Maharashtra

Kolhapur

CC/11/153

Smt. Rekha Prakash Patil - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

R.G.Shelke.

20 Jul 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/11/153
 
1. Smt. Rekha Prakash Patil
Dindnerli, Tal. Karveer
Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co. Ltd
204 E Station Road, kanchanganga,Kolhapur.
Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:R.G.Shelke., Advocate for the Complainant 1
 
ORDER
  
 
 
 
 
नि का ल प त्र :- (दि.20.07.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
 (1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांच्‍या पतीचा शेती हा व्‍यवसाय होता. तक्रारदार  यांचे पतीचा ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’  अंतर्गत पॉलिसी तक्रारदारांच्‍या पतीचा शासनामार्फत विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला होता.  तक्रारदारांच्‍या पतीच्‍या नावे शेती असून त्‍याचा खाते नं. 535 असा आहे. तक्रारदारांचे मयत पती प्रकाश आनंदा पाटील हे दि. 5/06/2009 रोजी उसाचे शेतीमध्‍ये पाला काढण्‍यासाठी गेले असता, शेतातील इलेक्‍ट्रीक पोलचा शॉक लागून ते जागेवरच मयत झाले. त्‍यानंतर तक्रारदारांचे पतीचे शवविच्‍छेदन केलेले आहे.  त्‍यामध्‍ये इलेक्‍ट्रीक पोलचा शॉक लागून मयत झाले आहेत व तसा मृत्‍यू दाखला दिलेला आहे. व त्‍यांचा व्हिसेरा रिपोर्टही आलेला आहे.  तक्रारदाराचे पती इलेक्‍ट्रीक पोलचा शॉक लागून मयत झाले याबाबतची फीर्याद करवीर पोलिस स्‍टेशन यांना दिलेली आहे. तक्रारदारांना विमा योजनेअंतर्गत क्‍लेम रक्‍कम मिळण्‍यासाठी योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांसह दि. 17/08/2009 रोजी तालुका कृषी अधिकारी, कळंबा तर्फ ठाणे यांचेमार्फत क्‍लेम रक्‍कमेची मागणी केली असता तक्रारदारांना क्‍लेमबाबत अद्याप काहीही कळविलेले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन विमा रक्‍कम रु. 1,00,000/-  
द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तालुका कृषी अधिकारी करवीर यांना क्‍लेम फॉर्मसोबत दिलेले पत्र, तक्रारदार यांनी दिलेला क्‍लेम फॉर्म, गट नं. 1723 चा सात-बाराचा उतारा, खाते नं. 535 चा 8 अ चा उतारा, घटना स्‍थळाचा पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, मृत्‍यूचा दाखला, फायनल मृत्‍यूचा दाखला, तक्रारदार यांनी क्‍लेम फॉर्म सामनेवाला यांना पाठविला त्‍याची रजि. ए. डी. ची पावती, तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीला क्‍लेम पाठविला त्‍याची पोस्‍टाची पोहच पावती इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात,  तक्रारदारांनी क्‍लेमची मागणी केलेली आहे परंतु त्‍यांना याबाबत काहीही कळविलेले नाही हे तक्रारदारांचे कथन मान्‍य नाही. तसेच तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा विजेचा शॉक लागून झालेला आहे हे कथन मान्‍य नाही. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या क्‍लेम फॉर्मसोबत 7/12, गाव नमुना नं. 6 क व ड सदर कागदपत्रे अपुरी असल्‍यामुळे निर्णय घेणे अडचणीचे झालेले आहे. सबब, सामनेवाला विमा कंपनी यांनी सेवेत त्रुटी नसल्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.    
  
 
(5)   सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत सामनेवाला विमा कंपनीने पाठविलेल्‍या पत्राच्‍या प्रती, क्‍लेम फॉर्म, इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
 
(6)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे विहित वेळेत क्‍लेमची मागणी केलेली आहे. सदर क्‍लेम फॉर्मचे सहपत्र प्रस्‍तुत कामी दाखल आहे. त्‍यामध्‍ये 7/12 चा मुळ उतारा, तलाठयाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, मृत्‍यू दाखला, पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, मरणोत्‍तर पंचनामा, फॉर्म ए व बी, मेडिकल रिपोर्ट, मयताचे प्रमाणपत्र, तसेच फायनल मेडीकल मत, तहसिल कार्यालयाचा क्‍लेम फॉर्म पाठविल्‍याची पोहच इत्‍यादी कागदपत्रे सामनेवाला यांनी दाखल केलेली आहेत त्‍याचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. उपरोक्‍त कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा अपघाती झाल्‍याची त्‍यांना इलेक्‍ट्रीक शॉक लागू अपघाती मृत्‍यू झाल्‍याची वस्‍तुस्थिती या मंचासमोर येते व त्‍या अनुषंगाने मृत्‍यू दाखला, पी. एम. रिपोर्ट, मेडीकल ऑफीसरचे मृत्‍यूबाबतचा अहवाल इत्‍यादी कागदपत्रांवरुन ही बाब स्‍पष्‍ट दिसून येते. सामनेवाला कंपनीने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारारांनी 7/12,गाव नमुना क व ड दाखल केलेला नाही असे प्रतिपादन केले आहे. परंतु युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवाला यांचे वकिलांनी 7/12 दाखल केल्‍याचे मान्‍य केलेले आहे. परंतु सदर 7/12 हा आवश्‍यक असल्‍याचा पुरावा होत नाही. गाव नमुना 7 अ व ड आहेत असे प्रतिपादन केलेले आहे. परंतु सामनेवाला कंपनीने अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करुन द्यावी याबाबत तक्रारदारांना कळविलेले नाही. तसेच 7/12 वरती तक्रारदारांची नावासदरी नोंद आहे याचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने विचार केलेला नाही. वास्‍तविक पाहता 7/12 च्‍या नोंदीवरुन तक्रारदारांचे पती शेतकरी आहेत ही बाब दिसत असूनही तक्रारदारांच्‍या विमा क्‍लेमवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामनेवाला विमा  क्‍लेम नाकारणे ही विमा कंपनीचे सेवेतील गंभीर त्रुटी दिसून येते. ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम, 14-(ड) त्‍यातील तरतुदींचा व उपरोक्‍त विवेचनाचा  विचार करता तक्रारदार हे सामनेवाला विमा कंपनीकडून दंडात्‍मक नुकसानभरपाई (Punitive Damages) मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार हे व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याने मानसिक त्रासापोटी रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. सबब, आदेश.                    
            
                                  - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 5.06.2009 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना दंडात्‍मक नुकसानभरपाई (Punitive Damages) रक्‍कम रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
 
4.    सामनेवाला   विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
 
 
 
[HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.