Maharashtra

Thane

CC/08/576

V. N. Balakrishnan Nair - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

05 Dec 2009

ORDER


.
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
consumer case(CC) No. CC/08/576

V. N. Balakrishnan Nair
...........Appellant(s)

Vs.

The Oriental Insurance Co. Ltd.
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 576/2008

तक्रार दाखल दिनांक – 23/12/2008

निकालपञ दिनांक – 05/12/2009

कालावधी - 11 वर्ष 00 महिना 13 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

व्हि. एन.बाला‍कृष्‍णन नायर

903, फ्लोरेन्‍टीना, लोधा पॅरडाईज,

माजीवाडा, ठाणे() 400 601. .. तक्रारदार

विरूध्‍द

    दि. ओरिएन्‍टल इंशुरन्‍स कं. लि.,

    ठाणे डिव्हिजनल ऑफिस,

    अर्जुन टॉवर, तीसरा मजला,

    गोखले रोड, नौपाडा,

    ठाणे (). .. विरुध्‍दपक्ष

     

समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्‍यक्षा

श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

सौ. भावना पिसाळ - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क स्‍वतः

वि.प तर्फे वकिल आर.एस.चहल

आदेश

(पारित दिः 05/12/2009)

मा. सदस्‍य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार

1. सदरहु तक्रार व्‍ही. एन. बालकृष्‍णन नायर यांनी ओरीएंटल इंशुरन्‍स कं. विरुध्‍द दाखल केली आहे. यामध्‍ये त्‍यांनी विरुध्‍द पक्षकार कडे त्‍यांच्‍या नवनिर्मित केलेल्‍या मेडिक्‍लेम पॉलीसीचे नाकारलेले 2007/2008 मधील व 2008/2009 मधील त्‍यांच्‍या 2 लाखावरील क्‍युम्‍युलेटीव्‍ह बोनसचे अनुक्रमे रु.60,000/- व रु.70,000/- रकमेची मागणी केली आहे.

 

2. तक्रारकर्ता यांनी त्‍यांच्‍या पत्‍नीसह विरुध्‍द पक्षकार कडे मेड‍िक्‍लेम पॉलीसी न.123/00/48/2007/7915 मार्च 2001 मध्‍ये मेडिक्‍लेम घेतला होता व सदरच्‍या पॉलीसीमध्‍ये नियम 6 वर

..2 ..

क्‍युम्‍युलेटिव्‍ह बोंनस देण्‍याची अट 'Sum insured under the policy shall progressively increased by 5% in as per respect of each claim free years of insurance subject to a maximum accumulation of 1o claim free years of Insurance?

सदर पॉलीसी दर पाच वर्षांनी क्‍युम्‍युलेटिव्‍ह बोनससकट नवनिर्मित केली जात असे परंतु 2007 मध्‍ये अक्‍युम्‍युलेटिव्‍ह बोनस पॉलीसीच्‍य एकंदर रु.2,00,000/- रकमेबरोबर बुडाला व नवीन नवनिर्मित पॉलीसीची रक्‍कम रु.3,00,000/- अशी नवीन नियम एकतर्फी तयार करुन विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना सुरू केली. याबद्दल तक्रारकर्ता यांना आक्षेप आहे. त्‍यांना त्‍यांच्‍या जुन्‍या पॉलीसीप्रमाणेच नियम ठेवावेत असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. व त्‍यानुसार अक्‍युमलेटिव्‍ह बोनस 5% प्रमाणे मिळण्‍याची मागणी त्‍यांनी केली आहे.


 

3. विरुध्‍द पक्षकार यांनी त्‍यांची लेखी कैफीयत निशाणी 7 वर दाखल केली आहे. यामध्‍ये त्‍यांनी सदरची नवनिर्मित पॉलीसीचा प्रीमियम तक्रारकर्ता यांनी भरलेला आहे म्‍हणजे तक्रारकर्ता यांना या नवीन पॉलीसीचे नियम व अटी मान्‍यच असल्‍या पाहीजेत अन्‍यथा तक्रारकर्ता सदर पॉलीसी नाकारु शकले असते व या अटी व नियम मान्‍य नसल्‍यास ते पॉलीसी होल्‍डर न रहाता बाहेर पडु शकतात. असे विरुध्‍द पक्षकार यांचे म्‍‍हणणे आहे. त्‍यामुळे सदर नियम एकतर्फी विरुध्‍द पक्षकार तर्फे बनवलेले नसुन ते तक्रारकर्ता यांनाही मान्‍य होते.


 

4. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा, कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तिवाद पडताळुन पाहीली असता मंचापुढे पुढील प्रश्‍न उपस्थित होतो.

प्र. विरुध्‍द पक्षकार यांनी जुन्‍य पॉलीसीप्रमाणे अक्‍युमलेटिव्‍ह बोनस न देता नवीन अटी नवनिर्मित पॉलीसीमध्‍ये जादा धालणे योग्‍य व कायदेशीर आहे का?

वरील प्रश्‍नाचे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांया देत आहे.

कारण मिमांसा

तक्रारकर्ता यांची मेडिक्‍लेम पॉलीसी मार्च 2001 पासुन

.. 3 ..

रु.2,00,000/- ची घेतलेली आहे. परंतु विरुध्‍द पक्षकार यांनी 2007 मध्‍ये एकतर्फा नियम बदलुन अगोदरचे अक्‍युमलेटिव्‍ह बोनस न देता पॉलीसी 3 लाखाची केली व तक्रारकर्ता यांचेवर आर्थिक बोजा वाढवला. अशाप्रकारे मान्‍यता नसलेली पॉलीसी नवनिर्मित करणे योग्‍य व कायदेशीर नाही. त्‍यामुळे मंचाच्‍या मते जुनी पॉलीसी समान अटी व नियमानुसारच नवनिर्मित केली गेली पाहीजे व त्‍यानुसार तक्रारकर्ता यांना 2007/2008 तसेच 2008/2009 मधील एकंदर रक्‍कम रु.2,00,000/- वरील क्‍युमलेटिव्‍ह बोनस मिळणे योग्‍य होईल म्‍हणुन हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे.

    अंतीम आदेश

    1.तक्रार क्र.576/2008 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.500/-(रु. पाचशे फक्‍त) विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना द्यावा व स्‍वतःचा खर्च सवतः सोसावा.

    2.विरुध्‍द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांच्‍या मेडिक्‍लेम पॉलीसी नं. 123/00/48/2007/7915 मध्‍ये नव‍निर्मित करुन जुन्‍या पॉलीसीतील. अटीप्रमाणेच नियम व अटी चालवुन रु.2,00,000/- रकमेवरचा अक्‍युमलेटिव्‍ह बोनस 2007/2008 तसेच 2008/2009 मधील तक्रारकर्ता यांस द्यावा. या आदेशाची पुर्तता ह्या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 2 महिन्‍याच्‍या आत करावे.

    3.विरुध्‍द पक्षकार यांनी मानसिक त्रासाचे व नुकसान भरपाईचे रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) तकारकर्ता यांस द्यावेत.

    4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍‍यात यावी.

    5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्‍यांकरिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्‍वरित परत घ्‍याव्‍‍यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.

    दिनांक – 05/12/2009

    ठिकान - ठाणे


 


 

    (श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील)

    सदस्‍य सदस्‍या अध्‍यक्षा

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे