Maharashtra

Kolhapur

CC/11/304

Sou. Rekha Raghunath Chougle - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

S.M.Potdar

13 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/304
1. Sou. Rekha Raghunath ChouglePandewadi,Tal.Radhanagari,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.Ltd.Local Branch Manager,Kanchanganga 204 E Station road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.M.Potdar, Advocate for Complainant
Sou. C.A. Jadhav, Advocate for Opp.Party

Dated : 13 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.13/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           तक्रारदाराचा पशु विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार यांचे गायीचा सामनेवाला‍ विमा कंपनीकडे इंदिरा गांधी महिला सह.दुध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. पंडेवाडी ता.राधानगरी मार्फत विमा उतरविलेला आहे. सदर पॉलीसीचा क्र.161600/47/2010/610 असा असून गायीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्रमांक ओआयसी/161600/73355 असा आहे. तक्रारदार यांची सदर विमाधारक गाय दि.09/09/2010 रोजी चरावयास सोडली असता दरडीवरुन पाय घसरुन उंचावरुन ओढयामध्‍ये पडून मयत झाली. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदार यांनी सामनेवालाकडे विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.06/01/2011 रोजी सामनेवाला यांनी गायीचे वर्णन जुळत नाही व विमा केलेपासून 15 दिवसांचे आत गाय मरण पावलेली असलेने दावा देय होत नाही असे चुकीचे उत्‍तर देऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारला आहे.
 
           वास्‍तविक सामनेवाला यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदाराची गाय प्रत्‍यक्ष पाहून विमा प्रपोजल फॉर्म स्‍वत: भरलेला आहे. सामनेवाला यांचेकडील डॉक्‍टर हे प्रपोझलवेळी संध्‍याकाळचे वेळेस तक्रारदारांकडेक आलेले होते. गायीचा रंग हा पांढरा व तांबूस, शेपूट गोंडा पांढरा, शिंगे पुढे टोकी, डोक्‍यावर पांढरा ठिपका अशा गायीचा विमा सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. परंतु सामनेवाला यांचे डॉक्‍टरांनी प्रपोझल फॉर्ममध्‍ये गायीचा रंग हा पांढरा व तांबूस नमुद करणेऐवजी काळा व पांढरा असे नमुद केले आहे. तक्रारदाराकडे एकच गाय असून तीचाच मृत्‍यू झालेला आहे. तसेच सामनेवाला यांनी कधीही पॉलीसीच्‍या अटी व नियमांची माहिती तक्रारदारास पुरविलेली नाही. सदर गोष्‍टीची कल्‍पना सामनेवाला यांना देऊनही त्‍यांनी तक्रारदाराचा क्‍लेम चुकीच्‍या कारणास्‍तव नाकारुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा त्रुटी केली असलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन क्‍लेमची रक्‍कम रु.10,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.30,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्र व पॉलीसी प्रपोजल पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(4)        सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नाही. सामनेवाला त्‍यांचे म्‍हणणेत पुढे असे सांगतात, तक्रारदार यांनी विमा पॉलीसी उतर‍वतेवेळी पॉलीसीतील सर्व अटी व शर्ती मान्‍य केल्‍या होत्‍या. सदर पॉलीसीतील अटी व शर्ती प्रमाणे तसेच पॉलीसीतील कंडीशनप्रमाणे गायीचा विमा केले पासून 15 दिवसांचे आत गाय मयत झालेस पॉलीसीची रक्‍कम मिळणार नाही असे स्‍पष्‍ट नमुद आहे. तसेच गाईचे प्रपोजल फॉर्ममधील वर्णन व गायीचा फोटो यामधील वर्णन जुळत नाही. या कारणास्‍तव सामनेवाला यांनी तक्रारदाराचा गायीचा दावा नामंजूर केलेला आहे. सदरची सामनेवाला यांची ही कृती पूर्णपणे कायदेशीर आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत इन्शुरन्‍स पॉलीसी शेडयूलसह, प्रस्‍ताव पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. 
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?            ---होय.
2. काय आदेश ?                                        --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराचे गायीचा विमा इंदिरा गांधी महिला दुध व्‍यावसायिक संस्‍था मर्या. पंडेवाडी ता. राधानगरी यांचेकडे पॉलीसी क्र.161600/47/2010/610 असून गायीच्‍या कानातील बिल्‍लयाचा क्र.ओआयसी/161600/73355 असा आहे. सदर गाय दि.09/09/010 रोजी चरावयास सोडली असता दरडीवरुन पाय घसरुन उंचावरुन ओढयामध्‍ये पडून मयत झाली. तदनंतर तक्रारदाराने रक्‍कम रु.10,000/- विमा रक्‍कमेची मागणी केली असता दि.06/01/2011 रोजी गायीचे वर्णन जुळत नाही व विमा केलेपासून 15 दिवसाचे आत गाय मयत झाली असलेने दावा देय होत नाही या कारणास्‍तव विमा दावा नाकारलेला आहे. दि.06/01/2011 चे क्‍लेम नाकारलेबाबतचे पत्र प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या विमा पॉलीसी व शेडयुलप्रमाणे प्रपोजल फॉर्मप्रमाणे 5 ते 6 वयाच्‍या गायीचा रंग काळा पांढरा, शेपुट गोंडा पांढरा, शिंगे पुढे टोकी, डोक्‍यावर पांढरा असे वर्णन नमुद केलेले आहे. तर तक्रारीमध्‍ये गायीचा रंग हा पांढरा व तांबुस, शेपुटगोंडा पांढरा, शिंगे पुढे टोके, डोक्‍यावर पांढरा टिपका असे नमुद केलेले ओह. सदर वर्णनात प्रथम दर्शनी फरक दिसून येतो. प्रस्‍तुत पॉलीसीवेळी जेव्‍हा सामनेवालांचे डॉक्‍टरांनी प्रपोजल फॉर्ममध्‍ये गायीचा रंग पांढरा व तांबुस नमुद करणेऐवजी काळा पांढरा नमुद केलेला आहे. तसेच पॉलीसी उतरविलेपासून थोडयाच दिवसात गाय मयत झाली असलेने सदरचे चुकीचे वर्णन दुरुस्‍त केले गेले नाही. तसेच सदर डॉक्‍टर प्रपोजलवेळी संध्‍याकाळचेवेळी तक्रारदाराकडे आले होते. त्‍यामुळे गायीचा रंग पांढरा व तांबुस ऐवजी काळा पांढरा असा नमुद केलेला आहे. प्रस्‍तुत कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता सदर बाबीं व्‍यतिरिक्‍त वर्णनामध्‍ये कोणताही फरक दिसून येत नाही. तसेच अशी नोंद चुकुन झालेची शक्‍यता नाकारता येत नाही. सामनेवाला यांचा मयत जनावराचे टॅगबाबत आक्षेप नाही. तसेच नमुद वर्णनातील चूक दुरुस्‍त करणेसाठी पुरेसा अवधी मिळेपर्यंत प्रस्‍तुत जनावर मयत झालेले आहे. तसेच सामनेवाला कंपनीने प्रस्‍तुत वर्णनातील फरक दर्शविणेसाठीचे नमुद गायीचे फोटो तसेच तक्रारदाराने पाठवलेले नमुद गायीचे शवविच्‍छेदन अहवाल, पशु वैद्यकाचे प्रमाणपत्र, विल्‍हेवाटीचा दाखला इत्‍यादी कागदपत्रे सामनेवाला यांनी दाखल केलेली नाहीत. सबब सदर कागदपत्रे दाखल करणेस सामनेवाला यांना कोणतीही अडचण नव्‍हती. केवळ कथनाखेरीज कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब विस्‍तृत विवेचनाचा विचार करता विमा उतरविलेले जनावर मयत झालेले आहे. तसेच मात्र जनावर मयत झाले त्‍यावेळी त्‍याचे कानात वर नमुद टॅग नंबरचा होता. सबब विमा उतरविलेले जनावर मयत झालेले आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तसेच सदरची पॉलीसी ही दि.31/08/2010 रोजी उतरविलेली आहे. पॉलीसीचा कालावधी हा दि.31/08/2010 ते 30/08/2011 चे मध्‍यरात्रीपर्यंत आहे. सदरची पॉलीसीसुरु झालेपासून म्‍हणजे दि.31/8/2010 ते जनावर अपघाती मयत झालेची तारीख दि.09/09/2010 अखेर कालावधी हा 10 दिवस आहे. सबब पॉलीसीच्‍या प्रोव्‍हीजोव्‍ह अटी व शर्तीप्रमाणे नमुद जनावर 15 दिवसांचे आत मयत झालेमुळे विमा दावा देय नाही असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. प्रस्‍तुत दाखल केलेल्‍या शेडयूलमध्‍ये प्रोव्‍हीजो मध्‍ये अट क्रमांक 3-Diseases contracted prior to or within 15 days from the day of commencement of the risk respect of Non-IRDP animal चा विचार करता प्रस्‍तुत तक्रारदार हे पंडेवाडी तालूका राधानगरी जि.कोल्‍हापूर या तळकोकणासारख्‍या ग्रामीण भागात राहतात व सदर गावी राहत असून पशूपालन केलेले आहे. सदर बाबींचा विचार करता प्रस्‍तुतची अट ही Non-IRDP animal साठी लागू आहे. सबब सदरची अट प्रस्‍तुत प्रकरणी लागू होत नाही. मात्र तक्रारदाराचे नमुद जनावर हे Integrated rural development programme अंतर्गत येते. सदर IRDP अंतर्गत उतरविले जाणारे पशुविमा खाली तक्रारदारचा पशुविमा येतो. यासाठी –The cattle insurance shceme has emerged as a savior over the years for landless, small and marginal farmers and for those whose major occupation is dairying. Cattle insurance has become compulsory under the Integrated Rural Development Programme व सदर योजनेअंतर्गत
*Any illness or accident should be communicated to the company immediately
* The insured, at his own expense, will call a qualified veterinarian in the event of illness or accident to the animal
* The carcass shall be retained for at least 24 hours after a notice of death is given to the insurance company. 
 
            If an animal dies, the cattle owner will have to furnish a copy of the postmortem report and death cerficate jointly signed by the sarpanch of the village, president or officer of the dairy cooperative society (DCS) official of the milk collection centre or government veterinary doctor, and supervisor or inspector of the central cooperative bank.
 
            सदर बाबींचा अवलंब तक्रारदाराने केलेला आहे व त्‍याप्रमाणे तक्रारदाराने सर्व कागदपत्रे सामनेवालांना पाठविलेली होती. याचा विचार करता 15 दिवसांत जनावर मयत झाले असलेतरी ते आजारग्रस्‍त होऊन मयत झालेले नसून चरावयास सोडले असता ओढयाकडील असणा-या दरडीवरुन पाय घसरुन पडून मयत झालेले आहे. सबब वरील विस्‍तृत विवेचन व पुराव्‍याचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा पशुविमा दावा नाकारुन सेवात्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु.10,000/- (रु.दहा हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.06/01/2011 पासून ते      संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.
 
3)  सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार  फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.
 
 
 
                          
             
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT