Maharashtra

Kolhapur

CC/11/96

SmSushila Aananda Lokare - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

S.M.Potdar

19 Jul 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/11/96
 
1. SmSushila Aananda Lokare
Aanur, Tal. Kagal
Kolhapur.
Maharashtra.
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Co. Ltd
Lokal Branch Manager, 204 E Station road, Kanchanganga,Kolhapur.
Kolhapur.
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:S.M.Potdar, Advocate for the Complainant 1
 Chaya Jadhav, Advocate for the Opp. Party 1
ORDER

  नि का ल प त्र :- (दि.19.07.2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.

 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
     तक्रारदार यांचे मयत पती आनंदा महादेव लोकरे  यांचा विहिरीचे पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला आहे. सर्व कागदपत्रासह सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेमची मागणी केली असता त्‍याचा पाठपुरावा करुन सामनेवाला विमा कंपनीने कोणतीही कार्यवाही केलली नाही. या उलट दि. 30/11/2008 रोजी पोलिस फायनल समरी 10 दिवसांमध्‍ये पाठविली नाही तर असे कारण देऊन क्‍लेम नाकारला आहे. 
   
 
     तक्रारदार पुढे सांगतात की,  दि. 02/23/2009 रोजीच्‍या अपघाती मृत्‍यूबाबतची सर्व कागदपत्रे म्‍हणजेच वर्दी, घटनास्‍थळीचा पंचनामा, जाबजबाब, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट ,  कॉज ऑफ डेथे सर्टिफीकेट, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शेतकरी असल्‍याबाबतचे खाते उतारे इत्‍यादी कागदपत्रे क्‍लेम फॉर्मसोबत जोडून पाठविले असता ते कागदपत्र शासनाच्‍या प्राधिकृत अधिका-यामार्फत पाठविले असतानाही चुकीचे कारणास्‍तव क्‍लेम नाकारलेला आहे. सबब, विमा रक्‍कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 2,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदारानी वारसा नोंद वही गाव नमुना 6-क, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शवपरिक्षेकरिता पाठवावयाचा पोलिस अहवाल, पोस्‍ट मार्टेम झालेबाबतचे सर्टीफीकेट, व पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, श्री. काकासो आनंदा लोकरे, दिपाली काकासो लोकरे व काशीराम महादेव लंबे यांचे जबाब, सामनेवाला यांनी दि. 30/11/2010 रोजी तक्रारदारास पाठविलेले पत्र व शासन निर्णय इत्‍यादींच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
 
(4)        सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी पोलिस फायनल समरी कागदपत्रे दहा दिवसाच्‍या आत पाठविणेबाबत दि. 30/11/2010 रोजी पत्र पाठविले आहे.   समरी कागदपत्र न दाखल करता प्रस्‍तुतची तक्रार दाखल झालेली आहे या कारणास्‍तव प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
 
  
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला तसेच उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. युक्‍तीवादाचे वेळेस तक्रारदारांचे वकिलांनी तक्रारदारांचे पती आनंदा महादेव लोकरे यांचे दि. 2/02/2009 रोजी पाण्‍यात बुडून मृत्‍यू झालला आहे. व त्‍या अनुषंगाने पोलिस स्‍टेशन कडील जाब जबाब, पंचनामा त्‍या अनुषंगाने पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, कॉज ऑफ डेथ  सर्टिफीकेट, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, शेतकरी असलेबाबतचा खाते उतारा इत्‍यादी कागदपत्रे क्‍लेम फॉर्मसोबत पाठविल्‍याचे या मंचाचे निदर्शनास आणून दिलेले आहे. वास्‍तविक पाहता ’शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत  राज्‍यातील शेतक-यांसाठी पॉलिसी उतरविलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणाचा विचार करता तक्रारदारांचे पती हे शेतकरी आहेत त्‍यांचा पाण्‍यात बुडून अपघाती मृत्‍यू झालेला आहे. त्‍या अनुषंगाने उपरोक्‍त वर्णन केलेले कागदपत्रे सामनेवाला कंपनीकडे दाखल केलेली आहेत. सदर कागदपत्रांवरुन अपघाती मृत्‍यू असलेबाबतचे स्‍पष्‍टपणे दिसून येते अशी वस्‍तुस्थिती असल्‍याकारणाने पोलिस अथोरिटीकडील समरी केसपेपर्स दिलेले नाहीत या कारणावरुन क्‍लेम फाईल बंद करणे ही सामनेवाला विमा कंपनी यांची कृती अत्‍यंत तांत्रिकपणाची असून सेवेतील गंभीर त्रुटी आहे. उपरोक्‍त कागदपत्रांचा विचार करता अपघाती मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसुन येते. सामनेवाला विमा कंपनी यांनी तांत्रिकपणे विमा क्‍लेम नाकारणे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे याचा विचार करता ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम, 14-(ड) त्‍यातील तरतुदींचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीने  तक्रारदारांना दंडात्‍मक नुकसानभरपाई (Punitive Damages)द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.     
    
 
          
 
                               - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि.30.11.2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना दंडात्‍मक नुकसानभरपाई (Punitive Damages) रक्‍कम रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
 
4.    सामनेवाला  विमा  कंपनीने  तक्रारदारांना  तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.
          
          
 
 
 
 

 

 
 
[HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.