जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १८१/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २२/१०/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/०८/२०१३
श्री.रामचंद्र श्रीधर शिंदे. ----- तक्रारदार.
उ.व.३५, धंदा - शेती.
राहणार- कावठी,ता.जि.धुळे.
विरुध्द
दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. ----- सामनेवाले.
गल्ली नं.५, शाळा नं.९ जवळ,
धुळे,ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.डी.डी.जोशी)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.सी.के.मुगूल)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून चोरी गेलेल्या वाहनाच्या विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी दि.०३-०५-२०११ रोजी धुळे येथील नवकार व्हील्स यांच्या दुकानातून दुचाकी वाहन स्प्लेंडर प्लस ही मोटार सायकल क्रमांक एम.एच.१८-ए.ई.-३२६८ ही विकत घेतली. तिचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडून काढलेला असून त्याचा कालावधी दि.०३-०५-२०११ ते दि.०२-०५-२०१२ असा होता. तक्रारदार यांनी दि.०९-०७-२०११ रोजी रात्री ०९.०० वाजेचे सुमारास सदर वाहन हे घरासमोर अंगणात नेहमी प्रमाणे लावले होते. त्यानंतर दि.१०-०७-२०११ रोजी सदर मोटार सायकल ही त्यांचे अंगणात दिसली नाही, त्याचा शोध घेवूनही न सापडल्याने दि.१२-०७-२०११ रोजी सोनगीर पोलिस स्टेशन येथे चोरीची फीर्याद दिली. सदर वाहन हे पोलिसांना न सापडल्यामुळे त्यांनी अ समरी मंजूर करण्यात आली आहे. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वाहनाचा क्लेम फॉर्म भरुन अर्ज सादर केला. परंतु सामनेवाले यांनी क्लेम हा मुदतीत दाखल केला नाही या कारणाने नामंजूर केला. सामनेवाले यांनी क्लेम नामंजूर करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांची विनंती अशी आहे की, मोटार सायकलची किंमत रु.४७,७५०/- ही दि.०९-०७-२०११ पासून द.सा.द.शे.१२ टक्के व्याजाने मिळावी, मानसिक, शारीरिक त्रासापोटी व अर्जाचा खर्च मिळावा.
(३) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा देऊन सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांचे वाहन हे दि.०९-०७-२०११ रोजी चोरीस गेले. परंतु त्यांनी सामनेवाले कंपनीस दि.१८-०७-२०११ रोजी कळविले आहे. पॉलिसीच्या अटी-शर्ती प्रमाणे वाहन चोरीस गेले असल्यास ४८ तासाचे आत विमा कंपनीला सुचित करणे आवश्यक आहे. परंतु या प्रमाणे तक्रारदार यांनी १० दिवस उशीरा कळविले असल्याने, तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला आहे. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र नि.नं.६ वर ६/१ ते ६/५, तक्रारदारांची पुरसीस व पुराव्याचे शपथपत्र तसेच सामनेवालेंचा जबाब पाहता आणि तक्रारदार व सामनेवाले यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी नि.नं.७ वर सदर वाहन खरेदी केल्याची छायांकीत पावती दाखल केली आहे. सदर पावती पाहता तक्रारदार यांनी दि.०३-०५-२०११ रोजी रक्कम रु.४७,७४८/- किमतीस स्प्लेंडर हे वाहन नवकार व्हील्स धुळे यांच्याकडून खरेदी केलेले आहे. या वाहनाचा तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीकडे विमा उतरविला आहे. त्या विमा पॉलिसीची प्रत नि.नं.८ वर दाखल केली आहे. सदर पॉलिसी प्रमाणे तक्रारदारांचे वाहन हे दि.०३-०५-२०११ ते दि.०२-०५-२०१२ या कालावधीकरिता विमाकृत केलेले आहे. सदर वाहनाची आय.डी.व्ही. व्हॅल्यू ही रु.३९,६१५/- एवढी नमूद केलेली आहे. सदर पॉलिसीचा विचार करता तक्रारदार हे या सामनेवालेंचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार याचे वाहन हे दि.०९-०७-२०११ रोजीचे रात्रीचे सुमारास चोरी गेले आहे. त्या बाबतची फीर्याद सोनगीर पोलिस स्टेशन धुळे येथे दि.१२-०७-२०११ रोजी दिलेली आहे. तिची प्रत नि.नं.९ वर दाखल आहे. सदर वाहन हे तपासाअंती मिळून न आल्याने, उपविभागीय पोलिस अधिकारी धुळे ग्रामिण विभाग साक्री, यांनी अ समरी रिपोर्ट दिलेला आहे. तो नि.नं.१० वर दाखल आहे.
तक्रारदाराने सदर वाहनाचा क्लेम प्रस्ताव सामनेवाले यांचेक्रडे दाखल केला आहे. परंतु सामनेवाले यांनी दि.२६-०४-२०१२ चे पत्रान्वये सदर क्लेम नाकारला असून सदर पत्र नि.नं.१३ वर दाखल आहे. सदर पत्र पाहता यामध्ये सामनेवाले यांनी, पॉलिसीच्या अटी शर्ती प्रमाणे वाहन चोरी गेले असल्यास ४८ तासाचे आत विमा कंपनीस कळविले पाहिजे. या अटी प्रमाणे विमेधारकाने वाहन चोरी गेल्या नंतर १० दिवसांनी कळविले असल्याकारणाने सदर क्लेम नामंजूर केलेला दिसत आहे. या पत्राचा विचार करता सामनेवाले यांनी सदर वाहन हे चोरी गेल्याचे ४८ तासाच्या आत कळविलेले नाही या कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे, ही बाब स्पष्ट होते आहे.
आमच्या मते कोणत्याही व्यक्तीचे वाहन चोरी गेल्या नंतर, ते वाहन शोधण्याचा प्रयत्न करुन त्या नंतर संबंधीत पोलिस स्टेशनला फीर्याद दिली जाते व या यासाठी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. सदरची घटना ४८ तासांचे आत सामनेवालेंना अटी व शर्ती प्रमाणे कळविणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाले यांना १० दिवसांनी उशीरा कळविलेले आहे. सदरच्या अटी-शर्ती चा विचार करता, ते कंपनीने तयार केलेले नियम आहेत. परंतु त्या बाबतच्या आवश्यक असलेल्या अटी-शर्ती या अर्जात पुरावा म्हणून दाखल केलेल्या नाहीत. सामनेवाले यांनी या अटी शर्ती प्रमाणे जरी मुदतीत सामनेवाले यांना कळविलेले नसले, तरी देखील सदर वाहन चोरी गेले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्या बाबतची फीर्याद दिलेली असून, वाहनाचा तपासात शोध न लागल्याने अ समरी दिलेली आहे. यावरुन सदर वाहन हे चोरी गेलेले आहे ही बाब स्पष्ट होत आहे. त्यानंतर सामनेवाले यांनी सदरचे वाहन चोरी गेल्याचे नाकारलेले नाही. सदर वाहन हे विमा कालावधीत असल्याने वाहनाचा विमा क्लेम देण्याची जबाबदारी ही सामनेवाले यांच्यावर आहे. ही रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले यांनी केवळ १० दिवस उशीरा कळविले आहे या कारणाने टाळू शकत नाहीत असे आमचे मत आहे. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेते त्रुटी स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी विमा क्लेमच्या अटी व शर्ती प्रमाणे ४८ तासात कळविलेले नाही, हे सामनेवालेंचे म्हणणे योग्य असले तरी, केवळ तांत्रीक कारणाने सामनेवाले यांनी सदरचा क्लेम पुर्णपणे नामंजूर करणे योग्य व रास्त नाही. या कामी सामनेवाले यांनी तक्रारदारांचा क्लेम हा नॉन स्टॅंडर्ड बेसीसवर मंजूर करणे योग्य होईल, या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत.
याकामी आम्ही मा.सर्वोच्च न्यायालयाच्या २ (२०१०) सी.पी.जे. पान नं.९. अलमेंदू साहू विरुध्द ओरिएंटल इन्श्युरन्स कं.लि. या न्यायनिवाडयाचा आधार घेत आहोत. या न्याय निवाडयाप्रमाणे, विमेधारकास नॉन स्टॅंडर्ड पध्दतीने विमा क्लेमची रक्कम देणे कंपनीस शक्य आहे. याचा आधार घेऊन सदर तक्रारदारास विमा क्लेमच्या रकमेपैकी नॉन स्टॅंडर्ड प्रमाणे रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. या प्रमाणे विमा पॉलिसीमध्ये वाहनाची आय.डी.व्ही. व्हॅल्यू ही रक्कम रु.३९,६१५/- अशी आहे. या रकमेच्या ७५ टक्के म्हणजे रु.२९,७११/- इतकी रक्कम दि.२६-०४-२०१२ च्या क्लेम नाकारल्याच्या पत्रापासून मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत. तसेच सदरच्या क्लेमची रक्कम तक्रारदारांना मुदतीत न मिळाल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे आणि त्याकामी या मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. त्यासाठी नुकसानीची रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास चोरी गेलेल्या वाहनाच्या विम्यापोटी, रक्कम २९,७११/- (अक्षरी रुपये एकोणतीस हजार सातशे अकरा मात्र) दि.२६-०४-२०१२ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ % प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम
धुळे.