Maharashtra

Sangli

CC/10/434

SHRI. MAHESH SHRIPATI KOLEKAR. AREWADI, TAL KAVTHEMAHANKAL, DIST SANGLI - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE CO.LTD, D/N OFFICE NO. 1,15 MD COMPLEX, MOUNT ROAD, NAGPUR 1 - Opp.Party(s)

ADV.SHETE, SANGLI

23 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/434
 
1. SHRI. MAHESH SHRIPATI KOLEKAR. AREWADI, TAL KAVTHEMAHANKAL, DIST SANGLI
Aarewadi, Tal.Kavathe Mahankal
Sangli
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE CO.LTD, D/N OFFICE NO. 1,15 MD COMPLEX, MOUNT ROAD, NAGPUR 1
A.D.Complex, Mount Road, Extension, Sadar, Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:ADV.SHETE, SANGLI, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                                            नि. १७
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
                                                    
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्‍या श्रीमती सुरेखा बिचकर
                         
ग्राहक तक्रार अर्ज क्र.४३४/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख    १२/८/२०१०
तक्रार दाखल तारीख   १३/८/२०१०
निकाल तारीख       २३/८/२०११
--------------------------------------------------------------
 
श्री महेश श्रीपती कोळेकर
वर्षे सज्ञान, धंदा शेती व पशुपालन
मु.पो. आरेवाडी
ता.कवठेमहांकाळ जि. सांगली                                     ..... तक्रारदारú
          
 विरुध्‍दù
 
दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
विभागीय कार्यालय-१, १५ ए.डी.कॉम्‍प्‍लेक्‍स,
माऊंट रोड, एक्‍स्‍टेन्‍शन, सदर, नागपूर-४४०००१       .....जाबदारúö
                               
                                         तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एम.एन.शेटे
      जाबदार तर्फे     : +ìb÷. श्री एम.एम.दुबे
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा. अध्‍यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
 
१.     तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्‍या पशु विमा दाव्‍याबाबत दाखल केला आहे.
 
२.    सदर तक्रार अर्जाचा थोडक्‍यात तपशील पुढीलप्रमाणे
तक्रारदार हा शेतकरी असून तो शेतीस पूरक म्‍हणून दुग्‍धव्‍यवसाय करतो व त्‍यासाठी त्‍याने मु-हा जातीची म्‍हैस घेतली होती. तक्रारदाराने त्‍याच्‍या म्‍हैशीचा रक्‍कम रु.३०,०००/- इतक्‍या रकमेचा विमा जाबदार यांचेकडे दि.२३/०२/२००८ रोजी उतरवला आहे. तक्रारदार यांना जाबदार यांच्‍याकडून विमा पॉलिसी ही देण्‍यात आली आहे. तक्रारदार यांची विमा उतरवलेली म्‍हैस दि.२३/५/२००८ रोजी मयत झाली. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांना ताबडतोब दूरध्‍वनीवर कळविले. शासनाचे डॉक्‍टरांनी म्‍हैशीचे शवविच्‍छेदन केले. डॉक्‍टरांनी म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ला काढून त्‍यांचे ताब्‍यात घेतला. म्‍हैशीचे मृत शरीर ज्‍या ठिकाणी पुरण्‍यात आले त्‍या ठिकाणचा पंचनामा करण्‍यात आला. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जाबदार यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला. जाबदार यांनी तक्रारदार यांच्‍या विमा दाव्‍याबाबत निर्णय घेताना खोटी व चुकीची कारणे देऊन दि.९/०८/२००९ च्‍या पत्राने विमा दावा नाकारल्‍याबाबत कळविले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विमा दाव्‍याची रक्‍कम मिळणेसाठी तसेच इतर अन्‍य मागण्‍यासाठी या मंचात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्‍या यादीने ८ कागदपञे दाखल केली आहेत.
 
३.    जाबदार यांनी या कामी हजर होवून नि.११ वर आपले म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. तसेच क्‍लेमफॉर्मसोबत आवश्‍यक ती मूळ कागदपत्रे जाबदार यांचेकडे जमा केलेली नाहीत. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाही सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा असे जाबदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१२ ला शपथपत्र दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.१३ ला लेखी युक्‍तीवाद व नि.१४ चे यादीने काही कागद दाखल केले आहेत.
 
४.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्‍हणणे, दाखल कागदपञे, दाखल लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्‍तीवाद ऐकला. जाबदार यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला नाही अथवा त्‍यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादाचे दरम्‍यान हजर राहिले नाहीत. तक्रारदार याने याकामी नि.५/७ वर विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये विमा पॉलीसीचा कालावधी नमूद नाही. परंतु जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विमा पॉलिसीबाबतचा मजकूर मान्‍य केला आहे. जाबदार यांनी विमा दावा नाकारल्‍याचे पञ तक्रारदार यांनी याठिकाणी नि.५/८ वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये विमा दावा नाकारणेसाठी जे कारण दिले आहे, ते ओरिजिनल कव्‍हरनोट सर्टिफिकेट नाही व दाव्‍यासंबंधी पेपर्स नाहीत. तक्रारदार यांचा विमादावा नाकारणेच्‍या कारणांचे अवलोकन केले असता ही कारणे संयुक्तिक वाटत नाहीत. सदरची कागदपत्रे तक्रारदार यांचेकडून मागितली होती याबाबत कोणताही पुरावा नाही. जाबदार यांनी सदर पत्रामध्‍ये विमादाव्‍यासंबंधीत नेमकी कोणती कागदपत्रे दाखल केली नाहीत याचा उल्‍लेख केलेला नाही. विमा पॉलिसीबाबत ओरिजिनल कव्‍हरनोट सर्टिफिकेट नाही हे कारण योग्‍य व संयुक्तिक वाटत नाही, विमा पॉलिसीबाबत जाबदार यांनी मजकूर मान्‍य केलेला आहे. त्‍यामुळे जाबदार यांनी ज्‍या कारणास्‍तव विमादावा नाकारला ते कारण संयुक्तिक वाटणारे नाही. तक्रारदार यांनी याकामी पॉलिसीची प्रत हजर केली आहे. सदर प्रतीवर पॉलिसी नंबर एसएनजी १००७२७ असा नमूद आहे. सदर पॉलिसीवरुन तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या म्‍हैशीचा रक्‍कम रु.३०,०००/- चा विमा दि.२३/२/२००८ रोजी उतरविला आहे व सदरची म्‍हैस ही दि.२३/५/२००८ रोजी मयत झाली आहे. त्‍याबाबत पोस्‍टमॉर्टेम सर्टिफिकेट व मृत्‍यू दाखला दाखल आहे. त्‍यावर म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ला नं.७२७ नमूद करण्‍यात आला आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा अयोग्‍य कारणास्‍तव व तक्रारदार यांना पुरेशी संधी न देता नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे त्‍यामुळे तक्रारदार हे विमा दाव्‍याची रक्‍कम रु.३०,०००/- विमादावा नाकारले तारखेपासून म्‍हणजे दि.९/८/२००९ पासून व्‍याजासह मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. 
 
५.    तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्‍या विमा दाव्‍याबाबत कोणताही निर्णय न घेवून तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे ही गोष्‍ट निश्चितच तक्रारदार यांना शारीरिक मानसिक ञास देणारी ठरते. त्‍यामुळे सदरची मागणी व तक्रार अर्जाच्‍या खर्चाची मागणी अंशत: मंजूर करणेत येत आहे.
      वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. जाबदार यांनी तक्रारदार यांना म्‍हैशीच्‍या विमा दाव्‍यापोटी रक्‍कम रु.३०,०००/-
   (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) दि.९/८/२००९ पासून द.सा.द.शे. ९ टक्‍के दराने
   व्‍याजासह अदा करावेत.
३. जाबदार यांनी तक्रारदार यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व
   तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) अदा
   करावेत.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार यांनी दि.५/१०/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्‍यास तक्रारदार     
   त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
 
सांगली
दि. २३/०८/२०११
 
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                अध्‍यक्ष           
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११.
     जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने   दि.    /    /२०११.
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.