Maharashtra

Kolhapur

CC/11/379

Pandit Tukaram Shetke - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Shital Potdar

10 Oct 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/379
1. Pandit Tukaram ShetkeTarsambale,Tal.Radhanagari,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co.Ltd.Local Branch Manager,Kanchanga,204 E Station road,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital Potdar, Advocate for Complainant
Sau. Chhaya Jadhav, Advocate for Opp.Party

Dated : 10 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 नि का ल प त्र :- (दि.10/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

  (1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.

 (2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांच्‍या गायीचा विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविलेला आहे. सदर गायीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्रमांक ओआयसी/161600/21063 असा आहे. तक्रारदारांची सदरची गाय दि. 13/02/2010 रोजी आजारी पडून मयत झाली. सामनेवाला कंपनीकडे त्‍यानंतर क्‍लेमची रक्‍कम रु. 10,000/- ची मागणी केली असता ऑगस्‍ट- 2010 मध्‍ये सामनेवाला यांनी मृत्‍यूसमयी गायीच्‍या कानातील बिल्‍ला तुटलेला होता  असे चुकीचे उत्‍तर देवून तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे. 
 
     तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे सांगतात सदर विमाधारक गायीच्‍या कानात विमा उतरविल्‍यापासून ते मृत्‍यपर्यंत सामनेवाला विमा कंपनीने टॅगींग केलेला बिल्‍ला होता. व त्‍यासंदर्भातील आवश्‍यक सर्व कागदपत्रांसह क्‍लेम फॉर्मसोबत जोडलेली आहेत. तक्रारदारांचा क्‍लेम खोटया कारणास्‍तव न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे. सबब, विमा क्‍लेम रक्‍कम रु. 10,000/- दि. 13/05/2010 पासून द.सा.द. शे. 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.    
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार  यांनी कॅटल इन्‍शुरन्‍स क्‍लेम फॉर्म, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, व्‍हेटरीनरी सर्टीफीकेट व पंचनामा इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र  दाखल केलेले आहे. 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार चुकीची आहे. तक्रारदारांना तक्रार करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. गायीच्‍या कानातील बिल्‍ला तुटलेला आहे. तसेच गायीच्‍या क्‍लेमफॉर्ममध्‍ये गायीच्‍या मृत्‍यूची तारीख 13/02/2010 ही नमूद केलेली आहे आणि दूध संस्‍थेनी दिलेल्‍या पत्रामध्‍ये गायीच्‍या मृत्‍यूची तारीख 20/02/2010 अशी नमूद आहे. म्‍हणून गायीचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे.    सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.  
 
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकला व   व उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे.   तक्रारदारांनी सामनेवाला कंपनीकडे क्‍लेम फॉर्म भरुन दिला त्‍याची झेरॉक्‍स प्रत आहे. तसेच पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट व व्‍हेर्टनरी सर्टीफीकेट व पंचनामा इत्‍यादी युक्‍तीवादाच्‍यावेळी या मंचाचे निदर्शनास आणून दिलेला आहे. सदर कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि. 13/02/2010 रोजी विमाधारक गायीचा मृत्‍यू झाला असल्‍याचे दिसून येते. व तसेच सदरचा पंचनामा सरपंच, सेवा सोसायटी चेअरमन, दुध संस्‍था चेअरमन, डे. सरपंच, व सेक्रेटरी यांनी केलेला आहे. तसेच सदर मयत गायीचे पोस्‍टमार्टेम सर्टीफीकेटचेही अवलोकन केले असता त्‍यावरही मयत गायीच्‍या कानात बिल्‍ला क्र. ओआयसी/161600/21063 असलेचे नमूद केले आहे. सामनेवाला विमा कंपनीने दाखल केलेल्‍या scrutiny फॉर्मसचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये बिल्‍ला तुटलेला आहे असे नमूद केलेले आहे. परंतु सामनेवाला कंपनीने विमा असलेली गाय मयत झालेली आहे याबाबत कोणतेही इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केलेले नाही व तसा अहवाल दाखल केलेला नाही. कोणत्‍याही इन्‍व्‍हेस्‍टीगेशनशिवाय निष्‍कर्ष काढून क्‍लेम नाकारला आहे ही सामनेवाला विमा कंपनीची सेवा त्रुटी आहे. वस्‍तुस्थितीचा विचार करता अत्‍यंत तांत्रिकपणे तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे ही बाब विचारात घेता तक्रारदार हे विमा क्‍लेम रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश    
                    
                            - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 13/05/2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT