Maharashtra

Kolhapur

CC/11/221

Smt. Mangal Rangrao Patil. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

S.M.Potdar.

14 Oct 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/221
1. Smt. Mangal Rangrao Patil.Prayag Chikhali, Tal. Karveer,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.LtdLocal Branch Manager, Kanchanganga,204 E, Station road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar., Advocate for Complainant
P.R. Ingale , Advocate for Opp.Party

Dated : 14 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

  

 
निकालपत्र :- (दि.14/10/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-यातील तक्रारदार यांचे पती मयत रंगराव विष्‍णू पाटील यांचा गावातील प्रयाग-चिखली वि.का.स.(विकास) सेवा संस्‍था मर्या.प्रयाग चिखली ता.करवीर जि.कोल्‍हापूर मार्फत सामनेवाला यांचेकडे J.P.A. अंतर्गत पॉलिसी उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.161600/47/2008/3542 असा आहे. पॉलीसी कालावधीतच दि.09/12/2010 रोजी तक्रारदाराचे पती रंगराव विष्‍णू पाटील हे शेतामध्‍ये पाणी पाजण्‍याकरिता गेले असता शेतामधील बांधावरुन पाय घसरलेने जोरात पडून त्‍यांचे डोकीस जबर मार लागला. त्‍यानंतर त्‍यांना उपचाराकरिता त्‍वरीत सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे नेले. परंतु औषधोपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला. तदनंतर तक्रारदारांनी आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांसहीत सामनेवालांकडे क्‍लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि.01/03/2011 रोजी ‘’ तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू अपघाती नसून आजारामुळे झालेला आहे. ‘’ असे चुकीचे कारण देऊन तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणाने तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवली असलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन क्‍लेमची रक्‍कम रु.1,00,000/-द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह, तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ क्‍लेम नाकारलेचे पत्र, घटनास्‍थळाचा पंचनामा, शवपरिक्षेकरिता पाठवावयाचा पोलीसी अहवाल, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)       सामनेवालांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी व बनावट आहे. वस्‍तुस्थिती पाहता व कायदयाचे दृष्‍टीने सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. सामनेवालांची तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराचा क्‍लेम जेव्‍हा दाखल केला तेव्‍हा इन्‍व्‍हेस्‍टीगेशन करताना आढळून आले की, डॉ. अशोक जाधव यांनी विमाधारकास सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्‍हापूर येथे रात्री 11.00 वा. मृत अवस्‍थेत आणले. MLC NO.333/10 P.M.NO2422 नुसार केले. मृत्‍यूचे कारण Atheroscierotic disease of Coronary arteries असे दाखवले आहे. त्‍यामुळे विमाधारकाचा मृत्‍यू हा सदर आजारामुळे झाला असून अपघाताने झालेला नाही ही बाब सिध्‍द होते. त्‍यामुळे तक्रारदाराचा क्‍लेम योग्‍य कारणासाठीच नाकारलेला असून सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रक्‍कम रु.5,000/- खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ मृत्‍यूच्‍या कारणाचे सर्टीफिकेट, पी.एम.रिपोर्ट, डॉक्‍टर अशोक जाधवा यांचा सर्व्‍हे रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?         -- नाही.
2) काय आदेश?                                         -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराचे पती मयत रंगराव विष्‍णू पाटील यांचा जेपीए अंतर्गत सामनेवालांकडे पॉलीसी क्र;161600/47/2008/3542 अन्‍वये विमा उतरविलेला होता. विमा पॉलीसीबाबत वाद नाही. तक्रारदाराचे पती दि.09/12/2010 रोजी शेतामध्‍ये पाणी पाजणेकरिता गेले असता शेतावरील बांधावरुन पाय घसरलेने जोरात पडून त्‍याचे डोक्‍यास जबर मार लागला व सी.पी.आर.हॉस्पिटल येथे उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झालेला आहे. तक्रारदाराने क्‍लेमची मागणी केली असता दि.01/03/2011 चे पत्राने तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा अपघाती नसून आजारामुळे झालेला आहे या कारणास्‍तव मृत्‍यू विमा दावा नाकारला आहे. येथेच वादाचा मुद्दा उपस्थित होतो. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पोलीस पेपरमध्‍ये दि.10/12/2010 चा पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता ज्‍या बांधावरुन पाय घसरुन पडला येथे ऊस पीक असून बांधाची उंची 4 फुट नमुद केली आहे. तसेच शवविच्‍छेदन, फॉर्म 2-बी मध्‍ये बांधावरुन खाली पडलेने त्‍याचे डोकीस मुक्‍का मार लागलेने जखमी अवस्‍थेत सी.पी.आर.हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झालेचे तसेच मयताच्‍या नक्‍की कारणासाठी मयताचे शव विच्‍छेदनासाठी पाठवलेचे नमुद केले आहे. मरणोत्‍तर पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता कलम 12 मध्‍ये वर नमुद मृत्‍यूची माहिती नमुद केलेली आहे. शव विच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केले असता कलम 17 मध्‍ये Surface wounds and injuries मध्‍ये  No any extranal injury असे नमुद केले आहे. तसेच कलम 19 Head कलमामध्‍ये (i) Scalp injury – Nil (ii) Skull – Intact (ii) Brain- Conjested Oedematous असे नमुद केलेले आहे. कलम 20(d) , (e) Right Lung, Left Lung  पुढे –Conjested  Oedematous on at section blood stained will be fluid comes out (f) Pericardium- Intact pericardial effusion about 100 ml fluid (g) Heart and weight- Cardiomegally endocadium thickned , smell, clots adherent to endocardium white infracted area about 2x3 cm over in a wall of it ventricle coronary vessels Atheroseleratic plaques in aorta असे नमुद केलेले आहे. तसेच मृत्‍यूच्‍या कारणामध्‍ये Atherotic disease of coronary arteries असे नमुद केले आहे.
 
           वर पी.एम.मध्‍ये नमुद केलेल्‍या मजकूराचा तसेच मृत्‍यूच्‍या कारणाचा विचार करता दि.10/12/2010 च्‍या  मृत्‍यूच्‍या कारणाच्‍या प्रमाणपत्राचा विचार करता मृत्‍यूचे कारण हे Atherosclerotic disease of coronary arteries असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तसेच त्‍या अनुषंगाने सामनेवाला यांनी त्‍यांचे पॅनेलवरील डॉ. अशोक जगन्‍नाथ जाधव (एमबीबीएस, एसएस-आर्थो) यांनी दिलेल्‍या शपथपत्रानुसार मृत्‍यूचे कारण वर नमुद केले कारणानेच झालेला असून सदरचा मृत्‍यू हा अपघाती नसून वर नमुद आजाराने झालेचे स्‍पष्‍ट होते. पुढील वैद्यकीय साहित्‍याचा विचार करता  
What Causes Atherosclerosis?
The exact cause of atherosclerosis isn't known. However, studies show that atherosclerosis is a slow, complex disease that may start in childhood. It develops faster as you age.
Atherosclerosis may start when certain factors damage the inner layers of the arteries. These factors include:
Plaque may begin to build up where the arteries are damaged. Over time, plaque hardens and narrows the arteries. Eventually, an area of plaque can rupture (break open).
When this happens, blood cell fragments called platelets (PLATE-lets) stick to the site of the injury. They may clump together to form blood clots. Clots narrow the arteries even more, limiting the flow of oxygen-rich blood to your body.
Depending on which arteries are affected, blood clots can worsen angina (chest pain) or cause a heart attack or stroke.
                वरील वैद्यकीय साहित्‍य, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यूच्‍या कारणाचे प्रमाणपत्र, डॉ. अशोक जगन्‍नाथ जाधव (एमबीबीएस, एसएस-आर्थो) यांचे शपथपत्र इत्‍यादीचे अवलोकन केले असता तक्रारदाराचा मृत्‍यू हा Atherosclerotic disease of coronary arteries मुळे झालेचे स्‍पष्‍ट होते. सबब तक्रारदाराचे पतीचा मृत्‍यू हा बांधावर पडून डोकीस मार लागल्‍यामुळे झालेचे अथवा डोकीस झालेल्‍या अंतर्गत इजेमुळे झालेचे दाखल वैद्यकीय पुराव्‍यावरुन दिसून येत नाही. सबब मयत विमाधारकाचा मृत्‍यू व अपघात याचा दुरान्‍वयेही संबंध स्‍पष्‍ट होत नाही. सबब नमुद विमाधारकाचा मृत्‍यू हा अपघाती नसलेबाबतच्‍या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांनी योग्‍य कारणास्‍तव विमा दावा नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
 
2)  खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
  

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT