Maharashtra

Kolhapur

CC/10/640

Vasant Nivrutti Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance co.Ltd., - Opp.Party(s)

D.L.Chechar/Sunil Shinde

22 Feb 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/640
1. Vasant Nivrutti Patilkasaba Thane, Tal.Panhala, Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance co.Ltd.,204 E Station Road, Kanchanganga, Opp. Panchshil Hotel Kolhapur.2. Chairman/Manager, Jyotirling Dudh Vyavsaik SansthaKasaba Thane, Tal.Panhala Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :D.L.Chechar/Sunil Shinde, Advocate for Complainant
A.D.Chougule/G.A.Chougule, Advocate for Opp.Party

Dated : 22 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.22.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांच्‍या गाईचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे किसान पॅकेज पॉलीसी अंतर्गत उतरविला होता. परंतु, सदर टॅग पडल्‍यामुळे सदरची बाब सामनेवाला क्र.2 यांना सांगून टॅग मिळणेबाबत विनंती केली. त्‍यानुसार सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 यांनी दि.03.12.2009 रोजी नविन टॅग मागविला व दि.22.01.2010 रोजी सदरचा टॅग मारला होता. सदन नविन टॅग्‍चा नंबर OIC 161600/48980 होता. सदरची गाय दि.26.01.2010 रोजी मयत झालेमुळे डॉ.एफ्.एम्.कर्डीले यांनी पोस्‍ट मार्टेम करुन अहवाल दिला. तसेच, मयत गाईच्‍या वस्‍तुस्थितीचा रितसर पंचनामा करणेत आला. त्‍यानंतर सामनेवाला यांचेकडे मयत गाईच्‍या विम्‍याची रक्‍कम मागणी केली असता सामेनवाला यांनी दि.07.10.2010 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सबब, पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रुपये 10,000/-, सदर रक्‍कमेवर 18 टक्‍के व्‍याज, दाद मागणेसाठी झालेला खर्च रुपये 3,000/-, प्रवास व इतर खर्च रुपये 1,000/- इत्‍यादी एकूण रक्‍कम रुपये 14,000/- देणेचे आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत मयत गाईच्‍या वर्णनाचे सर्टिफिकेट दि.20.02.2010, पोस्‍टमॉर्टेम सर्टिफिकेट दि.20.02.2010, व्‍हॅल्‍युएशन सर्टिफिकेट दि.20.02.2010, पंचनामा दि.26.01.2010, ट्रिटमेंट सर्टिफिकेट दि.14.02.2010, विमा दाव्‍याचे पत्र दि.27.01.2010, डॉ.कार्डीले यांचे सर्टिफिकेट, विमा कंपनीचे किसान पॅकेज पॉलीसीचे प्रस्‍तावपत्र, सामनेवाला क्र.2 यांनी नविन टॅग मिळणेबाबत पाठविलेले पत्र दि.03.12.2009, विमा कंपनीचे किसान पॅकेज पॉलीसीचे प्रस्‍तावपत्र, सामनेवाला क्र.1 चे क्‍लेम नाकारलेचे पत्र दि.07.10.2010, मयत गाईची छायाचित्रे इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, दि.03.12.2009 रोजीचे रजिस्‍टर्ड ए.डी.पत्राने दि.25.01.2010 रोजी गाईला नविन बिल्‍लाOIC 161600/48980 असा मारला आहे, डॉ.सर्टिफिकेट प्रमाणे दि.24.01.2010 रोजी पासून आजारी आहे व ती गाय दि.26.01.2010 रोजी मेली आहे म्‍हणजे बिला मारण्‍याअगोदर गाय आजारी होती या कारणास्‍तव आपली क्‍लेम फाईल बंद केली आहे असे कळविले आहे ते योग्‍य व कायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत येवून सामनेवाला यांना कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(5)        सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत सामनेवाला क्र.2 यांचे दि.25.10.2010 रोजीचे पत्र दाखल केले आहे.
 
(6)        या मंचाने उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे व दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचे युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकले आहेत. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीत उल्‍लेख केलेल्‍या गाईवर सामनेवाला विमा कंपनीचा विमा उतरविला आहे. तसेच, सदरची गाय दि.26.01.2010 रोजी मयत झाली आहे. त्‍या अनुषंगाने डॉक्‍टरांचे सर्टिफिकेट, शवविच्‍छेदन अहवाल, व्‍हॅल्‍युएशन सर्टिफिकेट प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारताना दि.25.01.2010 रोजी गाईला नविन बिल्‍लाOIC 161600/48980 असा मारला आहे, डॉ.सर्टिफिकेट प्रमाणे दि.24.01.2010 रोजी पासून आजारी आहे व ती गाय दि.26.01.2010 रोजी मेली आहे म्‍हणजे बिला मारण्‍याअगोदर गाय आजारी होती या कारणास्‍तव आपली क्‍लेम फाईल बंद केली आहे असे कारण नमूद केले आहे. सदर गाईला रिटॅगिंग केलेले आहे व बिल्‍ला नं.OIC 161600/48980 दिला. याचा अर्ज मयत गाईचा विमा होता व रिटॅगिंगसाठी बिला दिला होता. याचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम देणे आवश्‍यक होते. तसे न करुन सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब आदेश.
 
आदेश
 
1.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना गाईच्‍या विम्‍याची रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.26.01.2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.   
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT