जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 03/02/2011. तक्रार आदेश दिनांक :20/04/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 34/2011. श्री. पांडुरंग निवृत्ती काटकर, वय 48 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. वाकी (शिवणे), ता. सांगोला, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 35/2011. श्री. नारायण निवृत्ती काटकर, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती, मु.पो. वाकी (शिवणे), ता. सांगोला, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1, ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.)
2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 442, पश्चिम मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्ली, सोलापूर. (समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.एन. देशपांडे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत दोन्ही तक्रारींचे स्वरुप, विषय, विरुध्द पक्ष व त्यांचे म्हणणे इ. मध्ये साम्य असल्यामुळे त्यांचा निर्णय एकत्रितरित्या देण्यात येत आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारींमध्ये उपस्थित करण्यात आला विवाद थोडक्यात असा आहे की, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांनी केंद्र शासन पुरस्कृत पशुधन विमा योजना सन 2007-08 राबविली आहे. सदर योजनेंतर्गत विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपामध्ये 'विमा कंपनी') यांच्याकडे तक्रारदार यांच्या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आलेला असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्रमांक | विमा पॉलिसी क्रमांक | टॅग क्रमांक | विमा रक्कम (रुपयामध्ये) | जनावराचा मृत्यू दिनांक | 34/2011 | एस.ओ.एल.पी. 105246 | ओ.आय.सी.181100/ एस.ओ.एल.पी. 105246 | 50,000/- | 17/6/2009 | 35/2011 | एस.ओ.एल.पी. 105249 | ओ.आय.सी.181100/ एस.ओ.एल.पी. 105249 | 50,000/- | 26/9/2009 |
3. तक्रारदार यांची गाय अचानक आजारी पडली आणि उपचारादरम्यान वरीलप्रमाणे नमूद तारखेस त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात येऊन विहीत नमुन्यामध्ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. क्लेम सादर केल्यानंतर पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्यांना क्लेमबाबत काहीच न कळविता क्लेम प्रलंबीत ठेवला आणि त्यानंतर क्लेम नाकारण्यात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारी दाखल करुन विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विमा कंपनीस मंचाची नोटीस बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर राहिले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विमा कंपनीने तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने कोणतेही कारण नसताना त्यांचा क्लेम प्रलंबीत ठेवून तो नाकारल्यामुळे त्यांनी प्रस्तुत तक्रारी मंचासमोर दाखल केलेल्या आहेत. 5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विमा पॉलिसी, विमा दावा प्रपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्हॅल्युऐशन रिपोर्ट, कॅटल डेथ सर्टिफिकेट, ट्रीटमेंट सर्टिफिकेट, पंचनामा, दूध संस्थेचा दाखला, ग्रामपंचायत दाखला, खरेदी पावती, रु.50/- ची पी.एम. पावती, फोटो, औषधाचे बिले इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे. सदर कागदपत्रांचे सुक्ष्मपणे अवलोकन करता, विमा पॉलिसीमध्ये नमूद असणा-या टॅग क्रमांकाची गाय मृत्यू पावल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. 6. रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे निदर्शनास येते. पशुधन विमा योजनेंतर्गत जनावंराची दुर्घटना, मृत्यू व अन्य अप्रत्यक्ष हानी झाल्यास पशुपालकास यामुळे होणा-या आर्थिक नुकसानापासून या योजनेद्वारे वाचविता येऊ शकेल, असा उद्देश आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांच्या गाईचा मृत्यू झाल्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. विमा कंपनीने मंचासमोर हजर होऊन रेकॉर्डवर उपलब्ध असलेली कागदपत्रे विमा क्लेम सेटल करण्यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला नाही. आमच्या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्यू पावल्याचे सिध्द करण्यासाठी पुरेशी आहेत. विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम अयोग्य व अनुचित कारणास्तव प्रलंबीत ठेवून सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे गाईंच्या विम्याची रक्कम तक्रारदार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्यास दरासह मिळविण्यास पात्र ठरतात. 7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. ग्राहक तक्रार क्रमांक 34/2011 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.50,000/- दि.3/2/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. ग्राहक तक्रार क्रमांक 35/2011 मध्ये विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा रक्कम रु.50,000/- दि.3/2/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 3. विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 4. विरुध्द पक्ष विमा कंपनीने उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी नमूद मुदतीत न केल्यास मुदतीनंतर एकूण देय रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने अदा करावी. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/15411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |