Maharashtra

Kolhapur

CC/11/396

Vithu Hari Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Shital Potdar

05 Oct 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/396
1. Vithu Hari PatilAaknur,Tal.Radhanagari,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.Ltd.Local Branch Manager,204 E Station Road.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital Potdar, Advocate for Complainant
A.R.Kadam, Advocate for Opp.Party

Dated : 05 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 नि का ल प त्र :- (दि.05/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
         
      तक्रारदार हे शेतकरी असून शासनामार्फत शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा पॉलिसी उतरविलेली होती. सदर पॉलिसीचा क्र. 181200/48/2009/939 असा आहे. दि. 5/11/2008 रोजी तक्रारदार स्‍वत:चे शेतामध्‍ये ऊस लावण करण्‍याकरिता ऊस तोडून त्‍याच्‍या कांडया करत असताना अपघाताने त्‍यातील एक कांडी जोरात उडून तक्रारदार यांचे उजव्‍या डोळयास सदर उसाच्‍या कांडीचा जोरदार मार बसला. त्‍यामुळे त्‍यांना एस.बी. माने नेत्रतज्ञ यांच्‍या डोळयाच्‍या दवाखान्‍यात दाखल केले होते. त्‍यांचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला असे त्‍यांना सांगण्‍यात आले आहे. सदर अपघातामुळे तक्रारदारांना उजव्‍या डोळयास कायमस्‍वरुपी अंधत्‍व आल्‍याने तक्रारदारांनी मेडीकल सर्टीफीकेट व इतर अनुषंगिक सर्व कागदपत्रासह विमा क्‍लेमची  मागणी केली असता सामनेवाला विमा कंपनीने दि. 29/04/2010 रोजीचे पत्राने तक्रारदारांचे अपंगत्‍व 40 टक्‍के असल्‍याने क्‍लेम देता येणार नाही असे चुकीचे कारण देऊन कळविले आहे. व तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारला आहे. सबब, क्‍लेम रक्‍कम रु. 50,000/- दि. 24/06/2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत क्‍लेम नाकारलेचे पत्र, सिव्‍हील सर्जन दाखला, सी.पी. आर. अपंगत्‍व दाखला, पोलिस पंचनामा इत्‍यादीच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, पॉलिसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे 50 टक्‍के अपंगत्‍व असेल तरच विमा क्‍लेम देय होतो. त्‍यामुळे तक्रारदारांना अपंगत्‍व नसल्‍यामुळे तक्रारदारांचा क्‍लेम नाकारलेला आहे यामध्‍ये सामनेवाला यांची सेवा त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
 
(5)    या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार हे शेतकरी आहेत. तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे तक्रारदारांना ऊस तोडीत असताना त्‍यातील एक कांडी जोरात उडून तक्रारदार यांचे उजव्‍या डोळयास लागून अपघात झालेला आहे. व त्‍याची फीर्याद राधानगरी पोलिस स्‍टेशनला दिलेली आहे. व त्‍याप्रमाणे पोलिस पंचनामा झालेला आहे ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. तसेच तक्रारदारांनी डॉ. एस.बी. माने नेत्रतज्ञ यांचेकडेही सदर डोळयाबाबत उपचार घेतलेले आहेत. तसेच सिव्‍हील सर्जन, सी.पी.आर. हॉस्‍पीटल, कोल्‍हापूर यांनी डोळयाचा अपघात झाला आहे. तसे स्‍वतंत्र सर्टीफीकेट दिलेले आहे व 40 टक्‍के अपंगत्‍व असल्‍याचा दाखला दिलेला आहे. युक्‍तीवादाच्‍या वेळेस तक्रारदारांनी राज्‍य शासन निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. सदर ‍शासन निर्णय:- कृषि, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय वकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, शासन शुध्‍दीपत्रक क्र. शेअवि 2009/प्र.क्र.268/11 अ मंत्रालय विस्‍तार भवन, मुंबई 400 032, दिनांक  5 मार्च, 2011 सदर शासन निर्णयातील महत्‍वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे- कायमस्‍वरुपी अपंगत्‍वासाठीचा दावा/विमा प्रस्‍ताव अदा करण्‍यासाठी वैद्यकीय व्‍यावसायिकाने (Medical Practitioner)अपघातग्रस्‍त शेतक-याचा अवयव अथवा डोळा गमावला आहे असे प्रमाणपत्रात नमूद केलेले असल्‍यास अपंगत्‍वाची दर्शविलेली टक्‍केवारी (The % Disability) दुर्लक्षित करुन अशा प्रमाणपत्राचे आधारे विमा कंपनीने विमा प्रस्‍ताव अंतिम करावा. उपरोक्‍त उल्‍लेख केल्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या उजव्‍या डोळयास उपचाराकरिता सी.पी.आर. हॉस्‍पीटल येथे दाखल केलेले होते व उपरोक्‍त उल्‍लेख केल्‍याप्रमाणे शासन निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार हे विमा क्‍लेम रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. सबब, आदेश.        
                    - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 29/04/2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT