(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 16.08.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केला असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार ही खास चेक बोरगांव येथील रहिवासी असून तिचे पती देवीदास मडावी हे शेतकरी होते व शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेचे ते लाभधारक शेतकरी होते व त्यांना रुपये 1,00,000/- करीता विमाकृत करण्यात आले होते. गैरअर्जदार क्र.1 ही भारतातील एक राष्ट्रीयकृत विमा कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.2 ही गैरअर्जदार क्र.1 ला विमा दावे, तसेच संबंधीत केसेस हाताळून देणारी अधिकृत कंपनी असून याकरीता गैरअर्जदार क्र.2 ला गैरअर्जदार क्र.1 व शासनाकडून मोबदला मिळतो. गैरअर्जदार क्र.3 ही शासनाचे अधिकारी असून महाराष्ट्र शासनाने चालविलेली योजना पूर्ण करण्याचे काम आहे.
2. अर्जदाराचे पती देवीदास हे दि.13.6.2008 रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शेतातील कचरा उचल करीत असतांना, त्यांना विषारी साप चावला. यामुळे, त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान देविदासचा दि.13.6.2008 रोजी राञी 10-00 वाजता मृत्यु झाला. अर्जदाराने, आवश्यक ती सर्व दस्ताऐवज गोळा करुन क्लेम फार्मसह दि.1.12.08 ला गैरअर्जदार क्र.3 चे मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे पाठविली. अर्जदारास, गैरअर्जदार क्र.1 ने दि.12.11.09 चे पञान्वये मय्यत देविदास यांचा पॉलिसी क्र.181200/48/2008/91 चा क्लेम क्र.181200/48/2010/2617 हा क्लेम फार्म गैरअर्जदार क्र.2 चे मार्फत पाठविला नाही आणि क्लेम पेपर्स तारखेच्या नंतर प्राप्त झाले या कारणावरुन रद्द करण्यात आला आहे, असे कळविले. त्यानंतर, अर्जदाराने, अधि.किरण पाल यांच्या मार्फत दि.2.12.10 ला गैरअर्जदरांना नोटीस पाठवून विमा क्लेम देण्याची विनंती केली. 3. गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदारास दि.18.1.2011 च्या पञान्वये कळविले की, सदर शेतकरी वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मरण पावला, त्यामुळे पुन्हा तिन महिने सवलतीने सादर करण्याची मुभा होती. अर्जदाराने, मुदतीच्या आंत गैरअर्जदार क्र.3 कडे क्लेम फार्म जमा केला होता, तसेच केवळ गैरअर्जदार क्र.2 कडे क्लेम फार्म जमा करणे बंधनकारक नव्हते. गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीने दि.12.11.2009 च्या पञाव्दारे अर्जदाराचा विमा क्लेम नाकारल्यामुळे व सदर पॉलिसी ही नागपूर कार्यालयाने काढली असली तरी गैरअर्जदार क्र.1 चे चंद्रपूर येथे कार्यालय आहे, यामुळे या कोर्टास वाद चालविण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे, गैरअर्जदारांनी, अर्जदारास दिलेली सेवा न्युनतापूर्ण व अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यांत यावी. गैरअर्जदाराने मय्यत देवीदासचे अपघाती मृत्युचे नुकसान भरपाई दाखल रुपये 1,00,000/- दि.1.12.08 पासून 18 टक्के दाराने व्याजासह देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा. अर्जदारास नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व केसचा खर्च रुपये 5000/- देण्याचा आदेश गैरअर्जदाराविरुध्द पारीत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 13 दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने हजर होऊन नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 यास नोटीस तामील होऊन सुध्दा हजर झाला नाही. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 विरुध्द एकतर्फा आदेश नि.क्र.1 वर दि.8.7.2011 ला पारीत करण्यात आला. 5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरातील बहुतांश कथन नाकबूल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हिला दि.12.11.2009 च्या पञान्वये तिचा क्लेम नाकारण्यात आला व त्याची संपूर्ण कारणे कळविलेली आहे. अर्जदार हिने आपला क्लेम कबाल इन्शुरन्स ब्रोकींग म्हणजेच गैरअर्जदार क्र.2 मार्फत पाठविलेला नाही. अर्जदार हिचे कागदपञ मुदतीच्या नंतर प्राप्त झाल्यामुळे क्लेम स्पष्टपणे नाकारला होता. ही बाब, अर्जदारास माहित असून सुध्दा खोट्या आशयाची तक्रार दाखल केली. मय्यत देवीदास मडावी याचा मृत्यु दि.13.6.2008 ला झाला असे अर्जदार हिने नमूद केलेले आहे व ही तक्रार दि.21.3.11 ला म्हणजे मुदतबाह्य दाखल केलेली आहे, या कारणावरुन सुध्दा अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञावरुन स्पष्ट होत नाही की, मय्यत देवीदास मडावी याचा मृत्यु हा सर्पदंशानेच झाला, याबाबत सक्षम अधिका-यांनी म्हणजे डॉक्टर, ग्रामपंचायत अधिकारी, राजस्व अधिकारी यांनी कोणतेही प्रमाणपञ न दिल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदार हिच्याकडे असलेली जमीन ही कागदपञानुसार भुमीस्वामी स्वरुपाची नसून ती भूमीधारी स्वरुपाची असल्यामुळे तिला नुकसान भरपाई मिळू शकत नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सुध्दा मय्यत देवीदासच्या मृत्युबाबत स्पष्ट अभिप्राय नाही व वैद्यकीय अधिका-यांनी निश्चित अभिप्राय दिलेला नाही. अर्जदाराची तक्रार खारीज करुन त्यावर खर्च रुपये 5000/- अर्जदारावर लादण्यात यावा, असे नमूद केले आहे. 6. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.2 ला तक्रारीतून निर्दोष मुक्त करावे. अर्जदार हा विमा कंपनीचा ग्राहक होऊ शकतो ज्यांनी अपघात विम्याची जोखीम राज्य शासनाकडून विमा प्रिमिअम घेवून स्विकारली आहे. गैरअर्जदार क्र.2 हे केवळ सल्लागार आहेत व राज्य शासनास विना मोबदला साह्य करतो. कबाल इन्शुरन्स बोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. ही बिमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतो, यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज कृषि अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमंच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे का ? सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहेत कां ? नसल्यास तालुका कृषिधिकारी, तहसीलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. यासाठी, आंम्ही राज्य शासन व शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही कृपया याची नोंद घ्यावी. तसेच, यासाठी कोणताही विमा पिमीअम घेतलेला नाही. मय्यत देवीदास पांडूरंग मडावी, गांव – चेक बोरगांव, तालुका – गोंडपिपरी, जिल्हा – चंद्रपूर सदरील अपघात हा दि.13.6.2008 रोजी झाला व सदर प्रस्ताव हा अर्जदाराने आमच्या कार्यालयास न पाठविता परस्पर विमा कंपनीकडे पाठविला आहे व विमा कंपनीने अर्जदाराचा दावा नामंजूर केला असून, तसे अर्जदारास कळविले आहे. गैरअज्रदारास कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रुपये 5000/- आंम्हास देण्याची आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे. 7. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार शपथपञ दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखी उत्तर हाच पुरावा/रिजाईन्डर समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्र.16 नुसार दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, पुरावा/शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 8. अर्जदाराने दाखल केलेला शेतकरी अपघात विमा दावा, गैरअर्जदार क्र.1 ने हे म्हणून खारीज केले आहे की, अर्जदाराने सदर दावा मुदतीनंतर दाखल केला व तोही गैरअर्जदार क्र.2 मार्फत न पाठविता सरळ आम्हांला म्हणजे गैरअर्जदार क्र.1 ला पाठविले आहे. दस्तावेज क्र.अ-11 नुसार. 9. अर्जदाराने दाखल केलेले गैरअर्जदार क्र.1 चे दस्तावेज निशाणी क्र.अ-11 नुसार हे स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदाराचा विमा दावा मुदतीत दाखल न केल्यामुळे खारीज केलेला आहे. परंतु, जेंव्हा, अर्जदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या लेखी बयानात व युक्तीवादात असे म्हटले आहे की, अर्जदार बाईचे पती देवीदास मडावी यांचा मृत्यु साप चावल्यामुळे झाला असल्याने, अर्जदार बाईने सांप चावल्यामुळे मृत्यु झाल्याचे प्रमाणपञ व विसेरा रिपोर्ट दाखल केलेला नसल्यामुळे, सदर दावा खारीज करण्यांत आलेला आहे. 10. गैरअर्जदार क्र.1 ने, जर हीच सुचना अर्जदारास नि.क्र.अ-11 च्या दस्तावेजामध्ये सुचवीली असती तर अर्जदार बाईस पतीचा साप चावल्यामुळे मृत्यु झाल्याचे प्रमाणपञ, विसेरा रिपोर्ट दाखल करता आले असते. तसेही, विसेरा रिपोर्ट घेणे हे अर्जदार बाईचे कार्य नाही, ते कार्य पोलीसां मार्फत होणार आहे व त्यासाठी अर्जदार बाईस जबाबदार धरता येत नाही. 11. अर्जदाराने दाखल केलेला गैरअर्जदार क्र.3 चे पञ नि.क्र.अ-13 नुसार गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराचे विमा दावा प्रस्ताव पञ क्र.1185, दि.30.12.2008 ला गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविले असून व गैरअर्जदार क्र.1 कडून ञुटी पुर्ततेकरीता आलेल्या पञावरुन अर्जदाराने केलेली ञुटी पुर्तता बाबत गैरअर्जदार क्र.3 ने गैरअर्जदार क्र.1 ला पञ देवून पञ क्र.703/31/12/2009 ञुटी पुर्तता, अर्जदाराने केलेली आहे, तरी सदर विमा दावा प्रस्ताव मंजुर करण्याबाबत कळविले असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे की, अर्जदाराने ञुटी पूर्ण दस्तावेज गैरअर्जदार क्र.2 मार्फत न पाठविता सरळ आम्हांला पाठवीले, ग्राह्य धरता येत नाही, तसेच गैरअर्जदार क्र.3 ने, अर्जदारास कुठलीही न्युनता पूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 च्या विरुध्द तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 12. एकंदरीत, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचे विमा दावा नाकारुन सेवेत न्युनता केली असून, अनुचीत व्यापार पध्दती अवलंबलेली आहे. कारण, अर्जदाराचे विमा दावा दाखल केल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने शासन निर्णयामध्ये संबंधीतांचे कर्तव्य आणि जबाबदा-या या अटी अंतर्गत (इ) विमा कंपनीच्या कर्तव्य जबाबदारी मध्ये 1, 2 व 3 नुसार प्रस्ताव दोन महिन्यात निकाली काढला नाही व दोन महिन्यानंतर म्हणजे विमा दावा दाखल दि.10.12.08 नंतर दोन महिन्याचे आंत उचित कार्यवाही करायला पाहिजे होती. परंतु, दोन महिन्याचा ऐवजी गैरअर्जदार क्र.1 ने 19.9.09 म्हणजे तब्बल 9 (नऊ) महिन्यानंतर ञुटी पूर्ण करण्यासाठी पञ दिला, यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास न्युनता पूर्ण सेवा दिली आहे. 13. गैरअर्जदार क्र.1 ने साप चावल्यामुळे मृत्यु झाल्यामुळे विसेरा रिपोर्ट दाखल करा असे कुठेही पञ अर्जदारास किंवा गैरअर्जदार क्र.2 व 3 ला दिले नसल्यामुळे व त्याबाबत, पुरावा देण्याची संधी अर्जदारास न दिल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 चे या कारणांवरुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची मागणी गृहीत धरता येणार नाही, तसेच गैरअर्जदार क्र.1 चे हे ही म्हणणे गृहीत धरता येत नाही की, अर्जदार बाईचे पती हे ह्दयविकाराने मृत्यु झाला असावा, कारण ह्दयविकाराचा धक्का कदाचीत साप चावल्याचे बघून घाबरल्याने ही येऊ शकतो, तसे डॉक्टरांचा अहवालात सुध्दा नमूद आहे. तसेच, अर्जदार बाईचे पती हे दि.13.6.2008 ला संध्याकाळी साप चावल्यामुळे दवाखान्यात भरती झाले व त्याचदिवशी राञी 10.00 वाजता मृत्यु झाला, हे ही पोलीस पंचनामा, डॉक्टर अहवाला मध्ये नमूद असल्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 चे या कारणासाठी ही (डिफेन्स) बचाव गृहीत धरता येत नाही. 14. अर्जदार बाईने विमा दावा मुदतीनंतर दाखल केला म्हणून खारीज करा, हे गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे संयुक्तीक नाही. कारण, शासनानी ही योजना शेतक-यांसाठी काढली असून, याबाबत सर्वच शेतक-यांना माहिती आहे, हे म्हणता येत नाही. तसेच, शेतक-याचे मृत्युनंतर त्यांच्या वारसानांना या याजनेबाबत जेंव्हा व जशी माहिती मिळते, तेंव्हा असे दावे हे मुदतीत किंवा मुदतीनंतर असे विमा दावे दाखल करण्याचे अवलंबून असल्यामुळे, फक्त मुदतीबाह्य विमा दावा दाखल केल्यासाठी शेतक-याच्या वारसानांना जबाबदार धरुन विमा दावा खारीज करणे, संयुक्तीक नाही. वरील विवेचनावरुन गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होत असल्यामुळे, हे न्यायमंच खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर. (2) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास शेतकरी अपघात विमाची रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 ने दावा नाकारल्याचे पञाची तारीख म्हणजे 12.11.2009 पासून 9 % व्याजाने पदरी पडेपर्यंत द्यावे. (3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास शारिरीक, मानसिक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (4) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यांत यावी.
| | [HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT | |