Maharashtra

Raigad

CC/08/33

Eknath Krishna Bhoir - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. - Opp.Party(s)

Adv.S.D.Wadkar

26 Sep 2008

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/33

Eknath Krishna Bhoir
...........Appellant(s)

Vs.

The Oriental Insurance Co.
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):
1. Adv.S.D.Wadkar

OppositeParty/Respondent(s):
1. Adv.S.B.Patil



ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

 

                                           तक्रार क्र.33/2008                                                      तक्रार दाखल दि.22-7-2008.                                        तक्रार निकाली दि.29-9-2008.

 

श्री.एकनाथ कृष्‍णा भोईर.

रा.नवघर, ता.उरण, जि.रायगड.               ...  तक्रारदार.

     विरुध्‍द

दि ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.

शिवाजी रोड, पनवेल, ता.पनवेल,

जि.रायगड.                                  ...  विरुध्‍द पक्षकार.

 

                           उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष.

                                मा.सौ.ज्‍योती अभय मांधळे,सदस्‍या.

                                मा.श्री.बी.एम.कानिटकर,सदस्‍य.

                                                  तक्रारदारातर्फे वकील- श्री.एस.डी.वाडकर/श्री.डी.बी.वाडकर.

                       सामनेवालेतर्फे वकील- श्री.एस.बी.पाटील

 

-निकालपत्र -

द्वारा- मा.अध्‍यक्ष, श्री.आर.डी.म्‍हेत्रस.  

 

1.           तक्रारदारानी ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दाखल केली असून तिचे स्‍वरुप खालीलप्रमाणे आहे-

      तक्रारदाराचा वाहतूक व्‍यवसाय असून त्‍याचा एम.एच-06/के-7509 या क्रमांकाचा टस्‍कर टुर्बो ट्रॅक्‍टर 3516 मॉडेलचा ट्रेलर होता.  दि.23-7-07 रोजी ट्रेलर जे.एन.पी.टी.बंदरात यार्ड नं.सी-4-53 येथे कंटेनर खाली करण्‍यासाठी आला होता.  क्रेन क्र.आर-टी-11 हिने ट्रेलरवरील दोन पैकी एक कंटेनर क्र.डब्‍ल्‍यू.एच.एल.यू. 27-3473 उचलला असता ट्रेलरखालील दुसरा कंटेनर क्र.सी.ए.एक्‍स.यू-315755(3) हा ट्रॉलीसह पलटी होऊन अपघात झाला.  या अपघातामुळे तक्रारदाराच्‍या ट्रेलरचे नुकसान झाले.  या अपघाताची खबर तक्रारदारानी विमा कंपनीला कळवली.  त्‍यांनी सरबजितसिंग ब्राईट यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली.  त्‍यांनी सर्व सर्व्‍हे करुन रु.96,520/-चे नुकसान झाल्‍याचा अहवाल दिला.  त्‍यांनी त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये जे नुकसान झाले ते ट्रेलरमध्‍ये अंतर्गतरित्‍या जोर निर्माण झाल्‍यामुळे अपघात झाला.  हे नुकसान टकरीमुळे किंवा कोणत्‍या बाहय वस्‍तुमुळे झालेले नाही.  त्‍यांनी इंग्रजीत पुढीलप्रमाणे लिहीले आहे-

      Thus it is clear that damages were occurred due to force generated within body and not due to collision or external means.

            हा अहवाल दि.9-6-07 रोजी तयार झाला आहे.  तक्रारदारानी ट्रेलर उरण येथे दुरुस्‍त करुन घेतला.  त्‍याचा खर्च रु.96,520/- आला.  त्‍यांनीसुध्‍दा रु.96,520/-चे कोटेशन दिले. 

 

2.          तक्रारदारानी सामनेवाले कंपनीकडे चौकशी केली व हेलपाटे घातले तरीसुध्‍दा त्‍यांनी त्‍याला काहीही कळवले नाही म्‍हणून त्‍यांनी संबंधित शाखाधिका-यांकडून  क्‍लेमबाबत काय तो निर्णय घ्‍या अन्‍यथा तुमचेविरुध्‍द तक्रार दाखल करावी लागेल असे म्‍हटल्‍यावर त्‍यांनी दि.6-12-07 रोजी पत्र देऊन वर उल्‍लेख केलले कारण दाखवून तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला.  वास्‍तविकतः सामनेवालेनी कोलिजन व एक्‍स्‍टर्नल यांचा चुकीचा अर्थ लावून तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे ते चुकीचे आहे.  अशा प्रकारे त्‍यांनी अपघाताची सर्व कागदपत्रे देऊनही तक्रारदाराला सेवा देण्‍यात त्रुटी दाखवली असल्‍यामुळे तक्रारदाराला ही तक्रार दाखल करावी लागली आहे. 

 

3.          तक्रारदारास तक्रार देऊनसुध्‍दा लगेच क्‍लेम न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍या व्‍यवसायाचे नुकसान झाले म्‍हणून त्‍याचे दरमहा रु.20,000/-प्रमाणे नुकसान झाले आहे ते तीन महिन्‍याचे रु.60,000/- मिळावेत, तसेच ट्रेलरच्‍या नुकसानीचे रु.96,520/- मिळावेत व तक्रारदारानी कर्ज घेऊन वाहन घेतले असल्‍यामुळे त्‍याला व्‍याज दयावे लागत असल्‍यामुळे त्‍यावर 14% प्रमाणे व्‍याज मिळावे व सामनेवालेच्‍या कृतीमुळे त्‍याला जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्‍यापोटी रु.15,000/- मिळावेत, तसेच अपघाताच्‍या ठिकाणापासून गॅरेजपर्यंत ट्रॅक्‍टर ओढून न्‍यावा लागला तो खर्च रु.5,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.5,000/- मिळण्‍यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.

 

4.          तक्रारदारानी तक्रारीसोबत पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दिले असून ते नि.4 ला आहे.  नि.5 अन्‍वये यादीसोबत 1 ते 8 कागद दाखल केले असून त्‍यामध्‍ये विमा पॉलिसी, पंचनामा, वाहनाच्‍या अपघाताचे फोटो, गॅरेजच्‍या खर्चाचे कोटेशन्‍स, विमा मागणी अर्ज, पोलिसांचा व सर्व्‍हेअरचा अहवाल व विमा कंपनीचे पत्र इ.चा समावेश आहे. 

 

5.          तक्रार दाखल झाल्‍यानंतर नि.6 अन्‍वये सामनेवालेना नोटीस पाठवण्‍यात आली.  सामनेवाले या कामी हजर होऊन त्‍यांनी नि.11 ला आपले म्‍हणणे दाखल केले असून प्रतिज्ञापत्रही नि.12 अन्‍वये दाखल केले आहे.  नि.14 अन्‍वये विमा पॉलिसीसंदर्भातील शर्ती दाखल केल्‍या आहेत. 

 

6.          त्‍यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तक्रारदाराची तक्रार खोटी असून ती नामंजूर करावी असे म्‍हटले आहे.  त्‍यांनी सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टवर अवलंबून राहून विमा कंपनीच्‍या नियमाप्रमाणे तक्रारदाराच्‍या वाहनाचे नुकसान हे अंतर्गतरित्‍या त्‍यामध्‍ये जोर निर्माण होऊन झाले आहे.  त्‍यामुळे ते देण्‍यास कंपनी जबाबदार नाही.  त्‍यांच्‍या नियमाप्रमाणे बाहय गोष्‍टीमुळे (By External force) किंवा बाहेरील धक्‍क्‍यामुळे जर काही नुकसान झाले तर कंपनी ते देण्‍यास बांधील आहे.  कागदपत्रावरुन त्‍यांना असे वाटले की, अपघातातील नुकसानी ही अंतर्गत कारणामुळे झाली असल्‍यामुळे ते नुकसानी देण्‍यास जबाबदार नाहीत.  क्रेनमुळे एक कंटेनर उचलताना दुसरा कंटेनर पलटी झाला आहे.  या बाबी अंतर्गत स्‍वरुपाच्‍या आहेत.  या अपघाताचा विचार करता हा अपघात बाहय स्‍वरुपाच्‍या वस्‍तुच्‍या धक्‍क्‍याने झाला नाही म्‍हणून पॉलिसी ही स्‍पष्‍टपणे कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह इन्‍शुरन्‍स पॉलिसी असल्‍याचे म्‍हणता येणार नाही.  त्‍यामुळे त्‍यांनी योग्‍य कारण देऊन तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.

 

7.          तक्रारदार व सामनेवालेतर्फे त्‍यांच्‍या वकीलांनी केलेले युक्‍तीवाद ऐकले.  त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले.  त्‍यावरुन सदर तक्रारीच्‍या निराकरणार्थ मंचापुढे खालील मुद्दे उपस्थित होतात-

मुद्दा क्र.1 सामनेवालेकडून तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली गेली आहे काय?

उत्‍तर   -  होय.

मुद्दा क्र.2 तक्रारदाराचा अर्ज त्‍यांच्‍या मागणीप्रमाणे मंजूर करता येईल काय?

उत्‍तर    -  अंतिम आदेशात नमूद केल्‍याप्रमाणे.

विवेचन मुद्दा क्र.1 - 

8.          या कामी सामनेवालेनी इतर कोणतीही बाब नाकारलेली नाही.  ट्रेलरला अपघात होऊन त्‍याचे नुकसान झाले आहे.  ही बाब त्‍यांना मान्‍य आहे.  असे उपलब्‍ध पुराव्‍यावरुन दिसून येते.  त्‍यांनी या कामी सरबजितसिंग ब्राईट या सर्व्‍हेअरला सर्व्‍हे करण्‍यासाठी नेमलेले होते.  त्‍यांचा अहवाल तक्रारदारानी दाखल केला आहे.  तक्रारदाराच्‍या मागणीप्रमाणे चौकशी करुन सर्व्‍हे अहवाल दाखल केला आहे.  त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे त्‍यानी सर्व्‍हे अहवालात दुरुस्‍तीचे एस्टिमेट दाखल केले असून ते रु.96,520/- चे आहे.  त्‍याने अहवालामध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे-

      'As per the policy terms, any damages those not to due to external means, will not come under the view of the comprehensive insurance policy view of the comprehensive insurance policy.  Since the damage observed on the trailor were not due to any external means, insurer need not accept liability'.

      या सर्व्‍हे अहवालाचा आधार घेऊन सामनेवालेनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  या ठिकाणी असा प्रश्‍न निर्माण होतो की, प्रस्‍तुतचा जो अपघात झाला आहे ही बाब त्‍यांनी नाकारलेली नाही.  त्‍यांच्‍या कथनानुसार एक्‍स्‍टर्नल मीन्‍सचा म्‍हणजे बाहयवस्‍तूचा वापर न होता-संबंध न येता अंतर्गत-अंतर्गत संबंध येऊन ट्रेलरचे नुकसान झाले आहे.  सामनेवालेंच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या नियमाप्रमाणे जर अपघात हा एक्‍स्‍टर्नल मीन्‍समुळे झाला तरच नुकसानी देता येईल.  त्‍यांच्‍या कथनानुसार ही नुकसानी तशाप्रकारे झालेली नाही त्‍यामुळे ते नुकसानी मिळण्‍यास पात्र नाहीत म्‍हणून त्‍यांनी क्‍लेम देण्‍याचे नाकारले आहे.

            मंचाने याबाबत तक्रारदारानी दाखल केलेल्‍या घटनास्‍थळाचा अहवाल पाहिला.  तक्रारदारांच्‍या कथनाप्रमाणे त्‍यांचा ट्रॅक्‍टर-ट्रेलरवर दोन कंटेनर आहेत.  जे.एन.पी.टी.बंदरात कंटेनर उतरवण्‍यासाठी नेला असता क्रेनचालकाकडून प्रथम ड्रायव्‍हर बसतो त्‍या बाजूचा कंटेनर उचलला गेला व तो उचलताना दुस-या म्‍हणजे शेवटच्‍या बाजूकडील कंटेनरला धक्‍का लागला, तसेच ट्रेलरला बेंड आला.  याबाबत मंचाचे मत असे की, हा जो अपघात झाला आहे तो कोणाच्‍या चुकीमुळे (क्रेनचालकाच्‍या/अन्‍य कोणाच्‍या) झाला हे पहाणे मंचाचे काम नाही.  फक्‍त जे नुकसान झाले आहे ते कोणत्‍या प्रकारे झाले याचा तर्किक विचार (Logical Thinking) करुन  निष्‍कर्षाप्रत येणे महत्‍वाचे आहे.  मंचाने तक्रारदारानी नि.5 लगत 3 वर दाखल केलेल्‍या फोटोंचे अवलोकन केले.  त्‍यावरुन मंचाचे मत असे झाले की, ड्रायव्‍हर बाजूकडील कंटेनर उचलताना त्‍याचा धक्‍का नकळतपणे दुस-या कंटेनरला म्‍हणजे जो गाडीच्‍या शेवटच्‍या बाजूला/दुस-या टोकाला होता.  त्‍याला धक्‍का लागून तो पलटी झाला त्‍यामुळे ट्रेलरलासुध्‍दा बेंड आला असावा.  मंचाच्‍या मते क्रेनचालकाकडून ड्रायव्‍हरबाजूकडील कंटेनर अलगदपणे उचलला गेला असता तर दुसरा कंटेनर जो टोकावर आहे तो पाठीमागील बाजूस जमिनीवर वजनामुळे अलगद पडून राहिला असता म्‍हणजे त्‍यामुळे कदाचित ट्रॅक्‍टर-ट्रेलरची पुढील बाजू वर उचलली गेली असती परंतु येथे तसे काही न होता मागील कंटेनर पलटी होऊन पडला त्‍यामुळे ट्रेलरला बेंड येऊन तो वाकला.  केवळ बाहय ताकदीमुळे-धक्‍क्‍यामुळे कंटेनर पलटी होऊन ट्रेलरला बेंड आला असावा असे मंचाचे मत आहे.  अशा प्रकारे अपघात झाला असावा असे मंचाचे मत आहे परंतु याबाबत सर्व्‍हेअरने आपल्‍या अहवालामध्‍ये काही नमूद केले नाही.  त्‍याने फक्‍त आपल्‍या अहवालामध्‍ये (जो नि.5/7 ला दाखल आहे) तक्रारदाराबरोबर चर्चा करुन जे मत तयार झाले ते मांडले आहे.  त्‍यांनी त्‍यात असे म्‍हटले आहे की -

      While unloading the first container, the 2nd container somehow got imbalanced. आणि त्‍यात ते असे नमूद करतात की,  'Thus it is clear that damage were occurred due to the force generated within the body and not due to collision or external means'.  फोटोग्राफ पाहून त्‍याने वर उल्‍लेखल्‍याप्रमाणे मत दिले आहे.  कंटेनरमध्‍ये फोर्स-ताकद आपोआप निर्माण झाली व ती कोल्‍यूजन किंवा एस्‍टर्नल मीन्‍समुळे झाली नाही असे त्‍याचे मत आहे.  याठिकाणी असा प्रश्‍न निर्माण होतो की, निर्जिव वस्‍तूत आपोआप फोर्स-ताकद निर्माण होणार नाही, जोपर्यंत ती वस्‍तू कोल्‍यूजनमध्‍ये किंवा दुस-या वस्‍तूच्‍या संपर्कात येत नाही तोपर्यंत तिच्‍यात आपोआप ताकद निर्माण होणार नाही.  त्‍यामुळे सर्व्‍हेअरने दिलेले मत हे योग्‍य व तर्किक वाटत नाही व त्‍याचा आधार घेऊन विमा कंपनीने तक्रारदाराचा क्‍लेम नाकारला आहे.  अपघात होऊनसुध्‍दा अशा प्रकारचे कारण दाखवून विम्‍याची नुकसानी नाकारणे म्‍हणजे त्रुटीपूर्ण सेवा असल्‍याचे मंचाचे मत आहे.  विमा उतरविण्‍यामागचा हेतू हा एखादया व्‍यक्‍तीचे नुकसान झाले तर त्‍याची भरपाई मिळणे एवढा असतो.  याठिकाणी सुध्‍दा तक्रारदारानी विमा काढला आहे व त्‍याचे जे नुकसान झाले आहे ते त्‍याने कागदोपत्री दाखवून दिले आहे.  अशी परिस्थिती असतानाही विमा कंपनीने नियमाचा आधार घेऊन वस्‍तुस्थिती काय आहे याचा विचार न करता सर्व्‍हेअरच्‍या अहवालावर अवलंबून राहून तक्रारदारांचा दावा तांत्रिक कारणास्‍तव नाकारला आहे.  विमा कंपनी नियमाचा आधार घेऊन अंतर्गत व बाहय ताकद असा श्‍लेष किंवा भ्रम निर्माण करुन तक्रारदाराचा क्‍लेम नाकारीत आहे त्‍यामुळे त्‍यांची ही कृती निश्चितपणे सेवेतील त्रुटी दाखवते असे मंचाचे मत आहे.  सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होय असे आहे.

विवेचन मुद्दा क्र.2

9.          तक्रारदारानी आपल्‍या अर्जामध्‍ये ट्रेलरची नुकसानी तसेच तीन महिन्‍याचे सरासरी दरमहा रु.20,000/-प्रमाणे एकूण रु.60,000/-ची मागणी केली आहे.  तसेच वाहन कर्जाऊ घेतले व त्‍यासाठी त्‍याला 14% प्रमाणे व्‍याज दयावे लागले ती नुकसानभरपाई मागितली आहे व अपघाताच्‍या ठिकाणापासून गॅरेजपर्यंत ट्रेलर ओढून न्‍यावा लागला त्‍याला आलेला खर्च रु.5,000/- तो मागत आहे व न्‍यायिक खर्चापोटी रु.5,000/- मागत आहे.

            त्रुटीपूर्ण सेवा दिली गेल्‍याचे दिसून आले तर तक्रारदाराच्‍या अर्जातील मागण्‍यांचा विचार करता येईल परंतु ज्‍या सर्व मागण्‍या मागत आहे त्‍या मंजूर करता येतील काय हा प्रश्‍न आहे.  मंचाच्‍या मते अपघातात त्‍याच्‍या ट्रेलरचे जे नुकसान झाले तेवढेच त्‍याला मागता येईल कारण ट्रेलरचा विमा त्‍याने उतरवला होता व त्‍यासाठी त्‍याने प्रिमियम दिला आहे.  त्‍यांच्‍या व्‍यवसायाचे जे नुकसान झाले ते त्‍याला मागता येणार नाही.  त्‍याने विमा उतरवला नसता तर त्‍याला स्‍वतःहून स्‍वखर्चाने ट्रेलर दरुस्‍त करुन घ्‍यावा लागला असता व त्‍यामध्‍ये त्‍याचा जो वेळ गेला असता त्‍यामुळे त्‍याचे जे नुकसान झाले असते ते त्‍याने सोसणे आवश्‍यक होते.  या तक्रारीत सुध्‍दा त्‍याला वाहन दुरुस्‍तीसाठी तीन महिन्‍याचा कालावधी गेला आहे तो त्‍याच्‍या चुकीमुळे गेला आहे व तो विमा कंपनी देण्‍यास पात्र नसल्‍याचे मंचाचे मत आहे.  तसेच त्‍याने कर्ज घेऊन वाहन घेतले असेल तर त्‍या कर्जाची फेड करण्‍याची जबाबदारी त्‍याची स्‍वतःची आहे.  केवळ विमा कंपनीने रक्‍कम दिली  नाही म्‍हणून 14%प्रमाणे व्‍याज मिळावे ही त्‍याची मागणी न पटणारी आहे व अपघाताच्‍या ठिकाणापासून गॅरेजपर्यंत ट्रेलर ओढून नेण्‍यासाठी जो खर्च आला तो त्‍याने सोसणे आवश्‍यक आहे.   विमा कंपनी मात्र त्‍यांचे जेवढे नुकसान झाले तेवढेच देण्‍यास पात्र आहे, अन्‍य नुकसानी देण्‍याची जबाबदारी विमा कंपनीची नाही.  जर विमा कंपनीमुळे त्‍याचे हे नुकसान झाल्‍याचे तो म्‍हणतो ते त्‍याने दाखवून दिले असते तर त्‍याला ही नुकसानी देणे उचित ठरले असते.  परंतु या तक्रारीत तसे काही झालेले नाही. 

            मात्र सामनेवालेनी त्‍यांचा क्‍लेम मंजूर न केल्‍यामुळे त्‍याला जो शारिरीक, मानसिक त्रास झाला त्‍यात त्‍याला जो त्रास सोसावा लागला तसेच विमाकंपनीने त्‍यांचा दावा नाकारल्‍यामुळे त्‍याला ही तक्रार करावी लागली, त्‍यासाठी त्‍याला जो खर्च आला तो मिळणे उचित असल्‍याचे मंचाचे मत आहे.  सामनेवालेनी वेळचेवेळी दावा मंजूर केला असता तर हा प्रश्‍न निर्माण होत नव्‍हता.  त्‍याने शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.15,000/-ची मागणी केली आहे व न्‍यायिक खर्चापोटी रु.5,000/-ची मागणी केली आहे.  तसेच त्‍याने ट्रेलरच्‍या नुकसानीबाबतचे कोटेशनही दाखल केले आहे, ते दि.27-7-07 चे आहे व सर्व्‍हेअरचा रिपोर्ट दि.26-7-07 चा आहे.  यावरुन एवढाच अर्थ निघतो की, सर्व्‍हेअरचा अहवाल तक्रारदारास प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍याने कोटेशन बनवून घेतले आहे.  परंतु सर्व्‍हेअरने आपल्‍या अहवालात रु.96,520/-चा अपेक्षित खर्च नमूद केला आहे.  मंचाच्‍या मते तक्रारदारानी त्‍याच्‍याअर्जात तीच मागणी केली आहे व त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, त्‍याला रु.96,520/- ची नुकसानी देण्‍याबाबत तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.2,000/- देण्‍याबाबत आदेश करणे योग्‍य होईल.

10.         सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो-

                              -ः आदेश ः-

 

     सामनेवालेनी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे-

अ)   सामनेवालेनी तक्रारदारास रु.96,520/-(रु.शहाण्‍णव हजार पाचशे वीस मात्र) ट्रेलरच्‍या नुकसानीपोटी दयावेत व या रकमेवर तक्रारदाराने सामनेवालेकडे क्‍लेम दाखल तारखेपासून द.सा.द.शे.8% प्रमाणे संपूर्ण रक्‍कम देईपर्यंत नुकसानीदाखल व्‍याज दयावे.

ब)   सामनेवालेनी तक्रारदारास शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) दयावेत.

क)   न्‍यायिक खर्चापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) दयावेत.

ड)   वर कलम 'अ' व 'ब' मधील रकमा याप्रमाणे सामनेवालेनी न दिल्‍यास त्‍याला द.सा.द.शे. 8% व्‍याजदराने वसूल करण्‍याचा अधिकार तक्रारदारास राहील.

इ)   उभय पक्षकारांना आदेशाच्‍या सत्‍यप्रती पाठविण्‍यात याव्‍यात.

ठिकाण- रायगड-अलिबाग.

दिनांक- 29-9-2008.