Maharashtra

Sangli

CC/10/441

SHRIMATI. ANUSAYA DATTATRAYA YADAV(PATIL), BAVCHI, TAL WALWA, DIST SANGLI - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE CO.LTD, D/N OFFIVCE NO. 2,8 HIN DUSTAN COLONY, NEAR AJNI CHOUK, VERDHA ROAD, - Opp.Party(s)

ADV.SHETE, SANGLI

21 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/441
 
1. SHRIMATI. ANUSAYA DATTATRAYA YADAV(PATIL), BAVCHI, TAL WALWA, DIST SANGLI
BAVACHI TAL WALVA
SANGLI
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE CO.LTD, D/N OFFIVCE NO. 2,8 HIN DUSTAN COLONY, NEAR AJNI CHOUK, VERDHA ROAD, NAGPUR 15 AND OTHERS
DIV OFFICE NO.2,8, HINDUSTAN COLONY AJANI CHOAK VARADHA ROAD NAGPUR
NAGPUR
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:ADV.SHETE, SANGLI, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                               नि.क्र. २७   
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या सौ सुरेखा अ. बिचकर
 
तक्रार अर्ज क्र. ४४१/२०१०
--------------------------------------
तक्रार नोंद तारीख   : २१/८/२०१०
तक्रार दाखल तारीख  :  २३/८/२०१०
निकाल तारीख        :  २१/०२/२०१२
------------------------------------------
 
श्रीमती अनुसया दत्‍तात्रय यादव (पाटील)
वय वर्षे ७५, व्‍यवसाय काही नाही
रा.बावची, ता.वाळवा, जि. सांगली.                      ...... तक्रारदार
   विरुध्‍द
 
१. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कं.लि.
    डिव्‍हीजन ऑफिस नं.२,, हिंदुस्‍थान कॉलनी
    अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर ४४० ०१५
 
२. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.
    १०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
    मंगला टॉकीज जवळ, पुणे ४११००५
 
३. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी
    सांगली                                      ..... जाबदार
 
 
                                 तक्रारदार तर्फेò : +ìb÷.  एम.एन. शेटे
                             जाबदारक्र.१ तर्फे :+ìb÷. श्री ए.बी.खेमलापुरे
                                    जाबदारक्र.२ : स्‍वत:
                                    जाबदारक्र.३ : एकतर्फा
 
 
 
 
 
 
- नि का ल प त्र -
 
 
द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. अनिल य.गोडसे 
 
.     तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे. 
 
२.  सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
 
महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने राज्‍यातील शेतक-यांच्‍या अपघातासंदर्भात शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्‍यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्‍यात आला आहे. तक्रारदार यांचे पती दत्‍तात्रय रामचंद्र यादव हे शेतकरी होते व ते दि.३०/४/२००८ रोजी सायकलीवरुन वैरण आणण्‍यास जात असताना त्‍यांच्‍या सायकलला मोटारसायकलने धडक दिल्‍याने अपघात झाला त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर जखमा झाल्‍या त्‍यांना उपचारासाठी हॉस्‍पीटलमध्‍ये डमिट करण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर उपचार चालू असताना दि.२५/१०/२००८ रोजी त्‍यांचा मृत्‍यू झाला. तक्रारदार या त्‍यांच्‍या पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्‍कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी, बावची यांचेकडे दि.१८ जुलै  २००९ रोजी प्रस्‍ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्‍ताव तहसिलदार वाळवा यांचेकडे पाठविला. तहसिलदार वाळवा यांनी विमाप्रस्‍ताव दाखल करण्‍यास उशिर झाला आहे त्‍यामुळे सदरचा विमाप्रस्‍ताव विमा कंपनीकडे पाठवून द्या असे सांगितले. तक्रारदार यांनी सदरचा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे पाठविला. जाबदार क्र.१ यांनी दि.१५/१२/२००९ च्‍या पत्राने विमा प्रस्‍ताव नाकारला. त्‍यामुळे तक्रारदार यांनी विम्‍याची रक्‍कम व्‍याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्‍या यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
 
३.    जाबदार क्र.१ यांनी नि.२० वर आपले म्‍हणणे शपथपत्राच्‍या स्‍वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे पती शेतकरी असल्‍याची बाब नाकारली आहे तसेच पॉलिसीबाबतचा व अपघाताबाबतचा मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला असल्‍याबाबत पुरावा दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांचा तक्रारअर्ज चालणेस पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही. तक्रारअर्ज मुदतीत नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा प्रस्‍तुतचा अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे.
 
४.    जाबदार क्र.२ यांनी नि.१२ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.२ यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये जाबदार हे महाराष्‍ट्र शासनाला विमा योजना राबविण्‍यासाठी विनामोबदला सहाय्य करतात. कृषी अधिकारी अथवा त‍हसिलदार यांचेमार्फत आलेला विमाप्रस्‍ताव योग्‍यपणे भरला आहे का, सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्‍याप्रमाणे आहेत का हे तपासून त्‍याबाबत पूर्तता करुन मंजूर झालेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढेच जाबदार यांचे कार्य आहे. सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब जाबदार यांचेविरुध्‍द तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यासोबत महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रक व सन्‍मा.औरंगाबाद परिक्रमा आयोगाचा निवाडा दाखल केला आहे. 
 
५.    जाबदार क्र.३ यांनी नि.१७ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.३ यांनी आपले म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार यांचा विमाप्रस्‍ताव या कार्यालयाकडून पाठविण्‍यात आलेला नाही. तक्रारदारास विमा रक्‍कम अदा करणे अथवा नाकारणे ही बाब जाबदार यांच्‍या कार्यक्षेत्रात येत नाही. तरी योग्‍य तो निर्णय घेण्‍यात यावा असे नमूद केले आहे.
 
६.    तक्रारदार यांनी नि.२३ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.२२ च्‍या यादीने कागद दाखल केले आहेत. जाबदार क्र.१ यांनी नि.२६ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२४ ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे. तसेच नि.२५ च्‍या यादीने कागद दाखल केले आहेत. जाबदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.
 
७.    तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, प्रतिउत्‍तर, लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. प्रस्‍तुत तक्रारअर्जातील तक्रारअर्ज व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तक्रारदारतर्फे नि.२५/३ वर विमा कराराची प्रत दाखल केली आहे.   सदर करारावरुन सर्व शेतक-यांच्‍या वतीने महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे त्‍यामुळे अपघातग्रस्‍त शेतकरी व त्‍यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्‍दा ग्राहक या सदरात येतो त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्‍कर्ष आहे.
 
८.    तक्रारदार यांनी त्‍यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्‍कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे.  तक्रारदार तर्फे नि.२५/३ वर दाखल करण्‍यात आलेल्‍या विमा करारावरुन सर्व शेतक-यांचे वतीने महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे. सदर विमा करारामध्‍ये विम्‍याचा कालावधी दि.१५/८/२००७ ते १४/८/२००८ असा असल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्‍यू दि.३०/४/२००८ रोजी विमा मुदतीत झाला आहे ही बाब स्‍पष्‍ट होते. प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असलेल्‍या पॉलिसीची प्रत व परिपत्रकावरुन अपघातग्रस्‍त व्‍यक्‍ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय १० ते ७५ वयोगटातील असणे आवश्‍यक आहे. पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय ६५ असे नमूद आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पतीच्‍या वयाबाबत कोणताही वाद उपस्थित केला नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पतीचे वय निश्चितच १० ते ७५ या दरम्‍यानचे आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे. अपघातग्रस्‍त व्‍यक्‍ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी सात-बारा उतारा व खाते उतारा याकामी दाखल केला आहे.   सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे व त्‍यांचे पश्‍चात तक्रारदार यांचे नाव नमूद आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचे पती हे शेतकरी आहेत ही बाब समोर येते. 
 
९.    तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी दि.१५/१२/२००९ रोजीच्‍या पत्राने नाकारला आहे. विमा प्रस्‍ताव नाकारण्‍यास जे कारण दिले आहे ते विमा करारानुसार विमाप्रस्‍ताव हा कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीमार्फत दाखल नव्‍हता तक्रारदार यांनी प्रस्‍ताव डायरेक्‍ट पाठविला आहे व विमा प्रस्‍ताव दाखल करण्‍यास विलंब झाला आहे. जाबदार यांनी विमाप्रस्‍ताव नाकारण्‍यास दिलेले कारण योग्‍य आहे काय हे प्रस्‍तुत प्रकरणी पाहणे गरजेचे आहे. विमाप्रस्‍ताव केवळ कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडूनच पाठविणे गरजेचे आहे व कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीमार्फत न आलेले प्रस्‍ताव स्‍वीकारले जाणार नाहीत अशी कोणतीही अट विमाकरारामध्‍ये दिसून येत नाही. त्‍यामुळे विमाप्रस्‍ताव तक्रारदार यांनी स्‍वतहून दाखल केला या कारणास्‍तव विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. तसेच जाबदार यांनी विमाप्रस्‍ताव नाकारण्‍यास जे कारण दिले आहे ते पॉलिसीच्‍या कटऑफ डेटनंतर ९० दिवसांत प्रस्‍ताव दाखल करण्‍यात आला नाही, विमा पॉलिसीचा कालावधी हा दि.१५/८/२००७ ते १४/८/२००८ असा आहे, तक्रारदार यांनी दि.१५/११/२००८ पर्यंत प्रस्‍ताव दाखल करणे गरजेचे होते परंतु तक्रारदार यांनी सदरचा विमा प्रस्‍ताव त्‍यानंतर दाखल केला आहे. त्‍यामुळे तो मंजूर होणेस पात्र नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी दि.१८ जुलै २००९ रोजी विमाप्रस्‍ताव तहसिलदार यांचेकडे सादर केला होता परंतु त‍हसिलदार यांनी विमाप्रस्‍ताव स्‍वीकारला नाही असे नमूद केले आहे व त्‍यामुळे तक्रारदार यांनी स्‍वत:हून जाबदार यांचेकडे विमाप्रस्‍ताव पाठविला आहे. कट ऑफ डेट नंतर ९० दिवसांचे आत विमा प्रस्‍ताव दाखल करणेची अट पॉलिसी करारामध्‍ये नमूद आहे. तथापि सदरचा विलंब माफ करण्‍याची तरतूदही त्‍यामध्‍ये नमूद करण्‍यात आली आहे. सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी Lakshmibai Vs. ICICI Lombard या III (2011) CPJ 507 NC या निवाडयाचे कामी पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढले आहेत. i) Where no claim is made either with nodal officer, or the insurance company, within two years of date of death, such claim shall be barred by limitation. (ii) Cases where claim is made to Nodal officer, or Nodal officer has forwarded the claim to insurance company, or claim has been directly filed with insurance company within two years of the death, and the claim has remained undecided, in such a case, the cause of action will continue till the day the respondent insurance company pays or rejects the claim. 
सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी काढलेल्‍या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदार यांचे पतीचा मृत्‍यू दि.२५/१०/२००८ रोजी झाला आहे व तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी दि.१५/१२/२००९ रोजीच्‍या पत्राने नाकारला आहे. यावरुन तक्रारदार यांनी निश्चितच मृत्‍यू तारखेपासून दोन वर्षाचे आत जाबदार यांचेकडे विमाप्रस्‍ताव पाठविला आहे ही बाब स्‍पष्‍ट होते तसेच सदर निवाडयामध्‍ये विमा कंपनीकडे थेट प्रस्‍ताव दाखल करण्‍याचा पर्यायही तक्रारदार यांना खुला असल्‍याचा ऊहापोह व निष्‍कर्ष सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी काढला आहे. या सर्व बाबी विचारात घेता तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
 
१०.    तक्रारदार यांनी मुदतीत तक्रारअर्ज दाखल केला नाही त्‍यामुळे तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असेही जाबदार यांनी आपले युक्तिवादामध्‍ये नमूद केले आहे व सोबत काही निवाडे दाखल केले आहेत. जाबदार यांनी दाखल केलेल्‍या निवाडयातील वस्‍तुस्थिती वेगळी असल्‍या कारणाने सदरचे निवाडे याकामी लागू होणार नाहीत. जाबदार यांनी दाखल केलेल्‍या काही निवाडयांचा उल्‍लेख असलेला सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांचा निवाडा तक्रारदार यांनी दाखल केलेला आहे. सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी Lakshmibai Vs. ICICI Lombard या III (2011) CPJ 507 NC या निवाडयाचे कामी In case where the claim is rejected by the respondent Insurance company, the cause of action arises again from the date of such rejection. असा निष्‍कर्ष काढला आहे. सन्‍मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी काढलेला निष्‍कर्ष विचारात घेता तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी दि.१५/१२/२००९ रोजीच्‍या पत्राने नाकारला आहे त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारअर्ज दाखल करण्‍यास कारण दि.१५/१२/२००९ रोजी घडले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दि.२१/८/२०१० रोजी विमा दावा नाकारलेपासून दोन वर्षाचे आत दाखल केला आहे त्‍यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे या जाबदार यांच्‍या कथनामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांच्‍या पती यांचा मृत्‍यू अपघाताने झाला आहे हे दाखल वर्दी जबाब व पोलीस पेपरवरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारुन तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्‍याने तक्रारदार हे रक्‍कम रु.१,००,०००/- व सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.१५/१२/२००९ पासून द.सा.द.शे.९ टक्‍के व्‍याज देण्‍याबाबत आदेश करणे न्‍याय्य होईल असे मंचाचे मत झाले आहे. 
 
११.    जाबदार यांनी प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारअर्ज चालविण्‍यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही असे नमूद केले आहे. विमाकरार हा महाराष्‍ट्रातील सर्व शेतक-यांसाठी करण्‍यात आलेला आहे. विमाप्रस्‍ताव संबंधीत गावकामगार तलाठी यांचेमार्फत सादर करणेचा आहे. विमाप्रस्‍तावाबाबत वाद निर्माण झालेस त्‍या त्‍या जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली समिती गठित करण्‍यात आली आहे. यावरुन अपघातग्रस्‍त शेतक-यास व त्‍याच्‍या वारसांना त्‍या त्‍या जिल्‍हयाच्‍या ठिकाणी न्‍याय मागणेची संधी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे दिसून येते. सबब या मंचास प्रस्‍तुत तक्रारअर्ज चालविणेचे भौगोलिक अधिकारक्षेत्र नाही या जाबदारांच्‍या कथनामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही असे या मंचाचे मत आहे.
 
१२.    तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्‍य कारणास्‍तव नाकारल्‍याने तक्रारदार यांना या न्‍याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्‍य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
 
१३.    यातील जाबदार क्र.३ हे महाराष्‍ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.२ यांची सल्‍लागार म्‍हणून नेमणूक केली आहे. विम्‍याचे संरक्षण देण्‍याची जबाबदारी व करार जाबदार क्र.१ यांचेबरोबर झालेला आहे त्‍यामूळे सदरचा आदेश जाबदार क्र.१ यांचेविरुध्‍द करणेत येतो.
 
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
 
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रुपये १,००,०००/-(अक्षरी रुपये
   एक लाख माञ) दि. १५/१२/२००९ पासून द.सा.द.शे.९% दराने व्‍याजासह अदा करावेत.
 
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
   अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक ५/४/२०१२ पर्यंत करणेची आहे.
 
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचे विरुध्‍द
   ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि. २१/०२/२०१२                        
 
 
                  (सुरेखा अ बिचकर)                 (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                  अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली.                  जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.