नि.क्र.16
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
तक्रार अर्ज क्र. 481/2010
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 28/09/2010
तक्रार दाखल तारीख : 29/09/2010
निकाल तारीख : 03/05/2013
-----------------------------------------------
श्री. उध्दव संभाजी सावंत
वय वर्षे – 29, व्यवसाय – काही नाही
रा. बनाळी, ता. जत, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
दि ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी लि.
कृष्णा कॉम्प्ल्ेाक्स, आंबराई रोड,
शिवाजी स्टेडियम समोर, सांगली
ता. मिरज, जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन. शेटे
जाबदारतर्फे : अॅड सौ. एम.एम.दुबे
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराच्या मोटर सायकल अपघात विमा दाव्याची नुकसान भरपाई रक्कम जाबदार यांनी न दिल्याने मंचासमोर दाखल करण्यात आली आहे.
2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशिल पुढीलप्रमाणे-
तक्रारदार दिनांक 31/12/2007 रोजी जत-शेगांव जाणा-या मार्गावार स्वतःच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल क्र. MH-10-AH-97598 ने प्रवास करीत असताना ट्रक बरोबर अपघात होऊन मोटर सायकलचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, यामध्ये तक्रारदारही गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्व आले. सदरच्या अपघाताची गुन्हा रजि. नं. 02/2008 ने गुन्हा दाखल झालेला आहे. सदर मोटर सायकल दिनांक 20/02/2007 रोजी तक्रारदार यांनी खरेदी केली व त्याच दिवशी जाबदार विमा कंपनीकडे सदर वाहनाचे सर्वसमावेशक विमापत्र उतरविलेले असून त्याचा कव्हर नोट नंबर 1338441 असा आहे. दिनांक 31/12/2007 रोजी अपघात घडला त्यावेळी सर्वसमावेशक विमापत्र विधीग्राहय होते, तसेच वाहन चालविण्याचा परवाना होता. जाबदार यांना अ मोटर सायकलच्या अपघाताची माहिती दिल्यावर जाबदार कंपनी विमा प्रतिनिधी यांनी सर्व्हेअरची नेमणूक करून वाहनाच्या नुकसानीची माहिती घेतली. सर्व्हेअरनी सर्व्हेअर रिपोर्ट जाबदारांकडे देऊन मोटर सायकल दुरूस्त करण्याकरिता रक्कम रू. 32,000/- खर्च येणार असल्याचे सूचीत केले. मात्र जाबदार यांचेकडे वारंवार सर्व्हेअर रिपोर्टची मागणी केली असतानाही अदयाप सर्व्हेअर रिपोर्टची प्रत तक्रारदार यांनी देण्यात आलेली नाही. दरम्यानच्या कालावधीत काही कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत पत्रे आली परंतू तक्रारदार 9 ते 10 महिने रूग्णालयात दाखल असल्याने व एक पाय पूर्णपणे काढलेला व दुस-या पायावर 4 ते 5 शस्त्रक्रिया झाल्याने सदर कागदपत्रे वेळेत दाखल करणे शक्य झाले नाही. मात्र त्यानंतर सर्व कागदपत्रे जाबदार यांचेकडे मोटरसायकल दुरूस्ती बिल वैगेरे दाखल केलेली आहेत. जाबदार यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारलेला नाही तर मुदतीत कागदपत्रांची पूर्तता झाली नाही म्हणून विमा दाव्याची फाईल बंद केलेली आहे. सदर अपघात ट्रकच्या वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. उपरोक्त सर्व कारणांमुळे विमा रक्कम रू. 33,000/- 31/12/2007 पासून द.सा.द.शे. 18% व्याजासह, सर्व्हेअर अहवालाची प्रत दिली नाही म्हणून रू. 5,000/-, सदोष सेवेसाठी रू. 5,000/-, वाहनाच्या नुकसानीची रक्कम अदा केली नाही म्हणून दंड रू. 50,000/-, मानसिक ताण दिला म्हणून रू. 40,000/- तक्रारदारास मिळावयाचे आदेश व्हावेत अशा प्रकारची कैफियत मंचासमोर दाखल केली आहे.
3. आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि. क्र. 5 वर एकूण 6 कागदपत्रे पुरावा दाखल केले आहेत.
4. जाबदार क्र. 1 यांनी आपले लेखी म्हणणे नि.क्र. 8 वर सादर केले असून अर्जदार यांचा अर्ज, त्यामधील विधाने जाबदार यांना मान्य व कबूल नाहीत असे म्हटले आहे. मात्र जाबदार यांचेकडे अर्जदार यांचे मोटर सायकलचा विमा उतरविला होता हे मान्य केले आहे. जाबदार यांनी खालील मुददे प्रकर्षाने मांडलेले आहेत -
अ. दि. 31/12/2007 रोजी अपघात होऊन त्याबाबत गुन्हा रजि. नं. 2/08 नोंदविलेचे खरे नाही.
ब. सदर परवाना LMV (NT) असा असलेने कायदयाने मोटर सायकल चालवू शकत नव्हता. दि. 31/12/2007 रोजी सदर परवाना अर्जदार यांचेकडे वाहन चालविणेचा वैध परवाना असलेचे खरे नाही, मागणी करूनही दाखल केलेला नाही.
क. सर्व्हेअर श्री. पुजारी यांनी वाहनाचा सर्व्हे करून दुरूस्तीसाठी रू. 32,000/- खर्च येणार असलेचे सांगितलेले चुकीचे आहे.
ड. दुरूस्तीची मूळ बीले दिलेली नाहीत, 9/10 महिने उपचार घेत होते हे माहित नाही.
इ. दि. 19/02/2008 रोजी कागदपत्रांची पूर्तता करणेस कळविलेले होते.
आपले म्हणणे पुष्ठयर्थ नि.क्र.9 वर कागदपत्रे सादर केली आहे.
तक्रारदार व जाबदार यांचे लेखी म्हणणे कागदपत्रांची पुरावे, न्यायनिवाडे आणि युक्तीवाद ऐकल्यानंतर मंच खालील निर्णयाप्रत आला आहे
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष
1 तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे होय
2 जाबदार यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत
त्रुटी केली आहे नाही
3 अंतिम आदेशकाय ? खालीलप्रमाणे
कारणमिमांसा
मुददा क्र. 1 व 2
5. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे मोटरसायकल विमा उतरविला होता हे नि.क्र. 5/1 सिध्द होते व जाबदार यांनीही ते मान्य केलेले असून तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होते हे निश्चितपणे दिसून येते.
6. तक्रारदार यांच्या वाहन परवान्याचे निरिक्षण केल्यानंतर नि.क्र. 11/11 दिसून येते की सदर वाहन परवाना LMV (NT) स्वरूपाचा होता आणि तक्रारदार हे स्वतः वाहन चालवित होते व त्यांचेकडे वैध परवाना नव्हता. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय अधिक सूचक आहे असे मंचास वाटते.
2008 (2) T.A.C. 801 (S.C.) Supreme Court
Oriental Insurance Co. Ltd.
Versus
Zaharulnisha and other
“Death caused by rash negligent driving of scooter – Driver of scooter holding driving license for driving H.M.V. only and no valid driving license to drive a two wheeler –
Scooterist possessing driving license to drive H.M.V. and was driving totally different class of vehicle which act amounted to violation of Sec. 10 (2) of Motor Vehicle Act.
7. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून सदरच्या विमादाव्यामध्ये जाबदार यांनी विमा दावा योग्य त-हेने फेटाळला असे मंचाचे मत झालेले आहे. त्यामुळे जाबदार यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी निर्माण केलेली नाही अथवा जाबदारांची सेवा सदोष दिसून येत नाही. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत
आदेश
तक्रारदार यांची तक्रार रू. 500/- च्या खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे.
सांगली
दि. 03/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष