Maharashtra

Solapur

CC/11/170

Joti Udav Raut &other - Complainant(s)

Versus

The oriental Insurance Co.Ltd 1 Nagpur 2. solapur - Opp.Party(s)

Kulkarni

29 Jun 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/11/170
1. Joti Udav Raut &otherAt.&Po Phondsiras Tal. MalsiracSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The oriental Insurance Co.Ltd 1 Nagpur 2. solapurA.D.Complex mount road Nagpur 2. 442w. mangalwar peth solapurSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBER
PRESENT :Kulkarni, Advocate for Complainant

Dated : 29 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

                                                                 तक्रार दाखल दिनांक :  05/04/2011.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 29/06/2011.   

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 169/2011.

 

1. सौ. चिंगुबाई भानुदास रुपनवर, वय 55 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम

   व शेती, मु.पो. कन्‍हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

2. शिवामृत दुध उत्‍पादक सह. संघ मर्या., अकलूज, ता. माळशिरस,

   जि. सोलापूर तर्फे श्री. पंकज जनार्धन साळुंखे, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : नोकरी, रा. सदर.                                  तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 170/2011.

 

1. सौ. ज्‍योती उध्‍दव राऊत, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम

   व शेती, मु.पो. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.

2. शिवामृत दुध उत्‍पादक सह. संघ मर्या., अकलूज, ता. माळशिरस,

   जि. सोलापूर तर्फे श्री. पंकज जनार्धन साळुंखे, वय सज्ञान,

   व्‍यवसाय : नोकरी, रा. सदर.                                  तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 171/2011.

 

श्री. विष्‍णू बबन कुंभार, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती,

मु.पो. वरकुटे (बु।।), ता. इंदापूर, जि. पुणे.                         तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 172/2011.

 

श्री. सुखदेव जगू मासाळ, वय 45 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मु.पो. गोनेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर.                    तक्रारदार

 

            विरुध्‍द

 

1. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1,

  ए.डी. कॉम्‍प्‍लेक्‍स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01.

  (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्‍यात यावी.)

2. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., रा. 442, पश्चिम

  मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्‍ली, सोलापूर.

  (समन्‍स/नोटीस डिव्‍हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्‍यात यावी.)        विरुध्‍द पक्ष

                     गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                        सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

           

                   तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी 

                   विरुध्‍द पक्ष यांचेतर्फे अभियोक्‍ता : व्‍ही.एन. देशपांडे

 

आदेश

 

 

 

 

सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

 

1.     प्रस्‍तुत चारही तक्रारींचे स्‍वरुप, विषय, विरुध्‍द पक्ष व त्‍यांचे म्‍हणणे इ. मध्‍ये साम्‍य असल्‍यामुळे त्‍यांचा निर्णय एकत्रितरित्‍या देण्‍यात येत आहे.

 

2.    तक्रारदार यांच्‍या तक्रारींमध्‍ये उपस्थित करण्‍यात आला विवाद थोडक्‍यात असा आहे की, महाराष्‍ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला यांनी केंद्र शासन पुरस्‍कृत पशुधन विमा योजना सन 2007-08 राबविली आहे. सदर योजनेंतर्गत विरुध्‍द पक्ष (संक्षिप्‍त रुपामध्‍ये 'विमा कंपनी') यांच्‍याकडे तक्रारदार यांच्‍या गाईंचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्‍यात आलेला असून त्‍यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

ग्राहक तक्रार क्रमांक

विमा पॉलिसी क्रमांक

टॅग क्रमांक

विमा रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

जनावराचा मृत्‍यू दिनांक

169/2011

एस.ओ.एल.पी.111964

एस.ओ.एल.पी.111964

28,000

24/10/08

170/2011

--

ओ.आय.सी. 162603/7549

26,000

2/4/09

171/2011

एस.ओ.एल.पी.107729

ओ.आय.सी. 181100/107729

20,000

9/8/08

172/2011

एस.ओ.एल.पी.101138

एस.ओ.एल.पी. 101138

29,000

2/8/08

 

3.    तक्रारदार यांची गाय अचानक आजारी पडली आणि उपचारादरम्‍यान वरीलप्रमाणे नमूद तारखेस त्‍यांचा मृत्‍यू झालेला आहे. त्‍यानंतर पोस्‍टमार्टेम करण्‍यात येऊन विहीत नमुन्‍यामध्‍ये सर्व कागदपत्रे पाठवून विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. क्‍लेम सादर केल्‍यानंतर पाठपुरावा करुनही विमा कंपनीने त्‍यांना क्‍लेमबाबत काहीच न कळविता क्‍लेम प्रलंबीत ठेवला आणि त्‍यानंतर क्‍लेम अप्रत्‍यक्षरित्‍या नाकारण्‍यात आला. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारी दाखल करुन विमा रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल करुन तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार महाराष्‍ट्र पशुधन विकास मंडळ व मे. जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. यांना आवश्‍यक पक्षकार केले नसल्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या तक्रारीस बाधा पोहोचते. त्‍यांच्‍यातील करारानुसार मयत जनावरांचे विमा दावे सेटल करण्‍याची विशिष्‍ट पध्‍दती आहे. तक्रारदार यांनी क्‍लेम सेटलमेंट पध्‍दतीचा भंग केला आहे. त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही आणि तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची त्‍यांनी विनंती केली आहे.

 

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष यांचे म्‍हणणे व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्‍यांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                                 होय.

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?                  होय.

3. काय आदेश ?                                        शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

निष्‍कर्ष

 

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारीतमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदार यांच्‍या गाईचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्‍यात आल्‍याविषयी विवाद नाही. विमा संरक्षीत गाईच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारदार यांनी क्‍लेम सादर केला असता, त्‍यांना विमा रक्‍कम देण्‍यात आलेली नाही, अशी त्‍यांची प्रमुख तक्रार आहे. उलटपक्षी, विमा कंपनीच्‍या म्‍हणण्‍यानुसार करारानुसार मयत जनावरांचे विमा दावे सेटल करण्‍याची विशिष्‍ट पध्‍दती असून तक्रारदार यांनी त्‍याचा भंग केल्‍यामुळे त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही.

 

 

7.    तक्रारदार यांनी रेकॉर्डवर मयत गाईंचा क्‍लेम फॉर्म, कॅटल डेथ सर्टिफिकेट, पोस्‍टमार्टेम रिपोर्ट, कॅटल व्‍हॅल्‍यऐशन रिपोर्ट व इतर पुरक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्‍यू पावल्‍याचे स्‍पष्‍टपणे निदर्शनास येते. तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्‍यू पावलेली असतानाही विमा कंपनीने तक्रारदार यांच्‍या क्‍लेमबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन विमा क्‍लेम सेटल करण्‍यास विमा कंपनी कशी असमर्थ ठरते ? याचे उचित स्‍पष्‍टीकरण देण्‍यात आलेले नाही. आमच्‍या मते, सदर कागदपत्रे तक्रारदार यांची विमा संरक्षीत गाय मृत्‍यू पावल्‍याचे सिध्‍द करण्‍यास पुरेशी आहेत. वरील सर्व विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्‍लेम कोणत्‍याही उचित व सबळ कारणाशिवाय प्रलंबीत ठेवून सेवेत त्रुटी केलेली आहे आणि  तक्रारदार हे विमा संरक्षीत मयत गाईंच्‍या विमा रक्‍कम तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

8.    शेवटी आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. ग्राहक तक्रार क्र.169/2011 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रु.28,000/- दि.5/4/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

2. ग्राहक तक्रार क्र.170/2011 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रु.26,000/- दि.5/4/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

3. ग्राहक तक्रार क्र.171/2011 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रु.20,000/- दि.5/4/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

4.    ग्राहक तक्रार क्र.172/2011 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रु.29,000/- दि.5/4/2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के ज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      5. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

 

 

 

(सौ. प्रतिभा प्र. ज‍हागिरदार)                               (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                           ----00----

(संविक/स्‍व/14611)

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT