Maharashtra

Sangli

cc/10/267

Shri Ramchandra Vishwas Jadhav - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

27 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. cc/10/267
 
1. Shri Ramchandra Vishwas Jadhav
Matkunki, Tal. Tasgaon Dist. Sangli
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co.Ltd.
Mount Road, Extension, Sadar, Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                                                                       नि.१६
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या -श्रीमती सुरेखा बिचकर
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २६७/२०१०
---------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – ३/६/२०१०
तक्रार दाखल तारीखः –   ४/०६/२०१०
निकाल तारीखः      -   २७/०९/२०११
----------------------------------------
 
श्री रामचंद्र विश्‍वास जाधव
वर्षे – ३२, धंदा – शेती व पशुपालन
रा.मु.पो.मतकुणकी, ता.तासगांव जि.सांगली             ...... तक्रारदार
   विरुध्‍द
दि ओरिएंटल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी लि.
विभागीय कार्यालय–१, १५, ए.डी.कॉम्‍प्‍लेक्‍स,
माऊंट रोड, एक्‍स्‍टेंन्‍शन, सदर, नागपूर-४४०००१          ...... जाबदार
 
                      तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री एम.एन.शेटे
                      जाबदार तर्फे : +ìb÷. सौ एम.एम.दुबे                      
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. अध्‍यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
 
१.     तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या पशु विमा दाव्‍याबाबत दाखल केला आहे.
 
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
 
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्‍हणून दुग्‍धव्‍यवसाय करतो व त्‍यासाठी त्‍याने गायी व म्‍हैशी सांभाळल्‍या आहेत. तक्रारदाराने त्‍याच्‍या गायीचा रक्‍कम रु.२०,०००/- इतक्‍या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.७/०३/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्‍याकडून विमा पॉलिसी ही देण्‍यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेली गाय आजारी पडून दि.६/९/२००९ रोजी मयत झाली. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना ताबडतोब दूरध्‍वनीवर कळविले. तक्रारदार याचे गायीचे शासनाचे डॉक्‍टरांनी शवविच्‍छेदन केले. डॉक्‍टरांनी गायीच्‍या कानातील बिल्‍ला काढून तक्रारदारांचे ताब्‍यात दिला. गायीचे मृत शरीर ज्‍या ठिकाणी पुरण्‍यात आले त्‍या ठिकाणचा पंचनामा करण्‍यात आला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला.  अर्जदार यांनी सदरचे विमाप्रस्‍तावाबाबत जाबदार यांचेकडे दि.२५/५/२००९ रोजी भ्रमणध्‍वनीद्वारे चौकशी केली असता जाबदार तुमचा प्रस्‍ताव नाकारलेला आहे व त्‍याबाबतचे पत्र मागेच पाठवून दिलेले आहे असे कळविले. सदरचे पत्र अद्यापही तक्रारदार यांना मिळालेले नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्‍याची रक्‍कम मिळणेसाठी तसेच इतर अन्‍य मागण्‍यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्‍या यादीने १० कागदपञे दाखल केली आहेत.
 
३.    जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.१२ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील विमा पॉलिसीनुसार गाय मयत झालेनंतर गायीच्‍या कानातील बिल्‍ला हा कानाच्‍या तुकडयासह जाबदार कंपनीकडे क्‍लेमफॉर्मसोबत दाखल करणे आवश्‍यक आहे. तक्रारदार यांनी कराराप्रमाणे कानाचा तुकडा पाठविला नाही. त्‍यामुळे पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला आहे. तसेच क्‍लेमफॉर्मसोबत आवश्‍यक ती मूळ कागदपत्रे जाबदार यांचेकडे जमा केलेली नाहीत. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा असे जाबदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१३ ला शपथपत्र दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.१४ ला लेखी युक्‍तीवाद व नि.१५ चे यादीने निवाडे दाखल केले आहेत.
 
४.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार याने याकामी नि.५/९ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये विमा पॉलीसीचा कालावधी ३ वर्षासाठी असल्‍याचे नमूद आहे. तसेच जाबदार यांनीही आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारअर्जामध्‍ये विमा पॉलिसी दि.७/३/२००८ रोजी उतरविल्‍याचे नमूद केले आहे.   तसेच पॉलिसीचे अवलोकन केले असता पॉलिसी ही दि.७/३/२००८ रोजी उतरविली असल्‍याचे दिसून येते. पॉलिसी उतरविलेपासून तीन वर्षाचे आत तक्रारदार यांचे गायीचा मृत्‍यू झालेला आहे. म्‍हणजेच तक्रारदार यांचे गायीचा विमा कालावधीत मृत्‍यू झाला आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. प्रस्‍तुत प्रकरणी विमा नाकारलेचे पत्र दाखल नाही. तक्रारदार यांनी दि.२५/५/२००९ रोजी दूरध्‍वनीवरुन चौकशी केली असता त्‍यांना विमा नाकारलेचे समजून आले असे नमूद केले आहे. वस्‍तुत: तक्रारदार यांची गाय ही दि.६/९/२००९ रोजी मयत झाली आहे. तक्रारदार यांनी दि.२५/५/२००९ रोजी चौकशी केली असे नमूद केले आहे. परंतु सदरची तारीख ही टंकलेखनातील दोषाने नमूद केली असावी असे दिसून येते व सदरची बाब तक्रारअर्जाच्‍या परिच्‍छेद ५ मधून स्‍पष्‍ट होते. त्‍यामध्‍ये दि.२५/५/२०१० रोजी चौकशी केली असे नमूद आहे. जाबदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणणेमध्‍ये सदरची बाब नाकारली आहे. तसेच म्‍हणण्‍याच्‍या परिच्‍छेद ७ मध्‍ये तक्रारदार यांना दि.१५/३/२०१० च्‍या पत्राने कळविले आहे असे नमूद केले आहे. परंतु सदर दि.१५/३/२०१० रोजीचे पत्र जाबदार यांनी याकामी दाखल केलेले नाही. जाबदार यांनी  विमा दावा नाकारल्‍याचे पत्र याकामी त्‍यांना संधी असूनही दाखल केले नाही. त्‍यामुळे जाबदार यांनी विमा कोणत्‍या कारणास्‍तव नाकारला ही कारणे स्‍पष्‍ट होत नाहीत. जाबदार यांनी म्‍हणण्‍यामध्‍ये विमादावा नाकारण्‍याच्‍या कारणांचा उल्‍लेख केला आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला असे नमूद केले आहे. परंतु सदरच्‍या अटी व शर्ती काय आहेत हे दर्शविण्‍यासाठी कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा योग्‍य कारणास्‍तव नाकारला हे जाबदार यांनी पुराव्‍यानिशी शाबीत केले नाही.
 
५.    जाबदार यांनी म्‍हणण्‍यामध्‍ये ओरिजिनल विमा पॉलिसी, शवविच्‍छेदन अहवाल, पोस्‍ट मॉर्टेम पावती, कानाचा बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासह पाठविला नाही, या कारणास्‍तव तक्रारदार यांचे विमा दावा नाकारलेचे नमूद केले आहे. जाबदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये कानाचा बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासह पाठविण्‍याची जबाबदारी ही संबंधीत डॉक्‍टरांची आहे असे नमूद केले आहे. जाबदार यांचे कथन लक्षात घेता तक्रारदार यांना विमा पॉलिसी ही जाबदार यांच्‍या डॉक्‍टरांच्‍या सहीने देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे संबंधीत डॉक्‍टर हे जाबदार यांचे प्रतिनिधी आहेत. त्‍यांनी कानाचा बिल्‍ला तुकडयासह जाबदार यांच्‍याकडे पाठविला नसेल तर त्‍याबाबत तक्रारदार यांना दोष देता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. विमादावा प्रस्‍ताव पाठविताना कोणकोणती कागदपत्रे पाठविणे गरजेचे आहे हे दाखविण्‍यासाठी जाबदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्‍यामुळे जाबदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचा विमादावा नाकारण्‍यासाठी जी कारणे नमूद केली आहेत, ती कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला मृत्‍यूचा दाखला, शवविच्‍छेदन अहवाल इ. कागदपत्रे सादर केली आहेत, त्‍यामुळे  तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्‍यामुळे तक्रारदार हे विमा दाव्‍याची रक्‍कम रु.२०,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.१५/३/२०१० पासून व्‍याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. 
 
५.    तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्‍ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्‍यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
     
      वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
 
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना गायीच्‍या विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रु.२०,०००/-
   (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.१५/३/२०१० पासून द.सा.द.शे. ९
   टक्‍के दराने व्‍याजासह अदा करावेत.
 
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
   तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) अदा
   करावेत.
 
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.१२/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
 
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्‍यास तक्रारदार     
   त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि. २७/०९/२०११
 
                                                           
                  (सुरेखा बिचकर)                          (अनिल य.गोडसे÷)
                      सदस्‍या                                   अध्‍यक्ष
                       जिल्‍हा मंच, सांगली.                जिल्‍हा मंच, सांगली.          
 
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११.
     जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११.
                            
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.