Maharashtra

Kolhapur

CC/08/776

Sou. Ranjana Madhukar Kolekar - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. - Opp.Party(s)

Adv.U.S.Mangave.

29 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/08/776
1. Sou. Ranjana Madhukar KolekarKorochi, Tal. Hatkanangale,Kolhapur.Maharashtra2. Shri Madhukar Sayappa Kolekar,R/o. As above. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Branch Uttam Prakash Theatre Complex, Tilak Road, Ichalkaranji-416115.Kolhapur.Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.U.S.Mangave., Advocate for Complainant
P.R.Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 29 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.29.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          तक्रारदार क्र.1 व 2 हे नात्‍याने पती-पत्‍नी आहेत. त्‍यांच्‍या पॉवरलूम हा व्‍यवसाय आहे. तक्रारदारांचा कोरोची येथे विव्‍हींग मिल कारखाना आहे. सदर कारखान्‍यासाठी तक्रारदारांनी बँकेकडून व्‍यवसायाकरिता रक्‍कम रुपये 5 लाख इतके कर्ज घेतले आहे. सामनेवाला विमा कंपनीकडे व्‍यवसायाचे इमारत सुरक्षिततेपोटी मशिनरी, माल, स्‍टॉक, वांयडिंग मशिन तसेच इमारतीचा विमा उतरविलेला आहे. त्‍याचा कालावधी दि.17.05.2007 ते दि.16.05.2009 असा आहे व पॉलीसीची रक्‍कम रुपये 5 लाख इतकी आहे.
(3)       तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, दि.27.05.2008 रोजी मौजे कोरोची, ता.हातकणंगले, जि.कोल्‍हापूर येथे प्रचंड गारपीट व वादळी पावसामुळे तक्रारदारांच्‍या मालकीच्‍या कारखान्‍यावरील लोखंडी अँगल पूर्णपणे वाकून भिंतींना तडे गेले. तसेच, कारखान्‍याचे छत उडून गेल्‍याने तक्रारदारांच्‍या कारखान्‍यातील तयार माल, सुताचे गठ्ठे व मशिनरी यांचे नुकसान झाले आहे. तसेच, सदर कारखान्‍याचे शेडचे पूर्ण नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा मंडल अधिकारी, इचलकरंजी व ग्रामविकास अधिकारी, कोरोची यांनी प्रत्‍यक्ष पाहणी करुन नुकसानीची रक्‍कम रुपये 1,83,000/- इतकी केली. 
 
(4)       तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, वादळी पावसामुळे शेडच्‍या दुरुस्‍तीचा खर्च मुरलीधर एच्. पाटील यांचेकडे कोटेशन पध्‍दतीने विचारला असता त्‍यांनी तक्रारदारांच्‍या कारखान्‍याचा शेड दुरुस्‍ती खर्च रुपये 1,94,200/- असल्‍याचे कोटेशन दिले. तसेच, सुती तागे पावसात भिजल्‍याने त्‍यांची नुकसानी रुपये 1 लाख इतकी झाली आहे. तसेच, कारखान्‍यातील इलेक्ट्रिक मोटर्स व सुत तगाईच्‍या बीम्‍स् खराब होवून रक्‍कम रुपये 70000/- इतके नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करतेवेळी सर्व शासकिय अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्‍यांनी केलेल्‍या पंचनाम्‍यानुसार त्‍यांनंतर तक्रारदारांनी दुरुस्‍ती इस्‍टीमेट, कागदपत्रे व नुकसानीच्‍या एकून प्रमाणामध्‍ये क्‍लेम मागणी केली असता तक्रारदार अडाणी व अशिक्षित असल्‍याचा गैरफायदा घेवून विमा कंपनीने किरकोळ रक्‍कमेचा क्‍लेम मंजूर केला. तक्रारदारांच्‍या झालेल्‍या कारखान्‍याच्‍या नुकसानीचा मंडल अधिकारी यांनी केलेल्‍या पंचनाम्‍यानुसार व तक्रारदारांनी दुरुस्‍ती खर्चाबाबत दिलेल्‍या कोटेशनप्रमाणे क्‍लेमची मागणी केली असता तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदारांच्‍या कारखान्‍यामध्‍ये तयार कापड व पॉवरलूमचे झालेले नुकसानी रुपये 1,83,000/-, शेड दुरुस्‍तीसाठी येणार खर्च रुपये 1,94,000/- व इलेेक्ट्रिक मिटर व फर्निचरची नुकसानी रुपये 70,000/- अशी एकूण्‍ रुपये 4,47,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह देणेचा आदेश व्‍हावा व खर्च रुपये 5,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे. 
 
(6)       तक्रारदारांनीत्‍यांच्‍या तक्रारीसोबत सामनेवाला कंपनीने दिलेले डिस्‍चार्ज व्‍हौचर, शेड दुरुस्‍तीचे कोटेशन, त‍हसिलदार यांचेकडे भरलेली फी पावती, मंडल अधिकारी यांनी केलेला पंचनामा, तलाठी हे साक्षीदार म्‍हणून असलेसंबंधी पत्र, रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदारांनी केलेला अर्ज, विठ्ठल बोरकर यांनी दिलेला जबाब, तक्रारदारांची असेसमेंट कॉपी, बातमीचे कात्रण, नुकसानीची छायाचित्रे, क्‍लेम फॉर्म, नुकसानी रिपेअर बिल, पॉलीसी, तक्रारदारांनी दिलेले पत्र, सर्व्‍हेअर पुजारी यांचे पत्र, फायर सर्व्‍हे रिपोर्ट, मेट्रोकेमिकल डिपार्टमेंटचे पत्र, क्‍लेम फॉर्म, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे पत्र, इलेक्ट्रिक साहित्‍याचे बिल, बँक खाते उतारा, बँकेने दिलेला दाखला इत्‍यादी व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(7)       सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. तसेच, तक्रारदारांनी मागितलेली नुकसान नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सर्व्‍हेअर यांनी तक्रारदारांचे झालेले नुकसानीचा सर्व्‍हे करुन सर्व्‍हे अहवाल केलेला आहे. तक्रारदारांच्‍या पश्चिमेकडील शेजारी श्री.फोंडे यांचे घराचे छप्‍पर उडून तक्रारदारांचे शेडवर पडलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदारांचे लोखंडी अँगल वाकलेले आहेत व सिमेंट पत्रे फुटलेले होते. तक्रारदारांच्‍या पश्चिमेकडील छप्‍पराचे नुकसान झाले असून लोखंडी अँगल वाकलेले असून पश्चिम भिंतीस उभे तडे गेलेले आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेले कोटेशन हे जादा रक्‍कमेचा आहे. सर्व्‍हे अहवालानुसार क्‍लेम देय रक्‍कम रुपये 11,400/- इतकी होते. मंजूर क्‍लेममधील शेड हे साधारण 9 वर्षे जुने असल्‍याने 12 टक्‍के घसारा धरुन रुपये 22,050/- मधून 12 टक्‍के घसारा व पहिले 10,000/- चे नुकसान विमा पॉलीसीमध्‍ये असले अटीप्रमाणे देय होत नाही.   सदर रक्‍कम वजाजाता रक्‍कम रुपये 10,410/- इतकी रक्‍कम देणेस कंपनी तयार आहे. सुती मालाचे नुकसानीपोटी सर्व्‍हे अहवालानुसार रुपये 12,799/- देय होतात. परंतु, तक्रारदारांनी क्‍लेम रक्‍कम घेणे नकार दिलेला आहे. शासकिय अधिका-यानी पंचनाम्‍यामध्‍ये शेड फुटलेले सिमेंट पत्र, ताग सुत यांची नुकसानी रक्‍कम रुपये 18,000/- केली आहे व सर्व्‍हे अहवालानुसार रक्‍कम रुपये 20,000/- केली आहे. तक्रारदारांनी केलेली मागणी ही चुकीची असल्‍याने तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(8)       सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत पॉलीसी नं.162602/11/2008/1504, पॉलीसी नं. 162602/11/2008/666 ची शेडयुलसह पॉलीसी इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(9)       या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचे युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकलेला आहे. तसेच, उपलब्‍ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या कारखाना शेड त्‍यामध्‍ये इलेक्ट्रिक फिटींग, पॉवरलूम मशिनरी, स्‍टॉक इत्‍यादीसाठी स्‍टँडर्ड फायर व स्‍पेशल पेरिल पॉलीसी दिलेली होती. ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.27.05.2008 रोजी गारपीट व वादळी पावसामुळे तक्रारदारांच्‍या कारखान्‍याचे नुकसान झालेले आहे व सामनेवाला विमा कंपनीने किरकोळ स्‍वरुपाचा क्‍लेम मंजूर केलेला आहे व संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी याबाबत तक्रारदारांनी तक्रार दाखल केलेली आहे. युक्तिवादाचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी नुकसान संबंधात राज्‍य शासनाच्‍या महसूल खात्‍यातील मंडल अधिकारी तसेच ग्राम विकास अधिकारी यांनी केलेला पंचनामा या मंचाचे निदर्शनास आणून दिलेला आहे. सदर पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या कारखान्‍याचे नुकसान भरपाईबाबतचा पंचनामा करुन एकूण नुकसानी रक्‍कम रुपये 1,83,000/- इतक्‍या रक्‍कमेचा पंचनामा केलेला आहे. सदर पंचनाम्‍यावरती गांव कामगार तलाठी, ग्राम विकास अधिकारी, मंडल अधिकारी व सरपंच, ग्राम पंचायत यांच्‍या तसेच पोलीस पाटील यांनी सहया केल्‍याचे दिसून येते. तसेच, दुरुस्‍ती खर्चाचे एस्‍टीमेट श्री.पाटील एच्., अर्किटेक्‍ट व कन्‍स्‍लटिंग इंजिनिअर यांनी दिलेले आहे. सदरचे एस्‍टीमेट हे रुपये 1,94,200/- इतके दिलेले आहे. सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे करीत असताना सदरचे मुद्दे विचारात घेतलेले नाहीत व तक्रारदारांच्‍या संपूर्ण नुकसान भरपाईबाबत सर्व्‍हे अहवाल दिलेला नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. सामनेवाला विमा कंपनीने दिलेला सर्व्‍हे अहवाल योग्‍य असून तो बंधनकारक असल्‍याचे प्रतिपादन केले आहे. 
 
(10)      या मंचाने सर्व्‍हेअर यांनी दिलेल्‍या अहवालाचे बारकाईने अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणाचे चौकशीचे वेळेस तक्रारदारांच्‍या वकिलांनी सदर सर्व्‍हेअर यांचा उलट तपासाबाबत परवानगी मागितली. परंतु, या मंचाने आदेश पारीत करुन तक्रारदारांनी प्रश्‍नावली (interrogatories)द्याव्‍यात व सदर प्रश्‍नावलीला सदर सर्व्‍हेअर यांनी शपथेवर उत्‍तर द्यावे असा आदेश पारीत केला. त्‍यानुसार तक्रारदारांनी दिलेल्‍या प्रश्‍नावलीवरती सर्व्‍हेअर यांनी उत्‍तरे दिलेली आहेत. सदर प्रश्‍नावली व त्‍यावरील उत्‍तरे यांचे अवलोकन या मंचाने केले आहे. तसेच, तक्रारदारांनी नुकसानीबाबत फोटोग्राफ्स् दाखल केलेले आहेत. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.27.05.2008 रोजी वादळी पाऊस व गारपीटीने तक्रारदारांच्‍या कारखान्‍याचे शेड, त्‍यावरील सिमेंट पत्रे तसेच भिंतींना गेलेले तडे इत्‍यादीचे नुकसान झाले आहे. तसेच, मशिनरी व स्‍टॉकचे नुकसान झालेचे दिसून येते. सदर अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता नुकसानी संदर्भात संदिग्‍धता दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेले एस्‍टीमेटबाबत अहवालामध्‍ये स्‍पष्‍टपणे स्‍पष्‍टीकरण दिसून येत नाही. तसेच, तक्रारदारांचे कारखान्‍याचे शेडला असलेले अँगल्‍स वाकलेले आहे. सदर वाकलेले अँगल्‍स पूर्णपणे सरळ होत नाहीत. तसेच, शेडला असलेले सिमेंटच्‍या पत्र्यांना तडे गेले आहेत. त्‍यामुळे संपूर्ण शेड उतरवून पुन्‍हा शेड बांधणी खर्च तक्रारदारांना येणार आहे या मुद्दयाकडे दुर्लक्ष झालेचे दिसून येत आहे. तसेच, सामनेवाला‍ विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या कारखान्‍याचे नुकसान झालेनंतर स्‍पॉट सर्व्‍हे करणे आवश्‍यक होते. सदर स्‍पॉट सर्व्‍हे केला नसल्‍याचे दिसून येते. सर्व्‍हेअर यांनी त्‍यांच्‍या सर्व्‍हे अहवालासंदर्भात शपथपत्र दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु, त्‍यांचे शपथपत्र प्रस्‍तुत कामी दाखल नाही. तसेच, विमा कंपनीनेही शपथपत्र दाखल केलेले नाही. सर्व्‍हे अहवालामध्‍ये असलेली संदिग्‍धता व उपरोक्‍त विवेचन विचारात घेता सर्व्‍हेअर यांचा अहवाल बंधनकारक असणार नाही तसेच सर्व्‍हेअर यांनी दिलेला अहवाल हा निर्णायक पुरावा म्‍हणून वाचता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधारांचा आधार घेत आहे :-
 
 [1]    The New India Assurance Co.Ltd. Vs. PradeepKumar - 2009 ACJ 1729
         
          Insurance Act 1938, Sec.64-UM (2) – Motor Insurance – Claim for damage to truck – Surveyor’s report – Truck fell into khud and was damaged – Owner of the truck filed claim duly supported by original vouchers, bills and receipts for the parts purchased and the labour charges paid for repairs – Insurance company appointed surveyor who estimated damages at Rs.63,771/- which was not accepted by the owner – Owner filed complaint and District Forum directed insurance company to pay Rs.1,58,409/- which was confirmed by State Commission and National Commission – Contention that loss assessed by approved surveyors was binding – Whether the report of the approved surveyor is binding upon the insurance company and the insured – Held : No; it may be the basis or foundation for settlement of a claim; loss assessed by consumer for a affirmed.  
 
[2]     Texcones Tubes Co.Ltd. Vs. The Oriental Insurance Co.Ltd. - 2007 II CPR 248 (NC)
 
Consumer Protection Act, 1986 – Section 2 and 14 – Insurance claim – Damage to plant, machinery and stock covered under fire policy – Dispute with regard to assessment of loss to the stocks – Complainant was manufacturing paper cones and fire had broke out in procession hall – Surveyor assessed loss of the stock at Rs.21,64,140/- as per books of accounts and records but reduced it to Rs.4,53,966/- by adopting method of adjustment – Question whether adjustment or reduction of loss was justifiable ? – No. 
 
(11)     दि. 27.05.2008 रोजी झालेल्‍या गारपीट व वादळी पावसामुळे शासकिय अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी यांनी पाहणी केलेली आहे व त्‍या अनुषंगाने उपरोक्‍त उल्‍लेख केलेप्रमाणे शासकिय अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे व एकूण नुकसान भरपाई रुपये 1,83,000/- इतकी निश्चित केलेली आहे. तसेच, तक्रारदारांनी कोटेशन पध्‍दतीने श्री.मुरलीधर पाटील, अर्किटेक्‍ट व कन्‍स्‍ल्‍टींग इंजिनिअर यांनी दिलेले खर्चाबाबतचे एस्‍टीमेट याचा विचार करता तसेच तक्रारदारांनी क्‍लेम मागणी पत्रात मागितलेली नुकसान भरपाई इत्‍यादीचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,83,000/- व्‍याजासह द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्‍त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.  
 
आदेश
 
1.   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.   सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,83,000/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजार फक्‍त) द्यावी व सदर रक्‍कमेवर दि.27.05.2008 रोजीपासून द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
3.   सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER