नि. २५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २३५७/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३१/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : २/१/२०१०
निकाल तारीख : ३०/११/२०११
----------------------------------------------------------------
किरण मनोहर बोंगाळे
वय ५३ वर्षे, व्यवसाय – पेन्शनर,
रा.८५१/ए, खाणभाग, देशपांडे +ìटो सर्व्हिसेस,
सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
दी ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
तर्फे रिजनल मॅनेजर
डिव्हीजनल ऑफिस, पहिला मजला,
कृष्णा कॉम्प्लेक्स, आमराई रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.कु. वैशाली पवार,+ìb÷.वैभव कदम
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री के.ए.मुरचिटे
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वैद्यकीय विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा जाबदार विमा कंपनीतून सेवानिवृत्त झाला असून तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली आहे. तक्रारदार हा दि.९/३/२००९ रोजी सायं.६.३० चे सुमारास अचानक आजारी पडल्यामुळे तक्रारदार यांस त्याचे मुलाने नागवेणू क्लिनिक येथे घेवून गेला. तेथे डॉक्टर यांनी तक्रारदार यांस +ìडमिट करावे लागेल असे सांगितल्याने तक्रारदार यास +ìडमिट करण्यात आले. तक्रारदार हा सदर हॉस्पीटलमध्ये दि.९/३/०९ ते १८/३/०९ या कालावधीमध्ये +ìडमिट होता. सदर कालावधीमध्ये तक्रारदार याच्या विविध तपासण्या करुन वैद्यकीय उपचार करण्यात आले. सदर वैद्यकीय उपचाराबाबतचा विमादावा जाबदार यांनी दि.२४/४/२००९ रोजीच्या पत्राने नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज विमादाव्याची रक्कम मिळणेसाठी तसेच इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी हजर होवून नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी वैद्यकीय उपचार घेतले ही बाब नाकारली आहे. तक्रारदार हा जाबदार विमा कंपनीमध्ये अनेक वर्षे नोकरीस होता तसेच तक्रारदार यांचा मुलगा हा जाबदार विमा कंपनीचा एजंट आहे त्यामुळे जाबदार विमा कंपनीमधील कामकाजाची दोघांना माहिती असल्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा बनावट क्लेम दाखल केला आहे. यापूर्वीही तक्रारदार यांनी स्वत:करिता व त्याच्या पत्नीकरिता विमादावा दाखल करुन रक्कम मिळविली आहे. तक्रारदार याने ज्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली असे नमूद केले आहे, सदरचे हॉस्पीटल पंजाब बॅंक व सांगली बॅंक यांनी सिल केले असल्याचे आढळून आले. सदर दवाखान्यातील डॉक्टर डॉ गुरव हे सदर इमारतीमधील तळमजल्यामध्ये प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आले परंतु सदर दवाखान्यामध्ये पेशंट +ìडमिट करण्याची कोणतीही सुविधा दिसून आली नाही. तक्रारदार यांनी दि.१२/३/२००९ रोजी स्वत: जाबदार यांच्या कार्यालयात येवून आजाराची माहिती दिली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली वैद्यकीय बिले व त्यामध्ये आकारलेली रक्कम ही चुकीची नमूद आहे. तक्रारदार यांचेवर दाखविलेला वैद्यकीय उपचारही चुकीचा दर्शविला आहे. डॉ गुरव यांच्या दवाखान्यात पेशंट +ìडमिट करण्याची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे त्याबाबत नमूद केलेला मजकूर चुकीचा आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा योग्य कारणास्तव नाकारला आहे. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१३ ला प्रतिज्ञापत्र व नि.१४ च्या यादीने १७ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१६ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तसेच नि.१७ ला प्रतिउत्तराचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.१८ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.१९ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२३ च्या यादीने काही निवाडे दाखल केले आहेत.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यांचे अवलोकन केले. जाबदार यांच्या विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. तक्रारदार यांचे विधिज्ञ वैभव कदम यांनी लेखी युक्तिवादाप्रमाणेच तोंडी युक्तिवाद असल्याचे नमूद केले. तक्रारदार व जाबदार यांनी याकामी विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामुळे विमा पॉलिसीमधील अटी व शर्ती व त्याचा कालावधी याबाबत कोणतीच बाब मंचासमोर स्पष्ट होत नाही. तथापी पॉलिसीबाबतचा मजकूर जाबदार यांनी नाकारला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून वैद्यकीय विमा दावा घेतला होता एवढी एकच गोष्ट स्पष्ट होते. तक्रारदार यांचा विमा दावा बोगस असल्याचे कारणावरुन जाबदार यांनी नाकारला आहे. विमा दावा बोगस असल्याचा सिध्द करण्याची जबाबदारी निश्चितच जाबदार यांचेवर आहे. त्याबाबत जाबदार यांचे विधिज्ञांनी काही गोष्टींकडे मंचाचे लक्ष वेधले. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये ते डॉ.गुरव यांच्या नागवेणू हॉस्पीटलमध्ये दि.०९/०३/२००९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता उपचारासाठी गेले व तेथे त्यांना ऍडमिट करण्यात आले असे नमूद केले आहे. तक्रारदार यांना काही तपासण्या करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे रक्त व लघवीचा नमुना आंबेडकर रोड, सांगली येथील लॅबमध्ये घेतला गेला व सदरचा नमुना हा मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला असे नमूद केले आहे. प्रस्तुत प्रकरणी थायरोकेअर लॅबोरेटरीचा रिपोर्ट तक्रारदार यांनी नि.५ च्या यादीसोबत दाखल केला आहे. सदर रिपोर्टबाबत फेरीस्तमध्ये सदर रिपोर्टचा उल्लेख नसल्याने त्याबाबत खुलासा होण्यासाठी प्रकरण ठेवण्यात यावे असा आदेश नि.१ वर करण्यात आला. तक्रारदार यांचे विधिज्ञांना त्याबाबत विचारणा केली असता तक्रारदार यांनी थायरोकेअर लॅबोरेटरीचे रिपोर्ट आपण दाखल केले असल्याचे नमूद केले. परंतु त्याबाबत फेरीस्तमध्ये उल्लेख करण्यात आला नसल्याचेही नमूद केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी त्याबाबत नि.२४ वर पुरसिस दाखल केली. सदर थायरोकेअरच्या रिपोर्टचे अवलोकन केले असता सदर रिपोर्टवर सॅम्पल कलेक्ट केल्याची तारीख ९ मार्च २००९ रोजी सकाळी ९.०० वाजताची आहे. तक्रारदार यांना ९ मार्च २००९ रोजी सायंकाळी ६.३० वा. उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना तक्रारदार यांचे सॅम्पल सकाळी ९.०० वा. कसे घेण्यात आले हा प्रश्न उपस्थित होतो. तक्रारदार हे नागवेणु हॉस्पीटलमध्ये १० दिवस वैद्यकीय उपचार घेत होते. त्याबाबतचे बिल तक्रारदार यांनी नि.५/२ वर दाखल केले आहे. सदर बिलाचे अवलोकन केले असता तक्रारदार यास १० दिवस मॉनिटर व ऑक्सिजन दिल्याबाबतचे चार्जेस आकारले आहेत. यावरुन तक्रारदार हा १० दिवस ऑक्सीजन व मॉनिटरवर असताना दि.१२/३/२००९ चे पत्र देण्यासाठी जाबदार यांचे कार्यालयात कसा गेला हाही प्रश्न उपस्थित होतो. तक्रारदार याने त्याबाबत आपल्या तक्रारअर्जात खुलासा करताना सदरचे पत्र देणेसाठी दि.१७/३/२००९ रोजी डॉक्टरांचे परवानगीने स्वत:च्या जबाबदारीने गेलो होतो असे नमूद केले व त्यासाठी नि.५/९ वरील कागद दाखल केला आहे. त्यामध्ये तक्रारदार हा दि.१७/३/०९ रोजी दु.३.३० वा. स्वत:चे जबाबदारीवर बाहेर एक तास जात आहे असे नमूद असून दु.४.५५ वा. हॉस्पीटलमध्ये हजर असल्याचे नमूद आहे. तक्रारदार यांच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांचे तक्रारदार यांनी याकामी नि.१७ वर शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्राचे अवलोकन केले असता सदर शपथपत्रामध्ये डॉक्टरांनी तक्रारदार यांना दि.१७/३/२००९ रोजी एक तास बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली होती असे कोठेही नमूद नाही. तक्रारदार हा १० दिवस ऑक्सिजन व मॉनिटरवर असताना केवळ एक पत्र देण्यासाठी जाबदार यांच्या कार्यालयात जाईल का ? याबाबत साशंकता वाटते. जाबदार यांनी उपस्थित केलेल्या या युक्तिवादामध्ये तथ्य आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांच्या तक्रारअर्जातून व दाखल लेखी युक्तिवादातून सदर बाबींवर कोणताही संयुक्तिक खुलासा मंचासमोर आलेला नाही. वरील सर्व बाबी तक्रारदार आजारी होता अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण करतात त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा योग्य कारणाने नाकारला असल्याने तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ३०/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११