Maharashtra

Solapur

CC/10/571

Rajabai Subhash Bhosale - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance co.Nagapur.2)The Oriental Insurance co.Solapur - Opp.Party(s)

P.P.Kulkarni

09 Feb 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/571
1. Rajabai Subhash BhosaleR/o Umbare Velapur Tal.MalshirassolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance co.Nagapur.2)The Oriental Insurance co.Solapur1)Divi.Office AD Complex,mount Rd,Nagapur 2)442 P.Mangalwar peth,Chate Galli SolapursolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :

Dated : 09 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

निकाल दि.09/02/2011.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 570/2010.       तक्रार दाखल दि.01/10/2010.

 

श्री. बापू सुरेश मेटकरी, वय 32 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. नंदेश्‍वर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर.                     तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 571/2010.       तक्रार दाखल दि.01/10/2010.

 

सौ. राजाबाई सुभाष भोसले, वय 30 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

मु.पो. उंबरे वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.                   तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 572/2010.       तक्रार दाखल दि.01/10/2010.

 

सौ. जाईबाई दत्‍ता पवार, वय 45 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. उंबरे वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.                तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 573/2010.       तक्रार दाखल दि.01/10/2010.

 

श्री. शाम नामदेव डांगे, वय 41 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर.                            तक्रारदार

 

            विरुध्‍द

 

1. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1,

  ए.डी. कॉम्‍प्‍लेक्‍स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01.

  (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्‍यात यावी.)

2. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., रा. 442, पश्चिम

  मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्‍ली, सोलापूर.

  (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्‍यात यावी.)        विरुध्‍द पक्ष

              

 

         गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                   सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

           

                   तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी 

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे अभियोक्‍ता : सौ. वासंती दि. देशमुख

 

 

आदेश

 

 

 

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

 

1.     प्रस्‍तुत सर्व तक्रारींचे स्‍वरुप, विषय, विरुध्‍द पक्ष व त्‍यांचे म्‍हणणे इ. मध्‍ये साम्‍य असल्‍यामुळे त्‍यांचा निर्णय एकत्रितरित्‍या देण्‍यात येत आहे.

 

2.    तक्रारदार यांच्‍या तक्रारी थोडक्‍यात अशा आहेत की, महाराष्‍ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांनी केंद्र शासन पुरस्‍कृत पशुधन विमा योजना सन 2007-08 राबविली आहे. सदर योजनेंतर्गत विरुध्‍द पक्ष (संक्षिप्‍त रुपामध्‍ये 'विमा कंपनी') यांच्‍याकडे तक्रारदार यांच्‍या घरगुती होस्‍टर्न जातीच्‍या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्‍यात आलेला असून त्‍यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

ग्राहक तक्रार क्रमांक

विमा पॉलिसी क्रमांक

टॅग क्रमांक

विमा रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

जनावराचा मृत्‍यू दिनांक

570/2010

एस.ओ.एल.पी.

107250

ओ.आय.सी.

181100/107250

29,000/-

7/7/2008

571/2010

एस.ओ.एल.पी.

109226

ओ.आय.सी.

181100/109226

20,000/-

12/10/2009

572/2010

एस.ओ.एल.पी.

109236

ओ.आय.सी.

181100/109236

20,000/-

28/8/2008

573/2010

एस.ओ.एल.पी.

100928

ओ.आय.सी.

181100/100928

30,000/-

14/1/2010

 

3.    तक्रारदार यांची गाय आजारी पडली आणि उपचारादरम्‍यान वरीलप्रमाणे नमूद तारखेस त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे. त्‍यानंतर पोस्‍टमार्टेम करण्‍यात येऊन विहीत नमुन्‍यामध्‍ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. क्‍लेम सादर केल्‍यानंतर पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्‍यांना क्‍लेमबाबत काहीच न कळविता क्‍लेम प्रलंबीत ठेवला आणि त्‍यानंतर क्‍लेम नाकारण्‍यात आला. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारी दाखल करुन विमा रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

4.    विमा कंपनीने रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांना दिलेल्‍या पॉलिसीतील अटी व शर्ती स्‍वंयस्‍पष्‍ट असून दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक आहेत. तक्रारदार यांनी खरेदी पावती, औषधोपचार बिले, गाईचा आरोग्‍य दाखला इ. कागदपत्रे दिलेली नाहीत. त्‍यांनी सर्व कागदपत्रांची छाननी व पडताळणी करुनच क्‍लेम नामंजूर केले आहेत आणि त्‍याप्रमाणे तक्रारदार यांना कळविलेले आहे. तक्रारदार यांनी अटी व शर्तीचे पालन न करुन त्‍यांचा भंग केला आहे. तक्रारदार यांनी शर्त क्र.4 प्रमाणे 12 तासाच्‍या आत मयत गाईच्‍या आजारपणाबद्दल विमा कंपनीस कळविलेले नाही. तसेच शर्त क्र.6 प्रमाणे तज्ञ पशुवैद्यकीय अधिका-यांकडून उपचार करुन घेतलेले नाहीत. शर्त क्र.7 नुसार गाईच्‍या मृत्‍यूनंतर 12 तासाचे आत सविस्‍तर तार करुन विमा कंपनीस नोटीस दिलेली नाही. शर्त क्र.8 नुसार गाईच्‍या कानातील टॅग विमा कंपनीकडे पाठवून तो स्‍वखर्चाने रिटॅग करुन तसा दाखल घेतला नाही. विमा कंपनीने पुढे असे नमूद केले आहे की, अटी व शर्तीनुसार लवादाचा क्‍लॉज असल्‍याने तक्रार चालविण्‍यास केवळ अकोला येथे अधिकारक्षेत्र आहे. शेवटी त्‍यांनी तक्रारी-अर्ज खर्चासह नामंजूर करण्‍याची विनंती केली आहे.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

 

 

1. तक्रार चालविण्‍यास मंचाला अधिकारक्षेत्र प्राप्‍त होते काय ?       होय.

2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                             होय.

3. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?          होय.

4. काय आदेश ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

6.    मुद्दा क्र. 1 :- विमा कंपनीने तक्रारदार यांच्‍या गाईस विमा संरक्षण दिल्‍याविषयी विवाद नाही. विमा कालावधीमध्‍ये तक्रारदार यांची गाय मृत्‍यू पावल्‍याविषयी विवाद नाही. प्रामुख्‍याने, विमा कंपनीने कोणतेही कारण नसताना त्‍यांचा क्‍लेम प्रलंबीत ठेवून तो नाकारल्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारी मंचासमोर दाखल केलेल्‍या आहेत.

 

 

 

 

 

 

7.    तत्‍पूर्वी, विमा कंपनीने सर्वप्रथम पॉलिसी क्‍लॉजचा आधार घेत अधिकारक्षेत्र केवळ अकोला कोर्टास असल्‍याचे व या जिल्‍हा मंचास तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नसल्‍याचे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत 'विमा' हा 'सेवा' या कलमामध्‍ये अंतर्भुत आहे. तक्रारदार यांच्‍या गाईस विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले असल्‍यामुळे निश्चितच त्‍यांची तक्रार या मंचाच्‍या कार्यकक्षेत येते. तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'मॅग्‍मा फिनकॉप लि. /विरुध्‍द/ पंडीत ईश्‍वर देव ठाकूर', 2010 सी.टी.जे. 913 (सीपी) (एनसीडीआरसी) या निवाडयामध्‍ये असे न्‍यायिक तत्‍व प्रस्‍थापित केले आहे की,

 

            Para. 3 : As regards submissions referable to arbitration, it may be stated that the provisions of Section 3 of the Consumer Protection Act, 1986 is in addition and not in derogation of the proceedings of any other law for the time being in force. Thus, even if the Hire Purchase agreement contained arbitration clause, the complaint by the respondent under the Act was legally maintainable under the Act.

 

8.    वरील न्‍यायिक तत्‍वानुसार लवादाच्‍या क्‍लॉजमुळे जिल्‍हा मंचाचे कार्यक्षेत्रास बाधा पोहोचत नाही, हे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे विमा कंपनीने उपस्थित केलेला सदर मुद्दा निरर्थक व तथ्‍यहीन ठरतो आणि या मंचाला तक्रारदार यांची तक्रार चालविण्‍यास अधिकारक्षेत्र प्राप्‍त होते, या मतास आम्‍ही आलो असून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

9.    मुद्दा क्र. 2 ते 4 :- तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्‍हॅल्‍युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट इ. कागदपत्रांसह इतर पुरक कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे सुक्ष्‍मपणे अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्‍ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्‍यू पावल्‍याचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते.

 

10.   तक्रारदार यांनी गाय खरेदी केल्‍याची पावती दाखल केली नसल्‍याचे विमा कंपनीने नमूद केलेले आहे. वास्‍तविक पाहता, विमा कंपनीकडे तक्रारदार यांच्‍या गाईचा विमा उतरविल्‍याविषयी विवाद नाही. विमा संरक्षीत गाय मृत्‍यू पावल्‍याविषयी विवाद नाही. विमा कंपनीने गाईचा विमा उतरविताना सदर बाब का विचारात घेतली नाही ? याचा खुलासा केलेला नाही. ज्‍यावेळी विमा क्‍लेम सेटल केला जातो, त्‍यावेळी विमा कंपनीने खरेदी पावतीचा आग्रह धरलेला आहे. तसेच पॉलिसीच्‍या कोणत्‍या क्‍लॉजनुसार सदर पावती अत्‍यावश्‍यक आहे ? हे स्‍पष्‍ट केलेले नाही. खरेदी पावतीअभावी विमा क्‍लेम सेटल करण्‍यामध्‍ये काय अडचणी निर्माण होतात ? हे स्‍पष्‍ट केले नाही. त्‍यामुळे विमा कंपनीचा सदर बचाव मान्‍य करता येणार नाही, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

11.    विमा कंपनीच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांनी स्‍वखर्चाने पात्र व सक्षम पशुवैद्यकीय शल्‍यविषारदाकडून गाईचे उपचार केल्‍याविषयी पुरावा दाखल केला नसल्‍याचे नमूद केले आहे. रेकॉर्डवर दाखल पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, व्‍हॅल्‍युएशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट इ. कागदपत्रांवर पशुधन विकास अधिकारी यांची स्‍वाक्षरी असून त्‍यांनी विमा संरक्षीत गाईंचे पोस्‍टमार्टेम केल्‍याचे दिसून येते. त्‍यामध्‍ये गाईचा उपचार करण्‍यामध्‍ये निष्‍काळजीपणा झाल्‍याचे किंवा त्‍यामुळे गाय मृत्‍यू पावल्‍याच्‍या निरिक्षणाची नोंद नाही. तसेच कोणताही व्‍यक्‍ती आपल्‍या पशुधनाची निश्चितच काळजी घेतो आणि आवश्‍यकतेनुसार आजारी पशुधनाचा वैद्यकीय उपचार करतो, हे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्‍ये विमा कंपनीच्‍या सदर बचावामध्‍ये तथ्‍य आढळून येत नाही, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत.

12.   विमा कंपनीने पॉलिसीच्‍या अट क्र.4 व 7 चा आधार घेत, गाय आजारी पडल्‍यामुळे विमा कंपनीस कळविणे अत्‍यावश्‍यक असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच गाय मयत झाल्‍यानंतर 12 तासाचे आत विमा कंपनीस नोटीस देणे आणि 24 तासाचे आत गाईचे निरिक्षण करण्‍याची संधी विमा कंपनीस देणे अनिवार्य असल्‍याचे नमूद केले आहे.

 

13.   मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाने 'न्‍यू इंडिया एश्‍योरन्‍स कं.लि. /विरुध्‍द/ नानासाहेब हनुमंत जाधव', 2005 सी.टी.जे. 530 (सी.पी.) (एस.सी.डी.आर.सी.) या प्रकरणामध्‍ये असे म्‍हटले आहे की,

          

Para. 8 :- The very purpose of giving intimation within one calendar month is to have sufficient time for making scrutiny of the claim to avoid delay.  The full particulars are insisted for the effective scrutiny of the claim.  The phraseology used in the above clause would also give some latitude provided there is sufficient reason for late reporting.  There is no penalty clause provided in the above clause in case claim is not intimated within one calendar month.  Therefore, we hold that condition with regard to the time limit is not mandatory.  It is directory.  This clause is meant for the interest of the insured in order to facilitate prompt scrutiny of the claim.  This clause therefore cannot be used in detriment to the interest of the insured.  Therefore the action of repudiation on the part of the Insurance Company is not at all justified.

 

14.   उपरोक्‍त निवाडयात विषद तत्‍व पाहता, विमा कंपनीचा नमूद क्‍लॉज केवळ सूचनात्‍मक (directory) असून तो बंधनकारक (mandatory) ठरु शकत नाही. विमा कंपनीस विमा क्‍लेम त्‍वरेने सेटल करण्‍यास उपयोग होईल, इतक्‍याच मर्यादेत सदर अट अपेक्षीत ठरते.

 

15.   वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने अत्‍यंत तांत्रिक कारण देऊन विमा कंपनीने नाकारलेला असून सदर कृत्‍य त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदार गाईच्‍या विम्‍याची रक्‍कम क्‍लेम नाकारल्‍याच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र ठरतात, या मतास आलो आहोत.

 

16.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

      1. ग्राहक तक्रार क्रमांक 570/2010 मध्‍ये विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.29,000/- क्‍लेम नाकारल्‍याचा दि.10/8/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. ग्राहक तक्रार क्रमांक 571/2010 मध्‍ये विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.20,000/- क्‍लेम नाकारल्‍याचा दि.10/2/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

 

ग्राहक तक्रार क्र.570 ते 573/2010 आदेश पुढे चालू...

 

      3. ग्राहक तक्रार क्रमांक 572/2010 मध्‍ये विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.20,000/- क्‍लेम नाकारल्‍याचा दि.09/11/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      4. ग्राहक तक्रार क्रमांक 573/2010 मध्‍ये विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्‍कम रु.30,000/- क्‍लेम नाकारल्‍याचा दि.26/8/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      5. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      6. विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्‍यास मुदतीनंतर एकूण देय रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज दराने अदा करावी.

 

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/2211)

 

 

 

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT