Maharashtra

Kolhapur

cc/10/715

Vikas Vakoji Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

H.P.Randive

08 Apr 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. cc/10/715
1. Vikas Vakoji PatilPlot no. 10, Rajrshi Shahu Colony, Kasba Bawda, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. LtdDivisional Office, Kanchanganga, 204 E, Station Road, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :H.P.Randive, Advocate for Complainant
Sou. N.D.Joshi , Advocate for Opp.Party

Dated : 08 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र :- (दि.08/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.
 
           सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्‍य व न्‍याय क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) प्रस्‍तुत सामनेवाला विमा कंपनीकडे दि.15/09/2008 रोजी तक्रारदाराने स्‍वत:चे व त्‍याचे कुटूंबियाचे युनिव्‍हर्सल हेल्‍थ पॉलीसी उतरविलेली होती. सदर पॉलीसीचा क्र.47/2009/1785(मेडिक्‍लेम) असा आहे व निर्धारित विमा रक्‍कम रु.30,000/- इतकी आहे. तक्रारदाराचे कुटूंबामध्‍ये तक्रारदारासह एकूण 6 व्‍यक्‍ती असून त्‍यांची नांवे विमा पॉलीसीमध्‍ये नमुद आहेत. प्रस्‍तुत तक्रारदारांचे मातोश्री सौ.विमल वाकोजी पाटील या डायस फंक्‍शनल युटेरील ब्‍लीडींग या आजाराने आजारी होत्‍या . त्‍यामुळे त्‍यांना डॉ. हणमंत एस.पाटील, एम.बी.बी.एस. यांचे ज्ञानदिप नर्सिंग होम, मेन रोड, कसबा बावडा, कोल्‍हापूर येथे दाखल करुन दि.29/07/2009 रोजी अॅबडॉमिनल हिस्‍ट्रॅक्‍टोमी चे ऑपरेशन केले आहे. सदर ऑपरेशनकरिता रु.20,000/- इतका खर्च करावा लागला. दि.27/07/2009 ते 07/08/2009 पर्यंत त्‍यांनी इनडोअर पेशंट म्‍हणून सदर दवाखान्‍यात उपचार घेतलेले आहेत.वरीलप्रमाणे वस्‍तुस्थिती असताना सामनेवाला यांनी तक्रारदाराने सामनेवालांकडे दि.17/08/2009 रोजी रु.10,500/- इतक्‍या रक्‍कमेचा क्लेम केलेला होता. तथापि, कोणत्‍याही सबळ कारण अगर स्‍पष्‍टीकरणाशिवाय रु.7,875/- इतक्‍या रक्‍कमेचा क्‍लेम दि.30/09/2009 रोजी मंजूर केलेला असून उर्वरित रु.2,625/-चा क्‍लेम एकतर्फी नामंजूर केलेला आहे. रु.7,875/- रक्‍कम मान्‍य नसलेने व नामंजूर केलेल्‍या रक्‍कमेबाबत तांत्रिक अडचण येऊ नये म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत रक्‍कम स्विकारली नाही.
 
           नमुद नामंजूर केलेली रक्‍कम रु.2,625/- ची तक्रारदाराने मागणी केली. मात्र सामनेवालांनी सदर रक्‍कम न दिलेने सदर मे. मंचात ग्राहक तक्रार क्र.700/09 ही तक्रार दाखल केली होती. नमुद तक्रारीचा गुणदोषावर निकाल होऊन दि.29/09/2010 रोजी नामंजूर केलेली रक्‍कम रु.2,625/- द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याजासह देणेबाबतचा आदेश मे. मंचाने पारीत केला. मात्र दि.30/9/2009 रोजी मंजूर केलेली विमा रक्‍कम रु.7,875/- सामनेवालांनी तक्रारदारास अदा केलेली नाही. त्‍यामुळे दि.22/11/2010 रोजी तक्रारदाराने प्रस्‍तुत मंजूर केलेली रक्‍कम व्‍याजासहीत अदा करणेबाबत वकील नोटीस पाठवली. सदर नोटीस दि.23/11/2010 रोजी मिळूनही सामनेवालांनी त्‍यास उत्‍तर दिलेले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन रक्‍कम रु.7,875/- दि.30/09/2009 ते 15/12/2010 पर्यंतचे द.सा.द.शे. 18 टक्‍केने होणारी व्‍याजाची रक्‍कम रु.1,712.81 असे एकूण रक्‍कम रु.9,587/- सामनेवालांकडून वसूल होऊन मिळावेत तसेच प्रस्‍तुत रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(04)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला विमा कंपनीचे पत्र, ग्राहक तक्रार क्र.700/09 चे निकालपत्र, वकील नोटीस, सदर नोटीस पाठविलेली पावती व पोहोच पावती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(05)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला विमा कंपनीने पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार यांचा क्‍लेम रु.7,875/-मंजूर केला व तसे व्‍हौचर तक्रारदारास पाठविणेत आले होते. मात्र त्‍यास कोणतेही उत्‍तर न देता मे. मंचात ग्राहक तक्रार क्र.700/09 दाखल केली. सदर तक्रारीत रक्‍कम रु.10,500/- ची मागणी न करता रु.2,625/- ची मागणी केली. सदरची रक्‍कम आदेशाप्रमाणे व्‍याजासहीत मे. मंचात भरलेली आहे. वस्‍तुत: मंजूर क्‍लेम नामंजूर होता तर सर्व रक्‍कमेसाठी मे;मंचासमोर दाद मागणे न्‍यायाचे दृष्‍टीने योग्‍य होते. तसे न करता केवळ रु.2,625/- चा दावा दाखल केला. मे. मंचाचे आदेशाप्रमाणे सदर रक्‍कम भरलेली आहे. सबब सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही. सबब प्रस्‍तुतची तक्रार नामंजूर करणेत यावी व तकारदाराकडून सामनेवालांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावा अशी विनंती केलेली आहे.
 
(06)       सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(07)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
 
           अ) तक्रारदाराने प्रस्‍तुत मेडिक्‍लेमबाबत ग्राहक तक्रार क्र.700/09 तक्रार दाखल केलेल होती. सदर तक्रारीबाबत गुणदोषावर दि.29/09/2010 रोजी आदेश पारीत केलेला होता. सदर आदेशामध्‍ये तक्रारदाराने रु.10,500/- क्‍लेम मागणी केलेली होती व दि.30/09/2009 रोजी सामनेवाला विमा कंपनीने रक्‍कम रु.7,875/- मंजूर केलेले होते. तक्रारदारास सदर रक्‍कम मंजूर नसलेने रु.10,500/- मधून मंजूर रक्‍कम रु.7,875/- वजा जाता उर्वरित रक्‍कम रु.2,625/- बाबत तक्रार दाखल केलेली होती. प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचाने मंजूर करुन उर्वरित रक्‍कम रु.2,625/- दि.30/09/2009 पासून देणेबाबत आदेश केलेला होता. त्‍याप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने आदेशाप्रमाणे रक्‍कम भरलेली आहे.
 
           पुन्‍हा त्‍याच क्‍लेमबाबत तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे. वस्‍तुत: तक्रारदाराने रक्‍कम रु.7,875/- मंजूर रक्‍कम वजा जाता उर्वरित रु.2,625/- ची मागणी केलेचे प्रस्‍तुत निकालपत्रात स्‍पष्‍ट केलेले आहे. मात्र तक्रारदाराचे म्‍हणणेप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने रक्‍कम रु.7,875/- दिलेली नाही. त्‍यामुळे पुन्‍हा ही तक्रार दाखल करावी लागलेचे प्रतिपादन केलेले आहे. प्रस्‍तुतची रक्‍कम विमा कंपनी देईल अशी अपेक्षा ठेवून तक्रारदाराने उर्वरित रक्‍कम रु.2,625/- बाबत तक्रार दाखल केली होती व सदरची तक्रार मे. मंचाने मंजूर केलेली आहे. मात्र सामनेवाला विमा कंपनीने जाणीवपूर्वक रक्‍कम रु.7,875/- नोटीस देऊनही अदा न केलेने प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली असा युक्‍तीवाद केलेला आहे. वस्‍तुत: तक्रारदाराने मूळ ग्राहक तक्रार क्र.700/09 मध्‍येच संपूर्ण रक्‍कमेची मागणी करावयास हवी होती. तशी न करता उर्वरित रक्‍कम रु.2,625/- ची मागणी केली त्‍याप्रमाणे सदर मंचाने सदर तक्रारीमध्‍ये आदेश पारीत केलेला आहे. पुन्‍हा त्‍याचा क्‍लेम संदर्भात प्रस्‍तुतची तक्रार 715/2010 दाखल केलेली आहे. यापूर्वी सदर क्‍लेमबाबत सदर मंचाने निर्णय दिलेला असलेने प्रस्‍तुत तक्रारीस रेस ज्‍युडिकाटा तत्‍वाचा बाध येत असलेने प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार काढून टाकणेत येते.
 
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT