::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 18.02.2012) 1. सदर तक्रार प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यात आली असता, तक्रार मुदतीत आहे काय ? असा मुद्दा मंचाने उपस्थित केला. याबाबत अर्जदाराचे वकीलांची सुनावणी ऐकुण घेण्यात आली. 2. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि तक्रारीतील कथना नुसार अर्जदाराचा मुलगा योगेश वसंत डाहुले याचा मृत्यु दि.30/11/2004 रोजी झाला. त्याच्या वैयक्तिक अपघात विमा क्लेम मिळण्याकरीता तक्रार दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रारीस वादास कारण हे योगेश हयाचा मृत्यु दि.30/11/2004 ला झाला तेव्हा पासुन घडले आहे. अर्जदाराने तेव्हापासुन कोणतीही कार्यवाही केली नाही आणि गै.अ. यांनी दि. 03/02/2010 ला दिलेल्या पञावरुन वादास कारण घडले म्हणून तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या वकीलाने मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली. यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. व इतर विरुध्द आर.पियारीलाल इम्पोर्ट अन्ड एक्सपोर्ट लिमि. I(2010) CPJ 22 (NC) या प्रकरणाचा दाखला दिला. प्रस्तुत तक्रारी मध्ये विमा दावा नाकारल्याचा मुद्दा नाही, तर मृत्यु दि.30/11/2004 ला झाल्यानंतर वादास कारण घडले आहे. त्यामुळे वरील न्यायनिवाडयात दिलेले मत या प्रकरणाला लागु होत नाही. तसेच अर्जदाराच्या वकीलांनी केरला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी के.आर.जयराम कुमार विरुध्द नॅशनल इंन्शुरंन्स कं.लि. I (2011) CPJ 576 या प्रकरणाचा दाखला दिला. यातील मत या प्रकरणाला लागु पडत नाही. तर उलट मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंब्रई यांनी तक्रार क्रं 132/2010 श्री.राहुल चंद्रकांत मोदी विरुध्द रिलायन्स लाईफ इंन्शुरन्स व इतर 2 आदेश दि.16/08/2010.या प्रकरणात दिलेले मत या तक्रारीला लागु पडते. तसेच मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी Kandimalla Raghavaiah & Co. Vs. National Insurance Co.Ltd. and another 2009 CTJ (Supreme Court) (CP) या प्रकरणात दिलेले मत याला लागु पडतो. वादास कारण हे दावा नाकारल्यापासुन सुरु होत नाही, असे ग्राहय धरले आहे. प्रस्तुत प्रकरणातही विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासुन वादास कारण घडले असे म्हणता येणार नाही तर मृतक योगेश डाहुले याचा मृत्यु दि.30/11/2004 ला झाला तेव्हापासुन घडले आहे. यावरुन ही तक्रार मुदत बाहय आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत विलंब माफीचा कुठलाही अर्ज दाखल केलेला नाही. 3. मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी वरील निकालात दिलेले मत थोडक्यात येणे प्रमाणे. Therefore, repudiation of the claim and the subsequent correspondence will not extend the period of Limitation as contemplated under the law. Assuming for sake of argument that on first repudiation, probably the cause of action has arisen, as claimed by the complainant, yet from that date also the complaint is time barred because it should have been filed on or before 25/07/2010. So, even from the date of death of a person, namely the insured and from the date of the first repudiation by the insurance company the complaint is time barred. The right position according to law is that the complaint is barred by limitation. The submission that period of limitation shall be calculated from the date of repudiation stands rejected in view of Apex Court judgment. 4. वरील न्यायनिवाडसात दिलेल्या मतानुसार ग्राहक सरंक्षण कायद्या 1986 चे कलम 24 A प्रमाणे दोन वर्षं मुदतीत वादास कारण घडण्यापासुन दाखल केलेली नाही. तसेच विलंब माफीचा अर्ज सुध्दा जोडलेला नाही. त्यामुळे तक्रार प्राथमिक सुनावणीत स्विकारण्यास पाञ नाही. 5. अर्जदाराचे वकीलांनी सुनावणीत सांगीतले की, गै.अ. विमा कंपनीने दिलेल्या पञावरुन शेवटचे दिवस दि.02/02/2012 ला मंचात सादर केले. त्यामुळे तक्रार मुदतीत आहे. अर्जदाराचे हे कथन ग्राहय धरण्यास पाञ नाही. कायदेशीर नोटीस पाठवून मुदत बाहय वाद मुदतीत आणता येणार नाही. विमाधारकाचा मृत्यु दिनांकापासुन 5-6 वर्षानंतर नोटीस पाठविण्यात आला आहे. यावरुन तक्रार मुदतीत आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे उपलब्ध रेकॉर्ड वरुन तक्रार मुदत बाहय असल्याने प्राथमिक सुनावणीत स्विकारण्यास पाञ नाही.
6. एकंदरीत अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि तक्रारीतील कथना वरुन ग्राहक सरंक्षण कायद्याच्या कलम 24 A नुसार तक्रार स्विकारण्यास पाञ नाही. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार प्राथमिक सुनावणीत खारीज. (2) तक्रारी सोबत मुळ दस्ताऐवज असल्यास त्याचे झेरॉक्स रेकॉर्ड वर ठेवून परत अर्जदारास करण्यास यावे. तसेच सदस्य संच परत करण्यात यावे. (3) अर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 18/02/2012. |