Maharashtra

Kolhapur

CC/11/232

Eknath Dattatray Bhosale - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

R.G.Shelke.

12 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/232
1. Eknath Dattatray BhosaleSawrde Dumala, Tal. Karveer,Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.LtdBranch Manager, 204 E, Station road,Kanchanganga,Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.G.Shelke., Advocate for Complainant
N.D.Joshi, Advocate for Opp.Party

Dated : 12 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.12/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           तक्रारदाराचा पशु विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार हे वर नमुद गावचे कायमचे रहिवासी असून तेथे त्‍यांची स्‍थावर व जंगम मालमत्‍ता आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे किसान पॅकेज पॉलीसी या योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. त्‍याचा पॉलीसी क्र.161600/48/2010/3448 असून पॉलीसीचा कालावधी दि.30/07/2009 ते 29/07/2010 असा आहे. तक्रारदाराचे घर नं.57/1हे दि.16/04/2010 रोजी सायंकाळी 5.30 ते 8.30चे सुमारास वादळी वा-याने घराचे संपूर्ण पडझड होऊन नुकसान झाले व सदर पडझडीमुळे झालेले घराचे नुकसान रक्‍कम रु.12,497/- असून तसेच धान्‍याचे नुकसान झालेले आहे. दि.17/04/2010 रोजी गाव कामगार पोलीस पाटील यांनी पंचनामा केलेला आहे. घराचे वादळाने नुकसान झालेबाबतचा दाखला दिलेला आहे. तक्रारदारने घराचे दुरुस्‍तीसाठी लागणारे साहित्‍य हे गजानन फर्निचर सावर्डे दु।। यांचेकडून घेऊन दुरुस्‍ती केलेली आहे. त्‍याची पावती आहे. दि.17/05/2010 रोजी क्‍लेम फॉर्म भरुन व योग्‍य कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे क्‍लेमची मागणी केली असता दि.21/02/2011 चे पत्राने मिळकतीचा घर नंबर चुकीचा असलेचे कारणास्‍तव क्‍लेम नाकारला आहे. सदर घर नं.57 मध्‍ये तक्रारदार व त्‍यांचा भाऊ रहात आहेत. त्‍यामुळे सदर मिळकतीस 57/1 व 57/2 अशी फोड करणेत आलेली आहे. तक्रारदार हे दूर्गम भागातील असून ते शेतकरी आहेत. सबब प्रस्‍तुतचा क्‍लेम मिळणे जरुरीचे असतानाही मागणी करुनही प्रस्‍तुतचा क्‍लेम बेकायदेशीरपणे नाकारलेने प्रसतुतची तकार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा क्‍लेमची रक्‍कम रु.12,497/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी सामनेवालांकडे दिलेला क्‍लेम फॉर्म, नुकसानीबाबत ग्रामसेवक यांनी केलेला पंचनामा, नुकसानीबाबत पोलीस पाटील, तलाठी यांचा पंचनामा, ग्रामपंचायत मिळकत नं.132 चा उतारा, गजानन फर्निचर यांचे बील, किसान पॅकेज पॉलीसी प्रस्‍ताव, सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार श्री एकनाथ दत्‍तात्रय भोसले हे हे किसान पॅकेज पॉलीसी नं.161600/48/2010/3448 अन्‍वये सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या नमुना क्र.8 च्‍या कागदपत्रावरुन असे स्‍पष्‍ट दिसते की, तथाकथीत मिळकतीचे वर्णन विमा पॉलीसीमध्‍ये घर नं./गट नं.57 दगडमाती कौलारु असा आहे पण प्रत्‍यक्षात नमुना नं.द्ध मध्‍ये मिळकतीचा क्र.57/1 दगडमातीघर पडसर असा आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. तसेच तक्रारदाराकडून रक्‍कम रु.5,000/- मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांना देवविणेत यावेत अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत पूर्ववत सर्व्‍हेअर यांची सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला आहे. 
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?            --- होय.
2. काय आदेश ?                                                    --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराने दाखल केलेले सामनेवाला यांचे दि.21/02/2011 चे क्‍लेम नाकारलेचे पत्रानुसार किसान पॅकेज स्‍पेशल कॉन्‍टीजन्‍सी अंतर्गत पॉलीसी क्र.161600/48/2010/3448 तसेच क्‍लेम नं.161600/48/2011/001042 नुसार क्‍लेमची मागणी केलेली आहे. झालेले नुकसान हे दि.16/04/2010 रोजी झालेले असून सदरचे नुकसान हे वादळी वा-यामुळे राहते घर मिळकतीबाबतचे आहे. सर्व्‍हे रिपोर्टनुसार नुकसान झालेली मिळकत ही दत्‍तात्रय नारायण भोसले व द्रौपदी दत्‍तात्रय भोसले यांचे नांवे असून पॉलीसी मात्र एकनाथ दत्‍तात्रय भोसले यांचे नांवे आहे. त्‍यामुळे नमुद नुकसानीत झालेल्‍या मिळकतीमध्‍ये तक्रारदाराचा इन्‍शुरेबल इंटरेस्‍ट नसलेने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे ही वस्‍तुस्थिती सदर पत्रावरुन निदर्शनास येते.
 
           वादळवा-यामुळे घराचे नुकसान झालेले आहे याबाबत वाद नाही. सदर घराची दुरुस्‍ती तक्रारदाराने केलेली आहे. त्‍यासाठी रु.9,960/- इतकी नुकसानी गावकामगार पोलीस पाटील, ग्रामसेवक तलाठी यांनी दि.16/04/2010 रोजी पंचनाम्‍यानुसार निश्चित केलेली आहे. सदरची नुकसानीबाबतचा पंचनामा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच ग्रामपंचायत मिळकत नंबर 57 चा उतारा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सदर उता-यानुसार तक्रारदार नामदेव श्रीपती निकम यांचे मालक म्‍हणून नांव नोंद आहे. तक्रारदाराने प्रत्‍यक्षात खर्च केलेली रक्‍कम रु.12,497/- दिसून येते. त्‍याबाबत दि.09/05/2010 ची गजानन फर्निचर यांची पावती दाखल आहे. किसान पॉलीसी पॅकेज प्रस्‍तावामध्‍ये तक्रारदाराचे मालमत्‍तेबाबत दोन वासरे तसेच ग्राम पंचायत घर नं.57 ची नोंद दिसून येते. प्रस्‍तुत घराची मालकी ही तक्रारदार व त्‍यांचे भाऊ यांचे नांवे असलेचे दिसून येते. तक्रारदार हा त्‍याच घरात राहतो. दोन्‍ही भावामध्‍ये सदर घराची वाटणी झालेने घर नं.57/1 व 57/2 अशा नोंदी दिसून येतात. सर्वसाधारण हिंदू संस्‍कृतीप्रमाणे वडीलांचे मृत्‍यूनंतर त्‍यांची मुले म्‍हणून मिळकतीस वारस म्‍हणून नोंद केली जाते. अथवा मिळकत धारकाच्‍या हयातीत सामुपचाराने घराची वाटणी केली जाते. केवळ मिळकतीची फोड केली म्‍हणून प्रस्‍तुतचे घर तक्रारदाराचे नाही असे म्‍हणणे चुकीचे होईल.
 
सामनेवाला यांनी दाखल केलेला पूर्ववत सर्व्‍हेअर यांचा सर्व्‍हे रिपोर्ट पुढीलप्रमाणे आहे.-
Bills Submitted                                                                                  ALLOWED
Shree Gajana Furniture Sawarde Dumala
1. 2.5MA.C. Sheet 28x 370=10360               2.5M A.C. Sheet 10x 370=3700
                                    Rs.      10360                                               Rs.      3700
                                                                        Less 20 % Dep.                     740       
                                                                                                                    2960
5. Labour fro fitting A.C.       2137                 Labour                                 1026
    Sheets                       Rs.   12497                                                Rs.        3986
                                                          Less : Policy Excess                           2500
                                                                                                       Rs.          1486
 
              सबब नमुद पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या पूर्ववत सर्व्‍हेअर यांचे सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रु.1,486/-व्‍याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरची रक्‍कम देणेस तयार असलेचे असलेचे सामनेवाला यांचे वकीलांनी युक्‍तीवादाच्‍या वेळेस प्रतिपादन केले आहे. सबब सामनेवाला यांनी ग्रामीण भागातील कुटूंब पध्‍दतीचा विचार न करता तसेच पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता केवळ तांत्रिक कारणास्‍तव तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला यांचे क्‍लेम नाकारुन सेवा त्रुटी केलेमुळे तक्रारदार त्‍याला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पूर्ववत सर्व्‍हेअर यांचे सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे असलेली रक्‍कम रु.1,486/-(रु.एक हजार चारशे शहाऐंशी फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.21/02/2011 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT