Maharashtra

Sangli

CC/10/465

Pravin Dashrath Khot - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd., - Opp.Party(s)

10 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/465
 
1. Pravin Dashrath Khot
Haripur, Tal.Miraj, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co.Ltd.,
Mount Road, Extension Sadar, Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                            नि. १६
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
                    
ग्राहक तक्रार अर्ज क्र.४६५/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    १४/९/२०१०
तक्रार दाखल तारीख   १५/९/२०१०
निकाल तारीख       १०/१०/२०११
--------------------------------------------------------------
 
श्री प्रविण दशरथ खोत
वय वर्षे २८,, धंदा शेती व पशुपालन
मु.पो. हरिपूर ता.मिरज जि. सांगली                             ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
विभागीय कार्यालय-१, १५ ए.डी.कॉम्‍प्‍लेक्‍स,
माऊंट रोड, एक्‍स्‍टेन्‍शन, सदर, नागपूर-४४०००१       .....जाबदारúö
                              
                                         तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.एन.शेटे
      जाबदार तर्फे     : +ìb÷. श्री एम.एम.दुबे
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. अध्‍यक्ष, श्री.अनिल य.गोडसे
 
१.     तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या पशु विमा दाव्‍याबाबत दाखल केला आहे.
 
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्‍हणून दुग्‍धव्‍यवसाय करतो व त्‍यासाठी त्‍याने मु-हा जातीची म्‍हैस घेतली होती. तक्रारदाराने त्‍याच्‍या म्‍हैशीचा रक्‍कम रु.३०,०००/- इतक्‍या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.३१/०३/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्‍याकडून विमा पॉलिसी ही देण्‍यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेली म्‍हैस दि.२०/८/२००८ रोजी मयत झाली. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना ताबडतोब दूरध्‍वनीवर कळविले. शासनाचे डॉक्‍टरांनी म्‍हैशीचे शवविच्‍छेदन केले. डॉक्‍टरांनी म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ला काढून त्‍यांचे ताब्‍यात घेतला. म्‍हैशीचे मृत शरीर ज्‍या ठिकाणी पुरण्‍यात आले त्‍या ठिकाणचा पंचनामा करण्‍यात आला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला. जाबदार यांनी तक्रारदार यांच्‍या विमा दाव्‍याबाबत निर्णय घेताना खोटी व चुकीची कारणे देऊन दि.३०/०८/२००९ च्‍या पत्राने विमा दावा नाकारल्‍याबाबत कळविले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्‍याची रक्‍कम मिळणेसाठी तसेच इतर अन्‍य मागण्‍यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्‍या यादीने ६ कागदपञे दाखल केली आहेत.
 
३.    जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.११ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. तसेच क्‍लेमफॉर्मसोबत आवश्‍यक ती मूळ कागदपत्रे जाबदार यांचेकडे जमा केलेली नाहीत. तसेच म्‍हैशीच्‍या कानाच्‍या तुकडयासह कानातील बिल्‍ला या जाबदार यांचेकडे जमा केला नाही त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला आहे त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा असे जाबदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी नि.१४ ला लेखी युक्‍तीवाद व नि.१५ चे यादीने काही कागद दाखल केले आहेत.
 
४.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार याने याकामी नि.५/१ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये विमा पॉलीसी दि.३१/३/२००८ रोजी उतरविल्‍याचे दिसून येते. जाबदार यांनीही आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. तक्रारदार यांची म्‍हैस दि.२०/८/२००८ रोजी पॉलिसी उतरविलेपासून एक वर्षाचे आत मयत झाली आहे. म्‍हणजेच तक्रारदार यांचे म्‍हैशीचा विमा कालावधीत मृत्‍यू झाला आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्‍याचे पञ तक्रारदार यांनी नि.५/५ वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये विमा दावा नाकारताना ओरिजिनल विमा पॉलिसी, कानाचा बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासह पाठविला नाही, या कारणास्‍तव तक्रारदार यांचा विमा दावा नाकारलेचे नमूद केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असलेल्‍या करारपत्राची प्रत पाहता वैद्यकीय अधिका-यांची जबाबदारी दिली आहे.  सदर वैद्यकीय अधिका-यांनी कानाचा बिल्‍ला कानाच्‍या तुकडयासह पाठविण्‍याचा आहे.  तक्रारदार यांना देण्‍यात आलेल्‍या विमा पॉलिसीवर जाबदार यांच्‍या डॉक्‍टरांची सही आहे. त्‍यामुळे संबंधीत डॉक्‍टर हे जाबदार यांचे प्रतिनिधी आहेत. त्‍यांनी कानाचा बिल्‍ला तुकडयासह जाबदार यांच्‍याकडे पाठविला नसेल तर त्‍याबाबत तक्रारदार यांना दोष देता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. ओरिजिनल विमा कव्‍हर नोट नाही हे विमादावा नाकारण्‍याचे दुसरे कारण जाबदार यांनी नमूद केले आहे. परंतु जाबदार यांनी विम्‍याबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. त्‍यामुळे केवळ त्‍या एका कारणास्‍तव विमादावा नाकारता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.    तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्‍ये परिच्‍छेद ४ मध्‍ये जाबदार यांचेकडे कागदपत्रे पाठविल्‍याचा उल्‍लेख केला आहे. सदरची कागदपत्रे जाबदार यांना मिळाली नाहीत असे जाबदार यांचे कथन नाही तसेच विमादावा नाकारण्‍याच्‍या पत्रामध्‍ये त्‍याबाबतचा ऊहापोह नाही त्‍यामुळे जाबदार यांना सर्व कागदपत्रे मिळाली आहेत ही बाब प्रामुख्‍याने स्‍पष्‍ट होते. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा ज्‍या कारणासाठी नाकारला, ती कारणे संयुक्तिक वाटत नाहीत त्‍यामुळे  तक्रारदार यांचा विमा दावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्‍यामुळे तक्रारदार हे विमा दाव्‍याची रक्‍कम रु.३०,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.३०/८/२००९ पासून व्‍याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. 
 
५.    तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्‍ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्‍यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
      वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
 
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना म्‍हैशीच्‍या विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रु.३०,०००/-
   ( अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त ) दि.३०/८/२००९ पासून द.सा.द.शे. ९
   टक्‍के दराने व्‍याजासह अदा करावेत.
 
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
   तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) अदा
   करावेत.
 
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.२५/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
 
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्‍यास तक्रारदार     
   त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि. १०/१०/२०११
                  (गीता घाटगे)                   (अनिल य.गोडसे÷)
                      सदस्‍या                                   अध्‍यक्ष
                       जिल्‍हा मंच, सांगली.                जिल्‍हा मंच, सांगली.          
 
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११.
     जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.