Maharashtra

Kolhapur

CC/11/43

Smt. Laxmi Pandit Gurav - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

R.G.Shelake

09 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/43
1. Smt. Laxmi Pandit GuravKeloshi, Tal. RadhanagariKolhapur.Maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd204 E, Station Road, Kanchanganga,Kolhapur.Kolhapur.Maharashtra2. Kabal General Insurance Services Pvt Ltd101 Karandikar House, ShivajinagarPuneMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :R.G.Shelake, Advocate for Complainant
P.R. Kolekar, Advocate for Opp.Party

Dated : 09 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 नि का ल प त्र :- (दि.9.08.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांचे वकील हजर. सामनेवाला क्र. 2 गैरहजर. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला.
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     तक्रारदारांचा व्‍यवसाय शेती असून त्‍यांचे शेतजमिनीचा खाते नं. 267 असा असून सामनेवाला विमा कंपनीकडे 'शेतकरी अपघात विमा योजने' अंतर्गत तक्रारदारांचा विमा उतरविलेला आहे. दि. 9/04/2009 रोजी तक्रारदारांचे पती उसाच्‍या शेतामध्‍ये पाणी पाजण्‍यासाठी गेले असता ते घरी परत आले नाहीत म्‍हणून रात्री 10.00 वाजता शोधाशोध घेतली. तक्रारदारांचे पती उसाच्‍या वाफयात बेशुध्‍द अवस्‍थेत पडलेचे दिसून आले. त्‍यास ग्रामीण रुग्‍णालय, सोंळाकूर येथे हलविले असता डॉक्‍टरांनी सर्पदशांने मृत म्‍हणून घोषित केले. तक्रारदारांनी दि. 18/08/2009 रोजी योग्‍य त्‍या कागदपत्रासह विमा क्‍लेमची मागणी केली असता विमा कंपनीने क्‍लेमबाबत काही निर्णय घेतलेला नाही. सबब, क्‍लेम रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तालुका कृषिअधिकारी यांचेकडे भरुन दिलेला क्‍लेम फॉर्म, पान नं. 1 ते 15, ग्रामपंचायत केळोशी यांचेकडील मृत्‍यू दाखला, ज्ञानू शंकर गुरव यांचा वर्दी जबाब, व पुरवणी जबाब, घटना स्‍थळाचा पंचनामा, मयत पंडीत शंकर गुरव याचे प्रेताचे पी.एम. रिपोर्ट, प्रेताचा मरणोत्‍तर पंचनामा, पार्वती सिताराम गुरव यांचा जबाब, शंकर सिताराम गुरव यांचा जबाब, तालुका कृषीअधिकारी यांचे पत्र, कबाल जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीचे पत्र इत्‍यादींच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.
 
(4)   सामनेवाला  क्र. 1 विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारीतील तक्रारदारांची कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, दि. 9/04/2009 रोजी तक्रारदारांचे पती मयत झाले परंतु क्‍लेम मागणी सोबत कागदपत्रांमध्‍ये व्हिसेरा रिपोर्ट व मृत्‍यू कारणांचा अंतिम अहवाल जोडलेला नव्‍हता. तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू सर्पदशांने झाल्‍याचे कथन केलेले आहे. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हृदयविकाराने झाल्‍याचे नमूद केले आहे. सर्पदशांने मृत्‍यू झाल्‍याचा कोणताही रिपोर्ट नाही. त्‍यामुळे तक्रारदारांची क्‍लेम फाईल बंद करुन क्‍लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. 
 
(4)   सामनेवाला क्र. 2 यांनी त्‍यांचे म्‍हणणे देऊन तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. व तक्रारदारांची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे. 
 
(5)      सामनेवाला क्र. 2 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यासोबत  शासन निर्णय इत्‍यादींच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.  
 
(6)   या मंचाने तक्रारदारांची तक्रार व सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांचा युक्‍तीवाद विस्‍तृत व सविस्‍तर ऐकला आहे. तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा सर्पदशांने झाला असल्‍याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. परंतु उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी पोलिस स्‍टेशनमध्‍ये दिलेला दि. 10/04/2009 रोजीचा तक्रारीत दाखल केलेल्‍या वर्दी जबाबामध्‍ये तक्रारदारांच्‍या पतीचा मृत्‍यू हा हृदयविकाराने झाल्‍याचे नमूद केले आहे. तसेच इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट यांचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍येही मृत्‍यू सर्पदंशाने झाला असल्‍याचे नमूद केलेले नाही इत्‍यादींचा विचार करता तक्रारदारांनी त्‍यांचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाला आहे याबाबत कोणताही सर्वसंमत पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला विमा कंपनीने क्‍लेम फाईल बंद करुन तक्रारदारांना क्‍लेम नाकारला आहे यामध्‍ये त्‍यांची कोणतीही सेवा त्रुटी दिसून येत नाही. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज काढून टाकावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.  
   
                               - आ दे श -
1.    तक्रारदारांची तक्रार अर्ज काढून टाकणेत येतो.    
3.    खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
          
 
 
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT