर्पदंशाने तिचा मृत्‍यू झाला. तक्रारदाराने आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून सामनेवालांकडे विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.31/12/2010 रोजी सामनेवालांना सर्व कागदपत्रे पोहोचून देखील विमा दावा नाकारलेचे सामनेवाला क्र.1 यांनी दि.18/01/2011 रोजी पत्र पाठवले. त्‍यावेळी तक्रारीस कारण घडले. त्‍यामुळे सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटी मुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करावी लागली. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन मयत विमाधारक ताई गंगाराम पाटील यांचेवारसदार या नात्‍याने तक्रारदारास रक्‍कम रु;1,11,250/- इतकी रक्‍कम 15 महिनेचे 9 टक्‍के व्‍याजासह तसेच पुढील व्‍याज सेवेतील त्रुटीमुळे झालेल्‍या नुकसानीबाबत रु.25,000/-व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.10,000/- सामनेवालांकडून तक्रारदारास देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ्‍य सामनेवाला विमा कंपनीस दिलेला अर्ज, मांडूकली तलाठी यांचे प्रमाणपत्र, तालूका कृषी अधिकारी यांचे पत्र, मौजे मांडूकली ता.गगनबावडा येथील गट नं.615 चा 7/12 उतारा, 8-अ उतारा, वारसा प्रकरणी नोंदवही गगनबावडा, तक्रारदार यांचे प्रतिज्ञापत्र, मयत ताई पाटील यांचे ओळखपत्र, मयत ताई गंगाराम पाटील यांचा मृत्‍यू दाखला, पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शव परिक्षेसाठीचा पोलीस अहवाल, पी.एम.नोटस, तक्रारदाराचे ओळखपत्र, सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.27/07/2011 रोजी सी.पी.आर.हॉस्पिटल कोल्‍हापूर यांनी मयत ताई गंगाराम पाटील यांचे मृत्‍यूचे कारणाचा अंतिम अहवाल, प्रादेशिक वैद्यकीय प्रयोगशाळा यांचेकडे मयत ताई गंगाराम पाटील यांचे व्हिसेरा रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली.
 
 (04)      सामनेवाला विमा कंपनीने दाखल केलेले लेखी म्‍हणणेनुसार सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत वैयक्तिक माहिती नसलेने मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे पत्‍नी दि.07/10/2009 ते 10/10/2009 पर्यंत कोणत्‍या हॉस्पिटलमध्‍ये उपचार घेतले याबाबतच कागदपत्रे सामनेवाला विमा कंपनीकडे अथवा मे. मंचात दाखल केलेली नाहीत. तसेच सामनेवाला विमा कंपनीकडे कोणतेही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तक्रारदाराचे पत्‍नीचा सर्पदंशाने मृत्‍यू झाला याबाबतचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही; सबब तक्रारदाराची तक्रार त्‍यांनी केलेल्‍या मागणी खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत त्‍यांचे नागपूर ऑफिसकडून आलेला मेल दाखल केला आहे.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?         -- होय.
2) काय आदेश?                                         -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराकडून कोणतेही कागदपत्र प्राप्‍त झाले नसलेने तसेच मयत विमाधारकावर औषधोपचार केलेबाबतचा पुरावा दिला नसलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवालांचे वकीलांनी तक्रारदाराचा क्‍लेम आमचेकडे रजिस्‍टर नाही. त्‍यामुळे क्‍लेम नाकारणेचा प्रश्‍न येत नाही. कबाल इन्‍शुरन्‍सकडे चौकशी केली असता प्रस्‍तूतचा क्‍लेम व कागदपत्रे त्‍यांचेकडे नसलेबाबत कळालेचे प्रतिपादन केले आहे. तसेच तक्रारदाराने प्रस्‍तुत प्रकरणी अस्‍सल कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रे स्विकारलीबाबत सामनेवालांचा कुठेही सहीशिक्‍का नाही. सबब प्रस्‍तुत कागदपत्रे सामनेवालांना मिळालीच नसलेने क्‍लेम नाकारणेचा प्रश्‍न येत नाही. प्रस्‍तुत क्‍लेम फॉर्म व कागदपत्रे पाठवून दिलेस क्‍लेम निर्णित करणे शक्‍य आहे असे प्रतिपादन केले आहे व याची न्‍यायीक नोंद या मंचाने घेतलेली आहे. सदर बाबींचा विचार करता अॅड. नाझरे यांनी सदर बाबींस दि.18/01/2011 चे पत्र पाहिले असता सर्व बाबींचा खुलासा होतो असे प्रतिपादन केले आहे.
 
           मे. मंचाने तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे काही अस्‍सल व काही सांक्षांकित केलेली आहे. यामध्‍ये क्‍लेम फॉर्म भाग 1 ते 3, प्रतिज्ञापत्र इत्‍यादी अस्‍सल कागदपत्रे दाखल केली असून अन्‍य कागदपत्रे ही साक्षांकीत आहेत. दि. 18/01/2011 चे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास पाठवलेल्‍या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराचा दावा क्र.11/200/48 असून दि.10/10/2009 रोजी मयत विमाधारकाचा मृत्‍यू झालेचे तसेच दि.31/12/2010 रोजी कागदपत्र मिळालेचे नमुद केले आहे. सदर कागदपत्रे तालूका कृषीअधिकारी यांचेकडे मृत्‍यू झालेनंतर 90 दिवसांचे आत जमा करणे अनिर्वाय होते. तसेच कृषी अधिकारी यांनी सदर दाव्‍याची छाननी केलेनंतर कबाल इनशुरन्‍स कंपनी मार्फत सदर कागदपत्रे सामनेवाला क्र.1 यांचेकडे येणे ऐवजी ती थेट 13 महिन्‍यानंतर सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवली असलेने प्रस्‍तुत दाव्‍याचा विचार करणेस असमर्थ असलेने सदर मूळ कागदपत्रे परत पाठवत असलेचे नमुद केले आहे. वस्‍तुत: सदर योजनेच्‍या जी.आर.चा विचार करता विलंबाने विमादावे दाखल झाले तरी परिस्थिती व कारणांचा विशेषत्‍वाने विचार करुन सदर विलंब माफ करता येतो याचा विसर सामनेवाला विमा कंपनीस पडलेला आहे.
 
           यावरुन विमादावा व त्‍यासंबंधीची कागदपत्रे सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवी होती. मात्र वर नमुद कारणास्‍तव दावा निर्णित न करता कागदपत्रे परत पाठवून दिलेली आहेत. सबब ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. वस्‍तुत: सदर शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गतचे विमा दावे योग्‍य त्‍या कागदपत्रांसहीत तालूका कृषी अधिका-यामार्फत कबाल इन्‍शुरन्‍स येथून सामनेवालांकडे जात असले तरी प्रस्‍तुत प्रकरणातील विमा दावा थेट सामनेवाला क्र.1 यांचेकडे गेली असली तरी सरतेशेवटी सामनेवाला कंपनी कबाल कडून आलेल्‍या कागदपत्रांचीसुध्‍दा तपासणी करुन तदनंतरच दावा मंजूर अथवा नामंजूर करत असते. कबाल इन्‍शुरन्‍सची भूमिका ही कृषी अधिकारी यांचेकडून आलेले विमादावे सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवणेचे मध्‍यस्‍थाची आहे. सबब सदर बाबींचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीस सदर दावा निर्णित करणे शक्‍य होते. मात्र तसे न करता तांत्रिक बाबींवर बोट ठेवून तक्रारदाराची विमा दावा कागदपत्रे परत पाठवून देऊन क्‍लेम निर्णित न करुन सदर योजनेच्‍या मूळ हेतूस व उद्दीष्‍टास हरताळ फासलेला आहे. सबब सामनेवांचे सेवेतील ही गंभीर त्रुटी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराने दाखल केलेले पोलीस पेपर्स, पंचनामा, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, मरणात्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, व्हिसेरा या वरुन सामनेवालांची विमाधारक व ताई गंगाराम पाटील यांचा मृत्‍यू हा सर्पदंशाने झालेला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सबब तक्रारदाराचे पत्‍नीचा मृत्‍यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. व तक्रारदार हा लाभार्थी म्‍हणून विमा रक्‍कम रु.1,00,000/- व्‍याजासह मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्‍या त्रुटीमुळे तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार यांनी फक्‍त सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा क्‍लेम सामनेवाला विमा कंपनीकडे पाठवलेला आहे. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी कोणतीही सेवेत त्रुटी ठेवली नसलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                                आदेश
 
1) तक्रारदाराचीतक्रारमंजूरकरणेतयेते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) त्‍वरीत अदा करावेत. सदर रक्‍कमेवर दि.18/01/2011 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावी.
 
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT