Maharashtra

Kolhapur

CC/11/189

Shivaji Pandurang Varute. - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

P.B.Jadhav.

19 Jul 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/189
1. Shivaji Pandurang Varute.Sawrde Patankar, Tal. RadhanagariKolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.LtdDivisional Manager, Divisional Office, Kanchanganga, 204 E ward, Station road,Kolhapur.Kolhapur.2. Shri. Kedarling Vikas Seva Sanstha LtdSawrde Patankar, Tal. Radhanagari.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.B.Jadhav., Advocate for Complainant
P.R.Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 19 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र:- (दि.19/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)  
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांतर्फे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार या वर नमुद पत्‍तयावर कायमचे रहिवाशी असून शेती व्‍यवसाय करतात. सामनेवाला क्र.1 ही ख्‍यातनाम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी आहे. सामनेवाला क्र.2 ही सहकार कायदयाने अस्तित्‍वात आलेली सहकारी विकास सेवा संस्‍था आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 चे सभासद आहेत. सामनेवाला क्र.1 कंपनीने सामनेवाला क्र.2 संस्‍थेच्‍या सभासदांचे हिताकरिता जनता व्‍यक्तिगत अपघात विमा पॉलीसी महाराष्‍ट्र शासनाचे निर्णयानुसार जाहीर केलेली होती. त्‍यानुसार सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 यांचेकडे विमा पॉलीसी उतरविलेली होती. सदर योजनेनुसार अपघाती मृत्‍यूसाठी रु.1,00,000/- शेतक-याचे शरिराचा एखादा हात, पाय डोळा अवयव निकामी झालेस रु.50,000/- व नुकसान भरपाई रक्‍कम दिली जाते.
     दि.30/01/2009 रोजी सकाळी 9.00 वाजता तक्रारदार शेतामध्‍ये ऊस तोडणीचे काम करीत असताना ऊसाची पात तक्रारदाराचे डाव्‍या डोळयास लागून अपघाती दुखापत झाली. तक्रारदाराने गावकामगार पोलीस पाटील यांचे निर्देशाप्रमाणे कोल्‍हापूर येथील डॉ. ए.एम.जोगळेकर यांचे प्रगती नेत्र रुग्‍णालयामध्‍ये दाखल होऊन ऑपरेशन व औषधोपचार घेतले मात्र तरीही त्‍यास डावा डोळा गमवावा लागला. तक्रारदाराचा डावा डोळा काढावा लागलेने त्‍याची दृष्‍टी कायमपणे नाहीशी होऊन त्‍यास कायमस्‍वरुपी अंधत्‍व/अपंगत्‍व आलेले आहे. त्‍यामुळे तो शेताचे तसेच दैनंदिन कामे व्‍यवस्थितरित्‍या करु शकत नाही.
 
           तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे क्‍लेम फॉर्मसोबत मेडिकल सर्टीफिकेट, तलाठी प्रमाणपत्र, पोलीस पाटलांचा दाखला, अंपगत्‍वाचे प्रमाणपत्र इत्‍यादी कागदपत्रे जोडून नुकसानभरपाईची मागणी केली असता दि.30/09/2010 रोजी सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेचे प्रसतुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदाराचा डावा डोळा निकामी झालेने नुकसान भरपाई रक्‍कम रु.50,000/- औषधोपचारासाठी रु.3,000/- मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.12,000/- असे एकूण रु.90,000/- द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याजासह सामनेवाला क्र.1 कंपनीकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती केलेली आहे.
 
(03)       तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ्‍य तक्रारदाराने सामनेवालांकडे दाखल केलेला क्‍लेम फॉर्म, प्रगती नेत्र रुग्‍णालयाकडील डिस्‍चार्ज कार्ड, पोलीस पाटील यांचा दाखला, तसेच औषधोपचाराचे सर्टीफिकेट, सामनेवाला क्र.1 यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)       सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारीची तक्रार खोटी, लबाडीची व चुकीची असलेने मान्‍य व कबूल नाही. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूराबाबत काही म्‍हणावयाचे नाही. तक्रार अर्ज कलम 2 मधील मजकूर चुकीचा आहे. वस्‍तुत: तक्रारदाराने डॉ.जोगळेकरांकडे औषधोपचार घेत असतात. फार वर्षापूर्वी त्‍यांचे डावे डोळयाला जनावराची शेपटी लागून डोळा निकामी झालेचे कथन केले आहे. सबब डाव्‍या डोळयाला ऊसाचा पाला लागून जखम होउुन निकामी झाला नसून फार वर्षा पूर्वीपासून अंधत्‍व आलेमुळे निकामी झालेला आहे. त्‍यामुळे विमा दावा रक्‍कम देय होत नाही. सबब योग्‍य कारणास्‍तव सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेने सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही; सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूरकरणेत यावी व कोर्ट खर्च तक्रारदाराकडून सामनेवाला यांना देवविणेत यावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे.  
 
(05)       सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार चालविणेचा अधिकार क्षेत्र मे. मंचास येत काय?  -- होय
2. सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?              -- होय
3. काय आदेश?                                                                       -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- विमा सेवा या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कक्षेत येतात. विमा सेवा तसेच त्‍याबाबतच्‍या सेवात्रुटी निर्णित करणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास आहे.
 
मुद्दा क्र.2 व 3 :- तक्रारदाराचा विमा सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 यांचेकडे जनता व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत उतरविलेला होता याबाबत वाद नाही. तक्रारदाराने कथन केलेप्रमाणे दि.30/1/2009 रोजी सकाळी 9.00 वाजता शेतामध्‍ये ऊस तोडणीचे काम करीत असताना ऊसाची पात डाव्‍या डोळयास लागून सदर डोळयास अपघाती दुखापत झाली. गावंकामगार पोलीस पाटीलांचे निर्देशाप्रमाणे त्‍यांनी डॉ.ए.एम.जोगळेकर यांचे प्रगती नेत्र रुग्‍णालयामध्‍ये उपचार घेतलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले दि.07/02/2009 चे नमुद डॉ.चे सहीशिक्‍क्‍यानिशी असणा-या प्रमाणपत्रावरुन दि.30/01/2009 रोजी तक्रारदार दाखल होऊन दि.31/01/009 रोजी शस्‍त्रक्रिया (Enmucllation Surgry) केलेली आहे. दि.01/02/2009 रोजी त्‍यास डिस्‍चार्ज केलेले आहे व सदर बाबीसाठी रु.3,000/- खर्च आलेचे नमुद केलेले आहे. दि.03/08/2009 रोजी गांवकामगार पोलीस पाटील सावर्डे,पाटणकर ता.राधानगरी जि.कोल्‍हापूर यांनी दिलेल्‍या दाखल्‍यानुसार ऊस तोडणीचे काम करीत असताना त्‍याचे डाव्‍या डोळयास इजा झालेने डोळा काढलेबाबत आलेचे नमुद केले आहे. तसेच सदर बाबी विमा क्‍लेम फॉर्ममध्‍ये नमुद केले आहे.
 
           सामनेवाला यांनी दि.30/09/2010 फार पूर्वीपासूनच डावा डोळा हा निकामी झालेला होता. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा क्‍लेम विचारात घेता येणार नाही असे कळवलेचे दिसून येते. सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये तक्रारदार हा डॉ. जोगळेकरांकडे औषधोपचार घेत असून त्‍याचे डावे डोळयाला जनावराची शेपटी लागून जखम होऊन डोळा निकामी झालेचे कथन केलेले आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा डोळा हा पूर्वीपासूनच निकामी झालेला आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा क्‍लेम पॉलीसीच्‍या अटी व नियमाप्रमाणे देय होत नसलेने नाकारलेचे मान्‍य केले आहे. मात्र सामनेवाला यांनी सदर लेखी म्‍हणणेतील कथनानुसार नमुद डॉ.जोगळेकर यांचेकडून पूर्वीपासूनच उपचार घेत होता व सदर डावा डोळा पूर्वीपासूनच निकामी होता याबाबतचा वैद्यकीय पुरावा तसेच इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्टही दाखल केलेला नाही; केवळ लेखी म्‍हणणेतील कथनाखेरीज अन्‍य कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलला नाही. तसेच प्रस्‍तुतचे लेखी म्‍हणणेही शपथपत्रासह नाही. याचा विचार करता कोणत्‍याही सबळ पुराव्‍याशिवाय सामनेवाला यांनी तक्रारदाराचा डावा डोळा निकामी झालेचे डॉ. जोगळेकर यांचे प्रमाणपत्र तसेच गांवकामगार पोलीस पाटील दाखल्‍यावरुन स्‍पष्‍टपणे दिसून येत असतानाही पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता तांत्रिक कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेला आहे. ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कम रु.50,000/- दि.30/09/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेने तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्‍कम रु.50,000/- (रु.पन्‍नास हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.30/09/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या     खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT