Maharashtra

Kolhapur

CC/11/203

Gurunath Vasant Dorugade - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

S.M.Potdar

10 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/203
1. Gurunath Vasant DorugadeSohale, Tal. AajraKolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.LtdLocal Branch Manager,Kanchanganga,204 E Station road,Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
Chaya Ashok Jadhav, Advocate for Opp.Party

Dated : 10 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

नि का ल प त्र :- (दि.10/08/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 
(1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांचे मयत वडील हे शेतकरी होते. त्‍यांचा शासनामार्फत 'शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने' अंतर्गत पॉलिसी विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेली होती. पॉलिसीच्‍या कालावधीतच दि. 01/08/2008 रोजी तक्रारदारांचे वडील वसंत बाळू दोरुगडे यांचे रेल्‍वे गाडीची ठोकर लागून झालेल्‍या अपघातामध्‍ये डोक्‍यास मार लागू, दोन्‍ही पाय गुडघ्‍यातून आतल्‍या आत मोडून जबर जखमी झालेने त्‍यांना कूपर हॉस्‍पीटल येथे औषधोपचाराकरिता दाखल करण्‍यापूर्वीच तेथील डॉक्‍टरांनी मयत घोषित केले. याबाबत सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेमबाबत सर्व कागदपत्रासह मागणी केली असता दि. 125/03/2010 रोजीचे पत्राअन्‍वये क्‍लेमसोबत ब्‍लड टेस्‍ट फॉर अल्‍कोहोल रिपोर्ट पाठविलेला नसलेने व क्‍लेम कट- ऑफ डेट नंतर पाठविलेने क्‍लेम नाकारणेत येत आहे असे पत्र पाठविले. तक्रारदारांच्‍या तक्रारीत तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला विमा कंपनीने चुकीचे व तांत्रिक कारण देऊन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे. सबब, क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रार नाकारलेली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, पॉलिसी नियमाप्रमाणे आवश्‍यक ती कागदपत्रे जोडलेली नाहीत. कट-ऑफ डेट नंतर क्‍लेम पाठविला आहे. ब्‍लड टेस्‍ट फॉर अल्‍कोहोल बाबतचा रिपोर्ट पाठविण्‍याबाबत वेळोवेळी मागणी केलेली आहे. सदर कागदपत्राची पुर्तता केलेली नसल्‍याने तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
 
 
(5)   सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत  क्‍लेम नाकारलेचे दि. 15/03/2010, विविध दुर्घटना क्‍लेम छानबिन संबंधी फॉर्म, तक्रारदार यांनी क्‍लेमसोबत कंपनीकडे पाठविले पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट व पॉलिसी अग्रीमेंटसह इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
 
(6)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला.  तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी शवविच्‍छेदन अहवाल दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये मृत्‍यूचे कारण हे “shock due to haemorhage due to polytrama cunnatura” व त्‍याखाली मेडीकल ऑफीसर यांची सही व सदर शवविच्‍छेदनावर exhibit does not reveal any poison including ethyl alcohol” असे मृत्‍यूचे कारण दर्शविले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या शवविच्‍छेदन अहवालावर “shock due to haemorhage due to polytrama cunnatura” असे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये कारण नमूद केलेले आहे.
 
     तक्रारदारांच्‍या वडिलांचा मृत्‍यू हा रेल्‍वेची धडक लागून झालेला आहे. तक्रारदार हे अल्‍कोहोलच्‍या अमंलाखाली होते याबाबतची कोणतेही कागदपत्रे दिसुन येत नाही. सामनेवाला कंपनीने दाखल केलेला शवविच्‍छेदन व तक्रारदारांनी दाखल केलेला शवविच्‍छेदन अहवाल याबाबत अल्‍कोहोल अमंलाबाबत कोणतेही मत व्‍यक्‍त केलेले नाही. असे असतानाही तक्रारदारांचे वडिलांचा अपघाती मृत्‍यू झालेला आहे. व अल्‍कोहोल अमंलाबाबत कोणतीही वस्‍तुस्थिती समोर येत नसतानाही ब्‍लड टेस्‍ट फॉर अल्‍कोहोल अहवाल नाही या कारणावरुन क्‍लेम नाकारलेला आहे. ही सामनेवाला कंपनीची सेवेतील गंभीर सेवा त्रुटी आहे. तक्रारदारांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस विहित वेळेत क्‍लेम पाठविला आहे  ही वस्‍तुस्थिती या मंचचे निदर्शनास आणून दिलेली आहे.  सामनेवाला कंपनीने कट ऑफ-डेट नंतर क्‍लेम पाठविला आहे याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. उपरोक्‍त विवेचन विचारात घेता सामनेवाला यांची सेवा त्रुटी झाल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे.  तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
 
                          - आ दे श -
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 1/11/2008 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला   विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
          
          
 
 
 
 
 ‍
         
 
 
 
 
 

 


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT