Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/10/151

Dinesh Radhesyam Khandelwal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd.Through Branch Manager,Ahmadnagar & Other` 2 - Opp.Party(s)

Adv.Prakash Naukarkar

06 Jan 2011

ORDER


importMahashtraNagpur
Complaint Case No. CC/10/151
1. Dinesh Radhesyam KhandelwalR/o Ward No.2,Shivajinagar Mahadula,Tah.Kamptee,NagpurM. S. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.Ltd.Through Branch Manager,Ahmadnagar & Other` 2Add.Shivam Chembe`s,2nd Floor,Infront Zopadi Canteen,Sawdi Road,AhmadnagarAhmadnagarM. S. ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri V. N. Rane ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yangal ,MEMBERHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्‍या )     
आदेश
( पारित दिनांक :06 जानेवारी 2011)
 
 
प्रस्‍तुत तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेकडुन रुपये 40,000/- ची मेडीक्‍लेम पॉलीसी घेतली होती. सदर पॉलीसीचा क्रमांक 95120/46 असा असुन विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 25.5.2008 ते 24.5.2010 असा होता. दिनांक 18.6.2008 रोजी तक्रारदार आपले नातेवाईकांसोबत मोटर सायकलने डबलसिट येत असतांना नागपूर-कोराडी रोडवर ग्रीन डायमंड हॉटेलसमोर अपघात झाला व अपघातात तक्रारदाराच्‍या पायाला जबर दुखापत झाली. म्‍हणुन तक्रारदारास उपचारासाठी संगतानी हॉस्पिटल येथे दिनांक 18.6.2008ते 26.6.2008 या कालावधीकरिता भरती करण्‍यात आले. त्‍यावेळेस तक्रारदाराचे पायाचे हाड जुळण्‍यासाठी ताण देण्‍यात आला. दिनांक 2.7.2008 ते 9.7.2008 या कालावधीसाठी तक्रारकर्त्‍यास परत उपचारासाठी भरती करण्‍यात आले व त्‍यांचे गुडघ्‍याखालील हाडाची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. सदर उपचाराकरिता तक्रारदारास रुपये 70,000/- एवढा खर्च आला. विमा पॉलीसीच्‍या अटी नुसार गैरअर्जदार यांना सदर अपघाताची सुचना दिली असता. त्‍यांनी दिनांक 25.6.2008 रोजी पत्राद्वारे दावा प्रपत्र पुर्ण भरुन पाठविण्‍यास सांगीतले व त्‍यासोबत काही कागदपत्रांची मागणी केली. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने सदरचा दावा प्रपत्र मागणी केलेल्‍या दस्‍तऐवजासह गैरअर्जदारयांचेकडे सादर केला. दवाखान्‍यातुन सुट्टी झाल्‍यानंतर गैरअर्जदार कंपनीचे अधिकारी तक्रारदाराचे चौकशी करिता नागपूर येथे येऊन गेले. त्‍यानंतर दिनांक 17.9.2009 रोजी गैरअर्जदार यांनी तक्रारदाराने दाखल केलेले एक्‍सरेवर दिनांक 3.6.2008 नमुद आहे व अपघात सदर दिनांकास झालेला नसुन दाखल दस्‍तऐवजावरुन अपघात दिनांक 25.6.2008 रोजी झाल्‍याचे दिसुन येते या कारणास्‍तव तक्रारदाराचा विमादावा नाकारला. वास्‍तविक गैरअर्जदाराने तक्रारदाराचा योग्‍य दावा मंजूर न करता खोटया कारणास्‍तव नामंजूर केलेला आहे. गैरअर्जदाराची ही कृती सेवेतील कमतरता आहे म्‍हणुन तक्रारदाराने  सदरची तक्रार  दाखल  करुन
गैरअर्जदाराने मेडीक्‍लेम पॉलीसीनुसार रुपये 40,000/- व सदर रक्‍कमेवर दावा नाकारल्‍याचे दिनांकापासुन 18टक्‍के दराने व्‍याज, मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल 30,000/-व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/-मिळावा अशी मागणी केली.  
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्‍तऐवजयादी नुसार एकुण 11 कागदपत्रे दाखल केली. त्‍यात गैरअर्जदाराने दिलेले पत्र, दावा रद्द केल्‍याचे पत्र, एफ.आय.आर.ची प्रत, डॉक्‍टरचे देयक, डॉक्‍टरचे प्रमाणपत्र, कायदेशिर नोटीस, डाक प्रमाणपत्र, इत्‍यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्‍यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही म्‍हणुन प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश  24.11.2010 रोजी पारित करण्‍यात आला.
          -: कामिमांसा :-
प्रकरणातील वस्‍तुस्थितीवरुन असे निर्देशनास येते की, तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेकडुन मेडीक्‍लेम पॉलीसी रक्‍कम रुपये 40,000/-ची घेतली होती. सदर पॉलीसीचा क्रमांक 95120/46 असा असुन विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 03.6.2008 ते 2.6.2010 असा होता. (कागदपत्र क्रं.7,.8)
कागदपत्र क्रमांक वरील दस्‍तऐवजाचे निरिक्षण करता असे निर्देशनास येते की पॉलीसी कालावधी मध्‍ये दिनांक 18.6.2008 रोजी तक्रारदाराचा अपघात झाल्‍याने तक्रारदारास उपचारासाठी संगतानी हॉस्पिटल येथे दिनांक 18.6.2008 ते 26.6.2008 (कागदपत्र क्रं.51 ) या कालावधीसाठी भरती करण्‍यात आले व परत दिनांक 02.7.2008 ते 9.7.2010 या कालावधीसाठी तक्रारकर्त्‍यास परत त्‍याच हॉस्‍पीटलमध्‍ये उपचारासाठी भरती करण्‍यात आले होते. त्‍याउपचारासाठी आलेल्‍या खर्चाची देयके तक्रारदाराने कागदपत्र क्रमांक 15,16 वर सादर केलेली आहे.निर्वीवादपणे तक्रारदाराने विमा दावा सादर केलेला होता व गैरअर्जदाराने सदर विमा दावा तक्रारदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज व अपघाताचा दिनांक यामध्‍ये मेळ नसल्‍याचे कारणास्‍तव दिनांक 21.6.2010 रोजी नाकारला होता.
गैरअर्जदार यांनी आपल्‍या सदर म्‍हणण्‍यापोटी कोणताही सुस्‍पष्‍ट पुरावा सादर केलेला नाही व मंचापुढे हजर होऊन तक्रारदाराचे म्‍हणणेही खोडुन काढले नाही.
वरील वस्‍तु आणि परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचा योग्‍य विमा दावा नाकारुन तक्रारदारास सेवेतील कमतरता दिलेली आहे. असे या मंचाचे मत आहे. .सबब आदेश.
-//-//- आदेश  -//-//-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मेडीक्‍लेम पॉलीसी नुसार रुपये 40,000/-
एवढी रक्‍कम अदा करावी. सदर रक्‍कमेवर दिनांक 21.6.2010 पासुन रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो 9 टक्‍के दराने द.सा.द.शे.सरळ व्‍याज  द्यावे.
3. गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्‍याच्‍या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन
   हजार केवळ) द्यावे.
4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्‍त  झाल्‍यापासुन
  30 दिवसाचे आत करावे.
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER