Maharashtra

Kolhapur

CC/11/381

Yeshwant Maruti Kamble - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Shital Potdar

10 Oct 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/381
1. Yeshwant Maruti KambleMhalunge Tal.Karveer Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. The Oriental Insurance Co. Ltd.Local Br. Manager, Kanchanganga 204 E Station Road Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital Potdar, Advocate for Complainant
Sau. Chhaya Jadhav, Advocate for Opp.Party

Dated : 10 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

नि का ल प त्र :- (दि.10/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)   प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
          
      तक्रारदारांच्‍या म्‍हैशीचा विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविलेला आहे. सदर म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ल्‍याचा क्रमांक ओआयसी/161600/31268 असा आहे. तक्रारदारांची सदरची म्‍हैस दि. 03/09/2010 रोजी आजारी पडून मयत झाली. सामनेवाला कंपनीकडे त्‍यानंतर क्‍लेमची रक्‍कम रु. 10,000/- ची मागणी केली असता दि. 28/02/2011 रोजी सामनेवाला यांनी फोटोमधील शिंगाचे वर्णन जुळत नाही  असे चुकीचे उत्‍तर देवून तक्रारदारांचा न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे. 
 
     तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे सांगतात सदर विमाधारक म्‍हैशीच्‍या प्रपोझल फॉर्म ते  मृत्‍यपर्यंतच्‍या सर्व कागदपत्रांमधील वर्णन एकच असून सामनेवाला यांनी पॉलिसी उतरविताना मारलेला टॅग सदर मयत म्‍हैशीच्‍या कानातच होता.   व त्‍यासंदर्भातील आवश्‍यक सर्व कागदपत्रांसह क्‍लेम फॉर्मसोबत जोडलेली आहेत. तक्रारदारांचा क्‍लेम खोटया कारणास्‍तव न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारलेला आहे. सबब, विमा क्‍लेम रक्‍कम रु. 10,000/- दि. 03/12/2010 पासून द.सा.द. शे. 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा आदेश व्‍हावा व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.    
 
(3)   तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार  यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्र, च कियप पॅकेज पॉलिसी प्रस्‍तावपत्र, पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट, इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र  दाखल केलेले आहे. 
 
(4)   सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याअन्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार चुकीची आहे. तक्रारदारांना तक्रार करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. म्‍हैशीच्‍या कानातील बिल्‍ला तुटलेला आहे. तसेच म्‍हैशीच्‍या क्‍लेमफॉर्ममध्‍ये म्‍हैशीच्‍या मृत्‍यूची तारीख 3/09/2010 ही नमूद केलेली आहे.  प्रपोझल फॉर्मवर म्‍हैशीची शिंगे पाठगोल अशी लिहिली आहेत. पण प्रत्‍यक्षात व फोटोमध्‍ये म्‍हैशीची शिंगे पाठकोचारी असे आहेत.   म्‍हैशीच्‍या वर्णनामध्‍ये शिंगाचे वर्णन जुळत नसल्‍यामुळे म्‍हैशीचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे.    सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.  
 
(5)   या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकला व   व उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे.   प्रस्‍तुत प्रकरणातील किसान पॅकेज पॉलिसी-प्रस्‍तावपत्र पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे या मंचाने अवलोकन केलेले आहे. तक्रारदार तक्रारीत सांगतात त्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या म्‍हैशीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला आहे.   सदर विमाधारक म्‍हैस आजारी कारणावरुन दि. 3/09/2010 रोजी मृत्‍यू पावलेली आहे. त्‍याअनुषंगाने पोस्‍ट मार्टेम सर्टीफीकेट प्रस्‍तुत कामी दाखल केलेले आहे. सामनेवाला विमा कंपनीने विमा उतरविलेली म्‍हैशीची शिंगांचे वर्णन जुळत नाहीत या कारणावरुन क्‍लेम नाकारलेला आहे. परंतु सदर म्‍हैशीच्‍या कानांमध्‍ये मृत्‍यूसमयी बिल्‍ला होता ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. सामनेवाला विमा कंपनीने विमा उतरविलेली म्‍हैस ही आजारी पडून मयत झाली याबाबत कोणतेही इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केलेले नाही व तसा अहवाल दाखल केलेला नाही.  इन्‍व्‍हेस्‍टीगेशनशिवाय काढलेला निष्‍कर्ष हा कायद्याने अयोग्‍य आहे. यामध्‍ये सामनेवाला विमा कंपनीची सेवा त्रुटी दिसून येते.  वस्‍तुस्थितीचा विचार करता अत्‍यंत तांत्रिकपणे तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे ही बाब विचारात घेता तक्रारदार हे विमा क्‍लेम रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश    
                    
                            - आ दे श -
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
2.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्‍लेम रक्‍कम रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. तसेच, सदर रक्‍कमेवर दि. 3/12/2010 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍केप्रमाणे व्‍याज द्यावे.
3.    सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT